लगान मधून शिकण्यासारखे लीडरशिपचे गुण - भाग २

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

        स्वागत आहे पुन्हा एका नवीन पत्रामधे. मागच्या पत्राला वेळ काढून रिप्लाय दिल्या बद्दल प्रत्येकाचे आभार. आजचं पत्र म्हणजे मागचं पत्र लगान मधून शिकण्यासारखे लीडरशिपचे गुण चा दुसरा भाग आहे. जर तुम्ही मागचं पत्र वाचलं नसेल तर ते आधी वाचून मग हे पत्र वाचण्यासाठी घ्या म्हणजे लिंक लागेल. 

        मागच्या पत्रात आपण पाहिलं की कसं भुवनला एका प्रॉब्लेम मधे संधी सापडली. प्रत्येकाला तो प्रॉब्लेमच दिसतं होता पण तो एकमेव लीडर होता म्हणून त्याला संधी दिसली. पण आता तर खरा प्रॉब्लेम सुरु झाला. एकाला संधी सापडली असं वाटून कसं चालेल? खूप जण पाहिजे ना ह्याचं मताचे.

निगेटिव्ह बोलणाऱ्यांना मनापासून थँक क्यु म्हणा!

        भुवन अगदी मनापासून सगळ्यांना समजावून सांगतो की अरे ही कसली खास संधी आहे. ३  महीने मेहनत करून क्रिकेट शिकू, त्यांना हरवू आणि मग ३ वर्ष काही कर द्यावा लागणार नाही. असं म्हणाला की गावातला एक जण त्याला म्हणतो, "छोटी छोटी आँखे और बड़े बड़े सपने" म्हणजे मोठी मोठी स्वप्न पाहून उडू नको, जमिनीवर रहा. आणि हे वाक्य ऐकून सगळे तेच बोलायला लागतात. ३  महिने कसले, १ वर्ष प्रॅक्टिस केली तरी शक्य नाही. एक एक करत सगळे ह्या मतावर येतात की आता काही शक्य नाही जिंकणं म्हणून मॅच खेळूचं नये.


        येतात की नाही असे प्रसंग तुम्ही सांगा. आपण काहीतरी करायला निघतो. आपल्याला वाटतं की माझा विचार अगदी बरोबर आहे. आपण तो विचार तीन चार जणांना सांगे पर्यंत, हे करू नको, शक्य नाही, वेळ घालवू नको असे रिप्लाय आलेले असतात. अश्या वेळेस काय होणार? लीडर असो किंवा एक व्यक्ती त्याचं मन सुद्धा जमणार नाही, आपण प्रयत्न सोडून देऊ हे सगळे विचार करायला लागतात. पण भुवन काय करतो? 

आई-बाबा किंवा साई-बाबा!

        भुवन त्या दिवशी त्याच्या आईच्या जवळ बसतो आणि रडत रडत तिला सगळं परत समजावून सांगतो. आपण दुप्पट कर कसा देणार? पण रोज प्रयत्न केले, क्रिकेट शिकलो आणि जिंकलो तर तीन वर्ष कर द्यावा नाही लागणार. मी कुठे चुकतो आहे आई? हे नक्की होऊ शकतं. मला कोणी च समजून घेतं नाहीये. हे सगळं आई सोबत बोलून तो आधी मन मोकळं करतो. 

        त्याची आई फार काही बोलत नाही. इतकंच सांगते की इतका विचार करू नको. होईल सगळं ठीक. पण पुढे काय. आता भुवनला त्याची लहानपणीची मैत्रीण गौरी भेटते. ती त्याला भेटून एकच गोष्ट समजावून सांगते, "बाकी गाव काहीही म्हणू दे भुवन, पण मी तुझ्या सोबत उभी आहे. तुझा विचार बरोबर आहे. मला पटतो आहे. मी जमेल ती मदत करण्यासाठी तयार आहे."

        इथे भुवनला थोडा धीर येतो. आपल्या विचारांना सोबत करण्यासाठी कोणीतरी आहे हे समजून तो खूप खुश होतो आणि आता मी एकटा नाही माझ्यावर विश्वास ठेवणारा कोणीतरी आहे ह्या विचाराने तो पुढचे कामं सुरु करतो. 

