।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
तर आला आहे रविवार आणि मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही माझ्या पत्राची वाट बघत आहात. क्रिकेट असेल, टीव्ही सिरीयल असेल किंवा बातम्या सगळे जणं कशी वाट बघत बसतात त्या त्या गोष्टीची वेळ झाली की तसंच काहीतरी माझ्या पत्रांसोबत व्हावं ही माझी इच्छा आहे. होईल हळू हळू. आत्ता तर कुठे सुरवात झाली आहे. वर्षोनुवर्षे हे पत्र येतं रहाणार हे नक्की.
आज नवीन वर्षात आपण बोलूया एका विषयावर तो म्हणजे संगीत. मला का संगीत हा विषय घ्यावा वाटलं सांगू का? कारण मागच्याच महिन्यात संगीत क्षेत्रातला एक हिरा म्हणजेच उस्ताद झाकिर हुसेन आपल्या सगळ्यांना कायमचे सोडून गेले. आता फक्त त्यांच संगीतच आहे जे वर्षानुवर्षे जिवंत रहाणार आहे. खूप जणांच्या आवडीचा आणि जवळचा विषय आहे संगीत. कोणाला म्हणायला आवडतात गाणे, कोणाला ऐकायला, कोणाला सहज गुणगुणायला पण संगीत नसतं तर काय हा विचार मला करताच येत नाही.
आता या संगीताचे प्रकार खूप सारे आहेत. म्हणजे मज्जा अशी की सगळे सा, रे, ग, म, प, ध, नि, सा इतक्याच सुरांवर वाजतात पण प्रकार बघा किती आहेत! प्रकार तर आहेच त्या प्रत्येक प्रकारात गाणे किती आहेत. Permutation combination म्हणतो ना आपण ते वापरून किती प्रकार बनवले आहेत सगळ्या संगीतकारांनी बघा ना.
आता हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना शास्त्रीय संगीत, वेस्टर्न, हिप-हॉप, जॅझ, या सगळ्या प्रकारात एक प्रकार आहे ज्याला म्हणतात रॅप-म्युझिक. तुम्ही ऐकलं आहे कधी रॅप सॉंग? नसेल ऐकलं तर एकदा ऐकाच. आज एक नाही शंभर रॅपर आहेत. रॅपर म्हणजे आपण इंग्लिश मधे म्हणतो कागदाचं रॅपर ते नाही बरं का! रॅप सॉंग, रॅप म्युझिक जो बनवणारा आहे तो रॅपर. तर आज हे सगळं थोडक्यात बोलूयात. मी मागे लिहिलेले पत्र वाचण्याची इच्छा असेल तर इथे क्लिक करा. जुने पत्र वाचा.
रॅप म्हणजे खरं तर कविताच असतात पण त्या एक तालावर म्हणाल्या जातात म्हणून त्यांना रॅप सॉंग म्हणतात. पण रॅपर्स ना गाणं म्हणता येतं नाही असं काही नाही खूप जण कमाल गाणे म्हणतात. पण रॅप या संगीताच्या प्रकारात सुरांवर इतका जोर नसतो. रॅप मधे महत्व फास्ट गाणे म्हणणे, कमी श्वासात गाणे म्हणणे, इंग्लिश-हिंदी भाषा एकत्र करून म्हणणे किंवा बरेचदा रॅप मधे भाषण सुद्धा असतं पण ते एका लई मधे आणि एका तालावर वाजत असतं. तर समजून घ्या रॅप म्युझिक म्हणजे संगीत, गीतकार, कविता, ताल, लय, भाषण ह्या सगळ्यांची खिचडी. पण लोकांना ही खिचडी खूप आवडते.
मला का रॅप म्युझिक आवडायला लागलं?
मला संगीताची आवड आहे, पण येत काहीच नाही. ना मला चांगलं गाणं म्हणता येतं, ना मी कुठलं म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवतो, पण इच्छा खूप असते. अश्या वेळेस भाषण केल्यासारखं किंवा भर भर भर भर म्हणतं कधी कधी मला रॅप सॉंग म्हणायला आवडायचे. कारण सुरामधे परफेक्ट बसणारं गाणं म्हणावं तर आपण चांगलेच बेसूर आहोत इतकं तर गाणं मला आधीपासून समजतं होतं. ते सुरात आणू हा प्रयत्न कधी मी केलाच नाही. पण रॅप म्हणण्याचा प्रयत्न केला, गाणे ऐकता ऐकता आणि ते थोडं फार म्हणता आलं म्हणून मला रॅप हा प्रकार फार आवडला. असे माझ्यासारखे रॅप म्युझिक आवडणारे खूप जण असतील.
