घुस्सा छू मंतर!

।। श्री ।।

#१० 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

           माझाव्यापारच्या पत्रव्यवहारात आपले स्वागत आहे. मी एका महिन्यापूर्वी बरेच पत्र लिहिले, काही पुस्तकांवर, काही चित्रपटांवर आणि मग मला आवडतील, लिहावं वाटेल असे विषय काही सापडेना. म्हणून काही दिवसांसाठी हा पत्र व्यवहार थांबला होता. पण आता मला काही छान, आणि सगळ्यांनाच आवडणारे विषय सापडले तर हे पत्र पुढच्या २-३ आठवडे नक्कीच येतील. तुम्हाला हे पत्र वाचण्याचे विसरायचे नसेल तर इथे मी काही वेगवेगळे उपाय देतो आहे. तिथे subscribe करा, follow करा म्हणजे पत्र आलं की नोटिफिकेशन रुपी पोस्ट मॅन तुम्हाला आठवण करून देईल. 

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.

व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

            तर आजचा विषय काय आहे नेमका? सगळ्यांच्या सोबत असणारा, प्रत्येकाला कमी करावा असा वाटणारा, प्रत्येकाला अगदी चटकन येणारा तो म्हणजे "राग" हाच तर विषय आहे. सांगा बरं खरं खरं कोण कोण आहे तुमच्या वाचणाऱ्यांपैकी जो कबूल करेल की मला कधीच राग येतं नाही. ह्या प्रश्नाला एकाच ही उत्तर हो येणार नाही. इतकंच काय अगदी हा मेसेज जर तुम्ही तुमच्या मोबाईल वर आला असेल आणि उघडायला वेळ लागला तर राग येणारे लोकं मला माहिती आहेत. तर समजून घेऊया हा राग कसा संपवावा. 

ह्या पेक्षा छान कोण समजावणार राग आल्यावर शांत होणं कसं असतं ते!

            मी हा विषय का निवडला लिहिण्यासाठी कारण मला घरात एक पुस्तक सापडलं त्याच नाव आहे "घुस्सा छू मंतर" Wish Anger Away हे लिहिलं आहे सर श्री ह्यांनी. सर श्री हे "तेज ज्ञान फॉउंडेशन" (TGF)  चे फॉउंडेर आहेत. ही संस्था सेल्फ हेल्प आणि सेल्फ रियलायझेशन ह्या विषयांवर लोकांना शिक्षण देते, हे कसं आणि कुठे वापरावं हे शिकवते. मी खाली इथे लिंक देतो आहे त्यांची वेबसाईट नक्की बघा. 

https://happythoughts.global/

        तर मी "घुस्सा छू मंतर" हे नाव वाचून मी हे पुस्तक हातात घेतलं आणि सहज पानं पलटवले तर मला मध्ये खूप छान असे चित्र दिसले. मला लहानपणी पासून ना चित्र असलेले पुस्तकं फार आवडायचे. म्हणजे एक पुस्तक आहे ज्या मध्ये अगदी पहिल्या पानाच्या डाव्या कोपऱ्यापासून ते पानाच्या खालच्या टोकापर्यंत शब्द शब्द लिहिले असतील तर कसं कोणाला आवडू शकतं? आवडतही असेल म्हणा पण मला चित्र वाले पुस्तकं जास्त आवडतात. हे त्या मधलंच निघालं. 

        सर श्री ह्यांनी हे पुस्तकं २ भागात लिहिलं आहे. पहिल्या भागात ते आपल्याला नेमका राग काय  असतो,कसा येतो, रागाचे प्रकार कोणते कोणते असे काही विषय सांगितले आहेत आणि दुसरा भाग हा लहान मुलांनी राग सोडून नेमकं काय काय करावं ह्या बद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतात. जसं मी नेहिमी सांगतो हा ब्लॉग, हा लेख वाचणे म्हणजे हे पुस्तकं वाचणे नाही. हा ब्लॉग जर आवडला, हे पुस्तकं कामाचं आहे असं वाटलं तर नक्की विकत घ्या. ही आहे लिंक.

लिंक: पुस्तक विकत घेण्या साठी इथे क्लिक करा. 

        लेखक सांगतात की चिडणे म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे. पुस्तकाबद्दल बोलतांना लेखक अजून एक सांगतात. जशी घराची बेल आपण वाजवली की आत मधे झोपलेला व्यक्ती बरोबर उठतो. तसंच हे पुस्तक तुम्ही जर झोपलेले आहात, राग येणे किंवा सेल्फ हेल्प अश्या काही बाबतीत तर तुम्हाला बेल वाजवून जागं करेल.

काही लोकं चिडल्या वर डायरेक्ट हल्क बनतात!

आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारांनी राग येतो असे लेखक सांगतात.

प्रकार पहिला : असे व्यक्ती जे आतमधून पण चिडलेले असतात आणि बाहेरून पण. मी खाली एक GIF दिला आहे. आतमधून आणि बाहेरून चिडलेला व्यक्ती कसा दिसतो समजून घ्यायचा असेल तर खाली बघा. ते चिडले की अगदी तसेच दिसतात.


दुसरा प्रकार: असे व्यक्ती जे आतमधून चिडलेले असतात पण बाहेरून शांत असतात.

स्पोर्ट्स खेळणारे सहसा असे असतात बघा. 
कितीही अडचणी आल्या तरी शांत राहूनच खेळावं लागतं.

शॉर्ट स्टोरी - 

        ह्या प्रकाराचं उदाहरणं देतांना लेखक एक खूप छान गोष्ट सांगतात. एकदा एक माणूस त्याच्या छोट्या मुलाला मांडीवर घेऊन शांत करण्याचा, झोपवण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याला थापटून म्हणत असतो, "चुंनु शांत व्हा. झोपा आता. आई येईलच थोड्या वेळात. शांत हो चुंनु." 

    असं जेंव्हा तो म्हणत म्हणत त्या मुलाला सांभाळत असतो तितक्यात बाळाची आई येते आणि आई सोबत काही मैत्रिणी पण असतात. आपल्या मैत्रिणीचा नवरा बाळाला इतकं छान शांत करतो आहे हे बघून एक मैत्रीण म्हणते, "तुझा नवरा चुंनु बाळाला किती छान शांत करून झोपवतो आहे ना!" 

        बाळाची आई म्हणते, "माझ्या मुलाचं नाव चुंनु नाही. उलटं आमच्या ह्यांच नाव चुंनु आहे. चूंनीलाल. ते स्वतःला शांत करण्यासाठी असं म्हणतं आहेत." एखाद्या व्यक्ती ला बाहेरून पाहिल्यावर वाटेल की अरे किती शांत पणे हे मुलाला सांभाळत आहेत. पण खरं हे आहे की त्या मुलाचे बाबा वैतागून आणि चिडून आईची वाट बघत आहेत की कधी एकदा ही सांभाळते बाळाला म्हणून. 

तिसरा प्रकार: आत मधे शांत पण बाहेरून चिडलेले! 

हल्क बघणाऱ्यांना समजेल हे! 

प्रकार चौथा: जे आत मधून पण शांत असतात आणि बाहेरून पण. 

तुम्ही सुद्धा ठरवू शकता की आज मी शांत रहाणार. 

राग सारखाच आहे पण का प्रत्येक जण वेग वेगळ्या पद्धतीने रागाला बघतात. 

पुस्तकाच्या चौथ्या भागात लेखक सांगतात की राग म्हणजे काय ह्याच मी उत्तर देतो. सगळयात आधी ते म्हणतात राग म्हणजे शिक्षा. राग म्हणजे कचरा. राग म्हणजे लॉक. राग म्हणजे आपली ऊर्जा चुकीच्या ठिकाणी जाणे

आता तुम्हीच सांगा ज्या कोणाला राग म्हणजे काय हे वर लिहिलेल्या पैकी एक आहे असं जरी समजलं तरी राग आपोआप शांत होईल. 

आणि हे सगळं समजावून सांगताना पुस्तकात इतके छान कार्टून्स काढलेले आहेत ना. ते पण पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढवतात. 

राग आल्या वर शांत कसं होता येत????

        आता तुम्ही म्हणालं समजलं रे, राग न येणासाठी काय करावं ते लिहिलं असेल तर सांग. सांगतो. ते पण सांगतो. पण त्या आधी तुम्ही जर मुन्ना भाई MBBS हा मूवी पहिला असेल ना तर त्या मधले डॉ. अस्ताना आठवा. ते नाही का राग आला की हसायचे. असेच वेगवेगळे उपाय शोधून हा राग शांत करता येऊ शकतो. 

मी हा मुव्ही कधीही एन्जॉय करू शकतो.

        अगदी सोप्या भाषेत लेखक सांगतात की आपल्या तीव्र इच्छा ज्या आहेत त्यांच्या सोबत आपण जे घट्ट नातं बनवतो ना त्या मुळे राग येतो. उदाहरणं जर तुम्हाला एखाद्या परीक्षेत छान मार्क्स मिळाले तुम्ही घरी उद्या मारतं आलात हा विचार करून की आता मला सगळे खूप छान शाब्बास असे म्हणतील पण कोणीच काही म्हणाले नाही. ह्याचा तुम्हाला राग आला. तर जेंव्हा राग येतो तेंव्हा स्वतःला एकदा विचारून बघा माझी कुठली अशी इच्छा आहे जी नेमकी पूर्ण झाली नाही म्हणून मला राग येतो आहे? तुमचा राग आपोआप शांत होईल. 

