मनामध्ये ही पैश्याची प्रिंट नेमकी बनते कशी?

 ।। श्री ।।


#६ 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        प्रत्येक आठवड्यला काहीतरी लिहून ते त्याच वेळेवर ब्लॉग मध्ये वेबसाईट वर टाकणे ह्यात एक वेगळीच मज्जा आहे. तुम्ही कधी प्रयत्न केला नसेल ना तर करून बघा. माझाव्यापार समूहातले बरेच जण आठवड्याला ब्लॉग्स लिहीत असतात. मी तर मला मिळालेलं काम नेहिमीप्रमाणे एन्जॉय करतच करतो. 

मागचा भाग वाचायचा राहील असेल तर इथे क्लिक करून तो वाचू शकतात. 

लिंक - हे पुस्तकं वाचाल तर तुम्ही खरंच वाचाल! (mazavyapar.blogspot.com)



खरं सांगा! कोणा कोणाला असे पैसे छापायला आवडतील?

ही ब्लू प्रिंट नेमकी कशी बनते?

       "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड" मी हे पुस्तकं तुम्हाला मागच्या दोन ब्लॉग मध्ये कमीत कमी शब्दात समजावून सांगण्याच्या प्रयत्न केला. आता त्याचा तिसरा भाग ज्या मध्ये ही जी पैश्याची ब्लू प्रिंट म्हणून जी काही असते ती कशी बनते हे लेखक आपल्याला समजावून सांगतात.

विचार => भावना => क्रिया = परिणाम

    ही पैश्याची ब्लू प्रिंट ह्या चार गोष्टींनी बनलेली असते. विचार केल्यामुळे भावना निर्माण होतात भावनेतून आपण क्रिया करतो, आणि त्याचे आपल्याला रिझल्ट्स म्हणजेच परिणाम दिसतात. ही ब्लू प्रिंट लोकांच्या सहवासात राहून निर्माण होते. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, अधिकार असणारे लोकं, शिक्षक, अध्यात्म शिकवणारी मोठी लोकं, मीडिया आणि काही प्रमाणात आपली संस्कृती ह्या सगळ्यांमुळे निर्माण होते.
        तुम्ही हे नक्कीच आपल्या आजू बाजूला पाहिलं असेल. काही संस्कृती मध्ये पैश्याचं महत्व वेगळं आहे. तर काही मध्ये पैश्याला तितकं महत्व दिलं जात नाही. बाळ जन्म घेताना पैसा कसा सांभाळावा हे शिकून येत नाही त्याला हे सगळं नंतर शिकवलं जातं. 
        हे तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी सत्य आहे. हीच सगळी शिकवणं एक ऑटोमॅटिक रिस्पॉन्स बनते पैश्याच्या बद्दल आणि आपण तसेच विचार मग काम करायला लागतो. साहजिकच तसे परिणाम दिसायला लागतात. ही ब्लू प्रिंट कशी असावी हेच तर ह्या पुस्तकात समजावून सांगितलं आहे. 
        आता विचार कसे निर्माण होतात? विचार हे आपल्या कडे असलेल्या माहितीवर निर्माण होतात. त्या मुळे विचार => भावना => क्रिया = परिणाम हे समीकर थोडंसं नीट करूया. 

जुनी शिकवण => विचार => भावना => क्रिया = परिणाम

        जुन्या शिकवणीवरून विचार निर्माण होतात मग तश्या भावना मग तशी क्रिया आणि तसेच परिणाम. जस आपण मागच्या भागात पाहिलं ना कॉम्पुटर मधून आलेली प्रिंट, त्यावरची स्पेलिंगची झालेली चूक दुरुस्त करायला कॉम्पुटर वर असलेली फाईल, त्या मध्ये बदल करावा लागतो. प्रिंट काढल्यावर कितीदाही नीट करा पुढच्या प्रिंट ला परत स्पेलिंगची चूक सापडेलच. 
        तर हे पुस्तक वाचण्याच्या निर्णर तुम्ही घेऊन तुमची जुनी काही प्रमाणात चुकीची असलेली पैश्याच्या बद्दलची शिकवण बदलण्याकङे एक पाऊल घेतलेलं आहे. 

