मला मिळाली एक वाईट प्रतिक्रिया!

।।  श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

    स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन पत्रात. नवीन वर्षामधला या पत्राचा नंबर आहे ११. त्याच्या आधी मी मागचा पूर्ण वर्ष ई-मेल वर पत्र पाठवले आणि ह्या वर्षी whatsappवर पाठवायला सुरवात केली. तुम्ही वेळात वेळ काढून हे पत्र वाचायला घेतलं म्हणून खूप खूप धन्यवाद. 

    मी हे किती नंबर च पत्र आहे का सांगितलं माहिती का? कारण परवा मला माझ्या लिहिण्याबद्दल एक प्रतिक्रिया आली. ही प्रतिक्रिया फार काही चांगली नव्हती. आज त्या बद्दलचे माझे मत काय हे थोडं बोलूया आणि शेवटी मी एक भन्नाट न्यूज सांगणार आहे. 

नेमकी प्रतिक्रिया आली काय? 

    मला अशी प्रतिक्रिया आली की तू एक च गोष्ट परत परत सांगतो आहेस. कुठलाही विषय असला तरी तू शेवटी काही ठराविक गोष्टींबद्दलच बोलतो. एक म्हणजे पुस्तकं वाचा, स्क्रोलिंग कमी करा, न्यूज कश्या वाईट आहेत, कन्टेन्ट बनवा आणि काही अध्यात्मातल्या गोष्टी. बस्स ह्याच्या बाहेर तू काही वेगळं लिहीत नाही. म्हणजे काहीही विषय घेऊन लिहिला, तरी शेवट हाच करतो.

    आता प्रतिक्रिया कोणाकडून येते ते पण महत्वाचं असतं ना? ज्याने मला प्रतिक्रिया दिली तो माझा पहिल्या १० वाचनकांपैकी एक जण होता. जो आजही सगळे पत्र वाचतो. म्हणून मी जरा सिरियसली विचार केला.

    मी शांत पणे ही प्रतिक्रिया ऐकली. समजून घेतली. मग मी बसून माझे मागचे सगळे लेख वाचले आणि मला जाणवलं अरे हो खरंच. जवळपास प्रत्येक पत्राचा शेवट हा काही ठराविक ४-५ गोष्टी सांगणारा आहे. मी पण ह्या वर विचार केला, "असं खरंच होतं आहे का?" आणि होतं आहे तर "का होतं आहे?"

मला लक्षात आलं असं का झालं ते!

    सगळ्यात आधी आपण सोशल मीडिया मधे इतके गुंतलो आहोत की त्या मुळे आपल्या काही सवयी सुद्धा बदलून गेल्या आहेत. (बघा हं आला परत सोशल मीडिया चा टॉपिक) रोज सोशल मीडिया वापरून वापरून एक झालं आहे आपल्याला तेच तेच परत बघायची सवय निघून गेली आहे. जुना चांगला जरी असेल, तरी आपल्याला नवीन कन्टेन्ट लागतो. कारण इंटरनेट त्या मुळेच तर चालू आहे. रोज नवीन नवीन माहिती येते आणि जो कोणी नवीन माहिती आवडेल अश्या पद्धतीने टाकतो तो जिंकतो. ती कामाची आहे का? चांगली आहे का? हे प्रश्न इथे चालणार नाहीत. रोज टाकणे आणि लोकांना आवडेल अश्या पद्धतीने टाकणे. हा सोशल मीडिया जिंकण्याचा रुल आहे. 

    आता मी हे पत्र लेखन काही सोशल मीडिया वर जिंकण्यासाठी करत नाही. मी त्या रेस मधेच नाही. मी कोणासाठी लिहितो, स्वतःसाठी. आता मी त्या रेस मधे नाही त्या मुळे मला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी रोज किंवा अगदी सकाळ संध्याकाळ लिहिणं, माझा ग्रुप सारखा नवीन नवीन गोष्टींनी भरलेला असावा असं मला वाटतं नाही. आठवड्यातून एकदा पत्र येणार आणि त्यात मी काहीतरी मस्त सांगणार हे नक्की. हे सोशल मीडिया गेम जिंकण्यासाठी पुरेसं नाही हे मला माहिती असूनही मी एकदाचं कन्टेन्ट अपलोड करतो.

    मी जेंव्हा जेंव्हा लिहितो ते फक्त "हे वाचण्यासाठी खूप महत्वाचं आहे" असं वाटतं तेंव्हाच लिहितो. मी जे लिहितो ते माझ्यासाठी पण महत्वाचं आहे आणि वाचणाऱ्या साठी पण. मग ते रिपीट होतं आहे का? होतं असेल.

