हॅलो, मग? how’s the josh? high ना? हा मग तसाच असू द्या आणि नसेल तर ही गोष्ट ऐका. ही गोष्ट तुमच्या आयुष्यात पुन्हा जोश भरेल. कोणती गोष्ट? अहो तीच नेहमीची आपल्या सगळ्यांची. सामान्य माणसाची. त्याच्या ध्येयाची आणि ध्येयप्राप्तीसाठी त्यानं केलेल्या प्रयत्नांची.
नाही कळलं? अहो… मागच्या भागात नाही का आपण आर्यन आणि त्याचं बॅडमिंटन प्रेम पाहिलं, त्याचा जोश पाहिला, त्याची हार पाहिली. त्यानं त्याच ध्येय सुद्धा तेव्हाच ठरवून टाकलं. ह्या भागात आपली तीच गोष्ट पुढे सरकते आणि शेवटपर्यंत येऊन पोहोचते. जर मागचा भाग तुम्ही ऐकलं नसेल तर लिंक खाली डिस्क्रिपशन मध्ये आहे. तो ऐकून हा भाग सुरु करा.
तर… मागच्या भागात घडलेल्या घटनेनंतर जवळपास ४-५ महिन्यांनी एक मोठी टूर्नामेंट अनाऊन्स झाली होती. आर्यननं ह्याही टूर्नामेंट मध्ये भाग घेतला होता. आज पुन्हा तो त्याच कोर्ट वर उतरला होता जिथे तो आपल्या पहिल्याच मॅचमध्ये हरला. गर्दी आजही तेवढीच होती. कदाचित जास्तच असेल. त्या दिवशी ऑडियन्स मधून येणारे आवाज, टाळ्यांचा गजर सगळं त्याला त्याच्या स्वतःसाठी वाटत होतं. पण आज मात्र आर्यन खूप शांत दिसत होता. तो एकटा बसला होता.
तो आज त्या टाळ्यांनी विचलित होत नव्हता. नाही त्याची काही चलबिचल होत होती. प्लेयर्स, त्यांचे मित्र किंवा साथीदार असे सगळे एकमेकांशी गप्पा मारत होते किंवा काहीतरी डिस्कस करत होते. कोणाचंही आर्यनकडे लक्षच नव्हतं. मग हळू हळू नावं अनाऊन्स होऊ लागली तश्या मॅचेस सुरु व्हायला लागल्या. प्रत्येकजण जिंकण्यासाठीच आज कोर्टवर उतरला आहे असं वाटू लागलं होतं. एखाद दुसरी मॅच सोडली तर जवळपास सगळ्याच मॅचेस उत्कंठावर्धक झाल्या. स्पर्धक एक एक फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीत प्रवेश करत होते.
आर्यनची अजून पहिलीच मॅच व्हायची होती. मग थोड्या वेळात आर्यनचं नाव अनाऊन्स झालं. आर्यन त्याचं किट बाजूला ठेवून त्यातून रॅकेट काढून उभा राहिला. आर्यनच्या कोर्टवर येण्याआधी जे आवाज, ज्या टाळ्या येत होत्या त्या अचानक बंद झाल्या आणि त्या जागी लहान आवाजात कुजबुज ऐकू येऊ लागली. तिकडे लक्ष न देता आर्यन आत आला.
पण तो जसा आत आला तसा बाकी प्लेयर्स मध्ये एकदम हशा पिकला. बाकीचे प्लेयर्स सगळे त्याच्याकडे बघून हसू लागले. ते हसत होते कारण आर्यन वेट्स बांधून आला होता. हो तेच वेट्स जे त्यानं ४-५ महिन्यांपूर्वी एका स्पोर्ट्सच्या दुकानातून विकत घेतले होते. आर्यननं एकदा ऑडियन्स मध्ये बघितलं, एकदा सगळ्या प्लेयर्स आणि त्याच्या कोच कडे बघितलं आणि मग आपल्या पायाकडे बघितलं. त्यानं पायातले वेट्स काढले. तो पुन्हा सरळ उभा राहिला. त्यानं आपले डोळे बंद केले. रॅकेट भोवती मूठ घट्ट आवळली आणि पुन्हा डोळे उघडले.
