।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
स्वागत आहे नवीन पत्रात. आजच्या पत्रात गप्पा तर आहेचं पण मला महत्वाचं एका कॉल बद्दल सांगायचं आहे. मी सांगितलं होतं ना दोन आठवड्या पूर्वी की मी लहान मुलांसोबत प्रत्येक रविवारी गप्पा मारणार म्हणून. त्या गप्पा सुरु झालेल्या आहेत. अजून माहिती शेवटी सांगतो.
आणि हो मागच्या पत्राला आपले सगळ्यांचे छान रिप्लाय आले. करत जा रिप्लाय. गप्पा मारण्याचा फील येतो. तितकंच आपलं बोलणं होतं. आजचा विषय आहे नमस्कार करण्या बद्दल. लेट्स गो!
नमस्कार करणं ओल्ड फॅशन वाटतं का?
तुम्हाला वाटतं का ओल्ड फॅशन? भारतींयांमध्ये नमस्कार करणे हा एक छान संस्कार पूर्वीपासून आहे. आपण खास दिवसांना आपल्या पेक्षा मोठ्या लोकांना नमस्कार करण्यावर विश्वास ठेवतो. देवाला तर रोजचं नमस्कार करतो पण घरातल्या मोठ्या मंडळींना नमस्कार आणि मग ते आपल्याला आशीर्वाद देतात अशी खूप जुनी पद्धत आहे.
आता नमस्कार का? त्याचे फायदे काय? विज्ञानाच्या दृष्टीने फायदे काय? असे कितीतरी विषय घेऊन आपण गप्पा मारू शकतो. पण हे विषय आज नको. मी पाहिलेलं, अनुभवलेलं सांगतो. जर घरात कार्यक्रम असेल तर आपण प्रत्येकाच्या पाया पडतो आणि मोठे आपल्याला आशीर्वाद देतात. पण जे वयाने खूप मोठे नसतात ना ते पाया पडूच देतं नाहीत. "अरे नको रे, माझ्या काय पाया पडतो." असे काही वाक्य होतात आणि ती क्रिया मधेच थांबवली जाते.
हे काही माझ्या घरातलं नाही. खूप ठिकाणी मी पाहिलं आहे. जे वयाने खूप मोठे नसतात कदाचित त्यांना आपण काय इतके मोठे झालो का की कोणी आपल्या पाया पडेल, कदाचित असं वाटतं किंवा हे सगळं म्हाताऱ्या लोकांचे कामं आहे ते, मी अजून तरुण आहे. माझ्या नको पाया पडू. असंही असू शकतं. चुकीचं काहीच नाही. दोन्ही बरोबर आहे. (अरे दोनों सही है तो फिर कहना क्या चाहते हो?)
आशीर्वाद देणे म्हणजे नेमकं काय?
मी तर कित्येक दिवस असं समजत होतो की आशीर्वाद फक्त मोठेच देऊ शकतात लहानांना. पण आशीर्वाद म्हणजे, एखाद्याला चांगले जीवन, सुख आणि समृद्धी मिळावी अशी इच्छा व्यक्त करणे. अशी इच्छा देवाकडे, निसर्गाकडे व्यक्त करणे म्हणजे आशीर्वाद देणे. (आपण सोप्पा अर्थ घेऊन पुढे जाऊया.)
आता एखाद्याला चांगलं, सुखी आणि समृद्ध जीवन मिळावं म्हणून इच्छा तर कोणीही व्यक्त करू शकतो. त्याच्यासाठी मी मोठाच असलो पाहिजे हा तर काही नियम बरोबर नाही. मन मोठं असावं लागतं तितकं आहे पण वयाची अट नाही. मी तर ही इच्छा माझ्या पत्र वाचणाऱ्या प्रत्येकासाठी करतो. हे सगळे वाचणारे माझ्या पेक्षा लहान किंवा मोठे कोणीही असू शकतात. म्हणजे मी तर एका अर्थाने माझ्या सगळ्या वाचकांना रविवारी आशीर्वादच देतो.
आधी काय व्हायचं, कोणी नमस्कार करायला आला की मी टुन्न कर उडी मारायचो आणि तेच परत सगळे डायलॉग, "अरे मी तर लहान आहे रे. तू पाया कुठे पडतो आपण मस्त गळा मिठी घेऊ." वगरे वगरे. पण मी एक अनुभवलं हे असले विचार, "गुड मॉर्निंग, आय ब्लेस यु, गॉड ब्लेस यू, मोर पॉवर टू यू," असे इंग्रजी मधून आशीर्वाद देताना येतं नाहीत.
पॉईंट इतकाच आहे की प्रत्येकाने मला येऊन नमस्कार करावा अशी भावना मनात असू नये. अशी भावना नसतानाही जर कोणी पाया पडायला आले तर टुन्नकन उडी मारून नको नको करू नये. मी कोण फार मोठा झालो का आशीर्वाद देण्यासाठी असं वाटतं असेल तर "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" इतकं म्हणा. हे सुद्धा पुरेसं आहे. पण आपली संस्कृती नको नको आणि बाहेरची संस्कृती विचार न करता लगेच वापरणं आणि त्या ही पुढे नमस्कार करायची गरज नाही असं वाटणं म्हणजे चुकतं आहे की नाही. तुम्हीच विचार करून बघा.
छान नमस्कार करून घ्यावा आणि त्याला छान आशीर्वाद द्यावा. आपली संस्कृती छान टिकवावी मोठी करावी.
तुम्ही पण येणार का कॉल ला?
रविवारी चाळीस मिनिटं गप्पा मारणे हा नवीन उपक्रम सुरु झालेला आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मी लिंक देतो पण तुम्ही आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांनी का या कॉल मधे यावं सांगू का? हा कॉल फुकट आहे म्हणून. जिथे जिथे पैसे येणार तिथे तिथे बिझनेस येणार नाही ज्या मुळे बिझनेस होईल, ज्या मुळे पैसे कमवता येईल अशा गोष्टी तुम्हाला शक्य तितक्या पद्धतीने पटवून हा प्रॉडक्ट, ही सर्विस, हे पुस्तक, हा कोर्स, हे कॉलेज कसं तुम्ही ते लवकरात लवकर विकत घेणार ते बघितलं जातं.
मी तर फुकट बोलणारं आहे, तर मला काही विकायचं नाही, ना काही पटवून द्यायचं आहे. मी फक्त मला काही आवडलेल्या गोष्टी, कविता, शॉर्ट फिल्म्स, गाणे, गीत (Lyrics), डान्स, पुस्तकं, ग्रंथ, ओव्या, श्लोक सांगणारं. तुम्हाला पण आवडलं तर परत परत ऐका आणि बघा. चांगल्या आणि फुकट उपलबद्ध असणाऱ्या उपयोगी गोष्टी तुमच्या पर्यन्त पोहचवण्याचं काम हा कॉल करणारं आहे.
भेटूया आज रात्री ८ वाजता झूम मिटिंग द्वारे. रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ही आहे लिंक.
Click here if you want to register for a Zoom Meeting
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.
3 Comments
आशीर्वाद अजू 🙌
ReplyDeleteखूप मोठा प्रश्न होता माझा हा....
ReplyDeleteआशीर्वाद देणे पेक्षा कोणी पाया पडणे हे च नको वाटते .
पण, बऱ्या पैकी विचारला दिशा दिली .
अजिंक्य, तुस्सी ग्रेट 👍
"आशिर्वादाकडे " पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला...👌🙌
ReplyDeleteआणि सोबत पत्रातून आशीर्वादही मिळाला🙏🙏👌
खूपच सुंदर !!!