।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
माझाव्यापारच्या प्रत्येक वाचकाला अजिंक्य कडून मनापासून प्रणाम. जे कोणी माझे पत्र वाचून त्यांच्या ओळखीच्यांना ठरवून पाठवतात त्यांना वेगळा नमस्कार आणि एक सॅल्यूट पण. माझं खूप मोठं काम शेअर करणारे करत आहेत तर एक सॅल्यूट तर बनतोच त्या सगळ्यांसाठी.
मागच्या दोन्ही पत्रांनी माझा ब्लॉग इतक्या नवीन नवीन लोकांपर्यंत पोहोचला म्हणून मी ठरवलं एकदा हा माझाव्यापार काय प्रकार आहे आणि हे पत्र लिहिणं, रविवारी काही तरी वाचणं हे सगळं कुठून आलं कोणी ठरवलं ते सगळं सांगून देऊ. तुम्हाला ही कोणाला सांगावं वाटलं तर माहिती तर पाहिजे ना! बाकी पण सगळं भरपूर बोलूया. ( बोलूया म्हणजे नेहमीचच मी लिहिणार तुम्ही वाचू शकता.)
माझाव्यापार हे नाव का?
माझाव्यापार नाव कुठून आलं सांगू का? एकदा मी आणि माझे बिझनेस करणारे काही मित्र ज्या मधे काही सिनियर्स पण होते, सगळे गप्पा मारत बसलो होतो. आता बिझनेस म्हणलं की प्रॉफिट, लॉस, चुका, बिझनेस कोणाला समजणं, कोणाला न समजणं, कोणी बिझनेस जमत नाही म्हणून काम करणं सोडून देणं, जे जमलं नाही त्याला नावं ठेवणं हे सगळं सगळ्या बिझनेस मधे असतं. आमच्या या सगळ्या गप्पा चालू होत्या तेंव्हा माझे सिनियर मला म्हणाले, ते भारतात मोठे झालेले नव्हते, "People should mind their own Business in India. You guys love to discuss about other people. We don't do it genrally."
हे वाक्य मला आवडलं आणि पटलं. त्या मधले मी दोन शब्द उचलले "own Business" आणि त्याला माझ्या माझ्या पद्धतीने own म्हणजे माझा आणि business म्हणजे व्यापार असं स्वतःला सांगून माझाव्यापार एक शब्द स्वतःसाठी बनवून घेतला. हा शब्द फक्त मला स्वतःच्या बिझनेस वर, कामावर लक्ष द्यायचं, दुसरी कडे डोकं लावायचं नाही हे स्वतःला परत परत आठवण करून देण्यासाठी होता. नंतर "माझाव्यापार" हा शब्द मी माझ्या सोबत काम करणाऱ्या मित्रांना सांगितला. कुठून सुचला ते सांगितलं. त्यांना पण तो आवडला आणि तेंव्हा पासून आमच्या सोबत असलेला हा शब्द आहे.
मागच्या दहा वर्षातला मोठा बदल
मागच्या १० वर्षात आणि त्यामधेही जास्त करून ५ वर्षात इंटरनेट हे इतकं मोठं झालं आहे की इंटरनेटचा वापर बिझनेस साठी न करणे म्हणजे फार मोठी चूक वाटायला लागली आहे. कोणाला ही नवीन नाव, व्यक्तीचं असो किंवा बिझनेसच सांगून बघा तो आधी त्या नावाच्या कुठे कुठे प्रोफाइल आहेत, किती जण follow करतात, Subscribers किती, कमेंट चांगल्या आहेत का हे अगदी सहज बघतो. त्यामुळे, "मी बिझनेस करणारा आणि मी बिझनेस मधे बिझी आहे मला काही वेळ नाही सोशल मीडिया ला" वगरे हे उत्तर देणं काही बरोबर नाही.
