आज बाप्पांचं विसर्जन? १० दिवस झाले?

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

              माझाव्यापारच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. मी बरेचदा Thank You म्हणून सुरवात करतो पण आज sorry ने करावी लागणार आहे. का? कारण मागच्या रविवारी हे पत्र मिळायला पाहिजे होतं जे तुम्हाला सगळ्यांना मंगळवारी मिळतं आहे. आमचं पत्र रविवारी सकाळी ९ वाजता आपल्या ई-मेल मधे आलेलं असेल ह्याची खात्री मी घेईल. Sorry दोन दिवस लेट हे पत्र आपल्या पर्यंत येतं आहे आणि Thank You कारण आपण हे वाचत आहात.

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला! 

            आज आपल्या आवडीचे बाप्पा आपलय घरी परत निघाले आहेत. हे १०  दिवस का इतक्या लवकर जातात मला समजतं नाही. पण मी एक गोष्ट खूप आधी पासून करतो. आपण मोठे होता होता शिकतो, चुका करतो. तर माझ्या मते बाप्पांसोबाबत आपल्या मधली एक चुकीची गोष्ट पण विसर्जन करावी. तो राग असेल, नको तितकी चिंता करणे असेल, जेवण नीट करणे नसेल, अभ्यास न करणे असेल अश्या काही गोष्टी स्वतः बद्दलच्या शोधून त्यांना पण आनंदाने ही संधी समजून विसर्जन कराव्यात ह्या मताचा मी आहे. 

आज सगळ्यांमधले डान्सर जागे होतात . 

माझ्या मते आज काय विसर्जन करावं ?

        मी सगळ्यांमधे राहून काय अनुभवलं आहे सांगतो. नेमकं काय आपण ह्यावर्षी विसर्जन करावं ह्या बद्दल थोडक्यात बोलूया. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मोबाईल टीव्ही, फोन किंवा टेकनॉलॉजि म्हणा ह्यांनी १९९९ नंतर हळू हळू येण्याची सुरवात केली. आज आपण मागच्या १५  वर्ष जुन्या मोबाईलच्या जाहिराती पहिल्याना तर लक्षात येईल ते जे काही सांगत होते ते आज खरं झालं आहे. उदाहरण सॅमसंग कंपनीच्या जाहिरातीची टॅग लाईन होती "दिल तो जेब में रख्खा हें" आणि आज एक खिसा असा सापडणार नाही जिथे मोबाईल नाही. १ च्या ऐवजी २ सापडतील पण मोबईल नाही असा खिसा नाही. 

        टेकनॉलॉजि मुळे चांगल्या गोष्टी नक्कीच झाल्या. मी टेकनॉलॉजिला विरोध करणारा नाही. केला पण नाही पाहिजे. ती शिकून त्याच्या मुळे आपलं कामं कसं सोप्प होईल हे बघता आलं पाहिजे. पण नाणं आलं की त्याच्या दोन्ही बाजू देखील आल्या.

टेकनॉलॉजीची मला न आवडलेली एक गोष्ट

        एक गोष्ट जी वाईट झालेली मला कायम जाणवते ती म्हणजे आपली लक्ष देण्याची शक्ती कमी कमी होती आहे. जितका उत्साह आणि आनंद ३० सेकंदाचे रिल्स बघण्यात येतो तितका आनंद मोठे, काही तरी नवीन शिकवणारे व्हिडिओ बघण्यात येतं नाही. या प्रवृत्तीला ठरवून विसर्जन करावे असं मला मनापासून वाटतं. 



    
    विचार करा लहान पणी पासून किंवा रोज थोड्या थोड्या रिल्स बघत ३-४ वर्षात ३० सेकंदात काहीतरी बघायची, समजून घेण्याची सवय लागली मग जे काही समजायला १ तास लागतो ते बोर होतं, आवडतं नाही ही सवय सुरु झाली. माझ्या मते ३० सेकंदाच्या रिल्स एन्जॉय करायची सवय आणि वेळ लागणाऱ्या गोष्टी वाचायला, बघायला बोरं होणे ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.

        तर ह्या विसर्जनाच्या वेळी आठवणीने "३० सेकंदापुरतं लागणारं लक्ष" आठवणीने विसर्जन करा आणि कितीही वेळ लागला तरी मी लक्ष देऊन ऐकणारा, शिकणारा, वाचणारा व्यक्ती बनेल हे ठरवा. हे असं ४-५ वर्ष करतं गेलो तर आपण एक नवीन व्यक्ती म्हणून मोठे होऊ हे नक्की.