दुसरी गोष्ट म्हणजे रॅप म्युझिक चे बोल, त्या कविता, किंवा ते लिहलेलं गाणं जर नीट ऐकलं तर समजेल की हे रॅपर्स बरेच Life Lessons आपल्याला शिकवून जातात. कधी रॅप सॉंग चे बोल नीट ऐकून बघा. असे Life Lessons शिकवणारे रॅप सॉंग्स एक नाही खूप सारे सापडतील. आता अर्थात त्या मधे चांगले वाईट सगळ्या प्रकारचे गाणे सापडतात. पण मी चांगल्या गाण्यांबद्दलच बोलतो आहे. अजून एका गाण्याचं उदाहरणं देतो. हे गाणं लिहिलं आहे बादशहा नावाच्या एका रॅपर ने.
आता हे गाणं म्हणजे शंकरांची स्तुती आहे. कोणाला आवडेल, कोणाला नाही. पॉईंट हा आहे की रॅप वापरून सुद्धा महादेवांची इतकी छान स्तुती करता येते. माझ्या मते हे गाणं म्हणणं म्हणजे एका अर्थाने देवाचं नाव घेणंच झालं.
आता मी हा विषय का निवडला सांगतो!
मागच्याच आठवड्यात यो यो हनी सिंग ह्या एका कलाकारावर असलेली डॉक्युमेंट्री फिल्म नेटफ्लिक्स वर आली. हनी सिंग ह्यांचं नाव नक्कीच मोठं आहे. त्यांचे सगळेच गाणे खराब आहेत किंवा अगदीच वाईट म्युझिक बनवतात असं तर म्हणू शकतं नाही. पण बऱ्यापैकी चांगलं म्युझिक आणि निर्लज्जेकडे झुकणारे त्या गाण्यांचे व्हिडिओ बनवून हनी सिंग हे नाव मोठं नक्कीच झालेलं आहे. आपल्या कडच्या न्यूज ना एक संधी मिळाली आणि न्यूजने ते नाव वेगवेगळ्या प्रकारे बदनाम केल गेलं. वेगवेगळ्या गोष्टींमुळे हनी सिंग नेहिमी चर्चेत असायचे. हनी सिंग तरुण मुलांना बिघडवतो आहे असा पण आरोप त्यांच्यावर करण्यात आला. रॅप म्युझिक ही एक कला आहे आणि तो कलाकार ती कला वापरून कलाकार जे काही बनवेल त्याला आपण सगळी जनता डोक्यावर घेऊन नाचतो म्हणून ते मोठे होतात.
त्याला चांगलं म्हणा, वाईट म्हणा, का तरुण मुलांसाठी चांगलं नाही म्हणा. कोणाबद्दल द्वेष पसरवून तुम्ही मोठे नाही होऊ शकतं. आता मी जर हनी सिंग हा फालतू गायक आहे म्हणून असं काही तरी बनवलं तर ते निगेटिव्ह वाचायला, ऐकायला, बघायला जास्त जणं येतील आणि हनी सिंग ह्यांचं नाव अजून जास्त लोकांना समजेल. ही एक मार्केटिंग जगातली पद्धत आहे. काही जणांचं असं मत आहे की कोणीही त्यांच्याबद्दल चांगलं किंवा वाईट काहीही बोलतं असेल तर ते चांगलंच आहे. कारण पहिल्यांदा ते त्यांच्याबद्दल बोलतं आहेत. निगेटिव्ह का असेना पण त्यांचा विषय तरी निघाला आहे. त्यांचा विषय निघाला म्हणजेच त्या व्यक्ती ने कुठल्या तरी दुसऱ्या विचाराची जागा घेतली आहे.
निगेटिव्हिटी पासून दूर पळायचे मार्ग सांगू का?
माझ्या मते कुठे काही वाईट, चुकीचं, आपल्याला नको असलेलं दिसलं तर त्या बद्दल "हे किती खराब आहे" हे म्हणण्यापेक्षा त्याच्या विरुद्ध चांगल्या कश्यावर तरी आपलं लक्ष न्यावं.
