आज फाईल इन्स्टॉल करूयात का? ती पण डोक्यात!!!

।। श्री ।।


#८

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत रहातात. तुम्ही इतके मनापासून वाचतात आणि मला मेसेज करतात ह्या मुळे लिहिण्याचा उत्साह वाढतंच जातो. आता मागच्या ४ ब्लॉग्स पासून मी एकाच पुस्तकाबद्दल लिहितो आहे. तर हा ब्लॉग "सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड" सिरीज चा शेवटचा ब्लॉग असणार आहे. ह्या पुस्तकात १७ अश्या फाइल्स दिल्या आहेत ज्या वापरून जर आपण पैश्या बद्दलचे निर्णय घेऊ लागलो तर आयुष्य सोप्प होऊन जातं.

मागचे भाग वाचायचे राहिले असतील तर मी इथे लिंक्स देऊन ठेवतो. 

भाग १:

काही वर्षांपूर्वी ह्याच पुस्तकाने मला निवडलं होतं! | माझाव्यापार (mazavyapar.blogspot.com)

भाग २:

हे पुस्तकं वाचाल तर तुम्ही खरंच वाचाल! | माझाव्यापार (mazavyapar.blogspot.com)

भाग ३:

मनामध्ये ही पैश्याची प्रिंट नेमकी बनते कशी? | माझाव्यापार (mazavyapar.blogspot.com)

भाग ४:

वास्तू नेहमी तथास्तु म्हणतं असते! | माझाव्यापार (mazavyapar.blogspot.com)

        ह्या भागात समजून घेऊया पहिली फाईल. पण बाकीच्या १६? बाकीच्या वाचा ना तुम्ही. मी सगळं कसं लिहून पाठवू? तुम्हाला जर स्वतःची आर्थिक बाजू बदलण्याची इच्छा असेल तर हे पुस्तक वाचलंच पाहिजे. इथे मी लिंक देतो आहे नक्की विकत घ्या. ३०० किंवा ४०० फार काही महाग नसतात पुस्तकं पण त्या मधलं ज्ञान ३००/४०० करोडच्या वर असतं हे मला शिकवलं गेलं आहे. 

"मला पुस्तकं वाचायला आवडत नाहीत रे" अश्या व्यक्तींना माझा रिप्लाय.

फाइल्स कश्या काम करतात बघा!

        आता लेखक, हार्व एकर एक उदाहरण देतात. माझी बायको मॉल मध्ये गेली आणि तिला २५% डिस्काउंट वर मिळत असलेली एक पिवळ्या रंगाची पर्स दिसली.
        या आधी सुद्धा लेखक सांगतात की आपलं डोकं हे हजारो फाइल्स ने भरलेलं आहे. ती लगेच आपल्या डोक्यातल्या फाईल्स मध्ये जाते आणि तिला अगदी काही क्षणात उत्तर मिळतं की, हीच तर ती पर्स आहे जी तू किती दिवस झाले शोधतं होती. त्यात डिस्काउंट पण आहे. आणि पर्स अगदी बरोबर आकाराची आहे. जशी पाहिजे तशी. 

खरं सांगा डिस्काउंट म्हणलं की असेच पळतात ना तुम्ही?

        इथे तिच्या मनात ही पर्स मिळाली म्हणून आनंद तर झालाच आहे. पण त्या ही वरती ही पर्स डिस्काउंट मध्ये मिळाली असल्या मुळे त्याचा तिच्या मनातला गर्व अजून वेगळाच आहे. कारण तिच्या मनासाठी पर्स मिळणं ही एक परफेक्ट गोष्ट आहे. ती शोधतं होतीच, आणि तशीच्या तशी मिळाली पण ते पण डिस्काउंट वर. 
        पण चुकूनही तिच्या डोक्यात असा विचार येत नाहीये की, "बरोबर आहे ही पर्स छान आहे, डिस्काउंट मध्ये आहे. पण सध्या माझ्यावर बरेच लोन्स चालू आहेत. सध्या न घेतली तर काम चालत."
        असा विचार का आला नाही डोक्यात? कारण तशी फाईल कुठे इन्स्टॉल केलीच गेली नाहीये. "जर तुम्ही कर्जामध्ये आहात तर जास्त खर्च करू नये" अशी फाईल नाहीच आणि म्हणून हे उत्तर कधी येणारही नाही. 
        तुम्हाला समजतंय का, ह्या पुस्तकातल्या १७ फाइल्स इन्स्टॉल करणं का महत्वाचं आहे ते? आर्थिक यश न मिळणाऱ्याच फाईल्स जर डोक्यात असतील तर बदल होणार तरी कसा? मी आधी सांगितलं होतं ना तसं करा. ह्या ब्लॉग मध्ये किंवा ह्या पुस्तकात दिलेल्या गोष्टी वापरून बघा. फायदा झाला तर मला सांगा, सगळ्या जगाला सांगा. नाही झाला तर सोडून द्या.

