झेन आयुष्य जगणं म्हणजे नेमकं काय?

।। श्री ।।

#१० 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

           माझाव्यापारच्या पत्रव्यवहारात आपले स्वागत आहे. मागच्या पत्रात मी हनुमान ह्या चित्रपटा बद्दल तुम्हाला माझे विचार सांगितले, त्या आधी एक पुस्तक तुम्हाला माझ्या सोप्या शब्दात समजावून सांगितलं आणि असे वेगवेगळ्या विषयांचे ब्लॉग्स चालूच रहातील. आजच्या ब्लॉग मध्ये बोलूया एका नवीन विषयाबद्दल ज्याला म्हणतात "झेन"            

            हे पत्र सुरु करण्याआधी माझाव्यापारच्या प्रत्येक वाचकाचे खूप खूप आभार. आम्ही असेच वेगवेगळे ब्लॉग्स, बुक रिडींग क्लब, इमेल्स, ऑनलाईन कोर्स, इंटरनेटवर फ्री मध्ये उपलब्ध असलेल्या कामाच्या गोष्टी तुमच्या साठी घेऊन येत राहू. ह्याच्या बदल्यात आम्हाला काय पाहिजे? आमच्या प्रत्येक वाचक हा त्याच्या आयुष्यात मोठा व्हावा इतकंच. प्रत्येक वाचणाऱ्याला हे वाचून "काहीतरी शिकायला मिळालं" हे मनात यावं बस्स. आम्ही जिंकलो.

जेंव्हा तुम्ही सकाळी ५ ला उठून मेडिटेशन करण्याच्या प्रयत्न करतात!😂

            तर ह्या पत्रात आपण एका नवीन पुस्तकाची सुरवात करू. पुस्तकाचं नाव आहे "झेन - द आर्ट ऑफ सिम्पल लिविंग." हे पुस्तक लिहिलं आहे शुनमयो मसुनो ह्यांनी. ते एका झेन मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. ह्याच बरोबर ते जापान मधले आघाडीचे गार्डन डिझाईन करणारे व्यक्ती आहेत. हे वाचलं की पहिला विचार माझ्या डोक्यात आला तो म्हणजे गार्डन डिझायनर पण असतात का? हे असं एक प्रोफेशन आहे? मला आयुष्यात डॉक्टर, इंजिनियर, सीए ह्याच्या बाहेर काही आहे असं कधी कोणी सांगितलंच नव्हतं.  

        आता हे पुस्तक का वाचावं? मी का वाचायला घेतलं ते सांगतो. मी आयुष्याच्या काही चढ उतारामधून गेलो आणि मोठे मोठे बिझनेस करणारे किती सिम्पल रहातात हे मला जाणवायला लागलं आणि मग मी माझा शोध सुरु केला साधं रहाण्याचा. पण माझ्या लक्षात आलं साधं रहाणं काही साधं नाही. तर ह्या साधेपणाचा प्रवासात मी अभ्यास केलेलं हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक कसे आपण आपल्या आयुष्यातल्या बिनकामाच्या गोष्टी सोडून आपण आपल्या ध्येयाकडे सहज जाऊ शकतो हे शिकवतं. तर आवडेल का तुम्हाला सहजपणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला? चला तर मग माझ्या चष्म्यातून हे पुस्तक समजून घेऊया. 

झेन शोधणं म्हणजे असं जंगलात जाऊन बसणं नाही हां!

        सगळ्यात आधी तर हे सांगतो की हे पुस्तक दिसायला मस्त आहे. तुम्ही पण माझ्या सारखे आहात का ज्यांना चित्र असलेले पुस्तकं आवडतात? मी एकही चित्र नसलेलं पुस्तक वाचू शकतो, हा बदल आत्ता मागच्या काही वर्षांपूर्वीचा आहे. पण कित्तेक वर्ष माझं पुस्तक निवडण्याचं गणित हे त्या मधल्या चित्रांवरूनच पुढे जात होतं. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या चित्रांनी भरलेलं असं हे पुस्तक आहे आणि अगदी पानाच्या वरच्या डाव्या टोकावरून ते खालच्या उजव्या टोकापर्यंत नुसतं लिहिलेलं आहे असं काही नाही ह्या पुस्तकात. छान जागा सोडलेली, चित्र, नीट नेटकं, वाचावं वाटेल असं लिहिलेलं हे पुस्तक आहे. 

        लेखकाचं साधं म्हणणं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवायचा आणि आयुष्य आपोआप बदलून जातं. ते म्हणतात ना तुम्ही आयुष्य घडवूच शकत नाहीत. तुम्ही फक्त सवयी घडवू शकतात आयुष्य आपोआप घडतं जात. तर लेखक हे पुस्तक ४ भागात लिहितात आणि प्रत्येक भागात आपल्याला कुठल्या त्या छोट्या छोट्या सवयी लावून घ्यायच्या आहेत ते सांगतात.

