सुरवात करूया पाईपलाईनच्या गोष्टी पासून!

चला तर मग श्री गणेशा करूया! 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष 

       नमस्कार मी अजिंक्य कवठेकर आणि आजच माझ्यावर माझाव्यापारच्या टीम ने एक काम सोपवलं आहे (लादलं आहे म्हणलं तरी चालेल.) ते म्हणजे माझाव्यापार समूहाचे (communityचे ) आठवड्याला मराठी पत्र (newsletter) लिहिणे. मी मागच्या २ वर्षांपासून माझाव्यापारसाठी इंग्लिश मध्ये बरंच काही लिहिलं आहे. पण स्वतःमराठी असूनही मराठी पत्र लिहिणं हे माझ्यासाठी का अवघड आहे सांगू का? कारण मराठी लिहिण्याची सवयच सुटली आहे. 
        हे फक्त माझ्या बाबतीचच नाही, तुमच्या पैकी वाचणारे पण खूप जण असे असतील ज्यांनी कित्तेक वर्षात मराठी लिहिलं नाहीये. आज काल बऱ्याच शब्दांचा मराठी अर्थ सांगायला इंग्लिशची मदत घ्यावी लागते. बघू कसं जमतंय मला ते. पण मी मला दिलेलं काम चोख पणे पार पाडणार हे नक्की. 

तर हे आमचे माझाव्यापार ग्रुप कडून आठवड्याला येणारे पत्र, आर्टिकल, ब्लॉग्स, लेख तुम्ही का वाचावे?
  • जर तुम्हाला पुस्तकं वाचण्याचा कंटाळा आहे पण वाचले तर फायदा होतो ह्याची जाणीव असेल तर हे लेख तुमच्या कामाचे आहेत. 
  • तुम्हाला बिझनेस आणि त्या संबंधीची आवड आहे तर तुम्हाला हे आर्टिकल्स नक्की आवडतील. 
  • तुम्हाला गोष्टी आवडतात का? ज्या मध्ये शेवटी एक तात्पर्य असतं? मग तुम्हाला आमचे लेख नक्की आवडतील. 
  • तुम्हाला कमीत कमी वेळात वाचून काहीतरी शिकण्याची इच्छा आहे का? मग तुम्ही आमचे हे लेख नक्की वाचा.
हो पण कुठे वाचायला मिळेल? असा प्रश्न आला असेल मनात. तर २-३ मार्ग सांगतो. तुम्ही आम्हाला व्हाट्सअँप किंवा टेलिग्राम वर जॉईन करू शकतात. ह्या दोन्ही कडे आम्ही काहीही नवीन लिहिलं तर तुम्हाला अपडेट मिळेल. त्याहून चांगला मार्ग? आमच्या ई-मेल newsletter ला जॉईन व्हा. दार बुधवारी तुम्हाला आमचा एक ई-मेल येईल आणि तुम्ही निवांत आमचे लेख वाचू शकाल. तुमचा ई-मेल इथे लिहून आत्ताच आमच्या ई-मेलच्या लिस्ट मध्ये या.


      आजकाल काहीही ऑनलाईन करता येतं ना? कधी ऑनलाईन पाईपलाईन बांधण्याबद्दल ऐकलं आहे का? आजच्या कथेत मला त्या बद्दलच सांगायचं आहे. मी बरेच पुस्तकं आणि छोट्या छोट्या कथा वाचून आणि ऐकून बराच मोठा असा संग्रह बनवला आहे. 
      तर ही एक खूप खूप वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळेसची जेव्हां आपल्या घरी पाणी पाईपने येत नव्हत. पाइपलाइन नावाचं आज जे काही आपण वापरतो आहोत त्याचा शोध लागायचा होता. तर अश्या वेळेस लोकं नदी वरून पाणी घरी कसे आणायचे? अगदी सोप्प बादली, कळशी, भांड्या मध्ये भरून.

कुठल्याही गोष्टीची सुरवात उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्यापासूनच होते.

        तर ह्या गावमधले दोन अगदी खास मित्र राम आणि श्याम. हे दोघे तरुण आणि चांगलेच ताकदवान असल्यामुळे गावातल्या लोकांनी एक कामगिरी सोपवली होती. ती म्हणजे रोज नदीवर जायचं आणि बादली भरून पाणी आणून सगळ्यांना वापरता येईल अश्या जागेवर टाकायचं. दोघांना ह्या बदल्यात चांगला मोबदला मिळत असे म्हणून ते आवडीने हे काम करत होते. 
        असेच खूप दिवस पाणी भरून भरून एकदा रामला कंटाळा आला आणि तो श्यामला म्हणाला की, "ह्या बादल्या उचलता उचलता आपण असं काहीतरी करू की ज्यामुळे पाणी आपोआप घरात येईल. माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. बोल करायचं काम सोबत?" 
        श्याम ह्या कामासाठी फार काही तयारनव्हता. त्याचा फार काही उत्साह नाही म्हणून त्याने श्यामला सोडून आपल्या आपल्या कामाला सुरवात केली. दिवसभर रोजचं काम आणि उरलेल्या वेळात पाइपलाईन तयार करण्याचं काम. हे असं ४-५ वर्ष काम झालं आणि मग बनली पाईपलाईन. जी घरापर्यंत पाणी आणून देऊ लागली. आणि पुढच्या काही वर्षात बादल्या उचलणं हे काम बंदच झालं. लोकांनी रामला डोक्यावर घेऊन त्याच्या कल्पनेचं, जिद्दीने काम केल्याचं मनापासून स्वागत केलं, कौतुक  केलं, गावात जल्लोष केला. तशी ही गोष्ट अजून खूप मोठी आहे आणि अजून बऱ्याच काही गोष्टी शिकवून जाते.
        पण आजच्या भागात मला इतकंच बोलायचं आहे की ह्या राम ने कशी पाईपलाईन बांधली ज्या मुळे पाणी घरापर्यन्त आलं तशी पैसे येणारी पाईपलाईन बांधायला कोणा कोणाला आवडेल? अगदी प्रत्येकाला. पण रामइतक्याच जिद्दीने आणि चिकाटीने काम कोण कोण करेल? हाच तर खरा प्रश्न आहे.

