मार्गदर्शक असलाच पाहिजे!

     जसा जसा मी मोठा होत गेलो मला एका गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे स्वतः ठरवलेल्या मार्गाने पुढे जात राहणं जितकं महत्वाच आहे ना तितकच महत्वाचं एखाद्या अनुभवी व्यक्ती ने सांगितलेल्या मार्गाने जाणं पण महत्वाचं आहे.

आयुष्याच्या वेगेवेगळ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शक असणे खूप महत्वाचे आहे जसे आर्थिक बाबींमध्ये, आरोग्याच्या बाबींमध्ये, कुटुंबाच्या बाबींमध. असा एक मार्गदर्शक ज्याच्याकडे बघून तुम्ही "मला ह्याच्या सारखं बनायला आवडेल" म्हणू शकाल. जो तुम्हाला प्रेरणा देईल, दिशा दाखवेल. योग्य प्रश्न विचारेल जे तुम्हाला योग्य उत्तराकडे घेऊन जातील. असा एक मार्गदर्शक जो तुमच्या निर्णयांना आकार देईल, त्याने केलेल्या चुकांमधून तुम्हाला शिकवेल आणि त्याचा आशीर्वाद कायम तुमच्या वर राहिलं.

असा मार्गदर्शक जर तुमच्या आयुष्यात नसेल तर मी सांगेल शोधा. असे मार्गदर्शक खूप सारे आहेत. तुमच्यात शोधण्याची धडपड पाहिजे.

तुम्हाला देखील अश्या संघासोबत स्वतःला जोडून घेण्याची इच्छा असेल जो मार्गदर्शनाखाली काम करतो तर माझाव्यापारचा संघामध्ये नक्की सहभागी व्हा.

Telegram Group - मला सहभागी होण्याची इच्छा आहे.

Post a Comment

0 Comments