उदाहरण देतो. टीव्ही न्यूज मधे कसे आजकाल लहान मुलं बाहेरच खाण्यामुळे किंवा पॅक फूड खाण्यामुळे आजारी पडत आहेत हे दाखवतं असतील तर मुलांना सोबत बसवून हे किती खराब आहे, बघ असं खाऊ नको वगैरे वगैरे बोलण्यापेक्षा फक्त एक वाक्य म्हणा, "अरे हे पॅक फूड आमच्या काळात नव्हते म्हणून तर माझे आजोबा १०० वर्षांचे होते, पण सायकल वर फिरायचे. ते काय खात होते सांगू का?" आता त्या मुलांचं सगळं लक्ष गेलं "काय खाल्ल्या मुळे मी फिट राहू शकतो" ह्या वर. आता फळांबद्दल माहिती सांगा. कुठल्या फळाचे काय फायदे ते सांगा, ड्राय फ्रुट्स बद्दल सांगा, कसं आपण प्लांनिंग करावं की ज्या मुळे प्रवासात चिप्स ची पाकिटं न फोडता आपण फळं खाऊ. हे सगळं बोला.
मी सगळ्या भाषांमधले सगळे चित्रपट आणि सगळे गाणे ऐकतो. मला भक्ती गीतं, देवाचे गाणे तितकेच आवडतात आणि तेलगू, इंग्लिश किंवा अगदी कोरियन भाषा जी मला समजत नाही ते गाणे सुद्धा तितकेच. कारण माझ्या साठी म्युझिक म्हणजे डान्स आहे. देवाचं असेल तर देवाचं, जर कुठल्या गायकाचं असेल तर गायकाचं मी मनामधे मला मिळालेल्या छान गोष्टींचा विचार करत नाचतो ते माझ्यासाठी म्युझिक आहे. त्यामुळे मला गाणं कुठलं आहे हा फरक पडतं नाही. Let me express my Gratitude to this Master Plan for giving me such a wonderful life. ही भावना एन्जॉय करायला कुठलही म्युझिक मला तितकंच प्रिय आहे.
ही डॉक्युमेंट्री बघावी का?
बघितलीच पाहिजे असं तर काही नाही ह्या डॉक्युमेंट्री मधे. पण एक गोष्ट मला आवडली. ती मला इथे सांगावी वाटते आहे. हनी सिंग त्याचा पूर्ण संगीत जगातला प्रवास सांगताना तो एका भागात रडतो आणि म्हणतो की, "तुमच्या कडे जर आई वडील आहेत तर त्यांच्या पेक्षा मोठं काहीच नाहीये जगात." कारण त्याच्या आयुष्यात तो खूप जास्त आपल्या कामात हरवून गेला. खूप पैसा कमवणे, खूप फिरणे, चुकीच्या सवयी आणि हे सगळं करण्यात तो विचित्र अश्या आजारात पडला आणि शेवटी त्याचे आई, वडील आणि बहीण ह्यांनीच त्याला त्या आजारातून बाहेर काढलं. आज पुन्हा एकदा म्युझिक बनवणे त्याने सुरु केले आहे आणि हा सगळं प्रवास कसा झाला ह्या वर ही डॉक्युमेंट्री फिल्म आहे.
आता वेळ झाली आहे गीतकार आणि संगीतकार बनण्याची
मला खरं खरं सांगा, गाणे ऐकता ऐकता तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की अरे यार आपण पण ह्या म्युझिक च्या क्षेत्रात जाऊ ना. पण नंतर तो विचार गेला हरवून. पण AI ची मदत घेऊन तुम्ही गीतकार किंवा संगीतकार दोन्ही बनू शकतात. कसं?
तुम्हाला जे AI टूल आवडतं ते उघडा आणि त्याच्या कडून गाण्याचे बोल लिहून घ्या. तुम्ही स्वतः डायरीच्या मागच्या पानावर लिहिलेल्या कविता आहेत का मग तर उत्तम. त्या वापरा. नसेल लिहिता येतं तर AI कडून लिहून घ्या. नंतर ते lyrics, गाण्याचे बोल कॉपी करून suno.com वर पेस्ट करा. सुनो AI ला सांगा तुम्हाला तुमचं गाणं कुठल्या प्रकारचं पाहिजे आहे आणि अगदी पुढच्या १० सेकंदात तुमचे बोल गाण्यामधे बदलून, त्याला म्युझिक लावून तुमचं गाणं तयार झालेलं असेल.