        झेन चा अर्थ आपण समजून घेऊ. माणसाने ह्या जगात कसं जगावं ह्यालाच झेन म्हणतात. आज काल सगळे खूपच बिझी असतात. ह्या बिझि-नेस मधून बाहेर येण्यासाठी ते काहीतरी वेगळं करायला बघतात. फिरून येतील, काही दिवस सुट्टी घेतील वगरे वगरे असं काही ते करतात पण गाडी पुन्हा रुटीन ला आली की तोच स्ट्रेस, तेच बर्डन, पुन्हा कधी सुट्टी मिळते ह्याचे वेध लागतात. आणि ही सायकल सुरूच रहाते. पण सगळं जग धावतं आहे. आपल्याला थांबून कसं चालेल ना? सुट्टी घेऊन काहीच करणार नाही असं पण नाही होऊ शकत!

        आता जगाला बदलणं तर काही सोप्प काम नाही. पण स्वतःमध्ये बदल घडवणं नक्कीच सोप्प आहे. सुट्टी घेऊन शांती, नो स्ट्रेस, हे असं काही तरी शोधण्यापेक्षा जे सुट्टीवर गेल्यावर मिळतं ते जर सगळं रुटीन मधेच सामावून घेतलं तर? तेच मिळवण्यासाठी झेन तुमची मदत करेल. असं नका वाटू देऊ की आता झेन शिकण्यासाठी कुठे तरी डोंगरात जाऊन रहावं लागेल. छोटे छोटे बदल ते पण सवयींमध्ये इतकंच करायचं आहे.

"झेन म्हणजे आनंदी आयुष्य जगण्याच्या काही आयडिया"

        झेन हे शब्दात सांगणं जरा कठीण आहे ते अनुभवावं लागतं. पण लेखक सांगतात की एकदा का झेन तुम्ही वापरायला शिकले की, तुमच्या चिंता गायब होतील. आयुष्य हे किती निवांत जगता येतं हे समजेल. कारण आयुष्य कितीही कठीण आणि गुंतागुंतीचं असुद्या, झेन त्या मध्ये आनंदाने रहाण्याच्या हिंट्स तुम्हाला देईल. झेन हे आता जापानच नाही तर सगळ्या जगात प्रसिद्ध होतं आहे. आणि म्हणून शुनमयो मसुनो सांगतात की झेन म्हणजे फक्त काहीतरी आहे, छान असतं असं समजून न घेता हे आपल्या आयुष्यात वापरा. हे पुस्तक लेखक ४ भागात समजावून सांगतात पण मी तुम्हाला पुढच्या २ ब्लॉग्स मधे मला समजलेल्या, आवडलेल्या आणि तुमच्या कामाला येतील अश्या सगळ्या गोष्टी एकत्र करून सांगणार आहे. 

         ह्या ब्लॉग च्या शेवटी मला फक्त मी आत्ता पर्यंत लिहिलेले ९ ब्लॉग्स तुमच्या समोर ठेवायचे आहेत. जर एखादा ब्लॉग तुमच्या कडून वाचण्याचा राहिला असेल तर हे अगदी ५ मिनटात वाचून होणारे ब्लॉग्स नक्की वाचा. वेळ ५ मिनिटांचाच लागतो पण तुम्ही शिकणार काहीतरी कमालीचं हे नक्की. उदाहरणं देऊन सांगू का? आंबा सगळ्यांना आवडतो पण एखादा आळशी माणसाच्या समोर आलाच तर तो वाट बघतो कोण चिरून देईल का म्हणून, पण आता चिरून सुद्धा ठेवला आहे, त्या आंब्याचा मस्त असा रस बनवलेला आहे. कितीही आळशी व्यक्ती का असेना खाईल की नाही बोला? 

बघा हे कोण काका आहेत हे पण सांगत आहेत माझे ब्लॉग्स वाचायला!

        तसेच हे बराच वेळ वाचन करून समजणारे पुस्तकं तुमच्या समोर सोप्प्या भाषेत मी ठेवतो आहे. तर नक्की वाचा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा. पुढच्या भागात झेन पुस्तक समजून घेऊया. 

------------------------------------------------------------------------------------------------------------

१. सुरवात करूया पाईपलाईनच्या गोष्टी पासून!

२. स्वतःच्या मतांवर ठाम राहणं सोप्प असतं का?

३. नव्वदच्या दशकातले कार्टून्स!


-------------------------------------------------------------------------------------------------------------
       इथून पुढचे ५ लेख म्हणजे माझ्या एका आवडीच्या पुस्तकातून मला मिळालेल्या शिकवणींचा संग्रह आहे. 
पुस्तकाचं नाव आहे "द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड"

---------------------------------------------------------------------------------------------------------------
शेवटी मला म्हणायचं असं आहे की, 

       तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण राहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुप चा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार टेलिग्राम चॅनल.

व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोटे लेख तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. हा लेख जर आवडला नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या लेखातून प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या.

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

2 Comments

  1. ZEN मस्त वाटतंय हे पुस्तक ...intro वरून... पुढच्या newsletter पासून अजून मजा येईल वाचायला...
    If you Want to minimise the Pain , Read Zen 😄... हे आता सुचलं म्हणून share केलं..

    ReplyDelete
    Replies
    1. True.
      You can minimise the Pain, if you adapt the minimalist lifestyle..😊

      Delete