।।श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन पत्रात. मागच्या पत्रात मी एखाद्या ठराविक भाषे पेक्षा “दिल की भाषा” किती महत्वाची या बद्दल माझे विचार तुम्हाला सगळ्यांना सांगितले. ते पत्र वाचायचं राहिलं असेल तर नक्की वाचा. मी काही नवीन लोकांना भेटलो, कुठले वेगळे अनुभव आले की पत्र लिहिणं इतकं सोप्प होतं ना. त्या पैकीच आजचं एक पत्र आहे.
आणि हो पत्र लिहिताना जर कुठे ब्रॅकेट मधे लिहिलेलं दिसलं ना तर असं समजा ते माझं मन बोलत आहे. माझा Self Talk चालूच असतो नेहिमी. मो या वेळेस पासून विचार केला की त्याला लपवावं कशाला? तुम्ही पण तो वाचू शकता. (आला मोठा शहाणा! सांगतो आहे असा जसं कधी काही लपवत नाही.)
मी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे की मी बिझनेस करत असल्या मुळे नवीन नवीन लोकांना भेटतं रहाणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझी काय कोणाचीच बिझनेसची गाडीचं पुढे जाणार नाही जर नवीन लोकांना भेटणं बंद केलं तर. नवीन ओळखी होणं आणि असलेल्या ओळखींनमधून अजून चांगल्या पद्धतीने काम करणं हे नकळत बिझनेस करणाऱ्या व्यक्तींचा अंगवळणी पडलेलं असतं.
तर या आठवड्यात मला छत्रपती संभाजी नगर मधले एक मोठे उद्योजक मिलिंद कंक सर आणि त्यांचे काही टीम मेट्स ह्यांच्या सोबत बिझनेस मधल्या प्रोसेस या विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली. मिलिंद सर हे ६३ वर्षांचे उत्साहाने भरलेले व्यक्ती आहेत. कधी कधी मला आत्ता आत्ता पास झालेले विद्यार्थी असतात ना त्यांचा उत्साह कमी वाटतो तितके सर काहीतरी नवीन करण्यासाठी उत्साहात असतात. आणि त्यांचा तरुण मुलांसोबत काम करण्याचा उत्साह तो वेगळाच.
तरुणांसोबत काम करायचा उत्साह का मला महत्वाचा वाटतो ते आधी सांगतो. माझ्या सारखे तरुण मुलं (स्वतःला तरुण म्हणतो तू?) हे इथे लिहिलेलं वाचू नका माझं मन कधी कधी असं मधे बोलतं असतं. तरुण मुलांनाच काहीतरी नवीन करूया अशी इच्छा डोक्यात येतं असते. आता अनुभव कमी आणि काहीतरी वेगळं आणि मोठ्ठ करण्याची धडपड ह्यामधे चुका तर होणारचं. मिलिंद सरांसारखे लोकं सोबत असले की अश्या चुका कमी होऊ शकतात किंवा चुकले तरी त्यातून मार्ग कसा काढावा ह्याचं काही मार्गदर्शन मिळू शकतं.
जगातलं सगळ्यात सोप्प काम कुठलं माहिती का? माझ्या मते काहीच न करणं किंवा थोडं फार करून जे कोणी काही तरी करण्याचा प्रयत्न करतं आहे त्याला नावं ठेवणं ह्या पेक्षा सोप्प काम जगात कुठलंही नाही. हे सोप्प काम खूप जणं स्वीकारतात. ते करण्यात त्यांचा संपूर्ण वेळ जातो
पण खरोखर काम करण्यासाठी लोकांना एकत्र करावं लागत, काम ठरवावं लागतं, त्या कामाची प्लॅनिंग करावी लागते, ठरवलेल्या प्रमाणे होतं आहे प्रत्येकाकडून हे बघावं लागतं, ते काम करण्यात चुका झाल्या तर त्या स्वीकारून, पचवून किंवा त्याचे परिणाम भोगून काम बदलणं, त्याच्या मधे चुका होऊ नयेत असे बदल घडवणं असे कितीतरी कामं असतात. तुम्ही स्वतः विचार करा जो कोणी अश्या कामांमध्ये बिझी असेल त्याला कुठे वेळ मिळणार कोणालातरी वाईट बोलण्याचा, चुघल्या करण्याचा. रिकाम्या लोकांची कामं आहेत ही, कोणाबद्दल वाईट विचार करणं, कधीतरी ५ वर्षांपूर्वी झालेलं नुकसान आठवतं बसणं, एखाद्या बद्दल मनात वर्षोन वर्ष द्वेष धरून बसणं.