टेकनॉलॉजीचा चांगलाही वापर होतो! 

                आता आपलं लक्ष देण्याची प्रवृत्ती ही कमी झालेली आहे ह्याचा काही लोकांनी कसा वापर करून घेतला हे मी तुम्हाला सांगतो. आपण उदाहरण घेऊ रामायण ह्या महाकाव्याचं. हे महाकाव्य वाचायला, ऐकायला नक्कीच ३० सेकंद पुरणार नाहीत. आयुष्य पुरतं नाही कसले आले ३० सेकंद. पण अभ्यासाला आयुष्य पुरत नाही असे म्हणतात. आपल्याला अभ्यास करायचा नसेल. फक्त वाल्मिकीजींनी लिहिलेले रामायण आपल्याला माहित असावं इतकीच आपली इच्छा आहे असं आपण समजू. तरी सुद्धा ३० सेकंदाची ज्याला सवय लागली तो कसा काय रोज १ -१ तास बसून वाचन, कोणीतरी सांगितलेलं ऐकणं हे करू शकेल? नाही करू शकणार.

                पण YouTube वर एक चॅनेल आहे ज्याचं नाव आहे 21Notes. ह्या चॅनेलच्या माहिती मधे ते लिहितात आम्ही ह्या चॅनेल वर वाल्मिकी रामायण सांगतो ते पण एकविसाव्या शतकातल्या लोकांसाठी. ह्या चॅनेल मधल्या व्हिडिओ मधे वाल्मिकी रामायणातले महत्वाचे श्लोक आपल्याला बोलून दाखवले जातात त्याच बरोबर मागे एक ऍनिमेशन द्वारे रामायणाची गोष्ट दाखवली जाते आणि मधे मधे काही प्रश्न पण विचारून त्यांचे उत्तरं दिले जातात. आणि कुठलाही व्हिडिओ हा १० मिनिटांच्या वर नाही त्यामुळे जर कोणाला सवय नसेल मोठे व्हिडिओ बघण्याची तर तो सुद्धा एक बघण्यात गुंग होतो. पुन्हा ह्या रामायणातले संस्कृत श्लोक आपल्याला स्क्रीन वर दिसतात आणि त्याचे अर्थ हे इंग्लिश आणि हिंदी अश्या दोन्ही भाषेमधे उपलबद्ध आहेत. 

            वाल्मिकी रामायणाची सोप्या भाषेत, नवीन पिढीला आवडेल अश्या पद्धतीने ओळख करून घ्यायची असेल तर हे चॅनेल नक्की बघा. छान प्लेलिस्ट आहेत प्रत्येक प्रसंगाच्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे.

        असा वापर आपण केला तर? कारण प्रश्न आता रामायण चांगलं का हिंदी चित्रपटांचे गाणे चांगले हा नाहीच. हा प्रश्नच चुकीचा आहे. पण लोकांना बघायला आवडतील अश्या गोष्टी आवडतात. त्या मधलं चांगलं काय? आपल्या हिताचं काय? हा विचार करायला वेळ कोणाकडे आहे? मुद्दा सादरीकरणाचा आहे, presentationचा आहे. रामायण छान आहे या मधे वादच नाही पण त्याचं presentation नवीन पिढीला आवडेल असं झालं नाही तर लोकं बघणार नाहीत. 

       तर माझ्या मते जे जे चांगल्या पद्धतीने सादर करू शकतात, present करू शकतात लिहून, गोष्ट सांगून, ऍनिमेशन द्वारे, संगीताद्वारे, शक्य तितक्या प्रकाराने नवीन पिढीला आवडेल अश्या पद्धतीने आपले ग्रंथ मांडले पाहिजे. त्यांचे अर्थ न बदलता.  


            तर 21Notes हे YouTube चॅनेल नक्की बघा. अश्याच प्रकारचे अजून चॅनेल तुम्हाला माहित असतील तर मला नक्की कळवा. तुमच्या मनामधे काही क्रिएटिव्ह पद्धतीने आपले ग्रंथ मांडण्याची इच्छा असेल तर तसेही मला कळवा. मी जे लिहिलं आहे त्या बद्दलचे आपले मत दिले तर मला खूप आवडेल. भेटूया पुढच्या पत्रात रविवारी  ९.००  वाजता. 

आमचे newsletter जॉईन करायचे असेल तर ही आहे लिंक :  Join Mazavyapar's Newsletter 


Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Post a Comment

0 Comments