।। श्री ।।
#६
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
मी प्रत्येक आठवड्यात पत्र पाठवायला फार उत्सुक असतो. तसा मी नेहिमीच उत्सुक असतो. माझ्या मते कुठलंही काम उत्सुकतेनं न करणं म्हणजे भाजी बनवून त्यात मीठ न टाकण्यासारखं आहे. ह्याचाच अजून एक अर्थ असा की तुम्ही हे पत्र पण उत्सुकतेनंच वाचलं पाहिजे.
तर मागचा भाग वाचायचा राहील असेल तर इथे क्लिक करून तो वाचू शकतात.
लिंक - काही वर्षांपूर्वी ह्याच पुस्तकाने मला निवडलं होतं! (mazavyapar.blogspot.com)
आता मागच्या भागात मी "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड" ह्या पुस्तकाची थोडक्यात तुम्हाला ओळख करून दिली. थोडं तुम्हाला हार्व एकर बद्दल सांगितलं जे ह्या पुस्तकाचे लेखक आहेत. ह्या पत्रापासून मी ठरवलं आहे की तुम्हाला प्रत्येक पत्राच्या शेवटी एक गिफ्ट द्यायचं. पण..... स्क्रोल करून खाली जाऊ नका. छोटासा लेख आहे. वाचत वाचत स्क्रोल करा.
पैश्याचे कोणीही न सांगितलेले नियम!
पुस्तकाचा पहिला भाग जिथे सुरु होतो तिथे हार्व आपल्याला पैश्याच्या ब्लू प्रिंट बद्दल सांगतात. आपण दोन बाजू असलेल्या जगात रहातो. खाली-वरती, अंधार-उजेड, थंड-गरम, आत-बाहेर, फास्ट-स्लो, डावी बाजू- उजवी बाजू. जगात एक बाजू आहे म्हणजे दुसरी बाजूही असलीच पाहिजे.
हेच पैश्याच्या दोन बाजू बद्दल बोलायला गेलो तर पैश्याचे बाहेरचे नियम आहेत तसे काही आत मधले नियम पण आहेत. बाहेरचे नियम म्हणजे बिझनेसचे ज्ञान, इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पद्धती, वगरे वगरे. पण जे आत मधले म्हणजे मनातले नियम आहेत ते पण तितकेच महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ जर एका सुताराला आपण सगळे त्याचे टूल्स दिले पण त्याला ते वापरताच येतं नसले तर कसं जमणार ना?
मोठा पैसा आणि यश ह्या दोन्ही सोबत काही अडचणी पण येतात आणि ह्या अडचणींना कसं सामोरं जावं ह्या ज्ञानाची कमी असल्यामुळे बरेचं लोकं आज पाहिजे तितके यशश्वी नाहीत. तुम्ही असे उदाहरणं पाहिले असतील की एका व्यक्ती ने मोठा बिझनेस केला तो काही कारणांनी यशश्वी नाही झाला, त्या मुळे तो कंगाल झाला पण परत त्यानी काही वर्षात दुसरा बिझनेस करून तितकाच नाही त्या पेक्षा जास्त पैसा कमावला. असं कसं झालं? ह्याचं उत्तर आहे ब्लू प्रिंट.
मुळांपासून फळांची निर्मीती होते!
कल्पना करा तुमच्या समोर एक झाडं आहे. ह्या झाडाला आपण आयुष्य म्हणू आणि त्याला लागलेले जे काही फळं आहेत ती म्हणजे आपल्याला मिळणारे रिझल्ट्स आहेत. काही फळं मोठे आहेत, काही छोटे, काही खारट आहेत, काही पिकलेले आहेत, काही पिकलेलं नाहीत. म्हणजे आपल्याला मिळणारे रिझल्ट्स सगळे काही सारखे नसतात.
आता तुम्हाला हे रिझल्ट्स आवडले नाहीत तर प्रत्येक जण काय करतो, तो त्या रिझल्ट्स वरच लक्ष केंद्रित करतो. पण फळं तेंव्हाच बदलणार जेंव्हा मुळांवर काम केलं जाईल. जे जमिनीच्या खाली आहे त्यावर काम केलं तर जमिनीच्या वर जे आहे ते बदलणार. म्हणजेच न दिसणाऱ्या गोष्टींवर काम केलं की दिसणाऱ्या गोष्टी बदलणार.
