आता मोबाईल अ‍ॅप सुद्धा चुका काढतात म्हणे!

नमस्कार मित्रांनो, 

            माझाव्यापार च्या एका नवीन पत्रात आपले स्वागत आहे. आम्ही प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे विषय तुमच्या साठी घेऊन येतो आणि त्या विषयांमधून आपण आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो ह्या वर चर्चा करतो. तर ह्या आठवड्याचा विषय हा सध्याचा चर्चेचा विषय आहे. तो म्हणजे AI. करेक्ट "आर्टिफिशिअल इंटीलिजन्स" आता हाच विषय का निवडला? कारण जवळपास प्रत्येकजण ह्या विषयाबद्दल काहीतरी अर्धवट ऐकून आहेत. म्हणलं आपण तीच गोष्ट नीट समजून सांगावी. ते म्हणतात ना अर्धवट ज्ञान हे ज्ञान नसल्या पेक्षा पण खतरनाक आहे म्हणून. 

ही लोकांची ChatGPT वापरण्याची पद्धत आहे. 

        आता हाच नवीन AI शब्द मी तुम्हाला २ भागात समजून सांगतो. पहिले AI वापरणारे लोक म्हणजे जे संपूर्ण पणे टेकनॉलॉजि च्या जगाचा भाग आहेत. आणि दुसरे तुमच्या माझ्या सारखे सामान्य लोकं ज्यांना आपली आपली कामं करायला एखादा AI सारखा असिस्टंट मिळाला तर फारच आवडेल. ह्या सगळ्यांना फार काही मोठी कामं नाही करून घ्यायची. रोजच्या जीवनातली छोटी छोटी कामं सोपी झाली की झालं आपलं काम. असे ह्यांचे विचार आहेत. 

        तर हा लेख हा संपूर्ण पणे ह्या दुसऱ्या, म्हणजेच तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांसाठी आहे. ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला कसे आपण AI tools वापरून आपली रोजची कामे सोपी करू शकतो हे सांगणार आहे. तुम्ही पण माझ्या सारखे एक सामान्य व्यक्ती आहात जो AI चा वापर करून आपली कामे १०% सोपी करू बघतआहात. तर पुढे वाचत रहा.

        जे टेकनॉलॉजि मध्ये घुसलेले मंडळी आहेत ते बरेचदा AI मुळे जॉब्स जाणार, AI मुळे नौकऱ्या धोक्यात आल्या आहेत, AI १०० जणांचं काम २० जणांवर आणू शकतो, वगैरे वगैरे गोष्टी सांगत असतात. पण मी माझं मत सांगतो. टेकनॉलॉजि नेहिमीच येत रहाणार, त्या प्रमाणे आपण बदल केला नाही तर आपण मागे पडू. त्याला तुम्ही AI म्हणा का काहीही म्हणा. नवीन आलेल्या गोष्टी शिकाव्या तर लागणार. आजच्या स्मार्ट फोन च्या जमान्यात जर कोणी मी लँडलाईन फोन च वापरणार असं ठरवून बसला तर तुम्हीच सांगा नुकसान हे होणारच. त्या मुळे टेकनॉलॉजि ला न स्वीकारणे हे काही उत्तर नाही.

        पण जॉबच रहाणार नाही. लोकांची गरजच नाही पडणार हे असं होईल हे मला वाटत नाही. माझ्या मते AI मुळे जॉब संपणार नाही, जो AI शिकणार नाही त्याचा जॉब संपू शकतो. मी चुकलो असेल तर नक्की कमेंट मध्ये मला करेक्ट करा.

        आता येऊ आपल्या सारख्या लोकांकडे. काय वापर करणार बरं आपण AI चा? नुसत्या न्यूज आणि क्रिकेट बघणारे लोकं आपण. कायच वापर करावा आणि कुठलंच असं आपलं काम आहे जे सोप्प करावं बरं? 