असो हा वेगळा विषय आहे. आपण परत कधी तरी ह्या वर बोलू. पण मिलिंद कंक सर असो किंवा त्यांच्या सारखेच मोठे उद्योजक असो कोणीही निवांत बसून पाहिजेल त्याला नावं ठेवण्यात वेळ घालवू शकतात. पण ते असं करतं नाहीत. कोणावरही बोट दाखवून आपण मोठे होऊ शकतं नाही. हे सांगण्यासाठी मी मागचं सगळं लिहिलं.
तर मी जेंव्हा मिलिंद सरांना भेटलो त्या हॉल मधे बिझनेस करणारे ८-१० जण होते. ज्यांचे वेगवेगळे बिझनेस होते. पण छोट्या बिझनेस कडून मोठ्या बिझनेस कडे जाताना काय काय प्रोसेस लागतात हे शिकण्यासाठी सगळे एकत्र आले होते. आणि मिलिंद सर आणि त्यांची टीम ते शिकवण्यासाठी तयार होती . (शिकवणारचं ना, त्यांचा बिझनेस चालू आहे. हे अजून एक साईड इनकम.) मी म्हणालो ना. माझं मन असं मधे मधे बोलत असता. इग्नोर करा. त्यांनी कुठलीही आमच्याकडून फी घेतली नाही. हे सगळं फुकट होतं. The only thing we all were paying there was our attention.
आता मी ना manufacturing इंडस्ट्री मधला एक मस्त कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. त्याचं नाव आहे PDCA.
P - Plan
D - Do
C - Check
A - Act
PDCA ही Manufacturing आणि बऱ्याच वेगवेगळ्या इंडस्ट्री मधली एक प्रॅक्टिस आहे. त्याला प्रॅक्टिस म्हणा, सवय म्हणा किंवा कन्सेप्ट म्हणा काहीही चालेल. ही पद्धत वापरून आपण आपल्या कामाची प्रोसेस इम्प्रूव्ह करू शकतो, आपली प्रोसेस अजून सोपी आणि कुठल्याही चुका होणार नाहीत अशी करू शकतो.
मी अश्या Manufacturing च्या गप्पा सुरु केल्या तर बरेच जणं म्हणतील की मी तर काही Manufacture करतं नाही. हे काही माझ्या कामाचं नाही. पण आपण सगळेच आहोत ना आपल्या आयुष्याचे Manufacturers. आणि नसलो जरी Manufacturer तरी आपण सगळे एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत कुठल्यातरी प्रोसेस ने जातो. ती प्रोसेस साधी, सोपी, सरळ, चुका होणार नाहीत अशी व्हावी वाटतं असेल तर प्रत्येकाने PDCA हे शिकलं पाहिजे. आजच्या पत्रात मी आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरणं घेऊन सांगतो की कसे आपण PDCA वापरू शकतो ते.
आता प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक उदाहरणं सांगतो जे म्हणजे इन्शुरन्स. पर्सनल असेल, कार असेल, बाईक असेल, हेल्थ असेल पण आपण सगळे कुठले ना कुठले इन्शुरन्स वापरत आहोत. आता इन्शुरन्स वापरतो म्हणजे ते वर्षाला एकदा कधीतरी संपणार आणि आपल्याला पुन्हा एकदा नवीन वर्षाचं इन्शुरन्स घ्यावं लागतं. हे प्रत्येकाला माहिती आहे. पण तरीही किती जण इन्शुरन्स च्या रिन्यू करायच्या तारखा चुकतात? माझ्या ओळखीतले बरेच जण चुकतात.
ह्याच गोष्टीला PDCA मधे बसवलं तर ही गोष्ट खूप सोपी होते. मी सांगतो कशी. जर आपल्याला हे माहिती आहे की इतकी इतकी एक ठराविक amount भरायची आहे ती आधीच बाजूला ठेवा. बाजूला ठेवता येतं नाही खर्च होते का? तर मग त्याची FD करा, SIP करा, दुसऱ्या कुठल्या तरी बँकेत ठेवा पण आपली रिन्यू करायची amount माहिती पाहिजे आणि ती बाजूला असली पाहिजे.
