तुम्ही प्रयत्न करत आहात का?

तुम्हाला माहिती का यश आणि अपयशाचे दरवाजे हे बाजूबाजूला असतात.


गंमत अशी आहे की कोणालाच माहित नसतो कोणता दरवाजा कुठला आहे ते. तो दरवाजा जो पर्यंत तुम्ही वाजवणार नाही तो पर्यंत समजणार पण नाही.

पण जेंव्हा तुम्हाला उडी मारायची असेल, तेंव्हा तुम्ही सध्या जिथे आहात तिथून तुमच्या स्वप्नांकडे नेणारा कुठला तरी एक दरवाजा वाजवून बघावा लागेल. असा एक तरी क्षण येईल जिथे तुम्हाला कुठल्या दरवाज्यात काय मिळेल माहित नसेल पण तुम्ही (ती risk) तो धोका पत्करायला तयार असाल.

आता ह्याला काही पर्याय आहे? दरवाजा न वाजवणं किंवा तो धोका न पत्करणं? मी असं म्हणेल की अश्या वेळी दरवाजा न वाजवणं किंवा तो धोका न पत्करणं निवडल ना तर तुम्ही पुढे नाही आयुष्यात मागे जाताल.

पण मी अपयशी झालो तर? तर मग जे तुम्ही अपयशामधून शिकले आहात ते सोबत घ्या आणि पुन्हा एकदा प्रयत्न करा. यश हे पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यानेच येत असतं. पण प्रयत्न थांबले नाही पाहिजे.

दरवाजे वाजवत रहा, एक दिवस तुमच्या कामाचा दरवाजा उघडेल.

Post a Comment

0 Comments