Doubt is a part of Creative Process!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

            मागच्या काही आठवड्यात आपण उत्तम गुण घ्यावे, त्या गुणांची प्रॅक्टिस करावी म्हणेज ते गुण सरावात ठेवावे असं २-३ वेगवेगळ्या पत्रात बोललो. पण कितीही उत्तम गुण शिका डाउट, शंका जो पर्यंत जातं नाही तो पर्यंत पाहिजे तसा रिझल्ट मिळणं अवघड आहे. 

     आजच्या पत्रात मी कथा सांगणार आहे एका व्यक्तीची आणि शंके मुळे त्याच्या सोबत झालं हे सांगणारी. But I really doubt तुम्ही हे पत्र पूर्ण वाचणार का? सोडा डाउट ला बाजूला ठेवू आणि गप्पा मारू. लेट्स गो!

तुमचं वजन आहे ८० आणि..... 

        ही कथा आहे अक्षय कुमार ची. अक्षय कुमारला खूप वर्षानंतर सुट्टया मिळाल्या होत्या. तो एका ट्रिप ला जाण्यासाठी इतक्या वर्षांपासून वाट बघत होता की काय सांगावं. पण ऑफिसचे काम आणि सुट्टया सगळं मॅनेज करत करतं शेवटी खूप वर्षांनंतर ट्रिपचा दिवस आला. ट्रेनची वेळ होती सकाळी ८ ची पण अक्षय सकाळी ५ वाजेपासून स्टेशन वर जाऊन उभा राहिला. ट्रेन सुटू नये म्हणून तो अती उत्साहात होता. आता इतक्या लवकर येऊन करावं काय म्हणून स्टेशन वर इकडे तिकडे बघणं सुरू झालं. अक्षय कुमारला दिसला एक वजन काटा, त्याने विचार केला चला वेळ घालवू या. 

   वजन काट्यावर उभा राहून त्याने एक कॉइन टाकला तर एक चिठ्ठी बाहेर आली. त्यावर लिहिलं होतं "तुमचं नाव अक्षय कुमार आहे, तुमचं वजन ८० आहे आणि ८ ला तुमची ट्रेन आहे." त्याला शंका आली की या मशीनला कसं काय माझं नाव आणि ट्रेनची वेळ माहिती? काहीतरी गडबड आहे. एका शंके मुळे सहज वजन करायला गेलेला अक्षय आता नको त्या गोष्टीत अडकायला लागला. त्याने शक्य तितके दिसण्या मधे बदल केले आणि पुन्हा पुन्हा वजन केलं पण मेसेज तर येतचं होता. हा प्रयत्न त्याने जवळ जवळ अर्धा तास केला पण मेसेज काही बदलत नव्हता. आता त्याने ठरवलं आणि स्टेशन च्या बाहेर जाऊन तोंडाला काळ लावून असा काही अवतार करू की स्वतःला आरशात पाहिलं तरी ओळखू आलं नाही पाहिजे. सगळी तयारी करून तो पुन्हा एकदा वजन करायला आला आणि या वेळेस मेसेज आला "तुमचं नाव अक्षय कुमार आहे, तुमचं वजन ८० आहे आणि ८ ची तुमची ट्रेन गेली."

      एका शंकेवर दुसरी शंका करत करत ट्रेनच्या वेळेच्याही पुढे तो कसा गेला त्यालाही समजलं नाही. आता तुम्हीच सांगा काहीही गरज होती का वजन करून नको तिथे डोकं लावायची? गाडीच्या अर्धा तास आधी आलो तरी सगळं काही वेळेवर होऊ शकतं. पण पहिली शंका गाडी लवकर आली तर? दुसरी शंका मला उशीर झाला तर? तिसरी शंका वजन काट्या ला माझं नावं कसं समजलं? असं करतं करतं जे अगदी सहज होणारं होतं ते होऊ शकलं नाही आणि जे नको होतं तेचं नेमकं झालं. 

शंका मधे आली की उत्तर एकच....

      मला माझे एक बिझनेसचे सिनियर होते ते नेहमी सांगायचे अजिंक्य गणितामधे १ % x ९९% म्हणजे ९९% असं उत्तर येतं पण मी तुला विचारलं  १% शंका x ९९% आत्मविश्वास याचं उत्तर काय, तर ते उत्तर आहे शून्य. गणिताच्या नियमाने चुकीच जरी असलं तरी आयुष्यात काहीही मिळवताना हेच "शून्य" उत्तरच बरोबर आहे. 

     काहीही मिळवायची इच्छा असेल तर त्याच्या बद्दलचा आत्मविश्वास, धडपड, मेहनत, अभ्यास, सातत्य सगळं १००%च लागतं. तुम्ही असं म्हणून नाही चालत की "मी प्रयत्न शंभर टक्के करतो बघू झालं तर झालं." "मी केले आहेत १००% प्रयत्न पण होईल का नाही शंका आहे" म्हणजेच प्रयत्न पूर्ण झालेले नाही हे तुम्हाला ही माहिती आहे किंवा १००% प्रयत्न करून सुद्धा मनात शंका असणे हे पण पूर्ण प्रयत्न न करण्याचं लक्षण आहे. 

हाच कन्सेप्ट समर्थ आपल्याला कसे सांगतात

        समर्थांच्या एका ओवी मधे ते म्हणतात


अचुक येत्न करवेना ⁠। म्हणौन केलें तें सजेना ⁠।

आपला अवगुण जाणवेना ⁠। कांहीं केल्यां ⁠।⁠।⁠ ६ ⁠।⁠।


        निसर्गाचा नियम आहे तो. जे आपण देतो तेच वापस मिळतं असतं. Every action has equal and Opposite reaction. "प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते" मग तुम्हाला काय वाटतं "बघू प्रयत्न केले आहेत. काय माहित हॊईल का नाही ते!" असा विचार कामासोबत केल्यावर रिझल्ट काय असणार?

कळेना कळेना कळेना, ढळेना ।

ढळे, नाढळे, संशयो ही ढळेना ॥

गळेना गळेना अहंता गळेना ।

बळें आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२ ॥

        या एका मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात काही कळायला मार्ग नाही की या मनामधून संशय का जातं नाही? काही कळेना अहंकार का जातं नाही? पण शेवटी मला काय वाटतं सांगू का? जो पर्यन्त बुद्धी सोबत भावना, तर्काला एखाद्या महान व्यक्तींच्या अनुभवातून मान्यता आणि आपल्या विचारांना विश्वासाचं पाठबळ जो पर्यन्त जोडलं जातं नाही तो पर्यन्त सत्य, हित असे मोठे मोठे विषय समजणं शक्य नाही. 

        बुद्धी, तर्क आणि स्वतःचे विचार या तीन गोष्टींवरही प्रयोग करून करून शेवटी उत्तर न मिळणारे खूप आहेत. म्हणून मी जे कनेक्शन लावलं ना बुद्धी सोबत भावना, तर्काबरोबर मोठ्या व्यक्तींची मान्यता आणि विचारांबरोबर आत्मविश्वास हे कनेक्शन बरोबर लावून देणारी जी शक्ती आहे ना आपल्या पेक्षा मोठी तिच्यावर विश्वास ठेऊन शंका सोडून देऊन आपलं आपलं काम करायला पाहिजे. 

        मग आज पासून आपण सगळे प्रयत्न करूया. ती मोठी शक्ती आहे ना, तिच्या वर विश्वास ठेऊन शंका सोडून देऊन जगूया. भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि शंका सोडून जगण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद!

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.








Post a Comment

0 Comments