वास्तू नेहमी तथास्तु म्हणतं असते!

।। श्री ।।


#७

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            नुसतं बघणं बघणं. रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओ, टीव्ही, चित्रपट, न्यूज, ऍडव्हर्टाइसमेन्ट बस्स. अजून किती स्क्रीन बघणार? संकल्प म्हणतात ना मी तोच केला आहे. या वर्षी मी कमीत कमी स्क्रीन बघण्यात वेळ घालवेल आणि जास्तीत जास्त वेळ लिहिण्याला देईल. (हे लिहिताना माझं मन, "पण लिहिताना सुद्धा तू स्क्रीन कडेच बघतो आहेस.")

वाचनाचा कंटाळा करणारे असेच पुस्तक वाचतात.

           तुमचं पण मन असंच मधे मधे बोलतं राहतं का? असो मनाचं कामच आहे विचार करणं. त्याला थांबवण्यापेक्षा दुसरीकडे वळवण्याचा मी नेहिमी प्रयत्न करतो. तर पत्र क्रमांक ७ मधे आपलं स्वागत आहे. मागचं पत्र वाचायचं राहिलं असेल तर इथे वाचू शकतात. 

          मी "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड" हे पुस्तक तुम्हाला काही ब्लॉग्स मधे समजून सांगत आहे. काळजी करू नका मी काही पूर्ण पुस्तकं टाईप करून पाठवत नाहीये. थोडक्यात मला समजलेलं, त्या पुस्तकातलं मी वापरलेलं असं काही सगळं एकत्र करून इथे मांडतो आहे. हे सगळे ब्लॉग्स वाचून तुम्हाला हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची, नाही नाही वाचण्याची नाही तर हे पुस्तक अभ्यास करण्याची इच्छा व्हावी इतकाच माझा उद्देष आहे. आणि तो पूर्ण होईल ह्याची मला खात्री आहे.

मागच्या भागात आपण पाहिलं की कसं जुन्या शिकवणीतून विचार निर्माण होतात मग तश्या क्रिया आणि तसे परिणाम. या भागात समजून घेऊया की कसे हे विचार निर्माण होतात? तीन कारण आहेत ज्या मुळे हे विचार निर्माण होतात.  

१. सोबतच्या लोकांच बोलणं ऐकून -  
२. मोठ्यांची नक्कल करून - 
३. काही ठरावीक प्रसंगावरून - 

            आता लेखक हार्व एकर पान नंबर २८ ते ५५ अशी २७ पानं ह्या तीन गोष्टी समजावून सांगतात. जर हे पुस्तक वाचायला घेतलं तर हा भाग चुकूनही चुकवू नका म्हणून सांगतो आहे. आणि मी हे २७ पानं तुम्हाला अगदी काही ओळीत समजावून सांगणार आहे तर चुकूनही असा विचार करू नका कि पुस्तक समजलं. हे पुस्तक प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. 

आपले विचार कसे काय सोबतच्या लोकांच्या बोलण्यावर अवलंबून असतात?



        तर हा भाग लेखक खूप वेग वेगळे उदाहरणं देऊन सांगतात. तुम्ही लहानपणी कधी पैश्याबद्दल असं ऐकलं आहे का? की पैसा हा सगळ्या चुकीच्या गोष्टींचा मूळ आहे, श्रीमंत लोकं म्हणजे चुकीच्या मार्गांनी पैसा कमावलेले लोकं असतात, पैश्याने आनंद विकत घेता येत नाही, सगळेच श्रीमंत होऊ शकत नाहीत इतका पैसाच जगात नाही, माझ्या घरी पैसा काय झाडाला उगवतो का? आणि सगळ्यात जास्त ऐकलेलं हे आपल्या ऐपतीच्या बाहेरचं आहे. 
        आता हे जर सगळं तुम्ही लहान पणापासून ऐकलं असेल तर हे सुप्त मनात (Subconcious Mind) जाऊन बसतं. आणि हीच पुढे जाऊन पैश्याची ब्लू प्रिंट बनते. आता लेखकांनी लिहलेलं जरूर वाचा पण मी सोप्प सांगू का जे माझी आई मला लहान पाणीपासून शिकवते? 

वास्तू नेहमी तथास्तु म्हणतं असते!