        कारण तुम्ही तुमच्या मनालाच हे समजावून सांगताल की मला चांगले मार्क्स मिळाले मी ह्या वर खुश राहिलं पाहिजे, कोण मला शाब्बास म्हणतो कोण नाही ह्या वर माझं खुश रहाणं अवलंबून नसावं. इच्छा असाव्यात पण त्या पूर्णच झाल्या पाहिजे हे जर डोक्यात ठेवलं तर नक्कीच राग येणार. त्या पेक्षा असं डोक्यात ठेवा. इच्छा पूर्ण झाल्या तर हे माझ्या साठी बोनस आहे. नाही झाल्या तर मी म्हणेल accepted आणि पुन्हा प्रयत्न करेन. कारण राग येणं काय आहे कचरा, स्वतःला शिक्षा आणि चुकीच्या जागी ऊर्जा पाठवणे. 

                चिडल्या वर हे MEME लक्षात ठेवा, कदाचित आठवेल राग येणं म्हणजे कचरा करणे.               

        आता काही उपाय ह्या पुस्तकातून आपल्याला समजतात ज्याने राग येण्याची सवय आपण हळू हळू घालवू शकतो. बरेचसे उपाय आपल्या माहितीतले आहेत. जसे की १०० ते १ असे उलटे अंक मोजणे. थंड पाणी पिणे. स्वास हळू हळू घेणे आणि सोडणे. "पण हे सगळं कोणाच्या लक्षात रहातं राग आल्या वर? तेंव्हा माझं डोकं फुल्ल सटकलेलं असतं." हे नक्कीच आलं असेल डोक्यात. माझ्या तर आलं होतं वाचताना. खरंच ना. 

Mr Bean is doing a Deep Breathing Exercise

        खूप सारे उपाय आहेत पण उत्तम उपाय हा Deep Breathing आहे. मोठा श्वास घेणे आणि सोडणे. कारण राग आणि श्वास हे एक मेकांवर अवलंबून आहेत. ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही श्वासावर कंट्रोल मिळवा राग आपोआप कंट्रोल मधे येईल.

शेवटी लेखक सांगतात सगळेच उपाय संपले तर एखादा क्रिएटिव्ह उपाय शोधून काढा स्वतः साठी. जसे मुन्ना भाई मध्ये डॉ. अस्ताना राग आले की हसतात त्याच पद्धतीची लेखक एक गोष्ट सांगतात. 

शॉर्ट स्टोरी - 

        एका शाळेमध्ये शिक्षकांनी पुहा पुहा मुलांना आपले शूज पॉलिश करून आणा असे सांगितल्यावरही कोणीही ऐकत नव्हते. सगळे मुलं तसेच घाण शूज घालून येत होते आणि शिक्षक कितीही रागावले तरी स्वतःमधे बदल करत नव्हते. शिक्षकांनी एक दोनदा रागावून पाहिलं. आपण वर वाचलं ना त्या पद्धतीने आत मधे शांत आणि बाहेरून मी रागावलो आहे असं दाखवलं. पण काही फरक पडला नाही. शिक्षकांना हे चांगलं माहिती होतं की राग राग करून काही होतं नसतं. राग करणं माझ्या आरोग्यासाठी पण चांगलं नाही. 

        मग त्यांनी क्रिएटिव्ह पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवण्याचे ठरवले. त्या दिवशी शाळा संपली की वर्गाच्या बाहेर शिक्षक स्वतः बसले ब्रश आणि शूज पॉलिश घेऊन आणि प्रत्येक मुलाचे शूज स्वतः पॉलिश सरांनी करून दिले. हे बघून सगळ्या मुलांना फारच वाईट वाटायला लागलं. प्रत्येक जण स्वतःहून सरांना सॉरी म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी पासून प्रत्येकाचे शूज हे छान चमकत होते. 

        असे क्रिएटिव्ह उपाय सगळीकडेच वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतात. राग येण्या पेक्षा नक्कीच काहीही चांगलं आहे. म्हणून सोप्पं उपाय आनंदी रहा. आनंदी व्यक्ती कधीच चिडू शकत नाही. 

शेवटी मला म्हणायचं असं आहे की,


       तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुपचा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.


ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.

व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडला नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.

लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 


This week's sponsor is the DNA community.

Build 5 Mini Income streams that take 30 Minutes a Day, and cost virtually Rs 0 to Set up!

Without building a website, creating any products or Paying for Ads!

Get Access to this valuable webinar to learn!


Post a Comment

0 Comments