Book Summery (Zen - The Art of Simple Living) - Part 2

।।श्री ।। 

#१२ 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

        माझाव्यापार च्या पुढच्या पत्रात आपले स्वागत आहे. तर आपण मागच्या भागापासून झेन द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग हे पुस्तक आपल्या सोप्या भाषेत समजून घेत आहोत. मागचा भाग जर वाचायचा राहिला असेल तर ही आहे लिंक - Book Summery (Zen - The Art Of Simple Living) - Part 1

तुम्हाला हे पुस्तक विकत घेण्याची इच्छा असेल तर ही आहे लिंक. झेन - द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग 👈 इथे क्लिक करून तुम्ही हे विकत घेऊ शकतात. इंग्लिश मध्ये पाहिजे असेल तर ही लिंक वापरू शकतात 👉🏼 Zen - The Art of Simple Living.

    
    
        आता ह्या ब्लॉगचा मागचा भाग आणि पुस्तकाचा पहिला भाग आपल्याला कश्या आपण छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर आयुष्य सिम्पल होऊ शकत हे आपल्याला शिकवतो. पण नुसतं सिम्पल राहून कसं चालेल. तो एक भाग झाला जगण्याचा. आपण कुठे काही काम करायला गेलो तर विचार करा ना आत्मविश्वास आणि हिम्मत किती आहे हे बघितलंच जातं.
       तर ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखक आपल्याला तीस अश्या गोष्टी सांगत आहेत ज्या आपण वापरल्या तर आपला आत्मविश्वास आणि हिम्मत नक्कीच वाढेल. परत तेच सांगतो आहे, मी काही सगळे ३० उपाय इथे लिहून देणार नाही. मला पुस्तका मधलं इथे लिहून तुम्हाला पाठवण्याची इच्छा नाहीये. मी माझ्या चष्म्यातून वाचलेलं सांगेल ते समजून तुम्ही हे पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा. 

        तर ह्या तीस गोष्टी दिल्या आहेत त्या पैकी मला काही अश्या वाटल्या ज्या सगळ्यांमध्ये आढळून येतात. कारण हा मानवाचा स्वभाव आहे. ह्या चुका सगळे जण करतात. पण तुम्ही हे वाचून कश्या ह्या चुका चुकवता येतील ते बघा. 

जी गोष्ट झालीच नाही त्या बद्दल चिंता वाटून घेऊ नका.



प्रॉब्लेम आला की जवळपास प्रत्येकाचं मन हे असं करतं!

        झेन बुद्धिझमच्या एका गोष्टी मधे असं म्हणलं जातं की एकदा एक शिष्य आपल्या गुरुजींना विचारतो की, "माझं मन हे वेगवेगळ्या चिंतांमुळे भरलेलं आहे. मला ते शांत करण्यासाठी मदत करा." 
        गुरुजी म्हणतात, "तुझ्या सगळ्या चिंता माझ्या समोर ठेव आणि मला सांग ह्या सगळ्या चिंता आहेत ज्या मला शांत राहू देत नाही. मी त्या सगळ्या शांत करतो." 
        शिष्याच्या हे लगेच लक्षात आलं की चिंता ही स्पर्श न करता येण्या सारखी अमूर्त गोष्ट आहे. त्या मुळे जे कधी झालंच नाही त्याच्या बद्दल विचार करत राहणं म्हणजे वेडेपणा आहे. चिंता ही आपल्या मना मधेच निर्माण होणारी गोष्ट आहे. आत्ता या क्षणाला काय होतं आहे हा एकच विचार नेहिमी असला पाहिजे. 

दुसर्यांना दोष देऊ नका.



