।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
रविवार ते रविवार आपल्या गप्पा होतं रहाव्यात या उद्देशाने मी काही ना काही नवीन वाचून, ऐकून, विचार करून लिहितं असतो आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नवीन नवीन अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतात. असेच मनमोकळं करून प्रतिसाद देतं रहा. काही आवडलं तर, पटलं तर त्याला उत्तर देण्यामध्ये कधीही वेळ घालवू नये या मताचा मी आहे.
आजचा विषय तो आहे ज्याचा त्रास वरचे वर वाढतं जाणारं आहे. तो त्रास आहे ट्रॅफिक चा. माझ्या शहारत तर मला जागेजागेवर रस्ता वाढवण्यासाठी पाडापाडी आणि कामं सुरु होताना दिसतं आहे. पण हे सगळं होऊन सुद्धा ट्रॅफिक कमी होणार आहे का? माझ्या मते नाही होणार. मग ट्रॅफिक मधे वाया जाणारा वेळ आणि त्या मुळे होणार मनस्ताप कसा कमी करायचा? सोप्प आहे एका युनिव्हर्सिटी मधे ऍडमिशन घ्या, ट्रॅफिक युनिव्हर्सिटी.
वाचायला आळशी मंडळी ह्या पत्राचा सारांश समजावून सांगितलेला हा ६ मिनिटाचा पॉडकास्ट नक्की ऐकू शकता. मला वाचण्यापेक्षा ऐकायला आवडेल. 👈 इथे क्लिक करून ऐका.
ट्रॅफिक युनिव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय?
आपल्या सगळ्यांच्या सोबत एक मित्र दिवस रात्र असतो ज्याला आपण फोन म्हणतो. प्रत्येकाच्या खिशात आज एक वेळ पैसे सापडणार नाही पण फोन असेल. तो फोन वापरायला शिकला तुम्ही की झाले तुम्ही ट्रॅफिक युनिव्हर्सिटी मधे ऍडमिशन घेण्यासाठी तयार.
तुम्ही विचार करा ना. फोन हा आपल्याला एक मेकांसोबत बोलता यावं या उद्देशाने बनवला गेला होता आणि आज त्याच्यावर बोलण्याचं काम किती टक्के आहे? कदाचित बोलणं सोडून बाकी सगळा फोन चा वापर सगळे जण करतात. फोटो काढणे, एडिट करणे, इंटरनेट वापरणे, मेसेज करणे, मॅप्स बघणे, टॉर्च म्हणून वापरणे, गाणे ऐकणे, व्हिडिओ बघणे, पुस्तकं वाचणे आणि बोलणं किती? पाच टक्के बोलणं असेल. पण मी या ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पैकी सगळ्या गोष्टी आपला खूप वेळ घेतात. त्या बनल्याचे त्या साठी आहेत. आपला जास्तीत जास्त वेळ जावा म्हणून. आता या ऍडमिशन साठी एक गोष्ट लक्षात येणं महत्वाचं आहे. आपल्या हातात एक असं डिव्हाईस आहे ज्याच्यावर पाहिजे तितक्या विषयांचं ज्ञान उपलब्ध आहे.
आपण काहीही बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आवडीचे एक एक विषय शिक्षण सुरु करू. वेळ कशाला वाया घालवायचा तो आवडीचं शिकण्यात घालवू. झालं इथे तुम्ही ट्रॅफिक युनिव्हर्सिटी साठी इलिजिबल म्हणजेच प्रवेश घेण्यासाठी पात्र झाले. वेळ खूप जातो तो चांगल्या ठिकाणी वापरू असं वाटतं नसेल तर इथे ऍडमिशन घेऊ नका.
चल, घेतली ऍडमिशन पुढे काय?
बाकीच्या यूनिवर्सिटी सारखी इथली फी वेगळी आहे. The only thing you have to pay here is your Attention. इथे फक्त लक्ष देण्याची गरज आहे. बाकी कुठलीही फी लागतं नाही. इंटरनेट लागेल, मोबाईल लागेल हे सांगायला जावं तर तुम्ही सगळे जण इतकेच स्मार्ट आहात तुमच्या कडे ते आधीपासून आहे. आता गरज आहे फक्त डिस्टर्ब करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांना शांत करण्याची.
ह्या डिस्टर्ब करण्याऱ्या गोष्टी कश्या शांत करायच्या मी त्याचाही मार्ग सांगेल. पत्राच्या शेवटी सांगेल. पण तुम्ही ऍडमिशन घेण्याचं ठरवलं का? तुमचा विषय ठरवा. काय शिकायचं आहे? जो विषय ठरवणार त्याचे फ्री आणि अगदी थोडे पैसे भरून सुद्धा कोर्सेस उपलब्धआहेत. ते शोधा एकत्र करा आणि जेंव्हा जेंव्हा ट्राफिक मधे वेळ जाताना तुम्ही चिडचिड सुरु होईल ती बंद करून आधी आपला सिलॅबस पूर्ण करा.
तुम्हाला उदाहरणं देतो. तुम्हाला चरक संहिता बद्दल माहिती घेण्याची इच्छा आहे का? यू ट्यूब वर Dr Anant Dharmadhikari हे नाव सर्च करा. चरक संहिता ह्या विषयाला धरून त्यांची यू ट्यूब वर एक प्लेलिस्ट आहेत त्याच्या मधे १४५ व्हिडिओ आहेत, प्रत्येक व्हिडिओ जवळपास एक तासाचा आहे. तुम्हीच मोजा. किती तास झाले? किती तसंच शिक्षण उपलब्ध आहे?