हा ब्लॉग फॉरवर्ड करणं म्हणजे समोरच्याला रहस्य सांगण्यासारखं आहे.

        महत्वाची सूचना: ह्या पुस्तकात किंवा ह्या ब्लॉग मध्ये बरेचदा गरीब आणि श्रीमंत असा उल्लेख येईल. पण मला किंवा लेखकांना कोणालाही गरीब किंवा श्रीमंत या पैकी एक जण वाईट आहे एक जण चांगला असं काही सांगायचं नाही. माझे कुठलेही वाक्य किंवा त्याचा अर्थ हा, गरीब वाईट असतात आणि श्रीमंत चांगले असा नाही. ते फक्त गरीब आहेत इतकाच आहे. 

चला इन्स्टॉल करूया फाईल नंबर १ 


गरीब व्यक्ती "माझ्या सोबत असंच घडत" ह्या विचाराचे असतात. 
श्रीमंत व्यक्ती "मी माझं आयुष्य घडवणार" ह्या विचाराचे असतात. 

        आता सगळ्यात आधी आर्थिक दृष्टीने यश मिळवायचे असेल तर मी माझ्या आर्थिक गाडीच्या स्टिअरिंग व्हील वर आहे हे डोक्यात पक्क केलं पाहिजे. हे जर मानायचं नसेल तर नक्कीच आर्थिक गोष्टींवर तुमचा ताबा रहाणार नाही. आणि ताबा नाही, कंट्रोल नाही तर मग ती गोष्ट बदलणार तरी कशी ना? 

    खूपदा हे बघायला मिळतं. आर्थिक दृष्टीने जर तोटा झाला तर माणूस स्वतःला दोषी समजत नाही. स्वतःला दोषी न समजणं म्हणजे आर्थिक गाडी तुम्ही नाही दुसरं कोणी तरी चालवत आहेत हे कबूल करण्या सारखं आहे. पण जर तुम्ही जर स्टिअरिंग व्हील वर नाहीत तर त्यामधून येणारे रिझल्ट तुमच्या हातात नाहीत.

        हे आजचं पक्क करून घ्या. तुम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल की मीच तो आहे जो पैश्याची चुण चुण निर्माण करतो आहे, मीच आहे जो पैसा जेमतेम प्रमाणात स्वतःसाठी उपलब्ध करून घेतो आहे आणि मीच तो आहे जो पैश्याच्या गेम मध्ये यशश्वी पण झालो आहे. कळत किंवा नकळत तो मीच आहे. 

        पण माणूस जबाबदारी घेण्या ऐवजी स्वतःला बळीचा बकरा असावा तसा समजू लागतो. नीट वाचा बळीचा बकरा समजू लागतो तो असतोच असं नाही. तीन गोष्टी सहसा सगळे बळीचे बकरे करतात. समजून घेऊया कुठल्या तीन गोष्टी. 

१. दोष देणे: 

        अगदी प्रत्येक जण हा एका गेम मध्ये प्रोफेशनल बनला आहे तो म्हणजे "ब्लेम गेम" ह्या गेम चा उद्देश खूप सोप्पा आहे. स्वतः सोडून तुम्ही कोणा कोणाला दोष देऊ शकतात त्या सगळ्यांना दोष द्या. माहिती हे कोणा कोणाला दोष देतात?

असे व्यक्ती नक्की असतील तुमच्या आयुष्यात!

