I wish to be a content creator!

नमस्कार मित्रांनो, 

तुम्हाला पण कधी कधी असं वाटतं का की आपण कन्टेन्ट क्रिएटर बनावं!

  • पण काय कन्टेन्ट बनवणार?
  • कसं बनवणार?
  • नेमकं रोज काय करावं?

ह्या प्रश्नांमध्ये तुम्ही अडकून पडतात. हो ना? होतं ना असं?

तर आजच्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला कन्टेन्ट क्रिएटर बनण्याच्या दिशेने काही पायऱ्या सांगणार आहे. 

तुम्ही कन्टेन्ट क्रिएटर आहातच - 

सगळ्यात आधी लक्षात घ्या की हा लेख वाचणारा प्रत्येक जण हा कन्टेन्ट क्रिएटर आहेच. कन्टेन्ट क्रिएट करणे म्हणजे डान्स करताना रील्स बनवणे, गाणे म्हणणे, स्वतःचा सोडून बाकी दुसऱ्यांच्या बिझनेस बद्दल माहिती सांगणे, मोटिवेशन देणे हेच असतं हे डोक्यातून काढलं पाहिजे. तुम्ही फेसबुक वर एखाद्याला Happy Birthday म्हणणे हे सुद्धा कॉन्टेन्टच आहे. फरक इतकाच की हे कन्टेन्ट बनवतांना कोण वाचेल, कितीदा वाचेल, ह्या मधून पैसे मिळतील का वगैरे वगैरे प्रश्न बनवणाऱ्याच्या डोक्यात नसतात.

पॉईंट इतकाच आहे की तुम्ही, मी आपण सगळे कन्टेन्ट क्रिएटर आहोत.

अरे, पण मला नुसता क्रिएटर नाही त्या क्रिएशन मधून पैसे कमावणारा क्रिएटर बनायचं आहे!

मी समजू शकतो आहे, कन्टेन्ट क्रिएटर बनायचं आहे म्हणजे कन्टेन्ट तर बनवायच आहेच पण त्याच सोबत ते कसे पैसे कमावतात, ते कसे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात, कसे मित्रांसोबतचे मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करतात ते पण तर सगळं करायचं आहे ना.

तर आता मी खरं उत्तर सांगतो जे कदाचित तुम्हाला आवडणार नाही. पण काय आहे ना मला प्रामाणिक उत्तर देण्याची फार आवड आहे. कित्तेकदा समोरच्या व्यक्तीला नाराज होतांना मी पाहिलं आहे माझ्या प्रामाणिक उत्तरामुळे. पण खोटं सांगून एखाद्याला आनंदात ठेवण्या ऐवजी मी खरं सांगून आयुष्याची स्पष्ट जाणीव करून देण्यावर जास्त विश्वास ठेवतो.

 

 

कन्टेन्ट क्रिएटर बना, पण त्या आधी कन्टेन्ट क्युरेटर बना - 

आधी लक्षात घ्या आपल्या आवडीच्या क्रिएटर ला पाहिलं आणि लगेच तसं काम करणं सुरु केलं आणि मी झालो कन्टेन्ट क्रिएटर हे इतकं सोप्प नाहीये. कन्टेन्ट क्रिएटर बनाने हा बिझनेस आहे. एक व्यक्ती आपल्या आवडीचं काम करत गेला आणि लोकांना ते काम इतकं आवडलं की तो कन्टेन्ट क्रिएटर बनला ही स्टोरी सहसा सांगितली जाते.

 


उदाहरण-

मला वेगवेगळ्या खाण्याच्या डिश बनवायला आवडायच्या. मी त्या बनवतं गेले आणि त्याचे व्हिडिओ बनवतं गेले. मला समजलंच नाही कधी माझं चॅनेल मोठं झाला. मला पाहिलं यूट्यूब कडून चेक आल्यावरच समजलं की इथून पैसे मिळतात.

हे असं जर काही तुम्ही ऐकलं असेल तर हे संपूर्ण सत्य नसतं हे लक्षात घ्या. ही एक पद्धत आहे समजावून सांगण्याची. जसं २ मिनटात मॅगी बनते म्हणतात ना! पण बनते का हे आपल्या सगळ्यांना माहिती. बिझनेस उभा करणे ही आपोआप होणारी गोष्ट नाहीये. विचार करून, प्लॅन बनवून, टीम सोबत काम करून ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणाव्या लागतात. त्या मागे भरपूर परिश्रम आणि वेळ लागलेला असतो.

मग मी काय करावं? कन्टेन्ट क्रिएटर बनायचे स्वप्न बघणं सोडून देतो आणि तुला ऐकतो. कदाचित हेच किंवा ह्या पेक्षाही वाईट काही डोक्यात आलं असेल. पण मी म्हणालो ना मला सत्य सांगायची सवय आहे. 