एकविसाव्या शतकात मी पाईपलाईन कशी बांधावी?
        मी सुरवातीला म्हणालो तसं ऑनलाईन पाईपलाईन बांधणे ह्याचा एकविसाव्या शतकात अजून एक अर्थ आहे तो म्हणजे कन्टेन्ट बनवणे. एक लक्षात घ्या. २ प्रकारचे लोकं इंटरनेट वापरतात. एक जे नुसता वापर करतात ज्यांना आपण consumer म्हणतो आणि दुसरे जे create करतात ज्याला आपण creators म्हणतो. प्रत्येक consumer हा creator नसतो. पण तो creator बनण्याचा ज्या दिवशी निर्णय घेतो तेंव्हा लक्षात घ्या त्याला पाईपलाईन प्रकरण समजू लागलं आहे. 
        आज इतकी मोठी संधी सोशल मीडिया मुळे आपल्याला मिळाली आहे पण त्याचा वापर न होता वेळ वाया घालवण्याचं एक माध्यम म्हणून वापर होतो आहे ही फार जास्त वाईट गोष्ट आहे. 
        तुम्ही अगदी आत्ता हा ब्लॉग वाचता वाचता सुद्धा creator बनण्याचा निर्णय घेऊ शकतात. इंटरनेट वर ३ प्रकारचे कन्टेन्ट आपल्याला मिळतात. Written, Audio and Video.
        Written हा त्यातल्या त्यात थोडा सोप्पा आहे. Audio आज काल वाढू लागले आहेत. जो लिखाणापेक्षा थोडा अवघड आहे कारण तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे ज्या साठी एडिटिंगच ज्ञान घ्यावं लागेल. जे सोप्पच आहे पण लिहिण्यापेक्षा थोडं अवघडं. तिसरा प्रकार आहे video. सगळ्यात जास्त बघितल्या जाणारा पण बनवायला तितकाच अवघड असा आहे. लिहिणं, शूटिंग करणं, एडिट करणं, असे बरेच काम ह्या मध्ये असतात जे सहसा प्रत्येकाला जमत नाहीत. 
        पण सुरवात तुम्ही लिखाणातून नक्कीच करू शकतात. कारण जरी audio, video बनवायचं ठरवलं तरी स्क्रिप्ट ही लागणार जी लिहावीच लागते. मी तर माझ्या ओळखीच्या अगदी प्रत्येकाला ज्याला आवड आहे त्या प्रत्येकाला काही तरी लिहिण्याचा आग्रह करतच असतो. मीच काय समर्थ रामदासांनी सुद्धा "दिसामाजी काहीतरी लिहावे" हे सांगितलं आहे. 
         बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला कधी उडी मारायची आहे ते consumer वरून creator जगामध्ये. माझी काही मदत लागली तर मी नक्की करेन. आणि अजून एक हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण वाचला म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक छोटसं गिफ्ट. मी इथे एक लिंक देतो आहे एका कोर्स ची. हा कोर्स १००% फ्री आहे जो तुम्हाला ब्लॉगिंग साठी सुरवातीच्या पायऱ्या चढायला मदत करेल. माझाव्यापारच ई-मेल न्यूज लेटर नक्की subscribe करा.


       अजून एक, लिहिणारे नाहीत पण त्यातल्या त्यात चांगल्या पोस्ट, आर्टिकल्स, गोष्टी लोकांपर्यंत घेणून जाणारे व्यक्ती तरी बना. चांगल्या गोष्टी बघून, वाचून लोकांपर्यंत न पोहचवणं हे काही बरोबर नाही. आमचा ब्लॉग आणि बाकी पण काही चांगल्या शेअर करण्यासारखं वाचलं, ऐकलं असेल तर नक्की शेअर करा.
            ह्या राम श्यामच्या गोष्टी मध्ये पुढे काय झालं ते पुढच्या भागात सांगतो. मी ही गोष्ट ज्या पुस्तकातून वाचली त्या पुस्तकाचं नाव आहे "द पैंरेबल ऑफ द पाईपलाईन" हे पुस्तक लिहिले आहे बर्क हेजेस ह्यांनी.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 🙏🏼
कळावे लोभ असावा,
अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

0 Comments