दृष्टी विकणाऱ्याचा दृष्टीकोन!

                                                     

If you are lazy in reading, just click on the above link to listen to the audio version of this blog.

   भर दुपारच्या वेळात तुम्ही कधी दुकानदार जे असतात त्यांना बघितलं आहे का? लक्ष देऊन. मला तरी दुपारच्या वेळी स्वतःला रिचार्ज करणारा दुकानदार दिसतो. हो, तोच दुकानदार जो संध्याकाळी दुकानात येणाऱ्या भल्या मोठ्या गर्दीला एकटाच सांभाळत असतो. तोच स्वतः मालक, तोच स्वतः sales man, तोच स्वतः pack करून देणारा आणि तोच ग्राहकांच्या तक्रारी सोडवणारा. कसं जमतं ना हे सगळ एकट्याला? नाराज ग्राहक एकही मिळणार नाही ह्याची खात्री ती वेगळी. तर अश्याच एका दुकानाची ही कथा आहे.

   नितीशच्या वडिलांनी मोठी मेहनत करून हे दुकान उभं केलं होतं. वडिलांनी त्यांची कारकीर्द नियमित पार पाडली होती. बिझनेस तर त्यांनी केलाच होता पण त्या पेक्षा ही एक महत्वाची गोष्ट करण्यात ते यशस्वी झाले होते ती म्हणजे त्यांच्याच मुलाला त्यांच्याच बिझनेसची त्यांनी आवड निर्माण केली.

   आता नितीश या दुकानात लहानपणापासून येत होता. येऊन तो प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचा. त्यामुळे ग्राहकांशी बोलण्याचं कौशल्य हे, बाबा कसे बोलत आहेत, बाबा काय सांगत आहेत, काय सांगत नाहीत, हे सगळं नितीशला लक्ष देवून ऐकण्यामुळे आणि बघण्यामुळे जमलं होतं. दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक हा त्याच्यासाठी एक शिकण्याची संधी घेऊन येत होता. वडिलांनी २० वर्षापूर्वी सुरु केलेलं छोटंसं दुकान आज त्यांच्या शहरामधलं एक ओळखलं जाणारं असं चष्म्याचं दुकान होतं. ते म्हणजे श्री समर्थ ऑप्टीकल्स.

   लहानपणा पासूनच इतके ग्राहक बघितल्या मुळे "डोक्यावर बर्फ, पायात चक्र आणि तोंडात साखर" हे नितीश आपल्या वडिलांकडून छान शिकला होता. कदाचितच कोणी असेल, जो दुकानामध्ये आल्यावर चष्म्या नंतर नितीशच्या प्रत्येकाला आवडेल अश्या बोलण्याची स्तुती करत नसे.

   तर एकदा दुपारच्या वेळेला बाबांना जरा महत्वाचे काम आले आणि दुकानात काम करणाऱ्यांची सुट्टी असल्या मुळे त्यांचा पाय काही दुकानातून निघेना. ते जर दुकानातून बाहेर गेले असते तर जवळ जवळ २-३ तास नितीशला एकट्याला हे दुकान बघायचे होते. आपल्या बाबांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह बघून नितीश पटकन म्हणाला, "बाबा तुम्ही निवांत जा. मी आहे ना दुकानावर." आपला अकरावीचा अभ्यास करत बसलेला आणि त्याच बरोबर दुकानाकडे लक्ष देतो म्हणणाऱ्या त्यांच्या मुलाचे त्यांना खूप कौतुक वाटले.

बाबा, "अरे पण कोणी ग्राहक आले तर? काय बोलशील त्यांना?"

नितीश,"तुम्ही बोलता तेच" आणि तो वडिलांच्या आवाजात बोलण्याची नक्कल करू लागला. "नमस्कार स्वागत आहे तुमचं श्री समर्थ ऑप्टीकल्स मध्ये. मी तुमची कशी मदत करू."

बाबा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, "माझा जरा नंबर वाढल्या सारखा वाटतो आहे. जरा सांगता का."