आता मी सांगतो काय करू शकतो ते. जे मी केलं, ज्या मुळे मला रिझल्ट मिळाले आणि मी कन्टेन्ट क्रिएटर पण बनलो.

क्रिएट करण्याआधी क्युरेट करा. क्युरेट करणे म्हणजे एखादी मी वाचलेली, बघितलेली, समजून घेतलेली गोष्ट माझ्या पद्धतीने समजावून सांगणे. उदाहरण सांगतो. मी एक पुस्तक वाचलं, "The Secrets of the MIllionaire Mind" हे लिहिलं आहे हार्व एकर नावाच्या एका लेखकांनी. मला हे पुस्तक खूप आवडलं म्हणून मी मला आवडलेले ह्या पुस्तकातले काही पॉईंट्स वेगळे लिहून काढले माझ्या पद्धतींनी. तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर मी इथे खाली काही लिंक्स देतो आहे.

काही वर्षांपूर्वी ह्याच पुस्तकाने मला निवडलं होतं! (mazavyapar.blogspot.com)

हे पुस्तकं वाचाल तर तुम्ही खरंच वाचाल! (mazavyapar.blogspot.com)

👆 ह्याला म्हणतात क्युरेट करणे आणि हा मार्ग का निवडावा कारण एका दिवसात उठून क्रिएट करणे शक्यच नाही. तुम्हीच विचार करा ना. कुठलाही अनुभव नसताना एकदमच मी उद्याच्या उद्या कन्टेन्ट क्रिएट करतो म्हणणे म्हणजे डॉक्टर होण्याचं शिक्षण, अनुभव न घेता मी ऑपरेशन करतो म्हणण्यासारखं आहे.

तर मी सांगेल क्युरेटर बना इंटरनेट वर आज वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे व्हिडिओ, लेख, पॉडकास्ट उपलबध आहेत पण ते सगळेच सगळ्यांना समजतात असं नाही. पण त्याच विषयाची तुम्हाला आवड आहे आणि त्या मधलं काही तुम्हाला समजतं असेल जे तितकं सोप्प नाही प्रत्येकच व्यक्तीसाठी तर नक्कीच तुम्ही तुमच्या सोप्या पद्धतीने ते मांडू शकतात आणि नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. ह्यालाच म्हणतात कन्टेन्ट क्युरेट करणे.  

तर माझ्या मते आधी क्युरेटर बना आणि क्रिएटर बनायचं आहे का नाही हे लक्षात येऊनच जाईल!

ह्याचे फायदे सांगू?

  • चुकीची शक्यता कमी, कारण तुम्ही दुसऱ्यांचे कन्टेन्ट वाचून, बघून मग काहीतरी बनवतं आहात.
  • तुमच्या ज्ञानात १००% भर पडणार.
  • बऱ्याच लोकांना, "तुमचं नॉलेज फार कमाल आहे" असं वाटणार.

आणि सगळ्यात महत्वाचं,

  • तुम्ही कन्टेन्ट क्रिएटर (एक बिझनेस) म्हणून टिकून राहणार का ह्याची तुम्हाला १००% खात्री मिळणार.

करून बघा प्रयत्न, कदाचित क्युरेट करता करता तुम्ही खूप काही शिकून जातात. जाता जाता एक यादी देऊन जातो जी तुम्ही क्युरेट करण्याबद्दल विचार करू शकताल. 

१. बिझनेसची पुस्तकं

२. पॉडकास्ट

३. अवघड अश्या अभ्यासामधल्या काही गोष्टी.

४. परमार्थातील वेगवेगळी पुस्तक आणि पोथ्या

५. इतिहास आणि भूगोल

६. बिझनेस केस स्टडीस

आणि बरंच काही. तुम्ही तुमची आवड, तुमचा अभ्यास, तुम्हाला असणारा अनुभव बघा आणि आपला आपला विषय निवड. मी तरी पुस्तकं हा विषय निवडला आहे आणि माझाव्यापार चे वाचक मी लिहिलेल्या Book Summeryचा मनापासून आनंद घेतात. 

तुम्हाला "कन्टेन्ट क्रिएशन" हा विषय जर नीट समजून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही लिंक वापरून आमची व्हिडिओ ट्रैनिंग बघू शकतात. 

मला आवडेल कन्टेन्ट क्रिएशन ची सुरवात करायला.

click here to get the access.

शेवटी मला म्हणायचं असं आहे की,


       तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुपचा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.

व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडला नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

 

Post a Comment

2 Comments

  1. Content curation is the stepping stone to begin the journey of meaningful content creation. Thanks for making me understand that.

    ReplyDelete
  2. मी खरोखर गोंधळात होतो की ही कन्टेन्ट क्रिएशनची प्रोसेस सुरु कशी करायची म्हणून,
    पण ह्या ब्लॉग नी मला मदत केली.
    थँक यू अजिंक्य
    More power to you.

    ReplyDelete