।। श्री ।।
#११
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आमच्या अकराव्या पत्रात आपले स्वागत आहे . मागच्या पत्रात मी तुम्हाला झेन हे पुस्तक माझ्या भाषेत सांगेल असं मी म्हणालो होतो. तर आजचे पत्र हे एकाच पुस्तकाने भरलेले असेल "झेन - द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग."
तुम्हाला हे पुस्तक विकत घेण्याची इच्छा असेल तर ही आहे लिंक. झेन - द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग 👈 इथे क्लिक करून तुम्ही हे विकत घेऊ शकतात. ते असतात ना काही जणं, "पुस्तक हातात घेऊन वाचल्याशिवाय फीलच येत नाही राव" किंवा "मला नवीन पुस्तकांचा वास फार आवडतो" त्यांच्या साठी ही लिंक. Zen - The Art of Simple Living.
काही जणं असतात ना, हे असं 👆 केल्या शिवाय
पुस्तक वाचणं त्यांना सुरु करता येतंच नाही.
झेन हे पुस्तक वाचताना मला सारखी माझ्या आईची आणि ओव्हरऑल सगळ्यांच्याच आईची आठवण येत होती. का? हे पुस्तक आपल्याला तेच करायला सांगत जे आपली आई लहानपणी पासून सांगते आहे, पण आपण आहोत जे ऐकत नाही. घराघरातली गोष्ट आहे. "आईच तर सांगते आहे. इतकं काय त्यात." हे असं वाटतं असतं बऱ्याच जणांना. पण तेच सगळं जेंव्हा एक जॅपनीझ नाव असेलला, गार्डन डिझायनर, ज्याने हावर्ड मध्ये वगैरे स्पीच दिले आहे असा कोणी सांगतो आपण पटकन ऐकतो. ह्या चार भागांपैकी पहिल्या भागात लेखक हे कसा सवयींमध्ये बदल केला की आयुष्य बदलतं हे सांगतात. त्यांनी तीस सवयी सांगितल्या आहेत ज्या आपण आयुष्यात रोज वापरायला लागलो तर आयुष्य बदलतं. मी तुम्हाला सगळ्या सांगत नाही बसणार काही ठरावीक सांगतो पण हे पुस्तक घेऊन बाकी सगळ्या नक्की वाचा.
आपले पादत्राणे नीट काढून जागेवर लावून ठेवावे.
सहसा आपली बूट काढण्याची पद्धत ही अशी असते. 👆
जापान मध्ये असं म्हणलं जातं की, तुम्ही घराचा समोरचा दरवाजा बघूनच त्या घराबद्दल खूप काही सांगू शकतात. चपला आणि बूट हे ज्या पद्धतीने ठेवलेले आहेत त्यावरून घरात राहणाऱ्या व्यक्तींचा माईंड सेट समजू शकतो. कदाचित हे वाचणाऱ्याला जरा जास्तच होतं आहे असं वाटतं असेल. पण झेन बुद्धिझम मध्ये असं म्हंटल जातं की, "तुमच्या पायाखाली काय आहे हे काळजीपूर्वक बघा." जो आपल्या पायाखाली काय आहे ह्या वर लक्ष देऊ शकतं नाही तो आपल्या आयुष्याला पण दिशा देऊ शकत नाही. आता मला खरं सांगा कोणी कोणी आईकडून चपला आणि बूट नीट काढून ठेव ह्या वर बोलणे खाल्ले आहेत? मी सांगितलं होतं ना. आईची आठवण परत परत येते हे पुस्तक वाचताना. अगदी काही सेकंद लागतात नीट काढून ठेवण्यासाठी. जितका वेळ पायातून काढून फेकण्यासाठी लागतो तिटीकाच नीट ठेवायला पण लागतो.
तर आज पासून हे लक्षात ठेवा. जर तुमचं लक्ष हे चपला आणि बूट घरी आल्यावर नीट ठेवण्यावर आहे तर तुमचं लक्ष हे तुमच्या आयुष्यातला पुढच्या पावलावर पण आहे.
पेन आणि पेपर चा वापर करावा
तुम्हाला जर पेन असा फिरवता येतो तर तुम्ही शाळेत
कंटाळवाण्या क्लास मध्ये काय करायचे हे मी समजू शकतो.
तुम्ही माझे सुरवातीचे काही ब्लॉग्स जर वाचले मी सगळ्या ब्लॉग मध्ये एकच गोष्ट बोललो आहे ती म्हणजे लिहिण्याबद्दल. लिहिण्याची सवय सोडू नका. टाईप नाही, पेन आणि पेपर घेऊन लिहा. लिहिण्याचे असंख्य फायदे आहेत. हा एकच विषय मी माझ्या सुरवातीच्या सगळ्या ब्लॉग्स मध्ये बोलत होतो. पण लिहिणे किंवा चित्र काढणे ह्या सारखा उत्तम मेंदूचा व्यायाम दुसरा कुठलाच नाही. आपल्या मनामध्ये जो कोणी आहे त्याला कनेक्ट होण्याची ही एक पद्धत आहे. तर आजच चित्र काढण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करा. पण हे कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी करा.
