। । श्री । ।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आमच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. मागच्या पत्राला मला एकही रिप्लाय आला नाही म्हणून मी माझ्या ई-मेल च्या सेटिंग पहिल्या आणि माझ्या लक्षात आलं की एक गडबड झालेली आहे. त्यामुळे माझा ई-मेल तर तुम्हाला मिळाला पण त्याला जर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मला मिळाला नाही. टेक्निकल एरर म्हणूया आणि माझ्या कडून क्षमस्व. कारण इतकी मेहनत घेऊन तुम्ही रिप्लाय कदाचित केला असेल आणि तो मधेच कुठेतरी हरवून गेला माझ्या पर्यंत आलाच नाही. झाली काही तरी चूक.
पण आता रिप्लाय करू शकतात ई-मेल नेहिमीपेक्षा अधिक छान पद्धतीने चालू आहे. ajinkya@mazavyapar.com हा माझा ई-मेल आयडी आहे.
आणि तुम्हाला आमचे पत्र प्रत्येक रविवारी मिळावे असं वाटतं असेल तर तुम्ही इथे Subscribe करू शकतात.
विज्ञानाने इलॉन मस्क ला कडेवर घेऊन मारली उडी!
हा मागचा आठवडा विज्ञानाच्या दृष्टीने आपण किती प्रगती केली आहे हे दाखवणारा होता. इलॉन मस्क ह्यांनी एक रॉकेट आकाशात पार अंतराळात जाईल इतका उंच सोडून तो तसाच उभा खाली लँड करून दाखवला. चमत्कारचं म्हणावा. अशक्य वाटणारा विचार करून तो खरा करून दाखवणारा इलॉन मस्क हा खूप लोकांसाठी आदर्श बनलेला आहे. मी स्वतः तो व्हिडिओ ३-४ दा पाहिला की कोणी रिव्हर्स व्हिडिओ दाखवून काही खोटं सांगायचं प्रयत्न करतो आहे का म्हणून. पण तसं नाही तुम्ही स्वतः सुद्धा एकदा जाऊन बघा कसं रॉकेट उडालं आणि पुन्हा सुरक्षित पणे खाली उभं उतरलं ते.
आता माझ्या डोक्यात जो विचार चालू आहे ना तो सांगतो. विज्ञानाने प्रगती केली आपण म्हणतो पण सध्याची परिस्थती बघता मला विज्ञानाने लोकांना आळशी, झोपाळू, नुसतं काहीतरी बघत बसणारा, फक्त ऐकणारा, बघणारा पण काहीही ऍक्शन न घेणारा व्यक्ती बनवलं आहे हेच वाटतं. आणि ह्या पत्रात मी जिथे जिथे विज्ञान लिहितो आहे त्याचाच अर्थ टेकनॉलॉजि सुद्धा आहे.
तुम्ही विचाराल का? तुम्ही आजू बाजूला बघा आणि स्वतः सांगा. आजार काही वर्षांपूर्वी जितके होते तितकेच आहेत का वाढले आहेत? इंटरनेट वर इतकं शिकायला मिळतं म्हणतात की कोणीही घरी बसून पैसे कमवू शकतो मग जॉब मिळण्यासाठी इतकी मर मर का असते? जिथे १० जागा आहेत तिथे इंटरव्यू देण्यासाठी दहा हजारलोकं का जमतात? इंटरनेट मुळे डिजिटल इंडिया झालं आहे. पेमेंट फास्ट होतात मग का तरीही लोकांना इतकं फास्ट पैसे इनव्हेस्ट करणं समजतं नाही त्यात भारतातले ८०% आय-फोन हे EMI वर घेतले जातात? यादी मोठी आहे.
नवीन टेकनॉलॉजि वापरणं म्हणजे प्रेस्टिज असतं का?
ह्याच विषयाबद्दल माझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे ते सांगतो. आपल्या आयुष्यात टेकनॉलॉजि आली. कुठली? तर आपण मोबाईलच उदाहरण घेऊ. कारण सगळ्यांनाच माहित असलेलं आणि खूप साऱ्या लोकांनी मोबाईल हा कसा घरा घरात ते खिशा खिशात गेला हे पाहिलं आहे म्हणून.