मी थोडा अभ्यास केला आणि मला जाणवलं की सोशल मीडिया वर बिझनेसच प्रोमोट केला जातो असं काही नाही. अजून एक प्रकार आहे बिझनेसचा ज्याला म्हणतात पर्सनल ब्रँड. पर्सनल ब्रँड उभा करणे हा एक वेगळाच प्रकार आहे.
एक उदाहरण देतो. झिरोदा नावाची मोठी कंपनी आहे भारतातली. प्रत्येक जण काही ना काही ट्रेडिंग या कंपनीसोबत सुरु करतो. त्या कंपनीचा एक मालक युट्यूब वर वेगवेगळ्या लोकांसोबत पॉडकास्ट करतो.
का पॉडकास्ट साठी वेगळी मेहनत घेतो? काही गरज आहे? आपला आपला बिझनेस बघावा ना? पण या पॉडकास्ट मुळे बाकीचे सगळे लोकं त्याला ओळखायला लागले. मी निखिल कामत बद्दल बोलतो आहे. त्यांना कोणी ओळखत नव्हते असं काही नाही पण त्याच व्यक्तीची एक नवीन ओळख निर्माण झाली कन्टेन्ट क्रिएट केल्या मुळे. आणि नवीन ओळखीतून खूप साऱ्या नवीन संधी निर्माण होतात.
मी माझ्या मित्रांना म्हणालो, "आपण पण आपलं काम करत करत पर्सनल ब्रँड उभा करूया, रोज काम करत करत आपण पुस्तकं वाचतो ते सगळे पुस्तकं थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून सांगूया एका वेबसाईट वर आणि सोशल मीडिया वर. पण आपल्या ग्रुप चं नाव काय असेल?" काही विचार करायची गरजच नव्हती. माझाव्यापार. झालं. नाव फायनल. इथून आलं माझाव्यापार. (Mind your Business)
माझे पत्र रविवारी का वाचावे?
माझे पत्र जरी लिहिलं असेल पण मी इशारा हा चांगलं वाचण्याकडे करतो आहे. मला मनापासून न आवडणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे न्यूज. सतत निगेटिव्ह, सतत प्रॉब्लेम, पॉसिटीव्ह, काही सोल्युशन किंवा चांगल्या घडामोडी मी कधीही बघितल्या नाही मी न्यूज मधे. आता त्यांचा व्यवसाय आहे. निगेटिव्ह कडे लोकं आकर्षित होतात, मग जितके जास्त लोकं तितका पैसे हे सगळं ठीक आहे. न्यूज ह्या एक बिझनेस आहे, हे समजून आपण स्वतःचा विचार करावा, न्यूज कमी बघाव्या ह्या मताचा मी आहे.
पोट खराब करणारा पदार्थ समोर ठेवलेला आहे. तो खाऊन १० जणांचे पोट खराब झालेले आहेत. हे डोळ्याला दिसलं पण पदार्थ बनवणारा म्हणतो आहे, "काही नाही साहेब खा तुम्ही हे सगळे आधीच आजारी होते. माझ्या मुळे काहीही झालेलं नाही." तर तुम्ही खाण्याच्या आधी खूपदा विचार करणार. हेच न्यूज बद्दल होतं आहे. ते बघून डोकं खराब झालेलं मला खूप जण दिसत आहेत पण न्यूज वाले सांगतात तुम्ही तुमचं काम सोडा आणि कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे, कोण पडलं कोण उठलं, हे बघायला ७ वाजता टीव्ही आणि मोबाईल लावा.
रोज सकाळी ७ ला पेपर मधून किंवा ठळक घडामोडी च्या नावाखाली संद्याकाळी ७ ला, अशी वेळा ठरवून येणारी निगेटिव्ह ऊर्जा मी नाही घेऊ शकत. पण मी इतका लहान आहे की मी जाऊन त्यांचं तोंडही बंद करू शकत नाही. मग काय करणार? म्हणलं चला आपण चांगलं कन्टेन्ट वाचायला देऊ या. हळू हळू चांगलं वाचायची सवय लागेल. माझी कॉम्पिटिशन न्यूज चॅनेल सोबत नाही पण त्या विचारासोबत आहे जो दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकं घालून बघायला तुम्हाला टेंम्प्ट करतो, बिनकामाचं बघायला लावतो.
