।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून धन्यवाद. प्रत्येक आठवड्यात लिहिणं जितकं अवघड तितकंच अवघड वाचणं ही आहे असं मला वाटतं. पण तुम्ही वेळ काढून वाचता आणि वाचून रिप्लाय पण करतात म्हणून विशेष आभार. आज आपण जाणार आहोत बिझनेस च्या Quality shop floor वर. कस ते बघूया.
आणि नेहमीप्रमाणे त्या शॉप फ्लोअर वरचा वापरात येणार एखादा कन्सेप्ट जुन्या ग्रंथात सापडतो का बघूया. लेट्स गो!
सुधारणा करण्याची PDCA पद्धत
बिझनेस किंवा जॉब करणारे आणि त्या मधेही ऑटोमोबाईल या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कदाचित हा शद्ब ऐकला असेल. PDCA म्हणजे Plan, Do, Check, Act. Quality चेक करण्यासाठी आणि त्या मधे रोज थोडी थोडी सुधारणा व्हावी ह्या उद्देशाने ही पद्धत सगळे कंपनी वाले वापरतात असं तुम्ही समजू शकता. ही पद्धत शोधली आहे डॉ. विलियम एडवर्ड डेमिंग ह्यांनी १९५० मधे. डॉ विलियम हे एक मॅनेजमेंट कन्सल्टंट होते. यालाच बिझनेस मधे सुधारणा करण्यासाठी परत परत वापरली जाणारी पद्धत पण म्हणतात.
सोपी पद्धत आहे. आपण नकळत सुद्धा बरेचदा ही पद्धत वापरत असतो. P म्हणजे प्लॅन करायचा. D म्हणजे डू, तो प्लॅन यशश्वी रित्या पूर्ण करायचा, C म्हणजे चेक, तपासायचा की प्लॅन प्रमाणे आपण वागलो का आणि A म्हणजे ऍक्ट, आता चेकिंग चा जो काही रिझल्ट येईल त्या वरून पुन्हा बदल करून प्लॅन करून पुन्हा सगळं एका मागे एक करतं राहायचं. हे करून करून तर आपण काहीही करायला शिकतो.
आठवून बघा तुम्ही सायकल चालवायला कसे शिकले? आधी ठरवलं मला सायकल शिकायची आहे. हा झाला प्लॅन. मग सायकल घेऊन प्रयत्न केला म्हणजे डू. मग चेक केलं, जमतंय का? भीती वाटती आहे का? धरायला कोणी पाहिजे का? त्या नुसार पुन्हा ऍक्ट केलं, म्हणजे सायकल ला बॅलेन्स करण्यासाठी चाक लावले, किंवा कोणाला तरी धरायला सांगितलं आणि हेच परत परत करत आज आपण इतकेच एक्सपर्ट झालो आहोत की आपण मोबाईल एका कानात आणि खांद्यात धरून संपूर्ण ट्राफिक पार्क करतो. झाली की नाही Continous Improvement. कधी काळी सायकल वर बसायची भीती वाटायची आणि आज कशीही गाडी चालवू शकतो.
हा झाला बिझनेस मधला कन्सेप्ट. आता नेहमीप्रमाणे समजून घेऊया समर्थ आपल्या कशा पद्धतीने PDCA समजावून सांगत आहेत ते.
दीर्घसूचना म्हणजे लॉंग टर्म प्लँनिंग
म्हणौन असावी दीर्घसूचना । अखंड करावी चाळणा ।
पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ।। १२ ।।
म्हणून विवेकी माणसाच्या ठिकाणी दूरदृष्टी असावी आणि त्याने निरंतर परिस्थितीचा अंदाज घेत असावे आणि विचाराने पुढे काय होणार आहे, याचा अचूक अंदाज करून परिस्थिती जाणून घ्यावी. मी जसा नेहमी म्हणतो तेच एकदा समजून घ्यावं लागतं. त्या काळातले समर्थांचे शब्द आजच्या काळासाठी लावून घ्यावे लागतात. दीर्घसूचना म्हणजे लॉंग टर्म प्लँनिंग, चाळणा म्हणजे अनॅलिसिस, अनुमाना म्हणजे प्लॅन्स.