आधीच्या काळात एखाद्याच्या हातात मोबाईल असला तर काय मोठा माणूस आहे, मोबाईल आहे त्यांच्या कडे हाच विचार डोक्यात येत होता. किंवा लँड लाईन फोन सुद्धा मला आठवतं आमच्या पूर्ण कॉलनी मधे आमच्याच घरी होता. कधी कधी शेजारी अर्जंट फोन करायला किंवा कोणाचा आला तर बोलायला येत होते.
मला इतकं छान हे आठवतं आहे मी आणि माझी बहीण फोन वाजला तर दोघे काम सोडून फोन उचलण्यासाठी पळायचो. कोण फोन उचलणारा ह्यावरून भांडण होतं होते घरात आणि आज माझा मोबाईल समजा माझ्या बहिणीच्या जवळ आहे आणि कोणाचा फोन आला तर ती तो फोन उचलण्याचे कष्ट पण घेत नाही. इतकी फास्ट टेकनॉलॉजि बदलत गेली आहे की एखादी गोष्ट वापरून त्याचा कंटाळा पण आला आहे.
तर काही वर्षांपूर्वीचा काळ असा होता की मोबाईल असणे, कार असणे, इंटरनेट चा वापर चोवीस तास करता येणे, फोटो काढण्यासाठी कॅमेरा असणे हे सगळं म्हणजे prestige एक वेगळी प्रतिष्ठा असायची. आणि आज? आज प्रत्येकाकडे एक नाहीतर दोन मोबाईल आहेत. एक ANDROID एक IOS. कार एक तर प्रत्येक घरासमोर आहेच आहे. इंटरनेट चं तर काय सांगावं हाय स्पीड इंटरनेट प्रत्येकाच्या खिशात आहेत. घरात एखाद्या खोलीत नाही. खिशात जिथे जावं तिथे उपलबद्ध आहे. आज कॅमेरा पण आहे, त्या कॅमेरा मधे फोटो निघतात, व्हिडिओ निघतो तो एडिट होतो, जगाच्या कोपऱ्यात लोकांना पाठवता येतो. आणि हे एकाकडे नाही प्रत्येक व्यक्ती कडे आहे.
मग नेमकं प्रेस्टिज कश्यात आहे? माझ्या खिशात पण फोन समोरच्या खिशात पण फोन. मी तुझ्या पेक्षा मोठा आहे हे कसं दाखवणारं? म्हणून आय-फोन किंवा फ्लॅग-शिप फोन म्हणतात ते आले. सोप्या शब्दात सांगायचं तर महागाचे फोन आले ज्या मुळे मी मोठा आहे हे नकळत सांगायची सुरवात झाली. पण हळू हळू ते सुद्धा कमी झालं आहे.
मागच्याच महिन्यात आय फोन १६ भारतामधे आला. नेहिमी प्रमाणे लोकांनी गर्दी करून फोन घेतला पण खूप जणांचं मत होतं की ह्यात फार काही वेगळं नाहीये. जे आय-फोन १४ -१५ मधे होतं ते सगळं ह्यात आहे. हे पण प्रेस्टिज कमी होतं आहे.
मग नेमकं प्रेस्टिज कशात आहे?
मी माझं मत सांगतो. प्रेस्टिज हे आपल्या कडे उपलबद्ध असलेली टेकनॉलॉजि कशी मी वापरून माझा फायदा करून घेतो ह्या मधे आहे. उदाहरण सांगतो. फोन चा वापर मी वेळ घालवण्यासाठी करू शकतो किंवा असे छान लेख लिहून एक चांगला ब्लॉगर बनण्यासाठी प्रयत्न करू शकतो. माझ्या मते जो दोन लाखांचा फोन घेऊन शंभर गोष्टींचे Paid Subscription घेऊन आपला मेहनतीने कमावलेला पैसा घालवतो आणि जो वीस हजारच फोन वापरून छान ब्लॉग लिहितो, प्रत्येक आठवड्यात नवीन नवीन लोकांपर्यंत पोहचतो त्याच प्रेस्टिज आहे म्हणावं.
फक्त तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो बाकी Subscriptions Paid असले तरी आमचे Newsletter म्हणजेच पत्र हे फुकट आहेत. फक्त Subscribe करा. कसं करणार Subscribe? ह्या लिंक वर जाऊन MazaVyapar's Weekly Letter.
मला किती तरी जण माहिती आहेत जे दीड लाखांचे फोन वापरतात पण दिवस रात्र एकटे असतात. कारण दीड लाखाचा फोन असणे हेच प्रेस्टिज आहे. त्या फोन वरून गप्पा मारून मित्र कसे बनवावे, असलेले कसे टिकवावे ह्यात खरं प्रेस्टिज आहे हे कोण सांगणार?