मग त्या न्यूज असो का सिरीयल, किंवा व्हाट्सएप्प चे स्टेटस, स्वतःचे कामं सोडून सगळा वेळ घालवायचा आणि मग मला वेळ मिळतं नाही हे तर ठरलेलं वाक्य आहे. मी इथे एक व्हिडिओ देतो आहे मी तो व्हिडिओ गौर गोपाल दास ह्यांचा व्हिडिओ बघून मग बनवला. ह्या व्हिडिओ मधे शिकवलेली गोष्ट मी नेहमी वापरतो आणि त्या मुळे मला हे ठरवायला सोप्प जातं की नेमकं काय बघायला पाहिजे आणि काय नाही. कशाला नाही म्हणावं हे समजून घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
फिल्टर झालेलं वाचावं हा मुद्दा आहे
चांगलं वाचावं हा मुद्दा आहे. आपलं मन हे भय, भ्रम आणि चिंता ह्या तिन्हीही गोष्टींकडे जन्मापासूनच झुकलेलं असतं. त्या बद्दलची माहिती दाखवून दाखवून जितके जास्त लोकं गोळा करता येतील ते गोळा करायचे आणि आपला बिझनेस करायचा हे बिझनेस मॉडेल आहे न्यूज चॅनेल चे. आता जो हे सगळं समजून स्वतःला ह्या सगळ्यांपासून दूर ठेवेल आणि मनाला चांगलं वाचायला, ऐकायला आणि बघायला ढकलेलं तो जिंकला समजावं.
तुम्ही पण आज पासून फिल्टर वापरा आणि कचरा कमी जाऊ द्या डोक्यात. तुम्हाला जर वेगवेगळे कंसेप्ट्स ( ज्या मुळे आपल्याला विचार करायला मदत होते) शिकून घेण्याची इच्छा असेल तर मी नवीन यू ट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. चॅनेल च नाव आहे Forever Simplifed. नक्की Subscribe करा. अजून तर नवीन चॅनेल आहे. एक एक करत समजावून सांगणारे व्हिडिओ येतं रहातील. ह्या चॅनेल वर तुम्हाला काही ना काही समजावून सांगणारे व्हिडिओ मिळतील. करून टाका subscribe.
अरे भाई कहना क्या चाहते हो?
सांगायचं इतकचं होतं की चांगल्या गोष्टी वाचा, बघा आणि ऐका ज्या मुळे योग्य ते डोक्यात जाईल आणि पर्सनल ब्रँड च्या नावाखाली ते सगळं काही कुठे तरी नियमित पाठवत रहा. बस्स. इंटरनेट तुमच्यावर इतकं प्रेम करेल ज्या बद्दल कधी विचार केला नसेल तुम्ही.
Follow these 3 Rules
1. Consume Good
2. Filter
3. Publish what you like! :)
शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि चांगलं कन्टेन्ट बघण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.
आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.
आमचं यू ट्यूब चॅनेल subscribe करण्यासाठी इथे क्लिक करा.
Subscribe to Forever Simplified
आणि हो, एक सांगायचं राहील. तुम्हाला जर तुमच्या कुठल्या खास मित्राने हे पत्र पाठवलं आणि हे पत्र वाचून तुम्हाला वाटलं की, "किती सोप्या शब्दात कमीत कमी वेळ घेऊन कसल्या खास गोष्टी समजल्या रे!" माझाव्यापार चे आधीचे पत्र वाचायला मिळतील का? तर ही आहे लिंक इथे तुम्ही जुने पत्र (लेख, आर्टिकल, Newsletter, ब्लॉग) वाचू शकतात.
आणि असे खास लेख कधीही वाचायचे राहू नये म्हणून आमच्या पत्राला Subscribe करा.
0 Comments