स्वतःच्या मतांवर ठाम राहणं सोप्प असतं का?

नमस्कार, 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

      मागच्या भागात आपण राम आणि श्याम ची एक गोष्ट पहिली. ती "द पैंरेबल ऑफ द पाईपलाईन" ह्या पुस्तकातून मी वाचली आणि तीच तुम्हाला मी अजून थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने सांगितली. हे पुस्तक माझ्या आयुष्यातलं फार महत्वाचं पुस्तक ठरलं. तुम्ही पण वाचून बघा. कदाचित तुमच्याही कामाचं काही मिळेल.

मागच्या भागात नेमकं काय झालं हे वाचण्याची इच्छा असेल तर इथे क्लिक करून मागचा लेखं तुम्ही वाचू शकता. सुरवात करूया पाईपलाईनच्या गोष्टी पासून!

     आता मागच्या भागात मी सांगितलं की कसं राम स्वतःच डोकं वापरून एक पाईपलाईन बनवतो आणि मग पाणी घरा पर्यंत येतं. पण ह्या मध्ये एक गोष्ट होते ते म्हणजे श्यामचं काम बंद पडतं. आता जेंव्हा हे vision ही दूर दृष्टी राम नी श्याम ला सांगितली तेंव्हा श्यामला "पाईपलाईन बनेल, घर समोर पाणी येईल" हे काही दिसलं नाही. दिसणार तरी कसं? कारण राम हा त्याच्या दृष्टी ने बघत होता आणि श्याम फक्त बघत होता. दृष्टी पाहिजे ना बघण्यात. 

     तर हे जितकं पटकन मी लिहिलं किंवा तुम्ही वाचलं हे तितकं सोप्प नक्कीच नव्हतं. ना कधी सोप्प असणार आहे. मी सांगतो नक्की झालं काय ह्या संपूर्ण प्रकारात. रामने आपल्या मनात आलेला विचार जेंव्हा श्याम ला सांगितला तेंव्हा श्यामची पहिली प्रतिक्रिया होती, "काय गरज आहे? कोणी तुला नको ते कामं सांगितले आहेत?"

     राम ला हे गोष्ट पक्की माहिती होती की काम एकट्याने करणे आणि कोणा सोबत मिळून करणे ह्या मध्ये फरक खूप पडणार. म्हणून त्याने पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. 

         राम, "अरे आज चालू आहे चांगलं. पण उद्याचं काय? तू काय मी काय आज शक्ती आहे म्हणून तू २० वेळा वर खाली करतो नदी वर तरीही थकत नाहीस. उद्या जाऊन काय वाटतं? इतकं पाणी उचलता येईल?"

     श्याम जोरात जांभई देत म्हणाला, "उद्याचं उद्या बघू रामराव. माझं ऐक पाणी भरून झालं की घरी ये बाकी पण सगळे आले आहेत. थोडा आराम करू, जेवण करू, गप्पा मारू कुठे तू जास्तीचे काम काढतो आहेस" आणि श्याम निघून गेला. पण आता खरी परीक्षा सुरु झाली होती ती रामची.

     रोज अगदी रोज तो वेळेच्या आधी उठून त्याच्या डोक्यात जी कल्पना होती त्यावर काम करायचा. काम संपवून पुन्हा आपल्या डोक्यातल्या कल्पनेलाच वेळ द्यायचा. मित्रांसोबत जेवणं, गप्पा मारत निवांत बसणं, आज थकलो म्हणून जास्त वेळ झोपणं, हे सगळं तो एक एक करत सोडून शक्य तितका वेळ हा कल्पनेने निर्माण केलेल्या आणि काम करून ते अस्तित्वात येणाऱ्या गोष्टीवर देत होता.

      जेंव्हा तो कामात गुंतलेला असायचा तेंव्हा बाकीचे मित्र तर पाठीवर बोलायचेच त्यात घरचे तर म्हणाले, "वेड लागला आहे वेड आमच्या रामाला, सकाळ झाली की पोरगं कुदळ फावडं घेतंय आणि कुठे जातंय शेतात, रानात कुणाला ठाऊक?" मित्रांमध्ये एकच विषय, "अरे हा रामा करतोय काय नेमका? गपगुमान यावं काम करावं इथे आपल्या मध्ये बसून जेवावं, गप्पा हाणाव्या तर ह्याचं काही तरी वेगळंच. मी आज त्याच्या घरच्यांना जाऊन सांगतो की पोराला पार वेड लागलं म्हणून." 

     तुम्हाला काय वाटतं असं कोणी जर तुमच्या बद्दल तुमच्या मागे बोललं तर तुमचं मत हलणार का नाही? भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पण हेच तर हे पुस्तक किंवा ही गोष्ट शिकवून जाते. राम आपलं आपलं काम करत राहिला आणि मग ५ वर्षांनी कुठे ती पाईपलाईन बनली आणि मग लोकांनी चमत्कार पाहून त्याला डोक्यावर घेतलं. तो त्याच लोकांनी जे परवा उलटं बोलतं होते. राम चे बाबा म्हणाले, "अरे मग..मुलगा हाय कोणाचा? कसं करून दाखवलं!" मित्र म्हणाले, "राम हा आधी पासूनच तसा खटपट्या होता. आम्हाला माहिती होतं तो काही ना काही तरी वेगळं करेल." 

     आहे की नाही मज्जा. कसे लोकं बदलले. ते म्हणतात ना Sucess is a sweet Revange. सूड घेण्याचा गोड मार्ग म्हणजे यशश्वी होणे. तर हा गोडवा मना मना मध्ये पसरवण्यासाठी नक्की यशश्वी व्हा. प्रयत्न करा आणि करत रहा. "बस्स पुरे झालं" हा विचार मनात नको. 

तर आपल्या मतांवर ठाम राहणं सोप्प नसतं पण ठाम राहिलो तर ह्याच्या इतकी छान कुठली गोष्ट नसते. तुम्ही सुद्धा जर तुमच्या मतावर ठाम आहात आणि आज कित्तेक वर्षांनी कदाचित हा लेख वाचता वाचता तुम्हाला पण राम सारखं काम केल्याची जाणीव झाली असेल ना तर नक्की मला कंमेंट मध्ये किंवा ई-मेल द्वारे कळवा. 

     मी लिहिलेल्या छोट्या कथा तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. ही कथा जर आवडली नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या विचारांनी प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या. 

आमच्या ई-मेल लिस्ट मध्ये येण्याची इच्छा असल्यास इथे क्लिक करा. माझ्या मामाचं पत्र.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 🙏🏼
कळावे लोभ असावा,
तुमचा मित्र, 
अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

0 Comments