असे इंटरनेट वर फुकट उपलब्ध असलेले टूल्स सांगणं हे पण माझाव्यापार च्या टीम चे एक काम आहे. इंटरनेट चा वापर पुरेपूर व्हावा इतकीच आमची इच्छा आहे. आता पुढच्या वेळेस तुमच्या घरी किंवा बिझनेस मधे कुठल्या खास व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा काही खास प्रसंग असेल तर वापरा AI आणि मस्त गाणं लिहून कंपोझ करून घ्या AI कडून. वाढदिवस असला की Happy Birthday, Happy Birthday, HBD, हे असले मेसेज तर सगळेच करतात. पण वापरा AI आणि खुश करून टाका जवळच्या व्यक्तींना. आणि हो Special Thanks to Upya म्हणजे उपेंद्र जोशी ज्याने मला या AI टूल बद्दल सांगितलं.
शेवटी मला सांगायचं इतकंच आहे!
भरपूर चुका करून ठेवायच्या आणि नंतर त्या सगळ्या माझ्याकडून नकळत झाल्या, मी खूप चांगला व्यक्ती आहे, अशी एक नवीन आपली छबी उभी करायची, हा प्रकार डॉक्युमेंट्री किंवा चित्रपटा द्वारे करायचा असे प्रयत्न, खूप साऱ्या व्यक्तींबद्दल, खूप वर्षांपासून चालू आहेत. ही डॉक्युमेंट्री त्या मधला एक प्रकार असू शकतो. पण असला तर असला. माझाव्यापार ची सगळी टीम प्रत्येक गोष्टीमधून चांगलं काय घेता येईल हाच विचार करणारी आहे. आम्हाला तरी चांगलं स्वतःसाठो काय काढून घेता येईल हेच दिसतं, पुढे काही का असेना. हनी सिंग असो का कोणीही त्याच्या मधली एक चांगली गोष्ट घेऊ आणि भरपूर गाणे ऐकू आणि प्रत्येकाला ऐकवू.
असेच आमचे पत्र वाचत रहा. आमचे पत्र आवडले तर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रॅप सॉंग मधे इंटरेस्ट नसेल वाचण्याची इच्छा नसेल तर काह हरकत नाही. मी इथे एका रॅप सॉंग ची लिंक देतो आहे ज्या मधे गीता आणि महाभारत समजून सांगितलं आहे. हो रॅप मधे. ते ऐकलं तरी चालेल. विचार करा, पूर्ण ग्रंथ वाचून मग त्या ग्रंथाला एका काव्यामधे उतरवून मग त्याच गाणं बनवलं गेलं आहे ह्या संगीतकाराने. इतक्या मेहनती जर कोणी घेतली आहे तर आपण ऐकलं तरी पाहिजे म्हणून ऐका.
3 Comments
Nice topic, Ajinkya! You articulated the topic very nicely, starting from Indian music and the presence of Western music culture in India currently.
ReplyDeleteSome additional points I'd like to mention:
1. Most of the time, people compare Indian music with Western music, like rapping. However, there are numerous types of music worldwide, and most music develops based on a country's culture. Therefore, there should be no criticism or prejudice against any other type of music.
2. You mentioned Honey Singh in your article. Initially, Honey Singh created music on Bhagat Singh and women empowerment, but those songs were super flops. To survive commercially, artists must think strategically. So, there was nothing wrong with the music he created later.
3. After A.R. Rahman, Honey Singh revolutionized music production in India. Even today, the music from the movie Roja sounds fresh in terms of beat production. Similarly, songs like "Brown Rang" and "Blue Eyes" still sound fresh.
4. Lyrics are crucial for music lovers. Unfortunately, everyone remembers the music, but no one remembers the name of the lyricist.
5. When Western people appreciate Indian rapping music, whether in its desi form or in English, we feel proud of our rappers for their work.
6. Recently, I watched MTV Hustle Season 4, a music show. When I heard the level of their hip-hop music, I was surprised by their command over music and lyrics.
7. In Marathi, Sambata, is a famous rapper nowadays.
Thanks once again, Ajinkya, for this article. Your content is always excellent!
खुप छान अजिंक्य 👍
ReplyDeleteAn interesting take on music and its forms! It got me thinking about how rap battles, much like Indian jugalbandis, are rooted in showcasing wit and skill through rhythm and words. Loved the mix of personal stories and reflections on modern music trends.
ReplyDelete