।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
मागच्या आठवड्यात आपण मस्त गप्पा मारल्या की आधुनिक self-help पुस्तकांमधले बरेच concepts समर्थांनी 400 वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहेत.
या आठवड्यापासून आपण ती सिरीज पुढे नेऊया. पुढचे ७ रविवार — ७ इंग्रजी बेस्ट-सेलर्स आणि त्यांचे concepts — आपण दासबोध मधून शोधणार आहोत.
मागच्या पत्राला भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आज समजून घेऊया Ryan Holiday यांच्या Ego Is The Enemy या पुस्तकातील शिकवण आणि समर्थ रामदासांनी त्याच गोष्टी किती सुंदररीत्या आधीच सांगितल्या आहेत.
आजच्या पत्रात —
Ryan Holiday आणि Stephen Covey भेटतात आणि समर्थांच्या शिकवणींवर चर्चा करतात!
त्यांच्या गप्पांमधून काय काय समजतं ते बघूया. Let’s go!
आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावं असं वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.
जुने सगळे पत्र वाचायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. Thoughts Become Things.
⭐ Ego Is The Enemy
सुरुवातीला Ryan Holiday यांची थोडी ओळख करून घेऊया.
Ryan Holiday हे आधुनिक काळातील सर्वात लोकप्रिय Stoic philosophy लेखकांपैकी एक आहेत.
Stoicism म्हणजे ग्रीक–रोमन तत्त्वज्ञान ज्यात भावनांवर नियंत्रण, adversity मधील शांतता आणि विवेकशीलता यावर भर असतो.
Stoic लेखक म्हणजे हे प्राचीन तत्त्वज्ञान आधुनिक जीवनात कसं लागू करावं हे सोप्या भाषेत सांगणारे लेखक.
Ryan Holiday हे त्यातील सर्वात प्रसिद्ध लेखक.
मजेशीर गोष्ट म्हणजे —
Stoicism आणि भारतीय तत्त्वज्ञान (गीता, दासबोध, योगशास्त्र) यांच्यात खूप साम्य आहे!
पण हा विषय आपण वेगळ्या दिवशी घेऊ.
Ryan Holiday यांचं Ego Is The Enemy हे पुस्तक जगभरात super-hit आहे. तीसपेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध.
हे पुस्तक इतकं भिडतं कारण आधुनिक माणसाचा सर्वात मोठा अडथळा एकच — EGO.
Ego मुळे लोक “मी महान आहे!” असं समजतात
आणि त्यामुळे शिकणं बंद होतं.
⭐ Ryan Holiday आणि Stephen Covey यांची भेट (कल्पनारम्य संवाद)
एकदा काय झालं —
Ryan Holiday हे सुट्टीवर होते आणि त्यांनी त्यांचे लेखक-मित्र Stephen Covey यांना भेट दिली.
Stephen Covey म्हणाले:
“अरे समर्थ रामदासांचे पुस्तकं वाचण्यासारखे आहेत रे. त्यांनी मला असं काही सांगितलं की मी एक पुस्तकं लिहायला घेतलं आहे.”
Ryan Holiday म्हणाले:
“माझ्या डोक्यात पण एक कल्पना चालूच आहे. लोकांच्या मनात जो इगो असतो ना त्या वर लिहावं म्हणतो आहे. लोक कसे आहेत माहीत का? शिकलेले, छान बोलणारे… पण मनामध्ये इतका इगो!
मी मोठा… माझं म्हणणंच बरोबर… दुसऱ्यांना नावं ठेवणं… आणि राग आला तर काही केल्या आवरत नाही! ही चूक समजली पाहिजे रे स्टीफन.”
Stephen Covey हसत म्हणाले:
“अरे तू ‘पढतमूर्ख’ नावाचा समास वाचला आहे का?
समर्थांनी अगदी नेमकं हेच समजावलं आहे. Modern भाषेत त्याला आपण म्हणू शकतो — Educated Fool —
ज्यांना सगळं माहीत असतं पण कृती शून्य.
तू हा समास वाचून बघ, तूला तुझं अर्धं पुस्तक तयार झाल्यासारखं वाटेल!”