मॅच ला सुरुवात झाली. आर्यनचा ऑपोनन्ट सर्विस करत होता. त्यानं सर्विस केली आणि पुढच्याच क्षणी ते शटल त्याच्याच जवळ तिप्पट गतीनं परत आलं. ऑपोनन्टला काही कळायच्या आत आर्यनचा पहिला पॉईंट झालेला होता. मग पुढे शेवटपर्यंत आर्यननं मागे वळून बघितलंच नाही. त्याच्या पायात रॉकेट सारखी गती आली होती. तो इतक्या चिकाटीनं खेळत होता की ऑपोनन्टला थकायला व्हायला लागलं होतं. आर्यनचा गेम इतका सुंदर होत होता की त्याचा पॉईंट होईपर्यंत प्रेक्षक चिडीचूप शांत बसायचे आणि त्यानं एकदा का पॉईंट केला की लगेच टाळ्या वाजवायचे, आवाज करायचे.
पहिल्या ऑपोनन्टला आर्यननं असं सहज हरवलं. मग दुसरा आला. आपण थकलो तर हा ऑपोनन्ट आपल्याला सहज हरवणार हे आर्यनच्या लक्षात आलं होतं त्यामुळे त्यानं त्याचा गेम बदलला. अश्याप्रकारे आर्यननं कधी शक्तीच्या बळावर तर कधी युक्ती वापरून सगळ्या ऑपोनन्ट्सना हरवलं.
थोड्या वेळानं बक्षीस समारंभ होणार होता. आर्यन एका खुर्चीवर येऊन एकटाच वाट बघत बसला होता. आजूबाजूचे सगळे प्लेयर्स त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. आणि मग अचानक त्याच्या बाजूला विवेक येऊन बसला. हा तोच मुलगा होता ज्याच्याकडून आर्यन त्याची पहिली मॅच हरला होता आणि आज शेवटच्या मॅच मध्ये आर्यननं त्याला हरवलं होतं.
विवेक, “हेलो.”
आर्यन, “हाय”
विवेके, “काँग्रॅच्युलेशन्स! मजा आली आज गेम मध्ये.”
आर्यन, “थँक यु! मलापण छान वाटलं.”
आर्यनच्या पायाला पुन्हा वेट्स पाहून विवेक म्हंटला, “तू हे वेट्स घालून का फिरतोस सारखं? तुला पायाला त्रास होत नाही का?”
वेट्स कडे बघून आर्यन म्हंटला, “नाही. आता नाही होत त्रास.”
विवेक आश्चर्याने, “आता नाहीत होत म्हणजे?”
आर्यन, “म्हणजे आधी व्हायचा. २-३ महिन्यांपूर्वी. आता ते वेट्स पायचाच भाग वाटतात.”
विवेक, “पण घालतोस कशाला? स्टाईल म्हणून?”
आर्यनला एकदम हसू आलं तो म्हणाला, “खूप लोकांना तसंच वाटलं होतं पण ह्याच वेट्स मुळे मी आज जिंकलोय.”
विवेकला काहीच कळत नव्हतं, “काय? कसकाय पण?”
आर्यन, "मी जेव्हा माझी पहिली मॅच हरलो ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं. काय चुकलो? का चुकलो? काहीच कळायला मार्ग नव्हता. इव्हन मी चुकलोय असंही मला वाटत नव्हतं. मला फक्त एवढंच कळलं होतं की मॅच खेळण्याच्या आधी मी खूप जोश मध्ये होतो आणि त्याच जोश मध्ये ती मॅच खेळलो पण तू त्यादिवशी माझा गेम पाहून स्वतःचा गेम बदलालास आणि मग मी थकायला लागलो. आणि जसा मी थकायला लागलो तास माझा सगळा जोश पण उतरत गेला. मॅच जिंकण्याचं स्पिरिट माझ्यात उरलंच नव्हतं उलट कधी एकदाची मॅच संपतीये असंच वाटत होतं मला."