            बळीचे बकरे दोष देतात सरकारला, ते दोष देतात स्टॉक मार्केट ला, ते दोष देतात त्यांना ज्याने मदत केली त्याला, ते त्यांच्या बिझनेसच्या पद्दतील दोष देतात, ते मालक चांगला नाही म्हणून दोष देतात, ते माझे वर्कर चांगले नाहीत म्हणून दोष देतात, ते मॅनेजरला दोष देतात, ते हेड ऑफिसला दोष देतात, ते कस्टमर सर्विसला दोष देतात, ते अप लाईनला दोष देतात, ते डाऊन लाईनला दोष देतात, ते त्यांच्या जोडीदाराला दोष देतात (नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला), ते बिझनेस पार्टनरला दोष देतात, ते देवाला पण दोषी मानतात, आपल्या आई वडिलांना दोषी मानतात. त्यांच्या कडे कोणी ना कोणी दोष देण्यासाठी असतोच. स्वतः सोडून बाकी सगळे दोषी आहेत असं त्यांचं मत असतं. 

२. जस्टीफाय करणे: 

        जस्टीफाय करणे हे जर मी मराठीत सांगितलं ना तर तुम्हाला जस्टीफाय हा इंग्लिश शब्दच बरा वाटेल. जस्टीफाय करणे म्हणजे काम न झालं म्हणून चालणार आणि पटणारं असं कारण देणे. उदाहरण, काल शाळेत का आला नाहीस? सर मला ताप आला होता आणि इन्फेकशन वाढू नये म्हणून मी घरी थांबलो.

जस्टिफिकेशन आणि excuse थोडे फार सारखेच आहेत.

        लेखक इथे सांगतात की खूप लोकं,"पैसा तितका महत्वाचा नाही रे आयुष्यात" असं जस्टिफिकेशन देतात. "आयुष्यात पैश्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे शांती आहे, समाधान आहे, प्रेम आहे." लेखकांच्या मते हे जस्टिफिकेशन आहे बाकी काही नाही. मी जर तुम्हाला विचारलं तुमचे हात महत्वाचे आहेत की पाय? उत्तर असेल दोन्ही. तसंच पैश्या सोबत शांती, समाधान, प्रेम हे पण महत्वाचं आहे.
        मित्रा एक लक्षात घे. पैसा हा ज्या ठिकाणी गरजेचा आहे, ज्या ठिकाणी लागतो तिथे तो महत्त्वाचाच आहे आणि ज्या ठिकाणी नाही लागत तिथे खरोखरच बिनकामाचा आहे. प्रेम, शांती हे जरी पैश्या पेक्षा मोठे आहेत असे समजले तरी उद्या हॉस्पिटल चालवायला पैसेच लागतात. मोठी मोठी मंदिरं, घर हे बांधण्यासाठी पैसाच लागतो.
        तुम्ही पैश्या पेक्षा प्रेम महत्वाचं आहे म्हणून बँक मध्ये प्रेम डिपॉझिट नाही करू शकत! प्रयत्न करून बघा, बँक वाले जोरात सिक्युरिटीला हाक मारतील आणि तुम्हाला बँकेच्या बाहेर काढतील. 

३. तक्रारी करणे :

        तुमच्या आर्थिकतेसाठी आणि शारीरिकतेसाठी जर वाईटच काही करायचं असेल ना तर तक्रार करा. तक्रार  करणे ह्या इतकी वाईट गोष्ट कुठलीही असू शकत नाही, तुमच्या हेल्थ आणि वेल्थ साठी. तुम्हाला हे ऐकून माहिती असेल, तुम्ही ज्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करतात ती गोष्ट वाढत असते. तक्रार करणे म्हणजे तुमचं लक्ष हे काय चुकीचं आहे ह्या वर जास्त आहे, काय बरोबर आहे या वर नाही. आणि ज्या वर लक्ष असतं ती गोष्ट वाढते. तुमच्या तक्रारी मुळे अजून चुकीच्या गोष्टीच येतं रहाणार.

मला तक्रार करू देत नाही ह्याची मला तक्रार करायची आहे!

