The feeling of being thankful is gratitude. This is the simplest definition of Gratitude.
मी उद्योजक होणार असे ठरवून आणि त्यावर ठाम राहून मला आता १० वर्ष झाले. ह्या दहा वर्षात मी सगळ्यात जास्त कोणा कडून शिकलो असेल तर माझ्या आयुष्यात आलेले लोकं. आता हे लोकं कोणी पण असू शकतात. आजच्या ह्या ब्लॉग मध्ये मी फक्त मनापासून त्या सगळ्यांना Thank you, धन्यवाद सांगणार आहे.
{नकारात्मक बोलणार माझं मन - "मित्रा कोणी हे ऐकत पण नाहीये आणि वाचत पण नाही तुझे ब्लोग्स. कोणाला Thank you बोलणार?"}
मी - "कोण वाचेन आणि कोण ऐकेन हा प्रश्नच नाहीये. मी आज ज्या ज्या व्यक्तींमुळे घडलो आहे त्यांना मनापसून एक Thank you thought ची frequency पाठवायची आहे. पोहचणार्या व्यक्ती पर्यंत बरोबर पोहोचते. असा मला ठाम विश्वास आहे." आणि मनातल्या मनात मी Negative बोलणाऱ्या माझ्या मनाला लाथ मारली.
सगळ्यात आधी तर माझ्या मित्रा चे खूप मोठे आभार ज्याच्या मुळे मी उद्योजकता हा विषय समजून आपण त्या मध्ये जावू हे ठरवू शकलो.
त्या नंतर चे माझे यशस्वी न झालेले ३ बिझनेस, त्या बिझनेस मधल्या माझ्या team चे आभार. तुमच्या मुळेच मी समजू शकलो बिझनेस मध्ये काय करू नये.
त्या नंतर कितीही आभार मानले तरी कमी असे माझे घरचे, आई आणि बाबा ज्यांनी प्रत्येक बिझनेस मध्ये मला साथ दिली. बिझनेस यशस्वी झाला असो किंवा नसो.
खूप खूप आभार त्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी माझ्या बिसनेस वर विश्वास नाही ठेवला आणि त्यांच्या मुळे मी बिझनेस मध्ये बदल करत गेलो आणि प्रत्येकाचा विश्वास बसेल असा Brand बनवला.
बिझनेस मधले माझे सगळे गुरु आणि माझ्या सोबत तितक्याच मेहनतीने काम करणारे माझे मित्र ह्यांचे पण खूप आभार.
बिझनेस मध्ये जितके काही असे क्षण आले जिथे मला "आता मी बिझनेस करूच शकणार नाही" असं वाटलं त्या प्रत्येक क्षणाचे आभार कारण त्यांनीच मला ताकद दिली strong बनवल.
मी बिझनेस च्या गडबडीतून अर्धा तास वेळ काढून जेव्हा हा विचार करत बसलो होतो, तेंव्हा मला जाणवलं की माझा बिझनेस जो आता मोठा झाला आहे, तो मी नाही तर इतक्या वर्षा मध्ये होणार्या माझ्या सोबतच्या वेगवेगळ्या घटनांचा एकत्रीकरण आहे आणि या सगळ्या घटना कोणा मुळे घडल्या? सोबत असणार्या लोकांमुळे.
माझ्या मते Being Grateful, कृतज्ञ रहाणे हा उद्योजकाचा DNA असला पाहिजे. आणि मी सगळ्या मोठ्या बिझनेस करणार्यांना नेहमी grateful पाहिलेला आहे.
So make Gratitude a way of your life आणि आज हा ब्लॉग वाचून किंवा ऐकून झाल्या वर तुमच्या बिझनेस मध्ये ज्याने तुमाला मदत केली त्याला एक छोटासा Thank you चा मेसेज पाठवा. आयुष्यात होणार्या जादूची सुरवात ही Thank you च्या मेसेज ने होत असते.
भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.
माझ्या बद्दलआणिमाझ्याबिसनेसबद्दलजाणूनघेण्याचीइच्छाअसल्यास ह्या लिंक वर click करा. https://linktr.ee/Ajinkya_Kawathekar
0 Comments