विवेके, “हो… पण मग तुझ्या हरण्याचा किंवा वाईट वाटण्याचा ह्या वेट्स शी काय संबंध?”
आर्यन, “सांगतो. मॅच संपली आणि तसाच घरी निघून गेलो. घरी आई बाबांशी पण काहीच बोललो नाही. रूमचा दरवाजा लावून घेतला. माझ्या मनात बरेच विचार घोळत होते. म्हणजे आता आई बाबा काय म्हणतील इथपासून तर बॅडमिंटनचा विषयच सोडून देऊ इथपर्यंत. तेवढ्यात माझं लक्ष माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका मुलाकडे गेलं. तो त्याच्या टेरेस वर व्यायाम करत होता. तेव्हा माझ्या डोक्यात बल्ब पेटला.
कोच पहिल्याच दिवसापासून फिटनेस कडे लक्ष द्यायला सांगत होते पण आपण आळस केला, ज्या लोकांना मी स्पोर्ट्स मधला आयडॉल मानतो ते सगळे सुद्धा फिजिकली खूप फिट आहेत. आणि फक्त फिटनेस नाही तर तुमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट होती जी माझ्याकडे नव्हती. सातत्य. माझा गेम कधी चांगला व्हायचा. कधी वाईट. पण मी तो चांगलाच राहावा आणि अजून चांगला होत जावा ह्यासाठी प्रयत्नच करत नव्हतो.
मला कळलं होतं की हीच माझी खरी चूक होती. मी तेव्हाच माझं ध्येय ठरवून टाकलं आणि कामाला लागलो. रूमचा दरवाजा उघडला. घरातून बाहेर पडलो. एका स्पोर्ट्सच्या दुकानात गेलो आणि हे दोन किलोचे वेट्स विकत घेतले. त्यादिवसापासून आजपर्यंत मी हे वेट्स सतत घालून फिरतो.”
विवेक, “सही यार! म्हणजे हे तेव्हां पासून काढलेच नाहीत तू वेट्स? आणि तुला खरं खरं सांगू?”
आर्यन,”हो अरे चिल. बोल ना बिनधास्त.”
विवेक, “मी तुला खूप अंडरएस्टीमेट केलं होतं. त्या दिवशी तुला खूप इजिली हरवल्यानंतर आज तुला परत पाहून मला वाटलं हा आज काय करणार? पुन्हा तसंच फॉर्म मध्ये सुरुवात करेल आणि नंतर नंतर थकून जाईल. तू माझ्या वर्दी ऑपोनन्टच नाहीस असं वाटलं होतं मला. पण तू ह्या गेममध्ये खूपच मस्त खेळलास यार… पण मला ह्या वेट्सबद्दल अजून सुद्धा एक प्रश्न आहे…”
आर्यन, “बोल ना .”
विवेक, “तू वेट्स विकत का घेतले ते कळलं पण तू ते सतत का घालून फिरतोस मग? मी पाहिलंय लोकांना आणि बऱ्याचदा मी स्वतः सुद्धा हसलोय तुझ्यावर. तुला काहीच वाटत नव्हतं का त्याचं?”
आर्यन, “मी खरंतर ते वेट्स फक्त व्यायाम करण्यापुरतंच वापरणार होतो पण नंतर मी विचार केला की असं केलं तर तो पेन, तो मोटो तेवढ्यापुरताच राहील. मला ध्येय प्राप्त करण्यापर्यंतची प्रोसेस जगायची होती म्हणून मग मी ठरवलं की कितीही काही झालं. कितीही काही दुखलं तरी हे वेट्स आता पायातून उतरवायचे नाहीत.”
विवेक, “घरी गेल्यावर पण नाही?”
