।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
स्वागत आहे माझ्या नवीन पत्रात. मागच्या पत्राला एकदम आनंदाने आणि भरभरून रिप्लाय केले म्हणून सगळ्यांचे खूप खूप आभार. मी ज्या दिवशी जरा गडबडीत लिहितो ना तेंव्हाचे तुमचे रिप्लाय बघण्यासारखे असतात आणि वेळ काढून लिहिला की मला एक रिप्लाय येतं नाही.असो.
मी लिहीत राहणारचं आहे. तुम्हीपण वेळ मिळाला की रिप्लाय करत जा. तितकचं आपलं बोलणं होतं. हे पत्र म्हणजे तुमच्या आणि माझ्या गप्पा आहेत. या "तुमच्या" मधे कोण कोण येतं माहिती का? सगळे. माझ्या ओळखीचे सगळे. काही काही जण तर अगदी काल भेटलेले सुद्धा आहेत. पण या पत्राच्या निमित्ताने आपली ओळख वाढते किंवा जी ओळख आहे त्या पेक्षाही छान होते. म्हणून वाचावं आणि रिप्लाय द्यावा.
झालं माझ बोरं करून झालेलं आहे आजच्या विषयाकडे येऊ. आजचा विषय सगळ्यांच्या आवडीचा आहे. काही जणांच्या तर नकळत आवडीचा आहे. तो म्हणजे संगीत / Music. फक्त म्युझिक या विषयावर मी आधी पण एक पत्र लिहिलं आहे ते तुम्ही इथे वाचू शकता. रॅप सॉंग म्हणजे नक्की काय? आजचा विषय आहे Lyric writing and its power म्हणजे गीत लिहिणे आणि त्या मधली ताकद.
सगळ्यात आधी आजचं पत्र हे वाचणं आणि ऐकणं असं दोन्ही असणार आहे. तुम्हाला या पत्रात कुठे ऑडिओ दिसला तर ऐकून बघा. प्ले वर क्लिक करून तुम्ही ऐकू शकता. ही ऐकणं नवीन पद्धत आहे माझी पत्र लिहिण्याची. आवडली तर मला नक्की सांगा.
माझ्या आवडीचे lyrics/गीत कोणते?
हे, ते गाणं होतं जे ऐकून मला वाटलं की मी पण गाणे लिहू शकतो. कारण गाण्याचे बोल होते, "में लड़की पो पो पो, तू लड़का पो पो पो, हम दोनों मिले पो पो पो, अब आगे होगा क्या?" माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की "हे काय गाणं आहे का?असं काहीही लिहिलेलं चालतं तर मग मी पण लिहू शकतो. अर्थ असला पाहिजे असं काही नाही का? काहीही लिहिलं आणि चाल लावली तरी चालतं का?
हे गाणं "हेराफेरी" मधलं आहे. ते चित्रपटाच्या दृष्टीने बरोबर आहे. पण गाण्याचे बोल नावाचा प्रकार असतो हे मला ह्या गाण्यामधून समजलं. ह्या आधी मी गाणे ऐकत होतो, म्हणत होतो तरी कधी कोणी लिहिलं असेल हे गाणं असा विचारच कधी आला नव्हता. हे गाणं का माझ्या आवडीचं आहे, कारण इथून गाण्याचे बोल वाचणे, कोणी लिहिलं ते बघणे, त्या गीतकाराने अजून कोणते कोणते गाणे लिहिले ते वाचणे, स्वतः गाणं लिहून बघणे हे सगळे प्रयत्न सुरु झाले होते. म्हणून पो पो पो माझ्या आवडीचं गाणं आहे. तुम्हीपण खूप दिवसांनी ऐकत असणार हे गाणं तुम्हीपण आज ऐका.
पण खरोखर मनाला भिडलेले गाणं कोणतं?
तसे तर खूप आहेत. एका पत्रात तर सगळे सांगू नाही शकत. आज मी मोजके काही माझ्या आवडीचे गाणे आणि त्यांचे बोल तुम्हाला सांगतो. मी पुढे सांगणार आहे हे बोल पो पो पो सारखे नाही हे चांगले बोल आहेत. न वाचता पळू नका.
खूपदा एक प्रसंग आपल्या समोर येतो. कुठे कार्यक्रम होतो किंवा घरी सगळे भेटतात. तर लहान मुलं येऊन पाय पडतात. हा आपल्या कडे असलेला खूप चांगला संस्कार आहे. पाया पडणे. पण कुठे तरी हाय, हॅलो, व्हाट्स अप हे सगळे पटापट शिकून घेतले आणि पाया कोणी पडायला लागलं की नको नको वाटतं.