लेखक सांगतात की स्वतःची खरी ओळख ही स्वतः लिहिलेल्या एका ओळी मध्ये किंवा एखाद्या छोट्या चित्रात होत असते.
आपल्या अन्नामध्ये भाज्यांचा समावेश असावा
भाज्या म्हणलं की काही लोकांचा चेहरा हा असा 👆 होतो.
तुम्हाला आठवतं का काही दिवसांपूर्वी विराट कोल्ही नी शुद्ध शाकाहार स्वीकारला. थोडे वर्ष लोकं हसले जेंव्हा त्यांना त्याचा गेम खराब होताना दिसतं होता. पण आज रिझल्टस सगळं काही बोलतं आहेत. लेखक सांगतात विचार करा का बरं हे मॉंक लोकं वेगळे दिसतात? त्यांची स्किन का बरं वेगळी दिसते?
आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये डायरेक्ट कनेक्शन आहे. तुम्ही जर मनाची शांती शोधत आहात तर शाकाहारी अन्न खाऊन बघा. ह्या विषयावर जास्त बोलणं मला योग्य वाटतं नाही कारण फूड हा जवळपास प्रत्येकाचाच वीक पॉईंट असतो. प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा आपली लाईफ स्टाईल बघून. नॉन व्हेज न खाणं, शक्यच नसेल तर आठवड्यातला एक दिवस तरी असा ठेवा जिथे तुम्ही शाकाहारीच अन्न घेणार.
मी काही आजारांमधून जाऊन शिकलेली एक शिकवण सांगतो. अन्न हे औषधसारखं खायला शिका नाहीतर औषधं अन्नासारखी खावी लागतील. अन्न औषधसारखं खायचं म्हणजे काय? रोज त्याच वेळेला, एका जागेवर बसून, बत्तीस वेळा चावून खाणे म्हणजे औषधसाखे अन्न खाणे. आठवा स्वतःच्या गोळ्या कश्या तुम्ही वेळेवर, एका जागेवर बसून शांत पणे घेतात. तर अन्न पण माझ्या शरीरात जे काही बरं वाईट चालू आहे जे मला कळतही नाही ते बरं होण्यासाठी घ्या. ना की फक्त जिभेसाठी आणि पोटासाठी.
पादत्राणे न घालता फिरून बघा
कधीही बिना बुटाचे न रहाणारे गवतावर सोडलं तर असंच करतात.
चप्पल किंवा बूट न घालून फिरणे ही काही आपल्या देशात नवीन गोष्ट नाही. आजची नवरात्रीला तुम्हाला असे इतके जण दिसतील जे ९ दिवस पायात काहीही घालत नाहीत. आणि आपल्या पूर्वजांना किती छान गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला सवयी लावल्या होत्या बघा ना. परवाच आमच्या घराच्या बाजूला एक मंदिर आहे तिथे रोज येणाऱ्या आज्जी मी चप्पल घालून परत जातांना मला म्हणाल्या, "इथल्या इथे चप्पल घालून येत नको जाऊ. मंदिरात बिना चप्पलचं जेंव्हा तू येतो ना तेंव्हा जितके खडे टोचले तितकं तुझं पाप नाहीस होतं."
आता हे खरं आहे का खोटं ह्या मध्ये मला पडायचं नाही. पण पाहिलं का सवयी लावण्याच्या काय छान पद्धती होत्या आधीच्या. ह्या पुस्तकात लेखक थोडं विज्ञानाच्या पद्धतीने पण समजावून सांगतात की का बरं पावलं जमिनीवर टेकले पाहिजेत. जर तुम्ही कामात बिझी आहात तर सुट्टीच्या दिवशी तर हे नक्कीच करून पाहिलं पाहिजे.
म्हणजे सवयी बदलाव्या लागणार
रोजच्या सवयी सांभाळा, समजलं?
एक गोष्ट लक्षात येतं आहे का? रोजच्या आयुष्यातल्या काही सवयी बदलून आपल्याला आनंद सापडू शकतो. ह्या पुस्तकात १ नाही तर १०० असे मार्ग सांगितले आहेत जे वापरले तर आनंद आणि शांती (peace of mind) ह्या दोन्हीचा अनुभव घेता येऊ शकतो. त्या मधल्या मी फक्त चार तुम्हाला सांगितल्या. बाकीच्या पण पुढच्या भागात बघुयात. थोडं थोडं करतं हे पण पुस्तक माझ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेवटी मला म्हणायचं असं आहे की,
तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुपचा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.
ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.
व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.
मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडला नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.
बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती.
कळावे लोभ असावा,
तुमचा मित्र,
अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼
0 Comments