आज व्हेज /नॉन-व्हेज चर्चा करूया!

। ।  श्री । । 


सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

            मागच्याच पत्रात मी लिहिण्याचे कसले कमाल फायदे आहेत हे सांगितलं. मला काही जणांचे रिप्लाय असे पण आले की आम्ही लिहिणं सुरु करतं आहोत. त्या प्रत्येकाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही त्यापैकी एक आहात तर मी आनंदाने आपला लिहिलेला एखादा लेख पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी नक्की पब्लिश करेन. मी तर नेहिमी सांगतो, "मी म्हणतो आहे म्हणून नाही तुम्ही स्वतः लिहून बघा आठवडा भर तुमचं तुम्हालाच समजेल की खरंच खूप सारे फायदे आहेत लिहिण्याचे." 

            वेळात वेळ काढून तुम्ही माझे पत्र (ज्याला नवीन भाषेत Newsletter म्हणतात) वाचतात हे मला फार आवडतं. मी महिन्यातून एकदा व्हिडिओ वर सगळ्या माझाव्यापार च्या मेंबर्स सोबत भेटतो नां त्यांना पण मी हेच सांगतो. आयुष्यात वेळ हा सगळ्यात महत्वाचा आहे. एकदा तो गेला की परत मिळतं नाही आणि तुम्ही वेळात वेळ काढून मला ऐकतात किंवा हे पत्र वाचतात हा आनंद मला जास्त होतो. I am super Grateful to all of you.

आता आजचा विषय हा सगळ्यांचा फार फार आवडीचा आहे. तो म्हणजे खाणे. कोणी आहे का ज्याला खायला आवडतं नाही?  हॉटेल मधलं, घरचं, बाहेरचं, हेल्थी फूड असेल, स्वतः बनवलेलं असेल (मग ती मॅगी असली तरी चालेल) पण खाण्या बद्दल डोक्यात विचार आले नाही असं होणं शक्यच नाही. 

कंटाळा आला की खावं वाटणारे कोण कोण आहेत तुमच्या पैकी? 

हा विषय का निवडला सांगतो. 

        मला पुन्हा एकदा वेळ मिळाला आणि मी नेटफ्लिक्स वर एक डॉक्युमेंट्री पहिली. अरे काय हा डॉक्युमेंट्री बघतो असं वाटेल तुम्हाला कारण ह्याच्या आधी मी २-३ पत्र हे वेगवेगळ्या डॉक्युमेंट्री वर नक्कीच लिहिले आहेत. पण मला आवडतात बघायला. एक नवीन माहिती मिळते आणि काही विषय आहेत माझ्या डोक्यात ज्या वर मला डॉक्युमेंट्री बनवायची आहे. अगदी नेटफ्लिक्स लेव्हल ची डॉक्युमेंट्री बनवायची आहे. 

        आजच्या विषयाचं बोलूया. मी जी डॉक्युमेंट्री पहिली तिचं नाव आहे "You are what you Eat" नावातच समजलं असेल की ही डॉक्युमेंट्री आपण जे खातो त्या बद्दलची आहे. फूड आधीच आपल्या डोक्यात इतकं भरलेलं आहे त्यात नेटफ्लिक्स वर फूड विषयाला धरूनच इतक्या डॉक्युमेंट्री आणि सिरीज आहेत. हे मला फार नवल वाटलं.

        फूड म्हणजेच अन्न ह्या विषयाला धरून सध्या इतक्या चर्चा होतात. मला हे पत्र लिहिण्याच्या आधी तरी व्हेज आणि नॉन व्हेज हे दोनचं प्रकार असतात असं माहित होतं. वेगनं हे नाव एक ऐकलं होतं. पण मी वाचत गेलो आणि काय काय प्रकार निघाले आहेत हे मला आज समजलं. 

व्हेज मधले प्रकार बघा. 

  • Lacto-vegetarian: Includes dairy products but excludes eggs.
  • Ovo-vegetarian: Includes eggs but excludes dairy products.
  • Lacto-ovo vegetarian: Includes both dairy products and eggs.
  • Vegan: Excludes all animal products, including dairy, eggs, and honey.