ऑटोमॅटिक निर्माण होणारे विचार तीन गोष्टींमुळे निर्माण होतात. 
१. सोबतच्या लोकांच बोलणं ऐकून -  
२. मोठ्यांची नक्कल करून - 
३. काही ठरावीक प्रसंगावरून - 

        ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखक एक एक विचार आपल्याला कसा बरोबर पद्धतींनी आपल्या मनामध्ये पेरता येईल ह्या बद्दल सांगतात. आधी ते आपल्याला बदल जी एकमेव कायम राहणारी गोष्ट आहे त्या बद्दल सांगतात.


बदल घडतो कसा हे समजून घेतल्या वर तो अवघड वाटणारं नाही!

बदल नेमका कसा घडतो?

        प्रत्येकाला बदल करायचा आहे बघा. कोणाला वजन, कोणाला जॉब, कोणाला बिझनेस, कोणाला कार, कोणाला घर एक नाही हजार बदल प्रत्येकाला घडवून आणायचे आहे. काही स्वतः मध्ये काही समाजामध्ये. पण तुम्हाला कोणी बदल घडण्याची प्रोसेस सांगितली आहे का? ह्या पुस्तकात लेखक समजावून सांगतात. 
        मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो आणि ते पण माझंच. मला स्ट्रीट फूड खाण्याची भयानक आवड होती. (आजही आहे.) पण मनामध्ये मला हे कळत होतं की रोज पाणी पुरी, पाव भाजी, रगडा पॅटिस, दही पुरी, समोसा हे पदार्थ माझे, पैसे आणि प्रकृती दोन्ही कमी करत आहेत. तर मला हा बदल घडवून आणायचा होता जिथे मला महिनाभर जरी हे सगळं खाल्लं नाही लगेच जाऊन खावं, असं वाटलं नाही पाहिजे. 
        नेहिमीप्रमाणे २-३ दिवस मी न खाता राहिलो की मला चौथ्या पाचव्या दिवशी जास्त खावं वाटायचं आणि मी पण जाऊन खायचो. नंतर मी ह्या पुस्तकात वाचलेला बदल घडवून आणायची प्रोसेस समजून घेतली. 
        लेखक सांगतात बदल घडवून आणायच्या ४ पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे जाणीव. जाणीव झाल्या शिवाय बदल घडवून आणता येत नाही. समजा विचार केला प्रकृती बद्दलचा तर खुप जणांना आपली प्रकृती ही वरचे वर बिघडत जात हे दवाखान्याचं बिल बघितल्या वर जाणवतं. ती जाणीव. 
        दुसरी पायरी म्हणजे तुम्हाला समज येते. जसं माझ्या बाबतीत स्ट्रीट फूड खावं वाटणं हे मला आतूनच वाटायचं पण मी पाणी पुरीची गाडी दिसणं, मित्राचा फोन येऊन चल खाऊन येऊ पाणी पुरी असं म्हणणं ह्याला दोष देतं होतो. जेव्हा मला समज आली की हे मला च मनापासून खावं वाटतं आहे. 
        तिसरी पायरी जेव्हा आपण स्वतः ला त्या गोष्टी पासून दूर करतो. मी एकदा सहज जाऊन माझ्या नेहिमीच्या पाणी पुरी वाल्या दादांना जाऊन भेटून आलो पण पाणी पुरी खाल्ली नाही. एकदा खूप जास्त इच्छा झाली तरी मी घरी भाजी पोळी खाऊन स्वतःला सांगितलं आपण बुधवार ठरवला आहे तेव्हा खाऊया. मी काही या काही प्रयत्न करून स्वतःला दूर केलं आणि प्रकृतीसाठी चांगल्या असणाऱ्या सगळ्या पदार्थांचा अभ्यास करणं, त्या बद्दल वाचणं सुरु केलं.
        आणि चौथी पायरी म्हणजे मी नवीन सवय माझ्या मनात बसवली ती म्हणजे मी बुधवारला माझा चीट डे म्हणतो त्या दिवशी मी आनंदानी स्ट्रीट फूड खातो.

जुनी शिकवण माझी काही ह्या प्रकारची होती. 

१. जाणीव - खाण्याची जाणीव झाली की वेळ काढून जी जागा आवडते तिथे जाऊन खाऊन यायचं. 
२. समज - आपण काय लकी आहोत हे इतकं भारी खायला मिळतं आहे. 
३. तिसरी पायरी ही पायरी मला माहितीच नव्हती. 
४. आणि चौथी पायरी म्हणजे मी २ दिवस बदल करण्याचा प्रयत्न करायचो आणि मग सोडून द्यायचो. 