एकचं लर्निंग मी कितीदा वाचावं?

     मी माझ्या मित्राला विचारलं ज्याने प्रतिक्रिया दिली त्याला मागच्या वर्षीचे ५२ (प्रत्येक आठवड्याचा एक असे ५२ ) आणि ह्या वर्षातले १० असे जवळपास ६२ लेख तू वाचले ज्या मधे तुझ्या नुसार तेच तेच तात्पर्य (Take away, conclusion, lesson) तूला मिळाले. ज्या तुला पटल्या सुद्धा, तू त्या ४-५ गोष्टींपैकी काय करणं सुरु केलं? 

    म्हणजे तू सोशल मीडिया वर कन्टेन्ट फक्त बघणं नाही तर बनवणं सुरु केलं का? तू व्यायाम करणं सुरु केलं का? तू न्यूज निगेटिव्ह असतात हे समजल्यावर बघणं कमी केलं का? पुस्तकं वाचणं सुरु केलं का? (का अजून पण पुस्तकाला वेळ नाही तुझ्या कडे) किंवा काही आध्यत्मिक पुस्तकं वाचले का? या सगळ्यांचं उत्तर जसे माझे विषय सारखे असतात तसं होतं, सगळ्या प्रश्नांचं सारखं उत्तर "नाही". म्हणजे ६२ लेख वाचण्याचा फायदा हा शून्य आहे. कारण ते वाचून केलं काहीच नाही. 


    मग मी त्याच्या प्रतिक्रेवर प्रतिक्रया दिली. कळालं? का बरं तेच तेच लर्निंग मी का सांगतो. तुझ्यासारखा पहिल्या दिवशीपासून माझे लेख वाचून मला चांगली, वाईट प्रतिक्रिया देणारा जर एकही शिकवण आयुष्यात, त्याच्या रोजच्या जीवनात आणू शकतं नाही, तर माझ्या मते हेच lesson देणारे लेख मी १००० तरी लिहिले पाहिजे. बरोबर ना? त्याच्या डोक्यात तर पेटलीच पण माझ्या डोक्यात ट्यूब लक्ख पेटली.

एखाद्या विषयातला एक्स्पर्ट आपण कोणाला म्हणतो?

    एकच काम परत परत करून त्या मधे संपूर्ण यश मिळवणाराच आपण यशश्वी व्यक्ती आहे असं म्हणतो. विराट कोहली रोज सकाळी उठून, "मी आज दुसराच खेळात यशश्वी होतो" असा विचार तो नाही करत. कमी गोष्टींबद्दल जास्तीत जास्त माहिती असणं म्हणजे तो एक्स्पर्ट असं मला वाटतं. खूप साऱ्या गोष्टींबद्दल थोडं थोडं माहिती, कारण छान वाटतं मनाला ही झाली सोशल मीडिया ची पद्दत. तुम्ही ठरवा कुठली निवडायची ते.


        पण एक सांगू का? मी चांगली प्रतिक्रिया, वाईट प्रतिक्रिया ह्या सगळ्याच्या पुढे गेलेलो आहे. सगळ्यात आधी मी हे पत्र कोणासाठी लिहितो तर तो पहिला व्यक्ती आहे मी स्वतः. कारण एक पत्र म्हणजेच एक लेख लिहायचा आहे तर मला त्या बद्दल काहीतरी विचार आठवडाभर आधी करून, अभ्यास करून, तो लिहून, काही चुका दुरुस्त करून, काही माझ्या जवळच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन रविवारी पाठवण्यासाठी तयार ठेवावा लागतो.

    ह्या सगळ्या एक एक गोष्टी करण्यात मी इतकं काही शिकतो आणि माझी लिहिण्याची, वाचण्याची, ठरवलेलं काम वेळेवर करण्याची, मला आलेल्या रिप्लाय त्यांना रिप्लाय देण्याची अशी माझी एक एक सवय होतं जातं आहे. त्यामुळे आधी मी हे स्वतःसाठी लिहितो आहे. मी झाल्यावर मला जो काही रिप्लाय येतो, तो कसाही असला तरी माझ्यासाठी ती एक इम्प्रुमेन्ट करण्याची संधीच आहे असं मी समजतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येकाचे प्रत्येक रिप्लाय आणि प्रतिक्रिया ह्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.