असेच प्रकार नॉन व्हेज चे पण आहेत पण ते सांगण्यात काय पॉईंट आहे? सगळ्यांमध्ये कुठल्या तरी प्राण्याला मारून खातात. 

आणि ह्या सगळ्यांच्या वर भारतामधे अजून एक नॉन व्हेज खाणाऱ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे शनिवार आणि सोमवार सोडून बाकी दिवस खातो. 

लहान मुलांना आई अश्याच प्रकारे खाऊ घालते.

तर इतक्या प्रकारचे अन्न, ते खाणारे लोकं, त्यांच्या आवडी निवडी, त्यांचं रहाणीमान, ते राहातात त्या जागेवर उपलब्ध असलेलं व्हेज किंवा नॉन व्हेज फूड, प्रोटीन फक्त नॉन व्हेज मधे मिळतं, व्हेज खाणाऱ्यांना cholesterol चा त्रास नसतो, नुसतं व्हेज चांगलं, कधी कधी नॉन व्हेज चांगलं काय काय विषयांवर चर्चा करणार. ह्या सगळ्या मतांना एक उत्तर द्यावं म्हणून काही लोकांनी डॉक्युमेंट्री बनवायचं ठरवलं असं मला वाटतं आहे. 

ही डॉक्युमेंट्री बनवायला कशाला इतका पैसा लावला?        

        ह्या सगळ्या मतांना कंटाळून काही USA मधले डॉक्टर म्हणाले आपण एक काम करू आपण स्टडी करू, रिसर्च करूयात आणि काहीतरी निष्कर्ष काढूयात की कुठलं अन्न चांगलं आहे ते. आता त्यांचं तरी काय चुकलं त्यांना जर त्यांच्या आईनी किंवा पूर्वजांनी कसं ताट वाढलेलं असावं हे कधी सांगितलंच नाही तर. ते तरी बिचारे काय करणार. कोणी रस्ता दाखवणारा नाहीच म्हणल्यावर काय करावं करा मग रिसर्च आणि स्टडी. 

सगळंच आलं की ह्या मधे

ही डॉक्युमेंट्री ४ तासांची आहे. एक एक तासांचे ४  एपिसोड्स. अगदी पहिल्याच एपिसोड ला ते सांगतात की अमेरिकेतल्या डाएट ला ते Standard American Diet असं म्हणतात म्हणजेच SAD. ते खाऊन सॅड होण्या पलीकडे काही मिळतं नाही म्हणून हे नाव. 

पण तसे लोकं हुशार आहेत सगळे. त्यांची जी टीम होती त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण काही जणांना व्हेज खायला देऊ काही जणांना नॉन व्हेज आणि बघू काय रिझल्ट येतात ते पण अश्या स्टडी आधी खूप झाल्या आहेत. त्यात प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. एखाद्याला व्हेज फूड जमलं त्याला चांगले रिझल्ट दिसले याचा अर्थ असा नाही प्रत्येकाच्या शरीरावर सारखेच रिझल्ट येतील. मग हे ठरवावं तरी कसं? 




म्हणून त्यांनी ४ जोड्या शोधल्या सारख्या दिसणाऱ्या जुळ्या लोकांच्या. जुळे जे असतात ते पण वेगळे असतात पण त्यातल्या त्यात सारखे असतात. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण काही जुळ्या लोकांवर आपले सगळे प्रयोग करून बघू. मग २-३ महिन्यांच्या काळात ते एकाला व्हेज आणि दुसऱ्याला नॉन व्हेज असं फूड देऊन त्यांच्या खुप प्रकारच्या टेस्ट करतात आणि शेवटी काय रिझल्ट येणार ते बघतात. मी टेस्ट न करता सांगतो व्हेज चे रिझल्ट चांगले येतील आणि तसंच होतं सुद्धा शेवटी.  