हार्व एकर ह्यांनी समजावून सांगितलेली पद्धत 
१. जाणीव - मी जरा जास्तचं बाहेरचं खात आहे. कुठलीही गोष्ट अती चांगली नाही. 
२. समज - स्ट्रीट फूड विकणारे कधीही आपल्याला हे आरोग्यासाठी चांगलं नाही असे सांगणार नाहीत. मलाच हे समजून किती वेळेस खावं हे ठरवलं पाहिजे. बंद केलं तर अतिउत्तम. पण सध्या आठवड्याला एका दिवसांनी सुरवात करू. 
३. स्वतःला जाणीवपूर्वक दूर करणे - मी वेग वेगळे प्रकार वापरून स्वतःला स्ट्रीट फूड पासून दूर ठेवलं. माझ्या बॅग मध्ये शेंगदाणे ठेवले, काजू बदाम ठेवणं सुरु केलं आणि भूक लागली की स्ट्रीट फूड ऐवजी माझ्या कडे असलेलं खाणं सुरु केलं. 
४. नवीन शिकवण - आपल्या शरीराला बऱ्याच गोष्टींची गरज असते त्या पैकी एक प्रोटीन. प्रोटीन मी अन्नातून नीट दिलं नाही तर हळू हळू त्याचा परिणाम मला दिसेल हे मला जाणवलं आणि मी दिवसाचं प्रोटीनचं प्रमाण ठरवून ते पूर्ण करून मगचं बाकीच्या सगळ्या प्रकारच्या फूड्स ना महत्व देणं सुरु केलं. 


             आणि हे सगळं केल्यावर आज हा बदल आता काही वर्षांनी पक्का झाला आहे. आता मला आधी सारखं काहीही आणि कितीही खावं वाटतं नाही. असा होतं असतो बदल. आता समजलं का, की का बरं १ जानेवारीला जिम मध्ये सगळयात जास्त गर्दी असते. तुम्हाला जो बदल करायचा आहे तो ह्या ४ स्टेप्स मध्ये बसवून बघा. बदल करणं सोप्प वाटायला लागेल. 

           आता मी तुम्हाला ब्लॉग मध्ये हे पूर्ण पुस्तक लिहून देणार नाहीये. ह्या पुस्तकाबद्दल मी अजून २-३ ब्लॉग लिहिलं. मला पाहिजे इतकंच की तुम्ही हे विकत घेऊन ह्या पुस्तकाचा अभ्यास करावा. विकत घायच असेल तर ही आहे लिंक. "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड"


हे तुम्हीचं आहात ज्याला फ्री गिफ्ट आवडतात!

हे घ्या माझ्याकडून एक फ्री गिफ्ट!

        इंटरनेट वर पैसे भरून आजकाल सगळं काही शिकता येतं. पण माझा विश्वास फ्री मधे उपलब्ध असलेल्या गोष्टींवर जरा जास्तचं आहे. आणि अश्याच फ्री उपलब्ध असलेल्या कामाच्या गोष्टी तुमच्या पर्यंत पोहचवायला मला आवडतं. हे जे लेखक आहेत ना हार्व एकर ह्याची स्वतःची वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईट वर बरेच कोर्स फुकट मध्ये उपलब्ध आहेत. 

        हा फ्री मध्ये उपलब्ध असलेला कोर्स नक्की बघा. Don't believe a thought you think! पुस्तक वाचा, पुस्तक वाचा मी सांगणारच पण आवडतंच नाही वाचायला अश्यांसाठी हा एक छोटा कोर्स जो कसा विचार करावा हे शिकवेल. आत्ताच पाहिलं ना आपण कसे विचार आपल्या रिझल्ट्स सोबत जोडलेले आहेत. तर वेळ काढून नक्की बघा. 

            पुढच्या भागात थोडसं समजून घेऊया ३ गोष्टींबद्दल ज्या मुळे विचार ऑटोमॅटिक तयार होतात, जे आपल्या रिझल्ट्स सोबत जोडलेले आहेत. पण पुढचा भाग मी लिहिला आणि तुम्ही वाचायला विसरले तर? 

        तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुप चा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

व्हॅट्सऍप चॅनेल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडली नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 


Post a Comment

0 Comments