   नितीश, "नक्कीच, हेच तर काम आहे माझं. हे बघा आपल्या दुकानाला लागूनच एक डोळ्यांचा दवाखाना आहे. तिथे जर तुम्ही आमचे हे कार्ड घेऊन गेलात तर विनामूल्य तुमचे डोळे तपासून दिले जातील. तुम्ही आधी आमच्या दुकानात आले हा अगदी योग्य निर्णय घेतला. आधी तिथे गेले असता ना तर पैसे लागले असते. आता डोळे तपासून या आणि इथे आलात की तुम्हाला सगळ्या चष्म्याच्या फ्रेम्स दाखवतो ज्या तुम्हाला. कुठेच मिळणार नाहीत आणि ग्लास्सेस तर आमच्या दुकाना इतके स्वस्त आहेत, तसे कुठेच मिळणार नाहीत. त्याच बरोबर हे एक मोबाईल stand आणि हा ग्लास cleaning कीट पण फ्री. अजूच बऱ्याच ऑफर्स आहेत. तुम्ही डोळे तपासून आलात की चहा घेऊ सोबत. तो घेता घेता सांगतो."

   नितीशची इतकी बडबड ऐकून बाबाच थक्क झाले आणि गमतीत म्हणाले, "नितीश बाळ, Diabetes होईल रे एखाद्याला. जास्तच गोड बोलायला शिकला आहेस. पण छान. तुलाही ग्राहक सांभाळता आला पाहिजे. तर मी जावून येतो २ तास लागतील बघ आणि काही मदत लागलीच तर फोन कर. ठीक आहे? जाऊ मी?" असे बोलून ते निश्चिंत पणे बाहेर गेले.

   नितीश ने आपलं वही पुस्तक क्षणात बाजूला फेकलं आणि ग्राहकाची वाट बघत बसला. पहिल्यांदाच तर त्याला अशी संधी मिळत होती. एक दीड तास वाट बघण्यात आणि कसा उभा रहाणार, कसा बोलणार हे सगळं practice करण्यात गेला. आणि तितक्यात नितीशला एक वयस्कर व्यक्ती दुकानाकडे चालत येताना दिसली. नितीश तयारच बसला होता. तो वयस्कर माणूस आत आल्या आल्या नितीश ने खुर्ची वरून उडी मारली आणि बाबांच ऐकून ऐकून पाठ केलेली ज्याला तो एन्ट्री लाईन म्हणायचा ती बोलायला सुरवात केली.

"नमस्कार, स्वागत आहे आपले श्री समर्थ ऑप्टीकल्स मध्ये. मी तुमची कशी मदत करू शकतो?"

आजोबा,"अरे आपला गणपत नाही का रे?"

"मी गणपतचा मुलगा काका. तुम्ही मला सांगू शकतात. मी मदत करतो."

आजोबा,"अरे वा...गणपत ने लवकर शिकवले आपल्या मुलाला."

नितीश,"मुलगा हुशारच आहे आजोबा, शिकला पटापट." दोघे हसू लागले.

आजोबा,"नाव काय रे तुझं?"

"नितीश आजोबा, म्हणजे नुसता नितीश, आजोबा तुम्ही आहात. मी नितीश." त्याचा उत्साह कोणीही ओळखू शकतं होतं.

आजोबा, "हे बघ, मला ना चष्मा घ्यायचा आहे बघ, दिसत नाही रे हल्ली, आणि दिसला नाही की वाचता येत नाही बघ. मग कश्या समजाव्या रोजच्या घडामोडी."

नितीश,"अगदी बरोबर आहे आजोबा .आजकाल तर अपडेटेड राहिलंच पाहिजे. मी तुम्हाला काही छान फ्रेम्स दाखवतो. तुमचा नंबर काय आहे?"

आजोबा,"नंबरच बघू रे, आधी मला डोळ्यावर लावून तर बघू दे ना. मला कसं दिसतं आहे ते. तो असा खालच्या भागाला अर्धा चंद्र असतो बघ. तसा चष्मा दे."

नितीश जरा गोंधळला आणि म्हणाला, "आजोबा नंबरचा बनवावा लागेल चष्मा त्याला एक दिवस तरी जातो बघा. पण सध्या मी चष्मे दाखवतो ना. बघा कसं दिसतं आहे ते."

आणि मग नितीशने एक-एक चष्मे दाखवायला सुरवात केली.

नितीश, "आजोबा हा बघा, एकदम light weight. डोळ्यावर आणि नाकावर आहे हे समजणार सुद्धा नाही."

आजोबा, "हो का बघू..."

नितीश, "हा एक नवीन pattern आला आहे बघा. असा आपण रूम मध्ये असलो की पांढरा "आणि नितीश counter च्या वरून उडी मारून बाहेर आला आणि चष्मा उन्हात धरला, "हे बघा एका सेकंदात black. चष्मा कम गॉगल."