माझ्या डोक्यात आलं इतक्या आरामात क्लायमॅक्स काय असेल याचा अंदाज मी केला कायचं बघायचं पुढे? पण मला हे पत्रही लिहायचं होतं म्हणून मी सगळे भाग पहिले. एकदा बघण्यासारखं आहे. वेळ मिळाला तर बघा. शेवट माहिती आहे याचा अर्थ असा नाही की बघायला मज्जा येणार नाही.

पण काही काही अश्या गोष्टी आहेत ह्या डॉक्युमेंट्री मधे ज्या बघितल्या तर फूड इंडस्ट्री बद्दल चे काही चुकीचे समज दूर होतील. मी तुम्हाला २ उदाहरणं सांगतो जे मला आवडले. 

एक उदाहरणं आहे एरिक ऍडम्स ह्यांचं. 

        एरिक ऍडम्स हे न्यू यॉर्क शहराचे मेयर आहेत. मेयर म्हणजे महापौर. त्यांना स्वतःला एकदा डायबिटीस आहे असं समजलं आणि ते घाबरून गेले. कारण त्यांना, त्यांचं आयुष्य इन्सुलिन वर जगायचं नव्हतं. ते खूप घाबरले पण त्यांना एका डॉक्टरनेच हे सांगितलं की तुमच्या खाण्यामध्ये बदल करून तुम्ही डायबिटीस रिवर्स करू शकतात. त्यानीं ते केलं आणि आज ते संपूर्ण न्यू यॉर्क शहराला "वेगनं फोकस" बनवण्यासाठी प्रयत्न करतात. 

Winter is coming नाही......

त्यांचं स्वतःच असं म्हणणं आहे की अमेरिकेतील फूड हे प्रॉफिट कमावण्याच्या हेतूने बनवलेलं आहे. आपली हेल्थ चांगली रहावी हा विचार करून नाही. त्यांच्या बद्दलच एक छान आर्टिकल मला सापडलं तुम्हाला डिटेल समजून घेण्याची इच्छा असेल तर हे वाचू शकतात. 

I reversed my Diabetes. Now I want to help America get Healthy.

डायबिटीस असो किंवा कुठलाही आजार असो मी एक गोष्ट नेहिमी आजार झालेल्या व्यक्तीला सांगत असतो की गोळ्या, औषधं घ्या, पण आपलं मन आणि त्याची शक्ती ही अजून मेडिकल क्षेत्र ओळखू शकलं नाही अशी आहे. तर मनात नेहिमी हेच विचार करा की हा आजार पूर्णपणे निघून गेला आहे आणि मला उदाहरणं म्हणून बाकी कोणी ह्या आजारातून जात असेल तर त्याला हेच शिकवायचं आहे. मी मेडिकल फिल्ड ला नाकारत नाही पण मनाची शक्ती वापरून तर बघा इतकंच माझं म्हणणं आहे. 

दुसरं उदाहरणं आहे डॅनियल हम ह्यांचं.

डॅनियल हे एक मिशिलींन स्टार शेफ आहेत. आता मिशिलींन स्टार म्हणजे काय? मिशिलींन स्टार हा culinary world मधला म्हणजेच पाक कलेमधला एक उत्कृष्ट असा सन्मान आहे. जसा आपण चित्रपटांमधला ऑस्कर सगळ्यात मोठा अवॉर्ड समजतो. तसा मिशिलींन स्टार. ह्यांच्या रेस्टॉरंट चं नाव आहे Eleven Madison Park आणि हे रेस्टॉरंट एक उत्कृष्ट असं नॉन व्हेज मिळणार रेस्टॉरंट होतं. 

आपल्याकडे भेळ मिक्स करणाऱ्या दादांना पण एक अवॉर्ड दिला पाहिजे.

