क्या आप की जिंदगी में प्रोब्लेम्स है?

 ।।  श्री ।। 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

        मागच्या आठवड्यात आपण गप्पा मारल्या की कसं आपण निसर्गासाठी एक पाऊल उचलू शकतो. माझी खात्री आहे की माझं पत्र वाचल्यानंतर तुम्ही सिंगल युज प्लास्टिक बॉटल वापरणं हळू हळू कमी करण्याचा प्रयत्न करणार. मागचं पत्र वाचायचं राहिलं असेल तर ही आहे त्याची लिंक. सिंगल युज प्लास्टिक बॉटल.

    मी बरेचदा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि त्या प्रॉब्लेम्स चे माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार सोल्युशन माझ्या पत्रामधे लिहीत असतो. जसा मागच्या आठवड्यात मी सिंगल युज प्लास्टिक बॉटल वापरण्याचा प्रॉब्लेम आणि त्याच सोल्युशन सांगितलं. या आठवड्याचा प्रॉब्लेम काय आहे माहिती का? प्रॉब्लेम असणे हाच प्रॉब्लेम आहे. या बद्दल मी पत्र लिहिलं आहे.


पॉईंट हा आहे की,      

    मी आज पत्राच्या विषयातच विचारलं ना तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत का? "हो", हे प्रत्येकाचं उत्तर येईल. प्रॉब्लेम्सचे प्रकार वेगवेगळे असतील पण प्रॉब्लेम्स असणार हे नक्की. आता अजून एक प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकेल. तुम्हाला प्रॉब्लेम्स आवडतात का? बरेचं जण नाही म्हणतील पण हो जो कोणी म्हणेल त्याने काही गोष्टी जिंकल्या आहेत समजा. 

    हा फरक तुम्हाला अगदी सहज जाणवेल. अयशश्वी लोकं स्वतःला आपल्या प्रॉब्लेम्स पेक्षा लहान समजतात आणि यशश्वी लोकं स्वतःला प्रॉब्लेम पेक्षा मोठे समजतात. सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या प्रॉब्लेम्स सगळ्यांनाच आहेत. प्रॉब्लेम्स असूच नये, किंवा त्या पासून पळण्यामुळे तुम्ही अजून जास्त प्रॉब्लेम्स ना जवळ बोलवत आहात.

तुम्ही १ ते १० मधे कुठे आहात?

    विचार करा तुमच्या समोर एक समस्या, एक प्रॉब्लेम उभा राहिला आहे. ह्या प्रॉब्लेमला त्याच्या तीव्रते नुसार समजा आपल्याला मार्क्स द्यायचे असतील तर ते काय देणार हे मनात ठरवा. १ म्हणजे छोटा प्रॉब्लेम आणि १० म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम. आता तुमच्या समोरचा प्रॉब्लेम समजा ५ नंबरचा आहे आणि आता स्वतःला विचारा त्या प्रॉब्लेम समोर मी स्वतःचा विचार केला तर मी स्वतःला किती मार्क्स देईल? तुम्ही जर ३ मार्क्स स्वतःला दिले तर ५  नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला मोठाच वाटेल. आता स्वतः ला ९ मार्क्स द्या आणि आता ५ नंबरच्या प्रॉब्लेम कडे बघा. तुम्ही मला म्हणाल प्रॉब्लेम आहे कुठे? कोणा कडे बघू? प्रॉब्लेम दिसेना कारण आता तुम्ही मोठे आहात. 

    पॉईंट हा आहे की आपल्याला आपल्या प्रॉब्लेम पेक्षा मोठं राहता आलं पाहिजे. मग प्रश्न प्रॉब्लेम किती मोठा आहे हा राहातच नाही, प्रश्न मी किती मोठा होऊ शकतो हा असतो. कारण आपण श्वास घेत आहोत तो पर्यंत प्रॉब्लेम्स हे येतंच राहणार आहेत.

माझ्या मते प्रॉब्लेम्स आले की काय करावं?

    सगळ्यात आधी जर असं वाटलं की, "काय यार काय माझ्याचं आयुष्यात ह्या कटकटी आहेत. एक झालं की दुसरं, माझ्या मागचे प्रॉब्लेम्स संपतच नाहीत." स्वतःकडे बोट दाखवा आणि मी सांगतो ते स्वतःच नाव घेऊन म्हणा. जसं माझं नाव आहे अजिंक्य आणि मला असं वाटलं की खूपच प्रॉब्लेम्स आहेत यार आयुष्यात तर मी स्वतः कडे बोट दाखवून म्हणेल, "छोटू अजिंक्य, छोटू अजिंक्य, छोटू अजिंक्य." कारण आत्ता मी जे वरच्या पॅराग्राफ मधे समजवून सांगितलं तेच तर होतं आहे. मी स्वतः छोटा आणि प्रॉब्लेम मोठा आहे असं समजतो आहे. 

