। । श्री । ।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
हा लेख तुम्हाला मिळणार तेंव्हा दसरा झालेला असेल त्यामुळे "लेट पण थेट" दसऱ्याच्या माझाव्यापार कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या जगात काही तरी चांगले बदल घडवून आणण्यासाठी तुमच्या मनात जे काही विचार असतील त्या सगळ्या विचारांचा विजय व्हावा आणि ते चांगलं काम थांबवण्यासाठी जे काही वाईट विचार काम करतील ते सगळे कालच्या रावण दहनात जळून गेले असा विचार करा आणि माझाव्यापार च्या शुभेच्छा ह्या पत्रातून मिळाल्या आहेत असं समजा.
आजचं पत्र काय लिहावं ह्या विचारात मी असताना मला रतन टाटा ह्यांच्या बद्दलची दुःखद बातमी समजली आणि माझ्या मनात फक्त एकच श्लोक आला. हा श्लोक रतन टाटांनी खरा जगला आहे असं मला वाटलं.
देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी
मना चंदनाचे परित्व झिजावे परी अंतरी सज्जनानीव वावे ।। श्री राम ।।
अगदी खरं आहे देह राहिला नाही पण रतन टाटा प्रत्येकाच्या लक्षात राहणार. आपला देह टाकला तरी कीर्ती तशीच राहिली पाहिजे अशी आपली क्रिया असावी हे समर्थ रामदास आपल्याला सांगत आहेत जे रतन टाटांनी करून दाखवलं. रतनजींसारखे व्यक्ती भारतात पुन्हा पुन्हा जन्माला यावे आणि त्यांच्या वागणुकीतून आपण शिकून तशीच क्रिया करावी इतकीच माझी इच्छा आहे. माझाव्यापार टीम कडून रतन टाटा ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मला ऐकणं का महत्वाचं वाटत?
रतन टाटांच्या या ४ शिकवण आपल्या आयुष्यात वापरा आणि उद्योगपती बना वगैरे असले काही पॉईंट्स मी लिहिणार नाही. इंटरनेट वर प्रत्येक दुसरी शिकवण ही याच ठरलेल्या ४-५ उद्योगपतींची असते. त्यांनी खरंच तसं कुठे लिहून ठेवलं किंवा म्हणलं आहे का माहित नाही पण असे Quotes खूप सापडतात.
आपण सगळ्यांनी "वेल रेड" किंवा बहुश्रुत असे दोन शब्द नक्की ऐकले असतील. आपल्या संस्कृतीत सहसा बहुश्रुत व्यक्ती आहे असं म्हणतात. ज्याचा अर्थ होतो की ज्याने भरपूर लोकांचे चांगले चांगले विचार ऐकलेले आहेत आणि जवळपास सारख्या अर्थाचा शब्द आहे "वेल रेड" म्हणजे ज्याने भरपूर लोकांचे चंगले विचार वाचले आहेत असा पण आहे.
इतकं काय महत्वाचं आहे हे ऐकणं?
हे शोधायला निघालो तर इतले उदाहरणं सापडतील. एक उदाहरणं सांगतो.बाळाला आईच्या पोटात असतानाच ऐकू येणं सुरु होतं. म्हणनू गर्भ संस्कार, चांगले पुस्तकं वाचा ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या.
आता हेच ऐकण्याचं महत्व सांगणारी एक गोष्ट देवी भागवतात सुद्धा येते. ती सांगतो. मधू आणि कैटप हे दोन राक्षस ह्यांचा जन्म भगवान विष्णूंच्या कानाच्या मळातून झाला असा उल्लेख येतो. मी जेंव्हा पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली होती मला जो लिहिलेला अर्थ आहे तोच समजला होता. पण गंमत बघा त्याचा अर्थ किती मोठा आणि छान आहे. राक्षस ही एक प्रवृत्ती आहे जी आपण जेंव्हा चुकीचं ऐकतो आणि वाचतो त्या मधून जन्माला येतं असते. त्यामुळे चांगलं ऐका हा एक संकेत ही गोष्ट आपल्याला देऊन जाते.
म्हणून मोठे आपल्याला, "ऐकत जा रे" म्हणतात वाटत!
एक वेळ पोटात गडबड झाली तर बरं होईल काही दिवसात पण डोक्यामधे झाली तर? डोक्यांचे आजार वाटतात तितके सोप्पे नसतात. म्हणून मी आज ऐकण्याबद्दल लिहिण्याचा विचार केला.
इतकं कन्टेन्ट आहे इंटरनेट वर त्या पैकी फक्त आनंद देणारं, बघून हसू येईल, मज्जा येईल असं कन्टेन्ट बघण्यापेक्षा थोडा विचार करा नेमकं माझ्यासाठी चांगलं कुठलं आणि मग तेच डोक्यात जाऊ द्या.
आता मी चांगलं ऐका, ऐकणं असं ऐकणं तसं वगैरे सांगितलं पण इंटरनेट वर काय माझ्या मते चांगलं ऐकण्यासारखं आहे ते सांगतो.
वाल्मिकी रामायण समजून घ्या हिंदी किंवा इंग्लिश मधे सोबत मस्त ऍनिमेशन पण बघा.
आठवड्याभराच्या न्यूज रविवारी ३० मिनिटात हसत हसत ऐका.
Learn Spirituality and life growth with Mahatria.
आपल्या देवी देवतांच्या आरत्या, श्लोक, उत्सव ह्या बद्दलची माहिती मराठीमधे समजून घ्या.
असेच अजून चांगले विचार असणारे कन्टेन्ट कुठे मिळतात हे तुम्हाला माहिती असेल तर मला रिप्लाय मधे नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या पत्रात अजून एका नवीन विषयासोबत. तो पर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा.
Reader, एक सांगायचं होतं....
हा लेख/पत्र म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.
आता तुम्ही हा लेख ई-मेल मधे वाचून मला रिप्लाय केला किंवा ब्लॉगर वर वाचून खाली कंमेंट केली तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.
माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.
तुमचा मित्र,
अजिंक्य कवठेकर
0 Comments