एक दिवस डॅनिअल ला चिकन, बीफ, पोर्क हे कश्या पद्धतीने सांभाळतात. त्यांना काय खायला देतात. नंतर कश्या प्रकारे त्यांना जास्त पैसे मिळावे म्हणून औषधं देऊन देऊन जाड-जुड बनवतात आणि त्यांना दिलेल्या औषधांचा एका व्यक्तीवर काय परिणाम होईल हे विचार न करता विकतात हे समजलं. हे समजल्यावर त्यांनी त्यांचं मिशिलींन स्टार रेस्टॉरंट बंद केलं आणि काही महिन्यात पुन्हा सुरु केलं पूर्ण पणे वेगनं फूड वापरून. 

विचार करा सगळ्यात मोठं, सगळ्यात जास्त लोकांना आवडणारं, भरपूर पैसा कमवणारं, ज्या मुळे तिथे काम करणाऱ्या ४०-५० जणांचं घर चालायचं असं हॉटेल बंद करून पुन्हा नव्याने सुरु करणे हे सोप्प आहे का? पण नॉन व्हेज फूड जे लॉंग टर्म होणारे वाईट परिणाम त्यांना समजले आणि त्यांनी स्वतः वेगनं होण्याचा निर्णय घेतला. 

तुम्हाला डिटेल समजून घेण्याची इच्छा असेल तर हा पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकतात 

We are not Anti-Meat but we are Pro Planet...

असं म्हणलं जातं की डॅनिअलच्या या निर्णयामुळे संपूर्ण फूड इंडस्ट्री हादरली होती. नक्कीच काहीतरी कारण असणार जो इतक्या मोठ्या रेस्टॉरंट चा मालक नॉन व्हेज वरून व्हेज वर स्वतःला घेऊन आला. 

आता जरा आपल्या बद्दल बोलूया

आपल्याला चांगलं अन्न हे इतक्या सहज प्रकाराने मिळालं ना की त्याचं महत्व इतकं आहे हे आपण विसरून जातो. मी वरती दिलेलं चित्र बघा आपलं ताटच अश्या पद्धतीने बनलेलं आहे की आपल्याला प्रोटीन, फायबर, कार्ब्स आणि जे काही आपल्या माहिती असेल किंवा नसेल ते सगळं प्रमाणात मिळण्याची सोय होऊन जाते.

जेवायला बसायच्या आधीचे श्लोक असतील किंवा जेवण झाल्यावर पान खाणं असेल हे सगळं काही स्वच्छता, पचनक्रिया सगळ्याचा विचार करून बनवलेलं आहे. 

        पण आपणचं आहोत ज्याला टीव्ही मधे कोणी पिझ्झा ला लटकणारं चीझ चाटून खाल्लं की खावं वाटतं, छान पाऊस पडतोय आणि काही मित्र मिळून मॅगी खातं आहेत हे पाहिलं की मॅगी खावी वाटते, दुपारच्या चहा ला बिस्कीट सोबत असलेच पाहिजे त्या शिवाय चहा ची मजाच नाही. असे आपले विचार झाले आहेत. पण चहात साखर न टाकता पिणाऱ्या प्रत्येकाने एकदा बिस्किटा मधे किती साखर असते हे बघावं. चहा मधे जितकी टाकतात ना त्याच्या कितीतरी पटीने ती जास्त असते.


मला तर काही मोठे पण माहिती ज्यांना खायला दिलं की त्यांचा मूड बदलतो. 

        असो आज काल सोशल मीडिया मुळे कुठले अन्न चांगले आणि कुठले वाईट हे नक्कीच समजू शकतं. ह्या डॉक्युमेंट्री चा आधार घेऊन मला तेच पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचं होतं की आपण चांगलं अन्न विसरून जाहिराती जे चांगलं म्हणून दाखवतात ते खाणं जास्त सुरु केलं आहे. मी खाली काही यु ट्यूब चॅनेल च्या लिंक्स देतो आहे ते चांगलं फूड कसं ओळखावं ह्यावरचं आपल्याला शिकवणं देतात. हे चॅनेल नक्की बघा आणि पुढच्या पत्रात भेटूया पुन्हा एक नवीन विषय घेऊन. 

FoodPharmer

Satvik Movement

Fit Tuber 

Reader, एक सांगायचं होतं....

हा लेख/पत्र म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Post a Comment

0 Comments