आजोबा, "अरे वा, बघू जरा वाचून बघू दे." आजोबांनी समोरचा पेपर हातात धरला. "नाही रे, ह्याने नीट वाचता येत नाहीये बघ. अजून दाखव."

नितीश, "हा बघा, You are looking so young आजोबा." चष्मा आजोबांच्या डोळ्यावर चढवत नितीश म्हणाला.

आजोबांनी पुन्हा पेपर डोळ्या समोर धरला, "नाही रे, वाचता येण कठीण होतं आहे बघ तुझ्या चाश्म्यांमुळे."

   नितीशला काही समजेना त्याने आता पर्यंत त्याच्या कडचे चांगल्यातले चांगले चष्मे दाखवले होते आणि प्रत्येक चष्म्याला काकाचं एकच उत्तर "नीट वाचता येत नाहीये बघ" आता करावं तरी काय? आज ग्राहक तर गेलाच गेला आणि बाबांचे बोलणे मिळतील ते वेगळे. माझ्या पहिल्या ग्राहकाला मला यशस्वी पद्धतीने चष्मा विकायचा होता. आता कुठला चष्मा दाखवू या आजोबांना?" नुसते विचार नितीशच्या डोक्यात घुमत होते. समोरच्या टेबलवर कमीत कमी १०० चष्मे गोळा झाले होते.

   तितक्यात नितीशला त्याचे बाबा येताना दिसले. नितीश तुडूंब खुश झाला कारण नितीश ने केलेल्या चुका किंवा त्याला न समजल्यामुळे तो जे विकू शकला नव्हता ते बाबा अगदी काही मिनिटातच विकतील ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. बाबा आले की मोठे डोळे कडून माझ्या कडे बघणार, कारण हा इतक्या सगळ्या चाश्म्यांचा ढीग जो जमवला होता. म्हणून तो त्यांच्या डोळ्यातच बघत होता. त्याला डोळ्यांनीच बाबांना, "माझी मदत करा नंतर रागवा" असं सांगायचं होतं.

पण बाबा मध्ये आले आणि त्यांना हसूच आलं. ते आधी आजोबांच्या पाया पडले आणि म्हणाले, "अण्णा तुम्ही कधी आले गावाकडून? सांगितलं नाही. पाठवलं असत न कोणाला तरी stand वर."

आजोबा, "नाही रे गंपू, मी आलो बघ माझा माझा आणि कामच तसं महत्वाचं आहे बघ आणि चष्म्या बद्दल आहे. चष्मा म्हणलं की थेट तुझ्या दुकानात आलो बघ. तुझा पोरगा चांगले चांगले चष्मे दाखवतो आहे मला."

बाबा,"दाखवले ना चष्मे. पण तुम्हाला कधी लागला चष्मा? कोणत्या डॉक्टर ने सांगितलं? बघू कागद दाखवा डॉक्टर चा."

   आजोबा,"अरे डॉक्टर नी नाही सांगितलं बघ. कसं आहे ना, सगळं काही गावाकड काम करून करूनच शिकलो मी. २ दिसापुर्वी मी आमच्या तिथल्या टपरी वर माझ्या वयाच्या २ जणांना असा चष्मा घालून पेपर वाचताना पाहिलं बघ. मला पण वाचायचा आहे रे असा घडा घडा. म्हणून मी इतके सारे चष्मे पहिले. तुझ्या पोराने छान दाखवले,पण एकाही चष्म्या मधून वाचता येत नाही बघ. कसं आहे ना तुला तर माहिती आहे माझं काही शिक्षण झालं नाही. आता तू चालवतो की इतक्या वर्षा पासून चष्म्याचे दुकान दे की तुझ्या अण्णांना एक चष्मा बनवून. मला वाचता आलं पाहिजे बघ."

नितीश हे सगळं काही लक्ष देऊन बघत होता.

बाबा म्हणाले, "तुम्हाला कोण म्हणे हा चष्मा घालून वाचता येत. असं काही नसत. मी तुमची मदत करतो. पैसे पण लागणार नाही आणि तुमचा पेपर पण वाचण होईल. मी गाव कडे एक फोन करून आलोच." असे म्हणून बाबा फोन वर बोलण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले."