        हे कदाचित तुम्ही पण ऐकलं असेल. वास्तू नेहमी तथास्तु म्हणतं असते, तर चांगलं बोल, शुभ बोल. शब्द हे एखाद्या मंत्रा पेक्षा कमी नसतात. तर ते जरा जपूनच वापरावे. मी नाही म्हणत वाईट अनुभव येत नाहीत किंवा येणारच नाहीत. येतील पण पैश्या बद्दलचा वाईट अनुभव आला की सगळे श्रीमंत हे चोर असतात हे बोलणं काही बरोबर नाही. कुठल्या व्यक्ती कडून जर चुकीचा अनुभव आला तर, "जगात एकही प्रामाणिक व्यक्ती माझ्या वाट्याला नाही." हे बोलणं योग्य नाही. हे बोलून तुम्ही भविष्यात येणार एखादा प्रामाणिक व्यक्ती, त्याचाही रस्ता बंद करत आहात. 
        तर हा भाग तुम्ही पुस्तकात नक्की वाचा आणि आज पासून मी पैश्याबद्दल कुठलीही चुकीची गोष्ट बोलणार नाही हे स्वतःशी  पक्क करा. 

आपण कळत नकळत मोठ्यांची नक्कल करायला लागतो आणि तसेच विचारही!


         विचारांची नक्कल करणे याला लेखक मॉडेलिंग म्हणतात. हे मॉडेलिंग समजावून सांगताना त्यांनी दोन उदाहरणं दिले आहेत जे फारच कमाल आहेत. सगळ्यात आधी तर ते एक इंग्लिश मध्ये बरेचदा वापरली जाणारी फ्रेज सांगतात. वाक्प्रचार. Monkey see Monkey Do! म्हणजेच एकाचं बघून दुसरा पण तेच करू लागतो. लेखक सांगता माकडांसारखेच माणसं पण कमी नाहीत. सफरचंद झाडापासून दूर जाऊन पडत नाही. त्याच्या खालीच पडतं. 
        इथे ते उदाहरण त्यांच्याच बायकोचं देतात. एकदा जेवणं बनवतांना ते बायकोला विचारतात की, "तू हॅम (एक नॉन-व्हेजचा प्रकार) बनवताना दोन्ही बाजूनी का बरं कापते?" ती सांगते कारण माझी आई पण असंच बनवतं होती. त्याचं दिवशी तिची आई घरी जेवायला येणार होती तर त्या दोघांनी मिळून आईला विचारलं की, "तू हॅम बनवताना दोन्ही बाजूनी का बरं कापतेस?" तिची आई म्हणाली कारण मी माझ्या आई कडून हेच शिकले. 
        हे ऐकून तिघांनी मिळून आता आज्जीला फोन केला आणि तिला विचारलं की, "तू हॅम बनवताना दोन्ही बाजूनी का बरं कापतेस?" आणि तिच्या आज्जीनी उत्तर दिलं कारण, "माझ्या कडे असलेला तवा छोटा होता. मोठ तवा घेण्याइतकी आपली त्या काळात परिस्थिती नव्हती." 
        लेखकाचं हेच म्हणणं आहे की आपण सुद्धा पैश्याच्या बाबतीत आपल्या आई किंवा बाबा ह्यांच्या प्रमाणेच विचार करतो, त्यांचंच मॉडेलिंग करतो. इथे हार्व एकर त्यांच्या वडिलांचं पण उदाहरणं देतात. कशी त्यांची पैसे कमवणाची ब्लू प्रिंट ही आपोआप हार्व नी घेतली होती आणि मग ती कशी बदलली. 

का हे पुस्तक वाचावं ह्याचं अजून एक कारण ऐका!

        आता हे पुस्तक वाचून किंवा काही अनुभवामुळे तुम्हाला जरी समजलं की आपली पैश्याच्या बद्दल विचार करण्याची पद्धत ही आपल्या आई किंवा वडिलांसारखी आहे आणि जी चुकत पण आहे तरी तुम्हाला वाटतं का की आपण आई बाबांच्या समोर एक दिवस बसून त्यांना सांगू की, "आई-बाबा, ऐका मला जरा तुमच्या सोबत बोलायचं आहे. तुमची पैसे सांभाळण्याची पद्धत ही फार काही चांगली नाही. मला ती नाही आवडली. मी आज पासून काही वेगळ्या पद्धतीने पैसे सांभाळणार आहे. तुमची नक्कीच काही हरकत नसावी आणि तुम्ही मला समजून पण घ्याल. ओके? गुड नाईट." 