तर आयुष्यात न दिसणाऱ्या गोष्टींचं महत्व हे खूप जास्त आहे आणि तुमचा जर ह्या वाक्यावर विश्वास नाही तर तुम्ही एक मोठी चुक करत आहात. या वाक्यावर विश्वास न ठेवणं म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाण्यासारखं आहे. आपण निसर्गाचे एक भाग आहोत आणि निसर्गच आल्याला सांगतो आहे की न दिसणाऱ्या गोष्टींवर काम केलं की दिसणाऱ्या गोष्टींमध्ये बदल घडून येतो.
एक मॉडर्न उदाहरण बघूयात का?
अजून एक उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही समजा एक प्रिंट काढली आणि तुम्हाला लक्षात आलं की लिहिण्यात काही तरी चूक झाली. कदाचित स्पेलिंग चुकलं. म्हणून तुम्ही त्या कागदावर पेन्सिल घेऊन ती चूक नीट केली आणि परत प्रिंट काढली. पण तुमच्या लक्षात आलं की अरे चूक तर पुन्हा दिसती आहे. म्हणून तुम्ही पुन्हा पेन्सिल नी ती चूक नीट करून प्रिंट दिली. पण असं कितीदा ही करा ही चूक जो पर्यंत तुम्ही कंप्युटर वर लिहिलेल्या फाईल मधे बदल करत नाहीत तो पर्यंत दिसतं रहाणार.
बरेच लोकं ह्या पद्धतीने त्यांच्या चुका नीट करत आहेत. पैसा हा रिझल्ट आहे, संपत्ती ही एक रिझल्ट आहे, आरोग्य चांगलं असणे हा एक रिझल्ट आहे, आजारी असणे हा एक रिझल्ट आहे, तुमचं वजन हा एक रिझल्ट आहे. आपल्याला आयुष्यात रिझल्टला नाही तर तो रिझल्ट निर्माण करणाऱ्या मुळांना बदलायचं आहे.
तुम्ही लोकांना बोलताना ऐकलं असेल ना, आजकाल तब्येत बरोबर नाही रे, सध्या माझं बीपी वाढलं आहे. बीपी वाढणं हा प्रॉब्लेम नाही. बीपी वाढणे हा रिझल्ट आहे. तुम्ही दिवसभरात काहीतरी चुकीचं करत आहात त्याचा रिझल्ट बीपी वाढणं आहे. गोळी घेणे हा तात्पुरता ऊपाय ठीक आहे, पण लक्षात घ्या आतली बाजू जो पर्यंत बदलणार नाही तो पर्यंत बाहेरची बाजू बदलणारं नाही.
अजून बरंच काही ह्या पुस्तकात खूप छान पद्धतीने उदाहरणं देऊन समजावून सांगितलं आहे. ते पूर्ण वाचण्यासाठी हे पुस्तक नक्की विकत घ्या. ही आहे लिंक. "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड"
हे घ्या तुमचं फ्री गिफ्ट!
मी गिफ्ट बद्दल म्हणालो होतो ना. तर लक्षात घ्या इंटरनेट वर पैसे भरून आजकाल सगळं काही शिकता येतं . पण माझा विश्वास फ्री मधे उपलब्ध असलेल्या गोष्टींवर जरा जास्तचं आहे. आणि अश्याच फ्री उपलब्ध असलेल्या कामाच्या गोष्टी तुमच्या पर्यंत पोहचवायला मला आवडतं. हे जे लेखक आहेत ना हार्व एकर ह्याची स्वतःची वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईट वर बरेच कोर्स फुकट मध्ये उपलब्ध आहेत.
हा फ्री मध्ये उपलब्ध असलेला कोर्स नक्की बघा. The Shocking Truth about happiness. आहे की नाही प्रतयेकाची इच्छा की आपण खुश रहावं. मग हे जर कोणी फुकटात शिकवत असेल तर त्याला पण रडू नका. मला बघायला वेळचं नाही म्हणून. वेळ काढून बघावा असा फुकटचा कोर्स आहे.
याच्या पुढच्या भागात समजून घेऊ की ही मनी ब्लू प्रिंट नेमकी बनते कशी? पण पुढचा भाग मी लिहिला आणि तुम्ही वाचायला विसरले तर?
तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुप चा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.
ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.
व्हॅट्सऍप चॅनेल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.
ई-मेल लिस्ट मध्ये असलेल्या आमच्या सर्व subsribers ना विशेष काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर विशेष गोष्टींसाठी ई-मेल लिस्ट मध्ये जरूर ऍड व्हा.
मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडली नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.
बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती.
कळावे लोभ असावा,
तुमचा मित्र,
0 Comments