बरं आपले ग्रंथ आणि बाकीचं बाजूला ठेऊया. AI कोर्सेस इतकं फक्त टाकून बघा यू ट्यूब वर. मोजू शकणारं नाही इतके कोर्सेस आहेत. पैसे भरून करू शकता ते वेगळेचं. आता असा प्रश्न येऊ शकतो की सगळे कोर्स चांगले नसतात. बरोबर आहे नसतील चांगले पण आज जर आपण एका विषयात शून्य आहोत तर एक वर तरी जाण्यासाठी पुरेसं आहे. पुढचा रस्ता पावलं टाकतं गेले आपोआप दिसतं जातो. काय नाही ह्या युनिव्हर्सिटी मधे तुम्ही बघा. पण शिकण्याची इच्छा नसेल ना तर ह्या पैकी कुठलाही कोर्स तुम्हाला समजणार नाही हे नक्की.
ट्रॅफिक नेमकी कोणती?
आता ट्रॅफिक युनिव्हर्सिटी म्हणलं की आपल्याला फक्त रस्ता, गाड्या, ट्रॅफिक जॅम, धूळ, पाऊस हेचं आठवतं. मी इथे ट्रॅफिक शब्द हा मनात असलेल्या गोंधळा बद्दल वापरतो आहे. बाहेरची सोडा मनात कसली ट्रॅफिक झालेली आहे आज आणि म्हणूनच गाडी कुठेच पोहचू शकतं नाही. ती ट्रॅफिक कमी करायची असेल तर आपले आवडीचे विषय निवडा आणि रोज बाकी कुठेही स्क्रोल करतं वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आवडीच्या विषयाला द्या ना रोजचे २ तास. तुमच्या स्वतःचा कामात जेंव्हा कमालीची प्रगती दिसेल तेंव्हा माझी आठवण आली तर Thank You म्हणण्यासाठी भेटा इतकी मोठी आणि आयुष्य बदलून टाकणारी सवय आहे ही.
विषय सांगू कुठले कुठले महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांसाठी? इंग्रजी शिका, चित्रकला शिका, म्युझिक शिका, लिहिणं शिका, AI शिका, आपले सगळे ग्रंथ ४ वेगवेगळ्या लोकांकडून ऐका, मार्केटिंग शिका, बिझनेस शिका, काय पाहिजे ते शिका. फक्त एका युनिव्हर्सिटी मधे ट्रॅफिक युनिव्हर्सिटी. ऍडमिशन ओपन आत्ता पासून नेहमीसाठी.
एक आयडियाची कल्पना : मोबाईल वर कमीत कमी डिस्ट्रॅक्शन पाहिजे आहेत का? दोन कामं करा. सगळे नोटीफिएकेशन बंद करा. फोन ने तुम्हाला फोन कधी उचलायचा हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः ठरवा कधी बघायचा ते आणि दुसरं यू ट्यूब वापरताना ब्रेव्ह नावाचं App वापरा. यू ट्यूब वर कधीही कुठलाही व्हिडिओ बघताना एकही जाहिरात येणार नाही.
एक नवीन उपक्रम
मी फार सोप्प्या भाषेत सांगतो असं प्रत्येकाकडून ऐकून ऐकून मी हे खरं आहे का हे बघण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक आठवड्यात शनिवारी रात्री ८ वाजता मी माझ्या ओळखीच्या लहान मुलांसोबत गप्पा, गोष्टी, कविता, पत्र, ओव्या, श्लोक असं सगळं काही बोलणार आहे. जर लहान मुलांनी एन्जॉय केला तर खरंच मला सोप्प्या भाषेत सांगता येतं हे मी मान्य करेल आणि जर ते कंटाळले (जे होणं शक्य नाही) तर मी सोप्प्या भाषेत समजावून सांगण्यावर अजून काम करेन. हा संवाद मी झूम मिटिंग द्वारे घेणार आहे. ४५ मिनिटांसाठी. इथे छोटे मुलं अपेक्षीत आहेत. पण कोणीही स्वतःला छोटं समजून येण्याची इच्छा दाखवली तर त्याचं स्वागतचं आहे. कोणाला आवडतं नाहीत गोष्टी आणि कविता?
जो हा वाचणारा आहे त्याने ठरवावं तो मोठा आहे का छोटा ते आणि तुमच्या घरातल्या कुठल्याही लहान मुलाला येणाची इच्छा असेल तर तुम्ही इथे ह्या लिंक वर तुमचं नाव नोंदवू शकता. ही आहे रजिस्ट्रेशन लिंक. भेटूया पुढच्या पत्रात आणि जर झूम मिटिंग ला आलात तर रविवारी ३ ऑगस्ट ला रात्री ८ वाजता.
मला आणि माझ्या ओळखीच्या काही मुलांना या कॉल ला येण्याची इच्छा आहे.
👆इथे क्लिक करून तुम्ही रजिस्टर होऊ शकता👆
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि ट्रॅफिक युनिव्हर्सिटी च्या अभ्यासात व्यस्थ रहा. धन्यवाद.
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.
0 Comments