रख विश्वास, तू हे शिव का दास!


        भारतासारख्या देशात तुम्ही देवावर आधारीत चित्रपट काढणार आणि तो बॉयकॉट गॅंग च्या नजरेत न येणं  काय शक्य आहे? ह्याच उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार ह्यांचा आलेला OMG-२ हा चित्रपट आवर्जून बघा.

        आपल्या देशामध्ये एखाद्या चित्रपटामुळे भावना दुखावल्या ही काही नवीन गोष्ट नाही. एखाध्या समाजाच्या भावना, नाजूक विषय हाताळल्याने नाही दुखावल्या जात तर त्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली जाते म्हणून दुखावल्या जातात. चित्रपट हे लोकांपर्यंत पोहचण्याचे एक साधन आहे आणि ते वापरून वेगवेळगले विषय नाही मांडायचे तर मग कसे शिकवले जाणार? शाळा, कॉलेज नंतर चित्रपटगृह ही एकमेव अशी जागा आहे जिथे लोकं कमीत कमी २ तास बसून लक्ष देतात. चित्रपट पण तसा असावा लागतो हे ही तितकंच खरं. 

       तर अश्याच एका नाजूक विषयावर आपल्याला काही गोष्टी शिकवणारा एक चित्रपट सध्या तुम्ही बघू शकतात त्याच नाव आहे OMG-२. दिग्दर्शक अमित राय ह्यांची चित्रपटाची मांडणी आणि कमालीचे अभिनय करणारे २ नट अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी ह्या तिघांसाठी हा चित्रपट बघावा असं मला वाटलं. 

जो नाजूक विषय ह्या चित्रपटात मांडला आहे तो नाजूक विषय आहे सेक्स एडुकेशन (SEX EDUCATION) 

लोकसंख्येमध्ये भारताचा संपूर्ण जगात पहिला क्रमांक आहे आणि Pornography म्हणजेच अश्लील चित्रपट बघण्यात भारताचा संपूर्ण जगात तिसरा क्रमांक आहे तरी सुद्धा सेक्स हा विषय कोणीसुद्धा मोकळेपणाने बोलत नाहीत. हा लेख वाचणारे कित्तेक जण आत्ता सुद्धा सेक्स हे नाव वाचून पुढे वाचावं का नाही ह्या विचारात आले असतील.

जी गोष्ट लोकांसमोर मोकळेपणाने बोलण्यासाठी लिहिण्यासाठी आपल्याला लाज वाटते त्याच गोष्टी मध्ये आपला पहिला नंबर कसा काय असू शकतो? ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? ह्याच गोष्टीच उत्तर तुम्हाला हा चित्रपट देऊन जातो ते सुद्धा अगदी हसत खेळत. 

हे असे कसे हे विषय मांडू शकतात? किती वाईट बोलून दाखवलं आहे? असं कुठेही वाटणार नाही. अगदी ह्या चित्रपटाला घरचे जरी तुमच्या सोबत असले तरी तुम्हाला "एकटं आलो असतो तर बरं झालं असतं" असं वाटणार नाही, जरी चित्रपटाचा विषय "सेक्स एडुकेशन" असेल तरी सुद्धा. 

फक्त सेक्स एडुकेशनच नाही तर आजकाल अजून एक मोठे संकट आपल्या देशातल्या शाळेत जाणाऱ्या मुलांवर आले आहे. त्याविषयाला सुद्धा हा चित्रपट अलगद हात घालतो. मुलांना आपण आपले मोबाईल, लॅपटॉप सर्रास वापरण्यासाठी देतो पण ते त्याच्यावर काय शोधतील, त्याचा कसा वापर करतील, ते बघून काय निर्णय घेतील, कोणाला भेटतील, ऑनलाईन शिकून काय व्हिडिओ बनवतील ही गोष्ट विचारांच्या पुढे जाऊन भयानक होऊ शकते. 

एका सामान्य माणसाच्या आयुष्यात असेच वेगवेगळे प्रसंग उभे राहतात. तो त्याच्या परीने ते सांभाळतो पण एक वेळ अशी येते की देवाचा धावा केल्याशिवाय पर्याय उरात नाही आणि असाच काही धावा, कांति शरण मुद्गल म्हणजेच पंकज त्रिपाठी करतात आणि त्यांची मदत करायला शिव गण म्हणजेच अक्षय कुमार येतो. तो कश्या पद्धतीने मदत करतो ही अनुभवायची गोष्ट आहे. 

ते म्हणतात ना एखाद्या देशाला संपवायचं असेल तर त्याच्या एडुकेशन सिस्टिम शिक्षण पद्धतीवर घाव घाला. असाच काही घाव १८३५ ला थॉमस मॅकौले ने घातला होता. २ फेब्रुवारी १९८५ ला मॅकौले ने लिहिलेले ब्रिटिश पार्लमेंट चे पत्र हे जगजाहीर आहे. ह्या पत्राची तुम्हाला कल्पना नसेल तर मी इथे खाली त्या पत्राचा एक फोटो दिला आहे. ते पत्र नक्की वाचा. 


         तो म्हणतो मी संपूर्ण भारत भ्रमण केलं पण मला एकही भिकारी दिसला नाही. विचार करा काय श्रीमंती होती आपल्या कडे? का होती श्रीमंती कारण शिक्षण पद्धती ही आपल्या विचारांची होती. धर्म, काम, अर्थ आणि मोक्ष ह्या सगळ्यांची शिकवण ही आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये दिली जात होती. ह्या चारची गोष्टी आपल्या शिक्षण पद्धतीचे चार स्तंभ होते. पण कधी इंग्रज आले आणि कधी त्यांची गरीब पण भाग्यवंत भाषा इंग्रजी आपल्या संस्कृत, मराठी, हिंदी पेक्षा मोठी केली हे इतिहासालाच माहिती. 

पण आता तो काळ राहिलेला नाही. आपण नवीन तंत्रांचा वापर करून जास्तीस्त जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो. आणि पुन्हा एकदा तोच सोन्याचा भारत पुन्हा उभा करू शकतो जर भांडण, गर्व, माझ्या धर्मावरच गर्व, हे सोडून सोबत एकत्र राहण्याचा विचार केला तर. 

तर हा चित्रपट ऐक नाही तर नाजूक असे बरेच विषय छान पद्धतीने सगळ्यांना समजेल, कोणी दुखावणार नाही, सगळे जण आनंदानी बघतील अश्या पद्धतीने मांडतो. ही कमाल दिग्दर्शकाने कशी केली आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट आवर्जून बघाच. 

आणि आमचा हा चित्रपटचा review तुम्हाला कसा वाटला आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा. 

With Gratitude,

Ajinkya Kawathekar 

Post a Comment

0 Comments