        किती साधी आहे ना ही गोष्ट पण किती मोठा इम्पॅक्ट घडवून आणते बघा ना. आपलं मन कोणाकडे तरी मोकळं करणे (मन मोकळं आपण आपल्या घरच्यांसमोर पण करू शकतो किंवा आपल्या आवडीच्या देवासमोर) आणि आपल्यासोबत, आपल्या वर विश्वास ठेवणारा एक जण आहे.  इतकंच जरी समजलं तरी पुढचे पावलं आपोआप पडायला लागतात. ह्याच्यावरून एक गोष्ट मी डोक्यात ठेवली. मी ज्यांना ज्यांना भेटतो त्यांच्या मधे जर मला कोणी मनापासून काम करणारा दिसला ना तर मी त्याला आवर्जून शाब्बासकी देतो.

        आपल्याला रोज लागणाऱ्या कितीतरी अश्या गोष्टी आहेत ज्या साठी आपण पैसे देतो पण त्या पैश्यांच्या बदल्यात येणारी सर्विस ही तितकी चांगली नसते. आपण बरेचदा हे लोकं बरोबर नाही. पैसे खाणारे आहेत. इथे दुसरं काही ऑप्शन नाही असं म्हणून मिळेल ती सर्विस घेऊन बाकी सोडून देतो. पण हे नकळत करता करता जर कोणी कुठलीही सर्विस चांगली देताना दिसला ना त्याला आवर्जून भेटून, "तू चांगलं काम करतो आहेस, असंच करत रहा" हे सांगणं जास्त महत्वाचं आहे. वाईट सर्विसला शिव्या देण्यात पुढे आणि चांगल्या कामाची स्तुती करण्यासाठी १० वेळेस विचार हे कसं जमणार?  म्हणून आज पासून भुवनला धीर देणाऱ्यांपैकी एक जण बनूया हा विचार असू द्यावा. 

 पण आता पुढे सगळ्यांना एकत्र करायचं कसं? 

        इथे भुवन डोकं लावतो. तो एक दिवस भर दुपारी जेवणाच्या वेळेला एक बॅट आणि बॉल घेऊन गावातल्या एका लहान मुलासोबत क्रिकेट खेळणं सुरु करतो आणि जोर जोरात ओरडून ओरडून हे समजावून सांगतो की हे इंग्रज लोकं क्रिकेट म्हणू द्या का काही म्हणू द्या, हा फक्त विट्टी दांडू चा खेळ आहे जो आपण आरामात खेळू शकतो जिंकू शकतो. विट्टी ही चपटी असते आणि बॉल हा गोल बस्स. बाकी सगळं सेम आहे. कॅच घेणे. जोरात बॉल का मारणे. नेम लावून बॉल फेकणे हे सगळं काही सारखं आहे.

        मग एक एक करतं गावातले एक एक जण भुवन सोबत क्रिकेट मॅच खेळण्यासाठी तयार होतात. तो गावातल्या लोकांना त्यांच्या भाषेत समजावून सांगतो. एक एक व्यक्ती त्याच्या त्याच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी लक्षात घेऊन तो ११ जण बरोबर गोळा करतो. मग ती टीम बनते, सगळे मेहनत करतात, मॅच खेळतात आणि जिंकतात. अजून पण खूप साऱ्या अडचणी येतात पण ह्याचं चित्रपटामधल्या एका गाण्यात असं म्हणलं आहे, "सच और साहस हे जिस के मन में, अंत में जीत उसी की रहे." तेच होतं, एक एक करत सगळे प्रॉब्लेम्स संपतात आणि मग कुठे गावातले सगळे जिंकतात.

        सगळ्यांना एकत्र करणं म्हणजे ही फार अवघड गोष्ट. सध्याच्या काळात जिथे प्रत्येक जण सोशल मीडिया वर बिझी आहेत तिथे तर अशक्य वाटतं. पण तरीही काहीजण हे करण्यात यशश्वी होतात. त्यांच्या काही qualities मी पाहिल्या, त्याचा अभ्यास केला आणि मला जाणवलं की काही नियम अगदी सारखे आहेत.