Ryan Holiday यांनी समास वाचला…
आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुस्तक लिहायला सुरुवात केली —
Ego Is The Enemy.
समर्थांची ओवी आणि Ryan Holiday यांच्या संकल्पना
१) ओवी:
बहुश्रुत आणी वित्पन्न । प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान ।
दुराशा आणी अभिमान । धरी तो येक पढतमूर्ख ।। ३ ।।
समर्थ सांगतात:
विद्वान, विद्या, मोठं ज्ञान… पण मनात अभिमान असेल — तो पढतमूर्ख.
Ryan Holiday म्हणतात:
“Ego stops learning.”
२) ओवी:
आपलेन ज्ञातेपणें । सकळांस शब्द ठेवणें ।
प्राणीमात्रांचें पाहे उणें । तो येक पढतमूर्ख ।। ५ ।।
समर्थ सांगतात:
मी knowledgeable आहे म्हणून इतरांना कमी लेखणं, दोषच पाहणं —
ह्याला सुद्धा पढत मूर्ख म्हणतात.
Ryan Holiday म्हणतात:
“Ego makes you blind.”
Ego इतरांचे दोष दाखवतो, आपले नाही.
३) ओवी:
जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे ।
क्रिया शब्दास अंतरे । तो येक पढतमूर्ख ।। १० ।।
समर्थ सांगतात:
स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत, असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच, तो पढतमूर्ख असतो.
Ryan Holiday त्यांच्या ASPIRE section मध्ये सांगतात:
- Ego makes people create big stories in their head
- Ego makes them fantasize about success
- Ego makes them talk instead of act
त्यांचं प्रसिद्ध वाक्य:
“We substitute talking for doing — and this is one of the worst forms of ego.”
समर्थ म्हणतात:
“क्रिया शब्दास अंतरे”
(अर्थात् कथनी आणि करणी मध्ये फरक.)
⭐ मग समर्थांनी मूर्खांची लक्षणें का सांगितली?
कारण एकचं जे समर्थांनी सांगितलं पण आहे. सोडून द्यावी म्हणून मी लिहितो आहे.
👉 जे मिळवायचं आहे त्यासाठी काय करणं आवश्यक आहे, याची यादी आपण करतो.
👉 पण काय सोडावं लागतं — याची यादी आपल्याकडे नसते.
आणि ही “सोडून द्यायची यादी” म्हणजे हा समास.
ते एवढंच सांगतात:
**त्याग करावा म्हणून लिहिले आहेत.**
मी आज खाली संपूर्ण समास जोडला आहे.
निश्चित वेळ काढून वाचा. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील.
इथे क्लिक करून तुम्हीपढत मूर्ख लक्षण समास वाचू शकता.
⭐ पुढच्या रविवारी?
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता —
अजून काही महान लेखक समर्थांना भेटायला येत आहेत.
जर तुम्हाला आमचे पत्र नियमित मिळावे असं वाटत असेल तर:
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा
तोपर्यंत —
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि Ego सोडून देण्यात व्यस्त रहा!
धन्यवाद.


5 Comments
Jayshree Ram🙏🏻
ReplyDeleteखुप छान👌👌
ReplyDeleteओय अजिंक्य...
ReplyDeleteतुस्सी ग्रेट हो...👌🏻👌🏻
योग्य संकल्पना छान शब्दात मांडत आहेस😊🌸
त्यात रियोन हॉलिडे यांचे विचार आणि समर्थांची अनुरूप ओवी हे कार्य तुझ्या कडून समर्थ अत्यंत कुशलतेने करून घेत आहेत.
तुझ्यातील कल्पना शक्तीला नमन🙏🏻😊
श्रीराम समर्थ
थॉट प्रोसेस इज़ इनोवेटिव 👏👏
ReplyDeleteIt’s awesome thought “Ego is enemy” referring to foreign books and long-time ago knowledge given by Samarth. I read all the character of non-sense person attached by you. Many of those related to us by unknowingly or part of habit we are doing those mistakes. When we know our own mistake, we might think to correct it.
ReplyDeleteWhen all the motivational speaker refers only foreign philosophy, you have put forward step to referring our own Hindu mythology writing long ago. It’s new beginning, new era.
Thanks for sharing.