   नितीशला हे चांगलंच लक्षात आलं की का बर आजोबांना कुठला पण चष्मा दिला तरी नीट वाचता येत नव्हतं, कारण त्यांना वाचताच येत नव्हत. स्वतःवरच हसत नितीश सगळे चष्मे एक एक करून जागेवर परत ठेऊ लागला. तितक्यात बाबा परत मध्ये आले आणि म्हणाले, "चला अण्णा मी परत जाण्यासाठी गाडीची सोय केली आहे तुम्ही चहा घ्या आणि निघा परत. घरी सांगून आला आहात का? नाही का? बर मी करतो एक घरी फोन सांगतो माझा गाडी वाला सोडेल थोड्या वेळात म्हणून. आणि पेपर वाचण्याच काम पण झालं आहे तुमचं सांगतो गाडीत बसलात की."

आजोबा,"गंपू ,तू असला की कामे पटापट होतात बघ."

सगळ्यांनी सोबत चहा घेतला आजोबांनी सगळ्यांना नमस्कार करून गाडीत बसून घरी निघाले.

बाबा,"काय मग नितीश राव कसा होता ग्राहक सांभाळण्याचा पहिलाच अनुभव?"

नितीश, "अरे बाबा मला समजलच नाही रे, अरे त्यांना वाचताच येत नव्हत मग मी किती जरी चष्मे दाखवले असते तरी काय उपयोग होता. पण मला एक नाही समजलं. तू बाहेर जाऊन काय केलं की ज्या मुळे त्यांचा वाचण्याचा प्रश्न सुटला?"

बाबा,"अरे गावाकडले ह्यांचे शेजारी, दिगू त्यांना फोन करून सांगितलं की तुझ्या मुलाला रोज अण्णांना पेपर वाचून दाखवायला सांग. बबन्या ला रे. कशाला जाणीव करून द्यायची म्हातार्या माणसाला की तुम्ही शिकले नाही, वाचता येत नाही. अज्ञानात सुख असतं म्हणतात ना ते असं. वाटू दे न त्यांना की चष्म्या मिळाला नाही म्हणून वाचता येत नाहीये ते. दृष्टी सोबत दृष्टीकोन पण विकावा अधून मधून."

दोघेही हसायला लागले.

हा नितीशचा पहिला ग्राहक त्याच्या आयुष्यात तो कधीही विसरणार नाही.

   आणि राहिला प्रश्न वाचता न येण्याचा. हा प्राॅब्लेम आपल्या वाचता येणाऱ्या सुशिक्षित लोकांना पण आहे. कसा सांगू? तुम्ही जे whatsapp वर फेसबुक, Social Mediaवर येणारे मेसेज वाचताना कधी विचार केला आहे का? की त्या मेसेज मध्ये सत्य आहे का? कोणीतरी विनोद म्हणून पाठवला आहे का? किंवा चांगली प्रसद्धि मिळवण्यासाठी लिहिलेला आहे? त्या मेसेजची सत्यता जाणून घेण्याआधी फाॅरवर्ड करणारे लोकं ह्या गोष्टीमधल्या अण्णांना represent करतात.

   हे तितकच खरं आहे. आपल्याला माहिती आहे की आज काल ध्वनीच्या गती इतक्या गतीने माहिती मिळते पण ती समजून घेऊन, त्यामधली सत्यता जाणून घेऊन मेसेज फाॅरवर्ड करणाऱ्यांना सुशिक्षित म्हणलं पाहिजे. जशी ह्या गोष्टी मध्ये अण्णांना "मला वाचायचं आहे"ची घाई तशी लोकांना कोण आधी ही news किंवा ठळक घडामोडी statusला ठेवतो किंवा फाॅरवर्ड करतो याची घाई.

   तर माझा हा podcast ऐकल्या नंतर आपण सुशिक्षित आहोत असा चष्मा डोळ्यावर लावा आणि कश्यावर विश्वास ठेवावा व कश्यावर ठेऊ नये. काय फाॅरवर्ड कराव काय करू नये हे जरा समजून घ्या. आणि जर तुम्हाला ही गोष्ट ऐकून आपण सुद्धा अण्णा असल्याची जाणीव होतं असेल. तर मी सुद्धा तुम्हाला पेपर वाचून दाखवणारा बबन्या आहे असं समजा. द्वेष पसरवणारे, निंदा करणारे, कोणाला कमी लेखणारे, खोटे किंवा चुकीचे मेसेज पसरू नये इतकीच त्या मागची इच्छा.

चष्मा घालून style मारण्याचा सुटला आहे सगळीकडे वारा

आणि अजिंक्य च्या तुम्हाला सगळ्यांना सायोनारा.

आमच्या podcastचे नियमित अपडेट्स पाहिजे असल्यास आमचं Whatsapp Group नक्की जॉईन करा. माझाव्यापार मराठी

Post a Comment

0 Comments