माझ्या मते टेकनॉलॉजि आपल्या फायद्या साठी वापरणे ह्यात प्रेस्टिज आहे.
फोन वापरून नवीन मित्र बनवणे, जुन्या मित्रांसोबत मैत्री अजून घट्ट करणे हे ज्याला जमलं तो माझ्या साठी प्रेस्टिज वाला माणूस आहे. मग त्याच्या कडे फोन दोन हजार चा असला तरी चालेल.
आपल्याला कार नेमकी किती वापरावी लागते हे बघून त्या प्रमाणे उपलबध असणारी कार घेणारा व्यक्ती जास्त प्रेस्टिज वाला आहे. तो नाही जो "आपल्या कडे पण एक SUV असावी" म्हणून कार घेतो. आठवडाभर ऑफिस ला बस ने जाणं येणं करतो आणि सुट्टी च्या दिवशी घरच्यांसोबत बाहेर जावं म्हणलं तर कार खूप दिवस झाले चालवली नाही म्हणून बॅटरी डाउन होऊन बंद पडलेली असते. पण तो व्यक्ती ज्याच्या कडे अगदी पन्नास लाखाची कार घेण्याची शक्ती आहे तो एक ५-६ लाखांची कार घेतो कारण त्याला रोज कदाचीत १०० किलोमीटर मधेच फिरावं लागतं. हा आहे माझ्या दृष्टीने प्रेस्टीजियस.
असे २ काय खूप सारे उदाहरणं मी देऊ शकतो. पण पत्रामधे मला माझ्या टीम नी कमीत कमी शब्दात लिही असं सांगितलं आहे तर ते ऐकावं लागेल. म्हणून २ उदाहरणात आजच्या विषय मी संपवतो.
पण मला खरोखर जाणून घायला आवडेल की तुम्ही तुमच्या कडे असलेल्या टेकनॉलॉजि कश्या वापरतात. त्या टेकनॉलॉजि तुमचा वेळ, आरोग्य, नाते, मैत्री, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, झोप, ह्या सगळ्याची क्वालिटी खराब करत आहेत का तुम्ही मी सांगितलं त्या प्रमाणे प्रेस्टिज वाले व्यक्ती आहात जे टेकनॉलॉजि चा वापर फायद्यासाठी करतात हे मला रिप्लाय मधे नक्की कळवा. भेटूया पुढच्या पत्रात.
नमस्कार.
इंटरनेट वर उपलबद्ध असलेली एक भन्नाट गोष्ट सांगू का?
या भागात मी, मला इंटरनेट वर आवडलेली आणि आपल्या सगळ्यांच्या कामाला येणारी, त्यात फुकटात उपलबद्ध असलेली एक गोष्ट, टूल, वेबसाईट, ऍप्स असं काही तरी सजेस्ट करतो.
आजच्या पत्रात मी एका यू ट्यूब चॅनेल बद्दल सांगणार आहे. मला खूप दिवसांपासून वाटतं होतं की देवाचे भजन, स्तोत्र हे का बरं खूप छान नवीन पिढीला आवडेल अश्या प्रकारे म्युझिक देऊन बनवतं नाही कोणी? माझ्या मते म्युझिक च असतं जे आपल्याला एखादं गाणं दिवसभर गुणगुणायला भाग पाडतं. मग असं म्युझिक आपल्या कडे असलेल्या स्तोत्रांना देऊन त्यांना मॉडर्न पद्धतीने तरुणांना आवडेल अश्या पद्धतीने प्रेसेंट करता येईल का? आणि मला उत्तर मिळालं हो. शक्य आहे. हे एक यू ट्यूब चॅनेल नक्की बघा आणि ह्या वरचे स्तोत्र, मंत्र गाणे ऐकून जर डोक्यात बसले तर मला नक्की कळवा.
मला आत्ता पर्यन्त आवडलेलं सगळ्यात छान स्तोस्त्र म्हणजे श्री वेंकटेश्वर स्तोस्त्र. नक्की वेळ काढून ऐका आणि तुमची प्रतिक्रिया कळवा.
Visit this Wonderful YouTube Channel
Reader, एक सांगायचं होतं....
हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.
आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.
माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.
तुमचा मित्र,
अजिंक्य कवठेकर
0 Comments