असं खूप जणांच मत असत की मी खूप काही करू शकतो जर मला जास्त पैसे मिळाले तर किंवा माझी जास्त लोकांसोबत ओळख असली असती तर किंवा मी अजून कुठल्या तरी शहरात असलो असतो तर.
पण माझ्या मते कुठलीही गोष्ट अति, तिथे मातीच होतं असते, हा नियम आहे. एक पुरातन सत्य आहे ज्या मध्ये असं म्हणतात की "देव त्याचं लोकांना अति प्रमाणात सगळं देतो ज्यांचा त्याला विनाश करायचा असतो."
जास्त प्रमाणात मिळालं की सगळं काही चांगलं आणि छान होईल हा एक गैरसमज आहे. जे काही सध्या माझ्या कडे उपलब्ध आहे त्या मध्ये जे काम शक्य आहे ते करून पहिली पायरी पूर्ण करण महत्वाचं आहे. सध्या काय तुमच्या साठी उपलब्ध आहे? काय वापरून तुम्ही पहिलं पाउल उचलू शकतात? कोणा सोबत बोलू शकतात? हा विचार करा.
संसाधने तुम्हाला यशस्वी नाही बनवत. जी संसाधने उपलब्ध आहेत त्यामधून काय निर्माण करता येईल हा विचार असणे जास्त महत्वाचे आहे आणि हाच विचार यशस्वी बनवतो. उपलब्ध असलेल्या संसाधानातून काहीतरी उत्कृष्ट निर्माण करणे हाच खरं उद्योजकतेचा मार्ग आहे.
हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. काय आहे सध्या माझ्या हातात? आणि उत्तर मिळालं की ती गोष्ट आधी संपूर्ण पणे वापरा.
माझाव्यापार च्या community मध्ये आम्ही इंटरनेट वर फुकट उपलब्ध असणार्या संसाधनांचा वापर कसा करता येईल हे नेहिमी शिकत असतो. तुम्हाला पण शिकण्याची इच्छा असेल तर माझाव्यापार चे school नक्की बघा.
www.mazavyapar.com ह्या website वर जा आणि click करा फ्री trainings वर. धन्यवाद.
0 Comments