आर्यन, “नाही. मग ती चीटिंग झाली असती ना… माझे पाय सुरुवातीला खूप दुखले. खूपदा असं झालं की बस आता काढून ठेवू थोडा वेळ आणि थोड्या वेळानी परत घालू. मी तसं करायला गेलोसुद्धा पण जेव्हा जेव्हा मला असं वाटलं ना की मी ‘भाग मिल्खा भाग’ मधले मिल्खा सिंग चे ट्रेनिंग चे सीन्स बघायचो. त्यांना ट्रेनिंग करताना होत असलेला त्रास पाहून मला मग माझा त्रास काहीच नाही असं वाटू लागलं होतं.
मग मी आरश्याजवळ जायचो आणि रोज स्वतःलाच आपल्या ध्येयाची आठवण करून द्यायचो. ‘तुला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठीच खेळायचंय’ आणि हसण्याबद्दल म्हणशील तर असं कोणीच नव्हतं जे माझ्यावर हसलं नाही. म्हणजे माझ्या आई-बाबांपासून, मित्र, टीचर्स, आपले कोच आणि बॅडमिंटन चे मित्र सगळेच. इव्हन मी रस्त्यावरून जाताना रस्त्यावरचे लोकं सुद्धा मला हसत होते. पण मला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. कारण माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता आणि तो म्हणजे ही टूर्नामेंट जिंकणं.”
विवेक, “आणि तू ती जिंकलास. क्या बात है यार. मला आता मॅच हरल्यासारखं वाटतंच नाहीये. आज हारलो असेल पण उद्या कसं जिंकावं हे तुझ्या स्टोरी मुळे समजलं. थँक यु यार…”
तेवढयात आर्यनचं नाव अनाऊन्स झालं. तो समोर गेला. त्यानं जजच्या हस्ते पारितोषिक घेतलं. ते पारितोषिक घेताना अजूनही आर्यनच्या पायात ते वेट्स तसेच होते. पण आता बाकीचे प्लेयर्स त्याच्यावर हसत नव्हती तर त्याच्या अचिव्हमेंटचं कौतुक करत होती. त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होती. विवेक सुद्धा आर्यन साठी टाळ्या वाजवत होता.
मी कुठेतरी एक quote वाचला होता, “And those who were seen dancing were thought to be insane by those who could not hear the music.” म्हणजे नाचणारी लोकं त्या लोकांना वेडी वाटली ज्यांना ती धुन ऐकूच येत नव्हती ज्यावर ती लोकं नाचत होती. हा quote सांगण्यामागचा उद्देश असा की आपण अपयश आलं की त्याच खापर एकतर नशिबावर किंवा कोणीतरी दुसऱ्यावर फोडून मोकळं होतो. आपण स्वतः कदाचित कुठेतरी चुकलो असू, कुठेतरी कमी पडलो असू हा विचारच आपल्या मनात येत नाही.
कारण आपण जे काही काही करतो ते टेम्पोररी आलेल्या जोशात करतो. पण जेव्हा तुम्ही त्या जोशाला बाजूला ठेवून होश मध्ये तुमचं ध्येय निश्चित करता, ते प्राप्त करण्यासाठी कशाचीही फिकीर न करता वेडं होता, चिकाटीनं मेहनत करता ना तेव्हा तीच मेहनत तुम्हाला यश मिळवून देत असते.
जसं आर्यन च्या पायामधलं वेट तो कधीच काढत नव्हता कारण त्याला त्याच ध्येय दिसतं होतं तर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काय बांधून ठेवलं आहे? त्याचा विचार करा आणि होश मध्ये काम करा. ते पण सातत्याने.
तर २०२४ मध्ये जाता जाता जोश मध्ये नाही तर होश मध्ये राहून आपलं ध्येय मिळवूया इतकंच ठरवा.
मूवी बघून जोश मध्ये पटकन ध्येय मिळण्याचा,
सुटला आहे सगळी कडे वारा,
पण जोश नको, होश मध्ये राहून काम करा असं सांगणाऱ्या,
अजिंक्यचा तुम्हाला सगळ्यांना सायोनारा.
लेखक: ऋषिकेश भावठाणकर आणि अजिंक्य कवठेकर
-----------------------------------------------
0 Comments