        तुम्ही हे कधी ऐकलं आहे का? तक्रारी करणारे सगळे बरेचदा म्हणतात, "का नको तक्रार करू मी? माझ्या सोबतच होतं असं नेहिमी! लाईफची वाट लागलेली आहे." तुम्ही हा ब्लॉग वाचलेला आहे तर त्यांना प्रेमाने सांगा "लाईफची वाट लागलेली आहे म्हणून तू तक्रार नाही करत, तक्रार करतो म्हणून लाईफची वाट लागलेली आहे."
        ह्या पुस्तकात लेखक आपल्याला खूप सारे टास्क करायला सांगतात. त्या मधला एक टास्क तुम्हाला सांगतो. इथून पुढे ७ दिवस म्हणजे आठवडाभर एकही तक्रार करायची नाही. मोठ्याने तर नाहीच नाही पण मनातही नाही. तक्रारी थांबल्या म्हणजे चुकीच्या गोष्टींवर लक्ष जाणं बंद झालं आणि लक्ष जेंव्हा चांगल्या गोष्टी वर गेलं तुम्हाला माहिती जिथे तुमचं लक्ष आहे ती गोष्ट वाढत जाते.

अरे तो कहना क्या चाहते हो?

        आता हे वाचल्या नंतर सुद्धा तुम्ही स्वतःला दोषी (Blame), जस्टिफिकेशन किंवा तक्रार (Complain) करताना पकडलं तर लगेच आठवा की गाडीच्या स्टिअरिंग व्हील वर तुम्ही आहात आणि चुकीच्या गोष्टींवर फोकस करून तेच वाढेल. 
        श्रीमंत लोकं माझं आयुष्य मी घडवतो ह्या विचारांचे असतात. पुढच्या वेळेस "माझ्यासोबतच असं घडतं" हा विचार आला तर विचार करून तो विसरा आणि स्वतःला सांगा की मी माझी जुनी फाईल डिलीट करून "माझं आयुष्य मी घडवतो" ही फाईल हा ब्लॉग वाचून इन्स्टॉल केली आहे.
        हा ब्लॉग जरी तुम्ही मनातल्या मनात वाचतं आहात पण ही पुढची ओळ जोरात वाचा, श्रीमंत व्यक्ती "मी माझं आयुष्य घडवणार" ह्या विचाराचे असतात आणि मी पण असाच विचार करतो. माझं मन हे एका श्रीमंत व्यक्तीचे मन आहे.  

हे घ्या माझ्याकडून एक फ्री गिफ्ट!

        इंटरनेट वर पैसे भरून आजकाल सगळं काही शिकता येतं. पण माझा विश्वास फ्री मधे उपलब्ध असलेल्या गोष्टींवर जरा जास्तचं आहे. आणि अश्याच फ्री उपलब्ध असलेल्या कामाच्या गोष्टी तुमच्या पर्यंत पोहचवायला मला आवडतं. हे जे लेखक आहेत ना हार्व एकर ह्याची स्वतःची वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईट वर बरेच कोर्स फुकट मध्ये उपलब्ध आहेत. 

ह्या लिंक वर क्लिक करून सगळे कोर्स तुम्ही वेळात वेळ काढून अटेंड करू शकतात. Free Trainings

            तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुप चा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.

व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडला नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

4 Comments

  1. हे पुस्तक मराठी मधे वाचण्यात वेगळीच मजा आहे 😄 English पुस्तकाचे मुद्दे आठवतात... असो, सगळ्यांपर्यंत हा विषय जातोय हे महत्त्वाचे.
    तुमच्या साठी अधिक शक्ती 😉 ( MPTY)

    ReplyDelete
    Replies
    1. ऍक्च्युली काय आहे ना आपण सगळे खूप कम्फरटेबल झालो आहोत इंग्लिशला मे बी त्यामुळे थोडं वेगळं वाटतं. हा.हा..😅😅 (अशी इंग्रजी मिश्रित मराठी सोपी वाटती ना!)
      आमचा लेखं वाचून रिप्लाय केल्या आपले खूप खूप आभार.
      More power to you.

      Delete
  2. Again I want to say thank you...

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you. 😊
      More power to you. ✋🏻✋🏻✋🏻

      Delete