।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
स्वागत आहे आपले अजून एका नवीन पत्रात. आजच्या पत्रात थोडक्यात बोलूया पण महत्वाचं. सगळेच पत्र भरपूर मोठे असले पाहिजे असं काही नाही ना आणि हो मागच्या पत्राच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आवडल्या. आज परत समर्थ रामदास ह्या बद्दल थोडसं बोलूया.
मनाचे श्लोक म्हणजे समर्थ रामदास स्वामी
समर्थ रामदासांचे लिखाण हे इतकं जबरदस्त आहे पण अजूनही मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम हे तीन ग्रंथ असे आहेत ज्या मुळे समर्थ रामदास हे घरा घरात आजही पूजले जातात. मला जास्त इंटरेस्ट कशा मुळे आला माहिती का कारण ते सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल बोलतात. सेल्फ डेव्हलपमेंट वाचण्याची सवय एकदा लागली ना की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात यशश्वी झालेले वेगवेगळे लोकं कसे होते, कसे वागायचे, कसे बोलायचे, संकट आले की कसे वागायचे हे सगळं शिकता येतं.
हेच सगळ्या यशश्वी लोकांचं वागणं, बोलणं, काम करणं समर्थ रामदास आपल्याला वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणामधून शिकवतात. मनाचे श्लोक, दासबोध ह्या मधून शिकण्यासारखं तर आहेचं पण समर्थांचं अजून एक लिखाण ज्या बद्दल मला काहीच माहिती नव्हतं ते म्हणजे समर्थांनी लिहिलेली पत्र.
ह्या पत्रांमधे मॅनेजमेंट चे वेगळेच धडे शिकायला मिळतात. त्या बद्दलच माझा अभ्यास मागच्या काही दिवसात चालू आहे आणि तो मी तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या पुढच्या काही पत्रात मांडेल.
आजच्या पत्रात इतकंच
बाकीचे विषय लिहीत-लिहीत वाचत-वाचत मला जर कुठला विषय अभ्यास करायला, लिहायला आवडायला लागला असं तर तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी. बाकी मला आवडलेलं सगळं काही पत्रा द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवणे हे मी रविवार ते रविवार करतंच असतो. मी आत्ता पर्यंत समर्थ रामदास ह्या विषयावर जे काही लिहिलं आहे त्याच्या लिंक इथे देतो आहे. वाचून बघा कदाचित तुम्ही सुद्धा समर्थ विचार समजायला लागले की माझ्या सारखे समर्थांच्या प्रेमात पडाल.
काय मागावं हे समजलं तर पाहिजे ना!
"मना बोलणे नीच सोशीत जावे" म्हणजे नेमकं काय?
मी नेहमीप्रमाणे इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि समर्थांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या अभ्यासात व्यस्त रहा. धन्यवाद.
0 Comments