काही वर्षांपूर्वी ह्याच पुस्तकाने मला निवडलं होतं!

।। श्री ।।

#५

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        माझाव्यापार कडून येणाऱ्या पाचव्या पत्रात आपलं स्वागत आहे. माझे मागचे पत्र तुम्ही वाचले मला तुमचा अभिप्राय कळवला या बद्दल मनापासून आभारी आहे मी. सध्याच्या काळात सगळे इतकेच बिझी आहेत ना की कोणी मला थोडासा जरी वेळ दिला ना तर पैसे देण्याच्या वरचं वाटतं. पैसे कदाचित पटकन देऊन मोकळा होईल एखादा पण वेळ दिला म्हणजे नक्कीच मी कोणी तरी आहे ह्यांच्या आयुष्यातला हे जाणवतं. 

        तर मागच्या काही पत्रांमध्ये मी एका पुस्तकाबद्दल थोडक्यात माझं मत सांगितलं. त्या नंतर मी कार्टून्स बद्दल थोडं लिहिलं आणि मग डॉक्युमेंटरी फिल्म्स बद्दल मला सुचलेलं, आवडलेलं लिहिलं. मागचे लेखं जर वाचायचे राहिले असतील तर इथे क्लिक करून वाचू शकतात. 

सुरवात करूया पाईपलाईनच्या गोष्टी पासून! (mazavyapar.blogspot.com)

नव्वदच्या दशकातले कार्टून्स! (mazavyapar.blogspot.com)

तुझीच आठवण काढली होती आत्ता, १०० वर्ष आयुष्य आहे तूला! (mazavyapar.blogspot.com)

        मी विचार करत होतो आता कुठल्या विषयावर लिहावं. माझ्या डोक्यात माझ्या सगळ्यात आवडीच्या पुस्तकाचं नावं आलं. तुम्हाला माहिती का आपण कधी पण पुस्तकं निवडत नसतो. आता माझ्या ह्या वाक्यावर तुम्ही म्हणाल "काही पण, आत्ता परवा पुस्तक प्रदर्शनातून मी १० पुस्तकं आणले. (सध्या धुळीत पडले आहेत पण मीच निवडून आणले आहेत)." 

        माझ्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. आपण पुस्तकं निवडत नसतो तर पुस्तकं आपल्याला निवडत असतात. तर काही वर्षापूर्वी एका पुस्तका नी मला निवडलं. ह्या पुस्तका बद्दल मी ४-५ जणांकडून ऐकलं. हे सगळे माझ्या बिझनेस मधले माझे सिनिअर्स होते. इतके जण सांगत आहेत म्हणून मी विमानतळावर असताना हे पुस्तकं विकत घेऊन विमानात बसलो आणि हे पुस्तकं त्या प्रवासात कायमचं माझ्या आवडीचं बनलं.  

तुमच्या पैकी कोणी पुस्तक इतकं एन्जॉय करत वाचतं का?

        ह्या पुस्तकाचं नाव आहे "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड" हे पुस्तकं लिहिलं आहे हार्व एकर नावाच्या एका मस्त व्यक्तींनी. हे पुस्तकं विकत घेण्याची इच्छा असेल तर इथे क्लिक करून विकत घेऊ शकतात. 

"द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड"

        जगात सेल्फ हेल्प, पैशाचे मॅनेजमेंट, पैसा कमावण्या साठीच गरजेचं माईंड सेट हे सगळं सांगणारी हजार पुस्तकं आहेत. ह्या सगळ्या गर्दी मधून हेच का? ह्याच उत्तर मलाही माहित नाही. मी म्हणालो ना पुस्तक आपल्याला निवडत असतं म्हणून. ह्याच पुस्तकावर मी पुढचे काही लेख लिहिणार आहे आणि त्यात नक्की सांगतो का बरं मला हेच पुस्तक आवडतं. मला कोणाला पुस्तक गिफ्ट देण्याची इच्छा असेल तर मी पाहिले हेच पुस्तक निवडतो. 

        आता मी तुम्हाला माझ्या पद्धतीने तर सांगितलं की माझ्या साठी का हे पुस्तक महत्वाचं आहे. पण ह्या पुस्तकाच्या सुरवातीलाच लेखक एका मोठ्या हेडिंग मध्ये लिहितो की, "ह्यो हार्व एकर हाय तरी कोण आन म्या का का वाचावं ह्याने लिहिलेलं हे पुस्तक?" अश्या हेडिंग मध्ये लेखकाने ७-८ पान लिहिली आहेत. हे वाचूनच तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडाल. 

        लेखक सुरवातीलाच म्हणतो माझ्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ नका. म्हणलं, "अरे मी जरा शिकावं श्रीमंत होण्यासाठीचा काही गोष्टी आणि हा पहिल्याच पानावर माझं ऐकू नका म्हणतो आहे." हार्व सांगतात की माझ्या शब्दावर विश्वास ठेऊ नका कारण माझे शब्द हे माझ्या अनुभवातून आलेले आहेत. माझा असा पूर्ण विश्वास आहे की ह्या पुस्तकात दिलेल्या गोष्टी जर अस्तित्वात आणल्या तर आयुष्य नक्कीच बदलणार. पण मी म्हणतो आहे म्हणून विश्वास ठेऊ नका. ह्या पुस्तकाचा असा अभ्यास करा जशी आयुष्यातली एखादी परीक्षा आहे. मग पुस्तकले सूत्र वापरून बघा. जग फायदा झाला तर सोबत ठेवा नाही झाला तर फेकून द्या. 