विसरू नये म्हणून कंपनी पण खूप कॉल्स आणि मेसेज करतात. ते पण मेसेज, कॉल्स जर आपल्या बाकी एप्स आणि इमेल्स च्या गोंधळात हरवतं असतील तर एक रिमाईंडर लावा. झालं. प्लॅन केला, त्या प्लॅन साठी लागणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या, चेक केलं नेमकी कुठे गडबड होती आहे, आणि आता implement. इतकं केल्यावर का बरं कुठलीही रिन्यू डेट चुकती बरं. चुकू शकणार पण नाही.
प्रत्येकाचा मार्ग वेगळा वेगळा असू शकतो, रिझल्ट आला पाहिजे हे महत्वाचं. मीच बरोबर सांगतो आहे, हे मी म्हणतं नाही पण प्रोसेस आहे का जी तुम्हाला रिन्यू डेट च्या आधी आठवण करून पेमेंट पूर्ण करून घेईल? आता माझे काका आहेत ना त्यांचा PDCA म्हणजे माझी काकू आहे. काकू बरोबर सगळी आठवण करून पेमेंट करून घेते. मजेचा भाग सोडा पण अश्या प्रोसेस स्वतः बनवायला शिका. तेच आहे खरं PDCA.
आणि परवा मी मिलिंद सरांना भेटलो म्हणालो ना त्यांनी तर PDCA चाय पुढे अजून एक गोष्ट जोडली ती म्हणजे I. I म्हणजे Innovate. प्लॅन, डू, चेक, ऍक्ट अँड इंनोव्हेट. काहीतरी त्यामधे स्वतःचा एक सुगंध म्हणतात ना. तो असला पाहिजे. स्वतःच एक वेगळेपण असलं पाहिजे. मग खरी मज्जा आहे.
आपल्या मोबाईल मधे आजकाल अशी सोय आहे ज्या मुळे आपण एकही बटन न दाबत किंवा कुठेही टच न करता मेसेज करू शकतो. मोबईल घरी असलेल्या वाय-फाय ला कनेक्ट झाला की बरोबर एक मेसेज आईबाबांना जातो की मी घरी आलो आहे. असे काही ऑटोमॅटिक प्रकार माझे काही मित्र वापरतात जे घरच्यांपासून दूर रहातात. राहिला कधी गडबडीत मेसेज किंवा फोन करायचा तरी आईला बरोबर मेसेज मिळून जावा म्हणून.
व्हाट्सएप्प ला तुम्ही बिझी असले तर आपोआप मेसेज जातो. आपली कर कुठे ठराविक स्पीड च्या वर गेली तर मेसेज येतो. एका ठराविक खर्च झाल्यावर बँकेचे ऍप्प आपल्याला हे आठवण करून देते की खर्च नीट करा. असे एक नाही कितीतरी उदाहरणं आहेत.
आता हा ई-मेल तुम्हाला सकाळी ९ वाजता तुमच्या इनबॉक्स मधे मिळतो प्रत्येक रविवारी न चुकता. तुम्हाला काही जणांना वाटतं असेल की मी अगदी त्याच वेळेला ई-मेल पाठवतो म्हणून. पण पुन्हा एकदा हा ई-मेल
(पत्र) नक्कीच मी लिहिला आहे पण तो सेंड करायचं काम एक सॉफ्टवेअर माझ्यासाठी करतो.
असे माझे किती तरी मित्र आहेत ज्यांना मी मागच्या ४ वर्षांपासून वाढदिवसाला न चुकता ई-मेल करतो. हे ई-मेल त्याच्या वाढदिवसाला सेंड व्हावे अशी सोय केलेली आहे. खूपदा त्यांचा रिप्लाय आल्यावर मला समजतं की आज वाढदिवस आहे म्हणून मग मी फोन करून गप्पा मारतो.
आजच्या पत्राचा मुद्दा इतकाच आहे की जरी तुम्ही बिझनेस करणारे नाहीत तरी कोणाला आपल्या आयुष्यात जास्तीचा वेळ नको आहे. प्रत्येकाला वेळ कुठे तरी वाचवून तो कुठे तरी, कोणाला तरी देण्याची इच्छा आहे. तर हे शक्य करण्यासाठी PDCA अँड I म्हणजेच इंनोव्हेट शिकून वापरा आणि रिकाम्या वेळेत मला रिप्लाय करायला विसरू नका.
भेटूया पुढच्या पत्रात पुन्हा एखादा असाच छान विषय घेऊन.
तो पर्यंत तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आपल्या आपल्या कामात व्यस्थ रहा.
0 Comments