        तुम्ही कधी विचार केला आहे का! प्रत्येक व्यक्तीला जवळपास सारख्याच क्षमता दिलेल्या आहेत पण तरी एकच काम जेंव्हा दोन व्यक्ती करतात त्याचे परिणाम पूर्ण पणे वेगळे येतात? कारण परिणाम हे क्षमते सोबतच आपण काम कुठल्या मानसिकतेने करतो ह्या वर अवलंबून असतात आणि आपल्या मनामध्ये कुणालातरी दोष देणाऱ्या व्यक्तीची मानसिकता ही चांगले परिणाम निर्माण करूच शकत नाही. 
        झेन ट्रेनिंग मध्ये म्हणतात की जर तुमच्या मनात "का मला रोज सकाळी उठून गार्डनची साफसफाई करायची आहे?" असा विचार येत असेल तर तुमची ट्रेनिंग बिनकामाची होते. कुठलेही काम करताना मी ह्या कामाचे नेतृत्व करतो आहे हा विचार करूनच ते करावं. 

स्वतःची तुलना करू नका. 



            मी जे काम करतो आहे तेच माझ्या आयुष्यातलं मला मनापासून आवडणारं काम आहे, असं जो कोणी म्हणू शकतो तो खरोखर भाग्यवान आहे. कित्तेक जण हे काम माझ्या साठी आहे का? मी ह्या कामासाठी योग्य व्यक्ती आहे का? असा विचार करत बसतात. 
        झेन मध्ये असं म्हणलं जात की कुठल्याही कामामधून जर काही शिकण्यासारखं मिळत असेल तर ते काम परत परत केल्यामुळेच शिकता येत. कुठलीही गोष्ट सुरु करणं आणि बंद करणं हे खूप सोप्प आहे. अवघड आहे तेच तेच परत परत सातत्याने करत रहाणे. 
        सातत्य बिघडण्याचं कारण काही असेल तर हे म्हणजे तुलना करणे. तर कधीही स्वतःची तुलना करू नका. इतकंच लक्षात ठेवा आनंद हा आपल्या आवडीचं काम सातत्याने करणे ह्या मधेच आहे अजून कशातच नाही. 

आणि अश्याच अजून काही गोष्टी मला प्रत्येक व्यक्ती मध्ये कुठे ना कुठे आहेत हे जाणवतं. उदाहरण सांगतो, माझ्यात काय कमी आहे हा विचार करणे, एकाच आणि ठरावीक विचारसरणी मध्ये रहाणे, काळजी घेण्या ऐवजी काळजी करणे, काही बदल घडून आले तर भीती वाटणे.  

ह्या मी वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी आत्मविश्वास आणि हिम्मत कमी करणाऱ्या आहेत. तर ह्यांची जाणीव होणं ही पहिली पायरी झाली आता ह्या सगळ्या विचारांमधून बाहेर पडण्याची मला एक आवडलेला उपाय म्हणजे एक फुलाचं झाडं लावणे हा आहे. 

एक फुलाचं झाडं लावा




        लेखक सांगतात एक कुंडी घेऊन त्या मध्ये एका झाडाचं बी पेरा. त्याला रोज पाणी द्या. रोज त्याच्या सोबत बोला आणि काही दिवसातच त्या मधून एक छान झाड आणि फुल येईल. हे होणारे सगळे बदल रोज बघा. हे झाड लावल्या पासून प्रत्येक मिनिट, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला वाढत आहे. 
        निसर्गा मध्ये प्रत्येक दिवस हा नवीन आहे. पण माणसाला होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल विचार करायला फार आवडतं पण एक झाड लावताच तुमच्या हे लक्षात येतं की कोणीच थांबलेलं नाहीये. सगळे मोठे होतं आहेत. हा विचार एक बी पेरल्यावर त्या मधून जेंव्हा फुल येतं मनामध्ये पक्का बसतो की कोणीही आहे तसा रहाणार नाही. प्रत्येक दिवस हा नवीन आहे आणि आपल्याला नव्याने सुरवात करणे पण शक्य आहे.

शेवटी मला म्हणायचं असं आहे की,


       तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुपचा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.

व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडला नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

0 Comments