सांगतो. ह्या ब्लॉग च्या शेवटी नक्कीच उत्तर तुम्हाला मिळेल. आधी AI काय आहे हे जरा समजून घेऊया. कंप्युटर ने एक मेंदू बनवला ज्या मध्ये आपण आधी फक्त डेटा ठेवतं होतो. पण आता आपल्या सोबत कंप्युटर्स पण स्मार्ट झाले आहेत. ते आता हा डेटा वाचू शकतात आणि त्या प्रमाणे आपल्याला काही सुचूवू पण शकतात. ह्यालाच म्हणतात AI. 

काही उदाहरण सांगतो, 

तुम्ही फोन ची मेमरी डिलीट करताना कदाचीत हे अनुभवलं असेल. आपला फोन सांगतो एकच फाईल ही २ ठिकाणी दिसती आहे. एक डिलीट करा आणि तुमची मेमरी वाचेल. हे असं कधी तुम्हाला जुन्या फोन ने सांगीतलेला आठवतं आहे का? नाही! तो फक्त मेमरी फुल्ल झाली की रडायचा. पण आता स्मार्ट झाला आहे. 

जी-मेल मध्ये एखादा ई-मेल उघडा. त्या ई-मेल ला काय रिप्लाय करावा हे खाली लिहिलेलं असत. आपण फक्त क्लिक केलं की सगळं टाईप होतं. जी-मेल ने तुम्ही काय रिप्लाय देऊ शकतात ह्याचा अंदाज बांधून तुम्हाला काही सुचवलं. वापरायचं का नाही ठरवा आता.

तर AI तसं बऱ्या पैकी आपल्या आयुष्यात आलं आहे. ओळखणं आणि वापर हे समजून घ्यावं लागेल. 

        आजच्या ब्लॉग मध्ये एक AI tool मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला नेहिमी कामाला येईल. भारतात राहणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीची इंग्रजी ही पहिली भाषा नाही. हो, पण शिक्षणाला आयुष्यात पुढे प्रगती करण्यासाठी इंग्रजी शिवाय पर्याय नाही हे ही तितकच खरं. मग ही इंग्रजी आपण कशी बशी चुकत चुकत शिकतो. बरेचदा चुकीची बोलतो आणि ज्या मुळे आपलं काम होऊन पण जातं. बरेच जण इंग्रजी बोलताना has च्या जागी have, have च्या जागी had अशी गडबड करून बोलून तर घेतात पण शाळा कॉलेज संपल्या नंतर ही चूक बरोबर करायला कोणी मित्र नसतो. 




        माझं असं मुळीच मत नाही की इंग्रजी आली म्हणजेच काहीतरी मोठं होऊ शकतं आणि तरच मोठं होता येतं. पण जर संपूर्ण जगाने इंग्रजी ला स्वीकारलं आहे तर आपले विचार प्रत्यकापर्यंत पोचवण्यासाठी इंग्रजी शिकणे हे अनिवार्य आहे. There is no option. 

        आपण इंग्रजी बोलताना चुका करतो, चुकीची इंग्रजी बोललो तरीही आपलं काम होतं, आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगतो, इंग्रजी आपली दुसरी भाषा आहे म्हणून आपण जास्त लक्ष देत नाही, जरी हे सगळे कारण असले तरी का बरं जगाने स्वीकारलेली भाषा नीट येऊ नये? 

        तर हे tool जर तुम्ही वापरायला सुरवात केली तर तुमची इंग्रजी सुधारत जाईल. ह्या tool च नाव आहे Grammarly. हे tool कंप्युटर आणि मोबाईल दोन्ही वरही उपलबद्ध आहे. Grammarly हा एक कीबोर्ड आहे जो आपण जे काही इंग्रजी टाईप करतो ते gramatically व्याकरणाच्या नियमात बसणारं आहे का ते सांगतो. चूक असेल तर आपल्या ती चूक लक्षात आणून देतो. शाळेत इंग्रजी च्या मॅडम किंवा सर छडी मारून चूक दाखवायचे तसं नाही. अगदी प्रेमाने. आणि हे रोज बघून बघून आपली इंग्रजी सुधारायला लागते. 