    माझ्या मते तरी प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीमधे, विषयामध्ये जितका खोल अभ्यास करता येईल तो करावा. कोणीतरी कुठला तरी बिझनेस करून मोठा झाला, कोणीतरी जॉब करून मोठा झाला, कोणीतरी कुठलीतरी परीक्षा देऊन भारताच्या बाहेर जाऊन मोठा झाला, मग मला पण तसच करावं लागेल, हे सगळं आधी पण होतं, नंतर पण असणार आहे. सध्या फक्त सोशल मीडिया मुळे, कोणाच्या स्टेटस ठेवण्याने किंवा कोणी स्वतःहून सांगण्यामुळे तुम्ही तुमचं लक्ष सोडू नका. जे काम धरलं आहे ना त्यात एक्पर्ट बनायचं आहे हे डोक्यात फिक्स करा. इतकंच मला आजच्या पत्रात सांगायचं होतं.

न्यूज नाही पॉझिटिव्ह न्यूज

        मी सुरवातीला म्हणालो होतो ना मस्त न्यूज सांगणार आहे. झालं काय मी मागचे सगळे पत्र वाचले आणि मी खूपदा वेगवेगळ्या पत्रात "न्यूज नेगेटिव्ह असतात" असं लिहिलेलं मला जाणवलं. मला वाटलं अरे मी तर सगळं काही पॉझिटिव्ह बघणारा व्यक्ती. असं कसं मी नेगेटिव्ह बोलू शकतो. म्हणून न्यूज चॅनेल वाले करतील तेंव्हा करतील पण मी पॉझिटिव्ह न्यूज तुमच्या सोबत शेअर करेल. माझ्या मते सगळ्यांना वाचायला आवडतील पॉझिटिव्ह न्यूज.

        आजची पॉझिटिव्ह न्यूज आहे एका इंस्टाग्राम आणि यू ट्यूब वर आपलं अकाउंट चालवणाऱ्या व्यक्ती बद्दल. मास्टर जी, नावाचं एक चॅनेल आहे जे चालवतात एक व्यक्ती ज्यांचं नाव आहे मयांक सिंघ. मयांक हे एक शिक्षक आहेत आणि मुलांना त्याच त्याच जुन्या पद्धतीने शिकवण्यापेक्षा काही नवीन पद्धती वापरून ते शिक्षण देतात.

    उदाहरण सांगतो, त्यांना मुलांना गणित शिकवायचं होतं म्हणून त्यांनी आपल्या वर्गाला एक खोटी बँक बनवलं. प्रत्येकाला एक एक रोल दिला. कोणी कॅशियर. कोणी कस्टमर, कोणी मॅनेजर, कोणी लोन डिपार्टमेंट सांभाळणारे. असं सगळं ठरवून त्यांना खोटे पैसे देऊन बॅंकेमध्ये होतात ते सगळे कामं एक दिवस क्लास मधे केले. अगदी बँक ची स्लिप भरण्यापासून, चेक डिपॉझिट करण्यापर्यंत सगळं. मग या मधे गणित आलंच की.

    माझाव्यापारच्या टीम कडून मयांक ह्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा ह्यांचं चॅनेल बघा. त्यांच्या पद्धती बघा शिकवण्याच्या आणि आवडल्या तर नक्की subscribe करा. इतका सपोर्ट आपण करूच शकतो इतक्या चांगल्या कामाला.


शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.


आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.

आणि हो, एक सांगायचं राहील. तुम्हाला जर तुमच्या कुठल्या खास मित्राने हे पत्र पाठवलं आणि हे पत्र वाचून तुम्हाला वाटलं की, "किती सोप्या शब्दात कमीत कमी वेळ घेऊन कसल्या खास गोष्टी समजल्या रे!" माझाव्यापार चे आधीचे पत्र वाचायला मिळतील का? तर ही आहे लिंक इथे तुम्ही जुने पत्र (लेख, आर्टिकल, Newsletter, ब्लॉग) वाचू शकतात.

आणि असे खास लेख कधीही वाचायचे राहू नये म्हणून आमच्या पत्राला Subscribe करा. 











Post a Comment

2 Comments

  1. अजिंक्य खरंतर प्रतिक्रियेमधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आपण असंच पुढे पुढे जात राहतो, पण मागे वळून बघण्याची तीच संधी असते आणि त्यात नक्कीच सुधारण्याची शक्यता असते. तू असंच छान छान लिहित रहा लेखनासाठी तुला शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. तुमची कमेंट बघून खास आनंद झाला. वाचत रहा आणि माझा लिहिण्याचा प्रवास मी नित्य, नियमाने चालू ठेवेल. धन्यवाद.

      Delete