        इतका प्रामाणिक लेखक मी पहिल्यांदाच पहिला होता. नाही तर सगळेच तर म्हणतात की हे पुस्तक आयुष्य बदलेल, हे पुस्तक वाचून लोक करोडपती होतात, मी असं काही न सांगता खरं सांगणारा इतका प्रामाणिक पहिलाच लेखक पहिला होता. 

        लेखक सांगतात की तुम्ही ह्या आधी सुद्धा अश्या ट्रेनिंग, पुस्तकं, ऑडिओ ऐकलं असेल पण बरेचदा ह्या सगळ्या मधून अंगात जोश येतो काही दिवसांसाठी नंतर परिस्थिती जैसे थे. पण हे पुस्तक तुम्हाला मुळा पर्यंत जायला शिकवेल. तुम्हाला समजेल की नेमकं कारण काय आहे गरीब, मध्यम वर्गीय आणि श्रीमंत असण्याचं आणि एकदा का ते समजलं तुम्ही ते बदलण्यासाठी प्रयत्न नक्कीच करणार. 

        ह्या पुस्तकाचे २ भाग आहे. पहिल्या भागात तुम्हाला आपण कसे पैश्याच्या बाबतीत विचार करायला लागतो आणि कशी आपल्या अनुभवा मुळे ही पैशाची ब्लू प्रिंट बनते हे मी सांगणार आहे. आणि दुसऱ्या भागात कसे लोकं पैश्याचा बाबतीत विचार करतात आणि सतरा अश्या काही गोष्टी सांगणार आहे ज्याने तुमची ही मनी ब्लू प्रिंट कायमची बदलेलं जी फक्त यशश्वी होण्यासाठीच मदत करेल.

        मग हार्व आपल्याला कसे ते त्यांच्या वडिलांच्या मित्राला भेटले आणि ते किती श्रीमंत होते ते सांगतात. त्यांच्या वडिलांच्या मित्रानीच हार्व ना श्रीमंत लोकांचा अभ्यास करायची आयडिया दिली. मग हार्व नी तो अभ्यास केला स्वतः खूप मोठे बिझनेस केले आणि मग हे पुस्तक लिहिलं. हे सगळं वर्णन वाचण्यासारखं आहे.

तुम्ही विश्वास ठेऊ शकतात का?

        मग हार्व एक खूप छान गोष्ट सांगतात ट्रस्ट म्हणजेच विश्वासा बद्दल. एकदा एक माणूस एका उंच डोंगरावर जातो आणि गगडबडीत त्याचा पाय घसरून तो खाली पडतो पण कसा बसा तो एका झाडाला तिथे असलेल्या दगडाला धरून लटकतो आणि मदतीसाठी जोर जोरात ओरडायला लागतो. "मला कोणी वाचवू शकेल का?" "कोणी आहे का मदतीला?" 


        बराच वेळ ओरडल्यावर त्याला वरून मोठा असा आवाज येतो, "मी देव आहे. मी मदत करू शकतो. हात सोडून दे आणि विश्वास ठेव." तो अर्धवट लटकलेला माणूस पुन्हा ओरडतो, "तुम्ही नको, अजून दुसरं कोणी आहे का मदत करायला?" 

        काय माणूस आहे ना देवावर पण विश्वास नाही. असो, लेखक एकच सांगतात की विश्वास ठेवा. तुम्हाला दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी पहिली जागा सोडावी लागते. पण हा विश्वासच नसेल तर कोणीच मदत करून शकणार नाही. म्हणजेच ह्या पुस्तकले सूत्र, सांगितलेल्या काही ऍक्शन्स जर विश्वासाने केल्या तर काही अर्थ आहे. आपल्या जुन्या पैश्या बद्दलच्या, यशश्वी होण्या बद्दलच्या, मिलेनियर बनण्या बद्दलच्या कल्पना आणि विचार जरा सोडा विश्वास ठेऊन पुस्तकात दिलेलं वापरून बघा. ह्या मधून येणारे रिझल्ट्सच सगळं काही बोलून जातील.

        जर तुम्ही आत्ताच मिलेनियर आणि आनंदी आहात तर हे पुस्तकं तुमच्या साठी नाही असं समजा. पण आयुष्यात जर अजून एक पायरी वर चढून काही मिळवण्याची इच्छा असेल तर हे पुस्तक त्या प्रत्येक व्यक्ती साठी आहे. 

        आता इतकी छान प्रस्तावना वाचून मला लक्षात आलं का सगळे जण मला हे पुस्तक वाचायला सांगत आहेत. पुढच्या काही भागात मी माझ्या पद्धतीने मला समजलेलं हे पुस्तक तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुप चा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.  

व्हॅट्सऍप चॅनेल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडली नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या. आणि तुम्हाला  हा लेख वाचल्यानंतर तुमचे विचार मांडायचे असतील तर कंमेंट नक्की लिहा. 

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

2 Comments

  1. "I found 'The Secrets of the Millionaire Mind' to be a thought-provoking read, emphasizing the power of mindset in achieving financial success. While some concepts resonated, others might require personal adaptation."

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for taking the time to share your thoughts on my blog post discussing 'The Secrets of the Millionaire Mind.' I truly appreciate your perspective.

      It's great to hear that some concepts from the book resonated with you, highlighting the significant role mindset plays in achieving financial success.
      If you'd like to share more about your personal adaptations or any particular concepts that stood out to you, I'd love to continue this conversation and learn from your insights.
      Once again, thank you for engaging with my content and sharing your thoughts—it's truly appreciated.

      Delete