        पहिला नियम म्हणजे चेहऱ्यावर हास्य पाहिजे. आपण रडकं तोंड घेऊन कोणालाही एकत्र करू शकतं नाही. प्रॉब्लेम्स असू द्या, त्याच्या होणार आहे तितका त्रास होऊ द्या, त्यातून बाहेर पाडण्यासाठी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करा पण ह्या मधलं काहीही चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे. 

        दुसरा नियम शक्य तितकं सोप्या पद्धतीने समजावून सांगता आलं पाहिजे. माझ्या समोर टीम आहे त्यांना समजावून सांगण्यासाठी मी अमेरिकेतून बेस्ट ट्रेनींग देणारा एक ट्रेनर बोलावतो हे चांगलंच आहे पण ह्याच्या सोबत टीम ला समजेल अश्या भाषेत बोलणारा सुद्धा कोणीतरी सोबती असावा. म्हणजे गाडी फास्ट पळते. 

        तिसरा नियम आणि सगळ्यात महत्वाचा सोबत १ जण असो का १००० आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. किती लोकं सोबत आहेत ह्याच्या वर मी किती मेहनत लावणार हे ठरवून कधी गोष्टी घडतं नाहीत. आपली मेहनत आपल्या जागेवर ठेवायची.

        असे अजून बरेच नियम आहेत. पण हे तिन्हीही नियम भुवनच्या व्यक्तिरेखेत बघायला मिळतात. जे तुम्हाला मला नेहमी कामाला येतील. तशी ही फिल्म लीडरशीप, टीम बिल्डिंग, गोल सेटिंग, कधीही हार न मानणे, कोणी चूक केली तर त्याला कसं पुन्हा आपल्या मधे मिसळून घेणे, अश्या किती तरी गोष्टी शिकवून जाते.

        तुम्ही पण माझ्या सारखे लगान या चित्रपटाचे फॅन आहात तर तुम्हाला मिळालेल्या काही लर्निंग्स मला कमेंट मधे सांगू शकतात. मी भेटतो तुम्हाला पुढच्या पत्रात.अजून एका नवीन विषयासोबत.

तो पर्यंत सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आवडीच्या फिल्म्स बघण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.🙏🙏🙏

---------------------------------------------------------------------------------

        हे पत्र वाचून जर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलं असेल किंवा तुम्हाला "अरे ह्याची गरज होती रे मला" असं वाटलं असेल तर ही जी छान वाटणारी फिलिंग आहे ना ती स्वतः पुरती का ठेवायची? करून टाका फॉरवर्ड आपल्या काही खास मित्र आणि मैत्रिणींना. पिझ्झा चा शेवटचा त्रिकोणी तुकडा कसा आपण सगळे शेअर करून खातो तसा हा प्रकार आहे. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला असं पत्र वाचून नक्कीच छान वाटेल. 

हे असे छान कमी वेळात वाचता येणारे, माझी वाचनाची आवड हळू हळू वाढवणारे, मला काही तरी शिकवणारे, पत्र प्रत्येक रविवारी मिळावे असं वाटतं असेल तर तुम्ही इथे whatsapp ग्रुप ला जॉईन करू शकता. 👉 Thougts Become Things Whatsapp Update Channel

जर तुम्हाला वाटतं असेल की अरे whatsapp वर फार गर्दी असते आपण शांत पणे कंप्युटर किंवा लॅपटॉप वर वाचूया तर 👉 तुम्ही आमच्या ई-मेल Newsletter ला सबस्क्राईब करू शकता.

    माझं पत्र वाचल्याबद्दल आणि माझे पत्र खूप खूप लोकांपर्यंत पोहचवून माझे अनऑफिशीयल पार्टनर बनल्याबद्दल आपले खूप खूप आभार. भेटूया पुढच्या पत्रात. 😊😊😊










Post a Comment

0 Comments