    पण एक साधी आणि सरळ गोष्ट समजून घ्या ना! तुम्ही जितका मोठा प्रॉब्लेम सोडवणार तितका मोठा बिझनेस करणार, जितकी मोठी जबाबदारी तुम्ही सांभाळणार तितके तुमच्या कडे लोकं नौकरी करायला येणार, जितके लोकं नौकरी करायला येणार तितके जास्त ग्राहक तुम्ही सांभाळू शकणार, आणि जितके जास्त ग्राहक सांभाळणार तितका मोठा बिझनेस आणि पैसा कमवता येणार. सगळ्याची सुरवात कुठून होती आहे? मोठा प्रॉब्लेम सोडवण्यापासून.


    दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. एक जे कायम तक्रारी करतात, ज्यांचा वेळ तक्रारी करण्यात, दुसऱ्यांना नावं ठेवण्यातच जातो आणि दुसरे जे प्रॉब्लेम्स पासून पळत नाहीत, जे मला प्रॉब्लेम आला म्हणून तक्रारी करत नाहीत. पॉईंट इतकाच डोक्यात ठेवावा की, प्रॉब्लेम्स ना सांभाळणे आणि सोडवणे, सोडवण्यात आनंद घेणे ह्यातच खरं यश आहे. एकदा का हे जमलं कोण आणि कसं थांबवू शकणार कोणाला. विचार करून बघा.

    मी आधी म्हणल्यासारखं "छोटू मी, छोटू मी" न म्हणता काय म्हणावं ते सांगतो. आपला हात छाती वर ठेवायचा आरश्यात बघायचं आणि स्वतः ला सांगायचं, "मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्स पेक्षा मोठा आहे आणि माझ्याकडे कुठलाही प्रॉब्लेम आनंदाने सोडवण्याची कला आहे.


    हे मी जे काही लिहिलं हे माझं स्वतःच नाही. एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे "मिलिनियर माईंड चे रहस्य" लेखक आहे हार्व एकर आणि हे पुस्तक मी त्यांचा डिस्ट्रिब्युटर असल्या सारखं प्रत्येकाला वाचायला सांगतो. तुमची पण वाचण्याची इच्छा असेल तर ही आहे लिंक. ऍमेझॉन वरून तुम्ही हे पुस्तक मागवा आणि नक्की वाचा. 

या आठवड्यात सांगण्या सारखं काहीतरी मी अनुभवलं!

    मी मागच्या पत्रात म्हणालो होतो ना आपण आपल्या कार्यक्रमात इतके मग्न होऊन जातो की त्या मुळे अन्न किती वाया जात आहे, निसर्गाला काही त्रास होतो आहे का हा विचार डोक्यात येत सुद्धा नाही. पण मी या आठवड्यात एका लग्नाला गेलो होतो तर तिथे त्या लग्नाचं ब्रॅंडिंग "इको फ्रेंडली वेडिंग' म्हणून करण्यात आलं होतं. लग्नात कुठेही प्लास्टिकचे ग्लास वापरले गेले नव्हते. डेकोरेशन पण अश्या पद्धतीचं होतं की जे पुन्हा वापरता येऊ शकेल. एकदा वापरलं की फेकून देऊ असं नाही. अगदी चहा सुद्धा कुल्लड मधे देण्यात येतं होता, मातीच्या कपात. प्लास्टिक किंवा कागदाच्या कप मधे नाही.


    एकदाच तर असतो कार्यक्रम या नावाखाली आपल्याला वाट्टेल तशी उधळपट्टी करण्याची सवय लागली आहे. पैश्या बद्दल नाही बोलणार मी, तो प्रत्येकाने आपल्या मेहनतीने कमावलेला आहे. त्याची इच्छा किती, कुठे, कसा वापरायचा. पण निसर्गाचं काय? जर एकदाच कार्यक्रम होणार आहे तर तो निसर्गाला त्रास होणारा प्लॅन करावा का निसर्गाला साथ देणारा? 

    कुठलाही इव्हेंट "इको फ्रेंडली इव्हेंट' करणे शक्य आहे हे ह्या लग्नामधून मला जाणवलं. ह्याच्या पुढे इव्हेंट ची प्लॅनिंग करताना कसा इको फ्रेंडली करता येईल हा विचार नक्की करा. असं इको फ्रेंडली लग्न मला एन्जॉय करता आलं म्हणून आणि हा विचार केला म्हणून जोशी परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि नवीन जोडीला खूप खूप आशीर्वाद. 

इथे आहे पत्राचा शेवट!

    आज पासून ठरवून टाका की मी माझ्या प्रॉब्लेम्स पेक्षा मोठा आहे आणि सगळे प्रॉब्लेम्स मी आनंदाने सोडवतो. आमचे पत्र आवडले तर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा. आपल्या जवळच्या एका व्यक्तीला, आधी निसर्गाचा विचार करण्याची सवय लावा. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.

आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.







Post a Comment

0 Comments