पाया पडणे त्याचे फायदे परत हा एक वेगळा विषय आहे तो पण कधीतरी बोलू पण कोणी येऊन नमस्कार केला तर त्याला आशीर्वाद दिला पाहिजे की नाही? किंवा पाया पडणं वगरे सोडा. एकंदरीत आपल्या मनात भावना एखाद्याला आशीर्वाद देणाऱ्याच पाहिजे. अश्या वेळेस, "सुखी रहा, खुश रहा" असं आपण म्हणतो पण माझ्या डोक्यात गाणे चालतात. माझ्या डोक्यात काय येतं सांगू? ह्या पुढच्या गाण्याच्या दोन ओळी ऐका.
सपने जिन में हो ऐसी हो तेरी आँखे ।
प्यार हो जिन में हो ऐसी ही तेरी बातें ।
जिन में उम्मीदे हो ऐसे ही तेरे दीन हो ।
चैन हो जिन में हो ऐसी ही तेरी रातें ।
दरिया दरिया जीवन जीवन, धड़कन धड़कन कहता हे मन,
तू जीते और गम हारे, होते रहे वा रे न्यारे।
👆[AUDIO]👆
आत्ता तुम्ही छोटा ऑडिओ ऐकला असेल. मी इथे वर 👆 दिलेला आहे. तो किती छान संगीत बद्ध केला आहे ऐका. परत परत ऐकावा वाटतो. आणि राहिला प्रश्न अर्थाचा. अजून काय वेगळा आशीर्वाद द्यायचा भेटल्या नंतर कोणाला?
तुझ्या डोळ्यात कायम स्वप्न असू दे,
तुझ्या बोलण्यात नेहमी प्रेमाचे शब्द येउ दे,
रोज काहीतरी नवीन आशा असणारे तुझे दिवस असावे,
आणि इतकी शांतता असावी मनामधे की रात्री छान झोप यावी.
प्रत्येक नदी, दरी, हृदयाचे ठोके हे तुझ्या मनाला एकच म्हणतं आहेत.
आयुष्याच्या स्पर्धेत तू जिंकावा आणि तुझे दुःख हरावे आणि असचं सगळं छान होतं रहावं नेहमीसाठी.
होते रहे वा रे न्यारे, म्हणजे खूप छान होतं रहावं. ही एक हिंदी मधली म्हण आहे. (उदाहरण : इस साल फसल बहुत अच्छी हुई, हमारे वारे न्यारे हो गए।) काय वाटतं तुम्हाला? पुढच्या वेळेस कोणाबद्दल चांगला विचार करताना हे नक्की येणार तुमच्या डोक्यात. आणि मी तर कित्तेक दिवस असं समजत होतो की आशीर्वाद फक्त मोठेच देऊ शकतात लहानांना. पण आशीर्वाद म्हणजे काय, एखाद्याला चांगले जीवन, सुख आणि समृद्धी मिळावी अशी इच्छा व्यक्त करणे.
ही इच्छा व्यक्त करायला तुम्ही मोठेच असले पाहिजे असं काही नाही. मी ही इच्छा माझ्या पत्र वाचणाऱ्या प्रत्येकासाठी करतो. हे सगळे वाचणारे माझ्या पेक्षा लहान किंवा मोठे कोणीही असू शकतात.
आता अजून काही माझ्या आवडीचे गाणे ऐका
आवडीचे गाणे म्हणजे पूर्ण गाणे नाही त्या गाण्यांचे काही बोल. मला माहिती तुम्ही वेळात वेळ काढून माझे पत्र वाचतात मी इतका पण वेळ घेणार नाही. मी आधी ज्या गाण्या बद्दल सांगितलं, ते होतं "गली बॉय" नावाच्या चित्रपटामधलं. चित्रपट म्हणायला वेगळंच वाटतं ना. गली बॉय पिक्चर मधलं होतं. आता बरोबर वाटतं.
आता अजून काही गाणे सांगतो.
एखादं गाणं ऐकलं की मोटिवेशन एकदम भरभरून येतं म्हणतात तसं हे गाणं आहे माझ्यासाठी. इथे खाली त्या बद्दलची माहिती आहे. ऐकून बघा गाण्यातला छोटासा पार्ट.
0 Comments