।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
स्वागत आहे आपले माझाव्यापार च्या नवीन पत्रात. आज मी तुम्हाला एक छान अशी शॉर्ट फिल्म बघायला देणार आहे जी तशी तर खूप जुनी आहे पण आजही त्यामधून मिळणार मेसेज आजची तितकाच महत्वाचा आहे.
ती शॉर्ट फिल्म कुठली आहे हे सांगायच्या आधी मी का ही शॉर्ट फिल्म शेअर करायची ठरवली ते सांगतो. जास्त वेळ घेणार नाही मी कारण शॉर्ट म्हणत म्हणत ती शॉर्ट फिल्म ३० मिनिटांची आहे. काही वर्षांपूर्वी ३० मिनिटं म्हणजे शॉर्ट च वाटायचं पण आता शॉर्ट्सच्या जगात जे ३० सेकंदांचे ही नसतात, तिथे ३० मिनिटं म्हणजे मोठंच वाटतं. पण बघा ३० मिनिटं काढून नक्की बघा.
मला शॉर्ट फिल्म्स बघायची सवय कशी लागली सांगतो. मी कॉलेज मधे असताना माझ्या काही मित्रांसोबत मी शॉर्ट फिल्म बनवू असं ठरवलं आणि मग काय स्टोरी असावी, कसं एडिटिंग करायचं हे सगळं अभ्यास करतांना मी खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स बघितल्या. मला एक समजलं शॉर्ट फिल्म या कमीत कमी वेळात अगदी शॉर्ट टाइम मधे खूप मोठा अर्थ सांगून जातात. हे मला फार आवडलं. वेळ तर वाचतोच आणि एक नवीन शिकवण डोक्यात जाते ते वेगळंच. तेंव्हा पासून माझ्या कडे खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्सच कलेक्शन आहे जे प्रत्येकाने बघावं आणि आपल्या ओळखीच्यांना दाखवावं. मी माझ्या पत्राद्वारे अधून मधून शॉर्ट फिल्म्स च सजेशन देतच असतो. त्यामुळे नक्की Subscribe करा म्हणजे मी सजेस्ट केलेली फिल्म बघायची राहून जाणार नाही.
आता माझ्या कलेक्शन मधून ही शॉर्ट फिल्म कशी काय सुटली काय माहीत? ही ११ वर्ष जुनी शॉर्ट फिल्म आहे जी अमोल गुप्ते आणि त्यांच्या टीम ने बनवलेली आहे. ह्या फिल्म चा विषय तो आहे जय बद्दल आज प्रत्येक तिसरी किंवा चौथी जाहिरात बोलत असते. काही जणांनी बरोबर गेस केलं, SIP, Mutal Funds, Investments.
सगळ्यात महत्वाचं काय तर पैसे वाचवणे आणि वाढवणे हे खूप लहानपणी पासून सवयीत असलं पाहिजे. ते करण्याचे मार्ग खूप सारे आहेत. ते मार्ग कुठले आहेत कसे वापरावे हे प्रत्येक जाहिरात सांगते. पण मी पैसे वाचवतो आणि वाढवतो ही इच्छा, बुद्धी, सवय फक्त शिक्षणामुळेच येऊ शकते. हे शिक्षण शाळेत मिळेल, एखाद्या बिझनेस करणाऱ्या व्यक्ती कडे बघून मिळेल, आई बाबांकडून मिळेल, भाऊ बहीण शिकवतील किंवा ह्या शॉर्ट फिल्म मधून मिळेल. पैसा वाचवणे आणि वाढवणे ह्याची इच्छा व्हावी वाटतं असेल तर नक्की ही फिल्म बघा.
जाहिरातींमुळे आपल्याला पावला पावलावर काही तरी नवीन विकत घेण्याची इच्छा होतं असते. मग ते खाण्या पिण्याची गोष्ट असेल, कपडे असतील, फिरणं असेल, काही इलेकट्रोनिक वस्तू असेल पण ही इच्छा थांबत नाही हे नक्की. मग अश्या सगळ्या गर्दीमध्ये सेव्ह करणे, इन्व्हेस्ट करणे काय शक्य आहे जमणं? पण हीच इच्छा किंवा ते छोट्या प्रमाणात सुरु करू अशी इच्छा ही फिल्म नक्कीच तुमच्या डोक्यात सुरु करेल.
ही फिल्म आवडली तर मला नक्की कळवा आणि अश्याच माझ्या कलेक्शन मधल्या फिल्म्स मी पुढच्या काही पत्रात तुमच्या सोबत नक्की शेअर करेन तर माझाव्यापार चा पत्रव्यवहार (Newsletter) Subscribe नक्की करा.
भेटूया पुढच्या पत्रात पुन्हा एखादा असाच छान विषय घेऊन.
तो पर्यंत तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आपल्या आपल्या कामात व्यस्थ रहा.
0 Comments