आता अर्थ समजून घेतला की समर्थ PDCAच सांगत आहेत. मला तर वाटलं PDCAचं नेक्स्ट व्हर्जन सांगत आहेत. PDCA मधे फक्त प्लॅन येतं पण समर्थ दीर्घसूचना म्हणतात म्हणजे लॉंग टर्म प्लॅन कर म्हणतात. छोटा नको. प्लॅन हा लॉंग टर्म साठी असावा आणि त्याला छोट्या छोट्या गोल मधे वेगळं करून मग काम करावं. चाळणा कर, चेक कर जे ठरवलं होतं त्या प्रमाणे सगळं झालं का? हा विचार खूपदा सगळेच विसरतात. कामाच्या गडबडीत हे विसरूनच जातो की काम काय पूर्ण करण्यासाठी सुरु केलं होतं? काही बदल अपेक्षित आहेत का? कामामधे, स्वतःच्या जगण्यामधे, हे चाळणा केली, अनॅलिसिस केलं तरच समजू शकतं. आणि या नंतर सगळ्यात महत्वाचं. समर्थ म्हणतात पुढे जे होणार आहे ते आत्ताच आणून सोड. इतकं परफेक्ट प्लॅनिंग आणि त्या प्लॅन च कामात रूपांतर झालेलं पाहिजे.
मी भरपूर यशश्वी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या आहेत. त्या मधे जर असा प्रश्न विचारला की कस वाटतं आहे तुम्हाला इतका मोठा गोल मिळवून. तर बरेचदा ते एक उत्तर देतात. मला फार काही वेगळं वाटतं नाही. कारण मी हे रोज माझ्या कल्पना शक्तीने बघतो. तुम्हाला वाटतं असेल की मी कसे काय इतके रन्स काढले, थकलो नाही का? पण मी रोज इतके इतके रन्स काढले ही कल्पना करून जगतो आहे. मला फार काही वेगळं वाटतं नाही. एक शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल मॅनिफेस्टेशन. तुम्ही विचार करतात तसं होतं आणि माझा पण या वर पूर्ण विश्वास आहे. कुठलीही गोष्ट ही दोनदा होतं असते. एकदा डोक्यात, म्हणजे कल्पने मधे आणि दुसऱ्यांदा खऱ्या मधे. मला तर मॅनिफेस्टेशन वाचलेल्या आणि शिकलो असेलेल्या मुळे समर्थ मॅनिफेस्ट करून जे उद्या होणार आहे ते आजच आणून सोड हे सांगत आहेत असं वाटलं.
आहे की नाही PDCA च एक बेटर व्हर्जन तुम्ही सांगा. त्या पुढे पण समर्थ मस्त सांगतात.
म्हणौन दीर्घसूचनेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक ।
लोकांकरितां लोक । शाहाणे होती ।। १६ ।।
असे लॉन्ग टर्म प्लॅनिंग करणारे लोकं बघ, ते कसे विवेकाने म्हणजे काही गोष्टी ठरवून त्याच पद्धतीने वागतात ते बघ, असे लोक पाहून, त्यांचं अनुकरण करून पुढचा पण शहाणा होतो. आता प्रश्न हा आहे आपण कधी शहाणे होणार? आपण कधी लॉन्ग टर्म प्लॅन करून, त्या प्रमाणे वागून, जे वागलो त्याचं अनॅलिसिस करून जे होणार आहे त्याला कसे आजच आणून सोडणार हे सगळं आपल्याच हातात आहे.
झालं एकच महिना आहे मग आलाच जानेवारी महिना. एक जानेवारी पासून नक्की करेन हे बोलण्याची वेळ आली आहे. पण पुढच्या वर्षीपासून डिसेंबर मधे, १ जानेवारी ला ठरवलेलं रोज करतो आहे हे पण तुम्ही बोलणार या वर लक्ष असू द्या.
भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि स्वतःच्या Improvement साठी PDCA पद्धत वापरण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद!
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.


0 Comments