        हे AI tool कसं काम करतं ह्याचं एक उदाहरण देतो. माझाव्यापार च्या टीम मध्ये माझा एक मित्र आहे चिन्मय. मला त्याला हे सांगायचं आहे की पुढच्या आठवड्यात तू ब्लॉग लिही आणि अश्या एका टॉपिक वर लिही. तर मी हे इंग्रजी मध्ये लिहून तुम्हाला Grammarly कसं काम करतं ते सांगतो. 

Hey Chinmay,

    I hope you are awesome as always. I think next week you should wrote one blog on the topic of AI and machine learning. As you are one of the person who is practically working in this field I want you to write something new and great in this blog. You always writes something new. So I am waiting for your blog. See you soon. 

आता ह्या पॅरेग्राफ मध्ये चुका असतील पण हे मला कोण सांगणार? चला Grammarly ला विचारूया. विचारायची ही गरज नाही. Grammarly च फ्री version जरी इन्स्टॉल असेल ना तरी Grammarly आपली खूप मदत करतं. हे बघा उदाहरण. 






    
        हे तर Grammarly च फारचं छोटं उदाहरण झालं. आता तुम्हाला अजून एक जादू दाखवतो. समजा चिन्मय हा माझा मित्र नाहीये. मला त्याला प्रोफेशनल पद्धतीने सांगायचं आहे की तू ब्लॉग लिही वगैरे वगैरे. म्हणजे आता परत सगळं काही नव्याने लिहावं लागणार? पण बघा AI कशी मदत करतो ते. 

Dear Chinmay,

        I trust this message finds you well. I am writing to request your expertise and insights on the topic of AI and machine learning. Given your extensive experience in this field, I would be honored if you could craft a blog post on this topic next week. Your unique perspective and innovative ideas are highly valued and I am confident that your contribution will be of great interest to our audience.

        Your exemplary track record of producing novel content is well known, and I am eagerly looking forward to the new ideas and insights you will bring to this topic. Your contribution would be immensely appreciated and I thank you in advance for your time and effort.

Best regards,

आणि आपली ऑर्डर तयार. Grammarly मधे आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण कसं वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो त्याची एक यादी आहे. 


        पाहिलं कसं Grammarly आपल्याला आपल्या मेसेज चा टोन सेट करणे, व्याकरण नीट करणे, सोपं करणे, असे किती तरी प्रकार देतो. आणि हे सगळं फुकट आहे. Grammarly च पेड tool अजून खूप काही करू शकतं पण फ्री मधे सुद्धा आपले सगळे कामं होतात. तर आत्ता लगेच तुमच्या फोन आणि लॅपटॉप दोन्ही मधे ऍप्लिकेशन आहे ह्याची खात्री करा आणि रोज थोडी थोडी करतं आपली इंग्रजी कमालीची बनवा.
 

        असे AI चे खूप सारे tools आहेत जे प्रत्येकाला कामाला येतात. आपण कंप्युटर चे फार एक्स्पर्ट जरी नसलो तरी असे छोटे छोटे tools वापरून तुम्ही सुद्धा सांगू शकाल अरे मी पण AI वापरतो. Microsoft Copilot नावाचं tool  हे अश्यात मी जास्त वापरतो आहे. पुढे नक्कीच ह्या विषयावर पण ब्लॉग लिहिलं. 
        तर तुम्ही सुद्धा Grammarly वापरणं सुरु करा आणि एक छान असा मेसेज इंग्रजी मधे लिहून मला पाठवा. असेच फ्री मध्ये उपलबद्ध असलेले AI टूल्स वापरून बघा आणि आपलं काम सोप्प करायला शिका. कारण मी म्हणालो ना "AI मुळे जॉब्स जाणार" हे किती खरं आहे माहिती नाही पण AI अगदीच न येणाऱ्याचा जॉब धोक्यात येऊ शकतो हे लक्षात ठेवा. 

AI टूल्स वापरून काम सोप्प करण्याचा सुटला आहे सगळी कडे वारा,  
आणि अजिंक्यचा तुम्हाला सगळ्यांना सायोनारा 

Post a Comment

0 Comments