FEARचा नेमका अर्थ काय?

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        स्वागत आहे पुन्हा एका नवीन पत्रात. आपली भेट रविवार ते रविवार अशीच मस्त होतं रहावी. मागच्या रविवारचे प्रत्येकाचे रिप्लाय खूप छान होते. कोणी घरी वाचून दाखवतात माझे पत्र, कोणी आपल्या आजीला, आईला. मस्त. वाचण्यासारखं आणि एखाद्याला वाचायला देण्यासारखं मी लिहितो आहे हा फार मोठा आनंद आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. 

        आज बोलूया घाबरण्याबद्दल. वाटते की नाही भीती आपल्या सगळ्यांना? बोलूया काय करावं ह्या भीतीच. लेट्स गो!

पहिला नंबर कसा काय आला?

            मी सुरवात एका गोष्टीने करतो. मागच्याच काही आठवड्यांपूर्वी गणपती उत्सव संपला. ह्या गणपती उत्सवाची एक खासियत म्हणजे स्पर्धा. वेगवेगळ्या स्पर्धा होतं असतात. तर एका सोसायटी मधे पळण्याची स्पर्धा होती. सगळे उत्साहात तयार झाले. या वर्षी स्पर्धा लहान मुलांपासून ते मोठ्यांची सगळ्यांची ठेवली होती. सगळे लहान मुलं आपले बाबा जिंकतात का ते बघण्यासाठी थांबले होते. 

        सगळे मोठे काका लोकं रांगेत पळण्यासाठी उभे राहिले. थ्री, टू, वन गो असं म्हणून पळण्याची सुरवात झाली. सगळे काका जीव तोडून पळत होते. पण मांडे काका रेस साठी उभे पण नव्हते. ते मागून पळत आले आणि सगळ्यांच्या आधी फिनिश लाईन वर पोहोचले. सगळी लहान मुलं परेशान. "अरे असे कसे मांडे काका पळाले? कधी जास्त हलताना दिसतं नाहीत. सारखे पाय दुखतात, पाठ दुखते म्हणणारे काका आज सगळ्यांच्या मागून पळणं सुरु करून सुद्धा पहिले आले? वा." "काका काका सांगा ना. आज कसे काय तुमच्यात इतकी शक्ती आली?" सगळे मुलं त्यांच्या मागे. 

        मांडे नेहमीप्रमाणे पोरांवर खेकसले आणि म्हणाले, "गाढवांनो, मी पहिला आलो च काय कौतुक? त्या जोश्यांच्या कुत्र्याला कोण बांधून ठेवणार? ते मागे लागलं होतं माझ्या म्हणून इतका फास्ट पुढे पळालो. बघतोच त्या जोश्याला." 

कळालं कसा आला पहिला नंबर?

        पाय दुखी, पाठ दुखी सगळी कुत्रा मागे लागला च्या भीतीच्या पुढे आठवलीच नाही. काकांचा डायरेक्ट पहिला नंबर. भीती हा जो काही प्रकार आहे आपल्या भावनांचा त्याला आपण फार कमी लेखतो. त्याच्या इतकं मोठं मोटिवेशन कशा मधूनच नाही मिळणार अशी असते भीती. काही प्रमाणात आयुष्यात असलीही पाहिजे. आपणच कुठे तरी कंफर्ट आणि शांत झोप निवडतो. 

        हा विषय मी का घेतला आणि हा एक स्पर्धेचा अनुभव मी का सांगितला कारण आज रात्री मी लहान मुलांसोबत गप्पा मारतो ना त्यांना मी विंदा करंदीकरांची पिशी मावशी आणि तिची भुतावळ नावाच्या पुस्तकामधली एक भुताची कविता ऐकवणार आहे. या भीतीला कसं जिंकावं ते पण मी त्यांच्या सोबत बोलणारं आहे. तुमच्या ही घरी लहान मुलं असतील ज्यांना गोष्टी, कविता, गाणे, श्लोक सांगणारा दादा माहिती नसेल तर तुम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन करून प्रत्येक रविवार ०८.०० वाजता कॉल ला नक्की येऊ शकता. 

    ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांच्या साठी हा कॉल फुकट आहे. ही आहे रजिस्ट्रेशन लिंक. 

Click here to Register Yourself for the 08.00 PM call!

शेवटी मला म्हणायचं काय आहे!

        भीती म्हणजेच इंग्लिश मधे FEAR ह्याचे खूप अर्थ तुम्हाला सापडतील. भीती या भावनेची ताकद समजलीच नाही तर त्याचा अर्थ असेल Forgot Everything and Run (सगळं विसरा आणि पळा) पण ज्याला हा अर्थ समजला तो म्हणतो Face Everything and Rise (जे समोर येईल त्याचा सामना करा आणि मोठे व्हा.) 

              भीतीला तोंड देणं ह्याच्यावर आपण काहीही करू शकत नाही. ही भीती जन्मापासून आपल्या सोबत असते, एक नाही तर दुसरी पण ती नेहमी आपल्याला कुठल्या न कुठल्या रूपाने भेटत रहाते. ती समोर आल्यावर न घाबरता, हृदयाचे ठोके न वाढवता, ब्लड प्रेशर न बदलता, शांत डोक्याने, आत्मविश्वासाने हिताचं उत्तर देता आलं की समजा तुम्ही भीतीला जिंकले आहे म्हणून. भितीला जिंकायच आहे का मग घाबरलेले असताना, भिती वाटतं असतांनाही जे योग्य आहे ते काम करत रहा.

समर्थ तर एका श्लोकात इतकचं छान सांगतात. तुम्हीच वाचा मनाचा श्लोक नंबर २७.

भवाच्या भवे काय भीतोसी लंडी ।

धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥

रघूनायका सारिखा स्वामि शीरी ।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥

        समर्थ म्हणतात काय घाबरतोस भेकडा सारखा. रघूनायका सारखा स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे तो कधीही तुला सोडून जाणार नाही. नेहमी तुझी रक्षा करेल.

        तुम्ही तुमची भीती शोधा नेमकी कुठली आहे? पाण्याची, उंचीची, वेगाची, प्राण्यांची, लोकांची, अपयशाची, यशाची, इंग्लिश ची, टेकनॉलॉजि ची, लोकांसमोर बोलण्याची, लोक मला काय म्हणतील ह्या बद्दलची? कुठीलीही भीती असो. ती शोधा आणि त्या भीतीचा रोज थोडा थोडा वेळ सामना करा. त्या भीतीला दूर करण्यामध्ये तुम्हाला नक्की यश येईल. 

        तुम्हाला ही कॉल ला येण्याची इच्छा असेल तर येऊ शकता. लहान मुलांनाच कॉल आहे मी काय करू येऊन असा विचार करू नका. तुमच्या मधे पण लहान मुलं आहेच की! त्याने काय पाप केलं? इच्छा असेल तर रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन झाले की ई-मेल वर whatsapp ग्रुप ची लिंक मिळेल, ई-मेल वर आणि whatsapp ग्रुप दोन्ही मधे तुम्हाला झूम कॉल ची लिंक रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता मिळेल. कॉल ८.०० ते ८.४५ असेल. 

Click here to Register Yourself for the 08.00 PM call!

          भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या भितीला जिंकण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.  

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा




Post a Comment

0 Comments