        विचार करून बघा असं घरच्यांसोबत तुम्ही बोललात तर काय होईल? तर हे बोलणं किंवा त्यांना सांगून दाखवणं हे काही उत्तर नाही आहे चुकीच्या ब्लू प्रिंट चं. आणि ज्यांनी आपल्याला मोठं केलं. ज्यांच्यामुळे आपण हे वाचू शकतो आहोत त्यांना कुठल्या शब्दात सांगणार की तुमची ब्लू प्रिंट चुकीची आहे ते. अश्या वेळेस काय करावं हे उत्तर या पुस्तकात मिळेल. म्हणून हे पुस्तक जरूर वाचा. 

मोबाईल बघायला वेळ आहे पण पुस्तक वाचायला नाही?

काही ठराविक प्रसंग आपल्याला तसाच विचार करायला लावतात.

        आयुष्यात असे काही प्रसंग घडतात  त्या मुळे माणूस स्वतःला कायमचा बदलून टाकतो. मी माझ्या ओळखीचं एक उदाहरणं सांगतो. एका घरामध्ये वडील त्यांच्या भावाच्या नावे घेतलेल्या लोनचे गॅरेंटर होते आणि तो ते लोन वेळेवर पूर्ण करू शकला नाही म्हणून पुढचा सगळा त्रास त्यांना म्हणजेच गॅरेंटरला झाला. हा अनुभव वडिलांना आला म्हणून त्यांनी घरी कोणालाही लोन काढणं किंवा लोन साठी गॅरेंटर राहणं ह्या दोन्ही गोष्टींना नकार दिला. 

        पुस्तकातलं एक उदाहरणं बघू, लेखक आपल्या बायकोच उदाहरणं देतात. त्यांची बायको लहान असताना त्यांच्या घराजवळ नेहिमी एक कॅन्डी विकणारा माणूस येत होता. ही छोटीशी मुलगी उद्या मारत आई कडे जायची आणि सांगायची की मला ती कॅन्डी विकत घेऊन दे. तेंव्हा तिची आई म्हणायची की, "सगळे पैसे तर बाबांकडे असतात जा त्यांना माग." मग ती छोटी मुलगी बाबांकडे जायची बाबा तिला काय जे १-२ रुपये म्हणा डॉलर म्हणा ते द्यायचे आणि ती कॅन्डी घेऊन खुश होत होती.

        ह्या एका ठराविक रोज रोज घडणाऱ्या प्रसंगामुळे त्या छोट्या मुलीच्या डोक्यात असा समज झाला की पैसे हे नेहिमी घरातल्या पुरुषाकडे असतात. आईकडे नसतात आई पैसे कमवतच नाही. म्हणून मोठी झाली तरी तिची आता वडील नाही, पण  नवऱ्या कडे पैसे मागायची सवय सुटली नव्हती. आणि कितीपण बिझनेस केला तरी पाहिजे तसं यश मिळतं नव्हतं कारण ब्लू प्रिंट वर एकच छापलं गेलेलं होतं की घरातले पुरुष पैसे कमावतात बायका नाही. आणि हे सगळं तिच्या नकळत झालेलं होतं. 

        हे खरोखर वाचण्यासारखं आणि समजावून घेण्यासारखं कारण आहे. 

हे घ्या माझ्याकडून एक फ्री गिफ्ट!

        इंटरनेट वर पैसे भरून आजकाल सगळं काही शिकता येतं. पण माझा विश्वास फ्री मधे उपलब्ध असलेल्या गोष्टींवर जरा जास्तचं आहे. आणि अश्याच फ्री उपलब्ध असलेल्या कामाच्या गोष्टी तुमच्या पर्यंत पोहचवायला मला आवडतं. हे जे लेखक आहेत ना हार्व एकर ह्याची स्वतःची वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईट वर बरेच कोर्स फुकट मध्ये उपलब्ध आहेत. 

        हा फ्री मध्ये उपलब्ध असलेला कोर्स नक्की बघा. Don't believe a thought you think! पुस्तक वाचा, पुस्तक वाचा मी सांगणारच पण आवडतंच नाही वाचायला अश्यांसाठी हा एक छोटा कोर्स जो कसा विचार करावा हे शिकवेल. आत्ताच पाहिलं ना आपण कसे विचार आपल्या रिझल्ट्स सोबत जोडलेले आहेत. तर वेळ काढून नक्की बघा. 

                    तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुप चा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

व्हॅट्सऍप चॅनेल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडली नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

2 Comments

  1. Wow.. thank you अजिंक्य..
    कमी शब्दात खूप छान समजून सांगितलं.
    Please keep it up.

    ReplyDelete
  2. Thank you. आमचे लेखं वाचत रहा.
    आवडले तर सगळ्यांना पाठवा, काही नाही आवडलं तर मला सांगा.
    पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete