।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
स्वागत आहे पुन्हा एका नवीन पत्रात. मी प्रत्येक आठवड्यात पत्र लिहितो आणि पत्र वाचणारा प्रत्येक जण मला कधी फोन वर, कधी मेसेज वर, कधी भेटल्यावर जसं जमेल तश्या प्रतिक्रिया देतो. मागच्या आठवड्यात एका मागोमाग एक अशा दोन प्रतिक्रिया आल्या की "तुझ्या कॉन्सिस्टनची ची कमाल आहे." वाईट प्रतिक्रिया म्हणजे काही तरी शिकण्याची संधी आणि चांगली प्रतिक्रिया म्हणजे जबाबदारी इतकंच मला समजतं.
तर जबाबदारी वाढली आहे अशी समज असणाऱ्या अजिंक्य कडून पुन्हा एकदा धन्यवाद. माझे पत्र वाचत रहा आणि आपल्या जवळच्या सगळ्यांना वाचायला देतं रहा. मी अनलिमिटेड रविवार पर्यंत पत्र पाठवणार आहे. या अनलिमिटेड ची काही लिमिट असते का?तेच बोलूया आजच्या पत्रात. लेट्स गो!
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी
आता इतकी जुनी गोष्ट काय परत सांगायची असं मला एकदा वाटलं पण आपण सगळे विसरलो आहोत ही गोष्ट म्हणून परत एकदा सांगतो आहे. एक गरीब माणूस होता. त्याच्या कडे एक कोंबडी होती. ती कोंबडी रोज एक सोन्याचं अंड देतं होती. त्याने रोज एक एक असे करत करत बरेच अंडे गोळा केले. तो श्रीमंत झाला. पण एक दिवशी त्याच्या मनात अजून सोन्याचे अंडे पाहिजे असा हव्यास निर्माण झाला. त्याला वाटायला लागलं रोज एकच अंड का? आपण एकदाच कोंबडीला मारून तिच्या मधले सगळे अंडे घेऊन टाकूया. असा विचार करून त्याने त्या कोंबडी ला मारलं. त्या कोंबडीच्या मधे एकही अंड नव्हत आणि त्याला परत कधीही अंड मिळालं नाही.
एक मिळालं तरी अजून पाहिजे पाहिजे अशा वृत्ती ने त्याला जे मिळत होतं ते मिळणं सुद्धा बंद झालं. कोणतीही गोष्ट जास्त मिळवण्याच्या हव्यासाने असलेलं सुद्धा आपण कायमस्वरूपी गमावून बसतो हे या कथेचं तात्पर्य.
इतकी मोठी गोष्ट मी सांगितली पण का? प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे पण आज ह्या गोष्टीच्या उलटं सगळं चालू आहे म्हणून मला परत एकदा सांगावी वाटली.
तुम्ही काय निवडणारं सांगा
मी जर तुम्हाला दोन पर्याय दिले या पैकी तुम्ही काय निवडणार सांगा. पहिला पर्याय तुम्हाला ९९ रुपयांमधे रोज ३ जीबी इतकं इंटरनेट मिळणार आणि दुसरा पर्याय १४९ रुपयात तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट मिळणार. काय निवडणार सांगा? बरेच जण म्हणतील हा काही प्रश्न आहे? आम्ही अनलिमिटेड डेटाच निवडणार.
पण आत्ताच आपण वरच्या गोष्टीत वाचलं ना अति सर्वत्र वर्जावे. मग का आपण अनलिमिटेड इंटरनेट निवडतो? हीच तर मज्जा आहे. मी हे लिहितो आहे सगळं पण माझ्या घरी एक नाही दोन अनलिमिटेड इंटरनेट असलेले कनेक्शन आहेत. इंटरनेट ही काळाची गरज आहे, सगळं जग आता इंटरनेटमय होतं आहे असे डायलॉग्स मी मारू शकतो. पण ते न बोलता मी मला जे समजतं ना ते सांगतो. अनलिमिटेड निवडणे ही तर फक्त सुरवात आहे, चूक नाही.
अनलिमिटेड निवडणे तर फक्त सुरवात आहे
अनलिमिटेड इंटरनेट, कॉल्स किंवा अनलिमिटेड फूड आणि ड्रिंक्स मिळणारे हॉटेल्स, अनलिमिटेड प्रॉफिट होणारे शेअर्स, अनलिमिटेड चित्रपट आणि गाणे ऐकणे, अनलिमिटेड ट्रेन पास, मेट्रो पास. काही रेस्टोरंटस मधे अनलिमिटेड कॉफी असते. अनलिमिटेड ऑनलाईन कोर्स. असं सगळं आपल्याला पाहिजे असतं. मी कधी असा विचार करत नाही म्हणू नका. एकदा त्या जागेवर स्वतःला ठेऊन बघा. एक नाही तर दुसरं प्रत्येकात काही तरी अनलिमिटेड असावं ही भावना असणार हे नक्की.
अरे मग काय करू? सोडून देऊ का? उद्या पासून अनलिमिटेड इंटरनेट बंद, हॉटेल ला जाणं बंद, अनलिमिटेड प्रॉफिट चा विचार बंद! कसं जमेल रे हे? मला अशा वेळेस समर्थ आठवतात. समर्थ कन्सेप्ट क्लिअर करतात म्हणून मला त्यांनी लिहिलेलं वाचायला फार मज्जा येते. आनंद मिळतो. समर्थांनी लिहिलेलं वाचल्यावर मला जाणवलं सध्याच्या जगात अनलिमिटेड निवडणे चूक नाही. अनलिमिटेड घेऊन त्याचा नीट वापर केला नाही तर ती चूक ठरेल. समर्थांच्या एका पत्रात ते म्हणतात.......
अति सर्वत्र वर्जावे । प्रसंग पाहोन चालावे ।
हट निग्रही न पडावे । विवेकी पुरूषे ।।
कुठल्याही गोष्टीचं आपण अति केलं की तिथे माती होतं असते म्हणून "मी आता अनलिमिटेड इंटरनेट प्लॅन बंद करणार, अनलिमिटेड पैसे कमवण्याचा विचार बंद करणार". ही झाली अर्धवट शिकवण. पुढे समर्थ फक्त आठ ते नऊ शब्दा सांगतात प्रसंग पहा मग ठरवा. नको तिथे हट्ट नको आणि विवेकाने विचार करा.
मी जर अनलिमिटेड इंटरनेट घेतले तर मला त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे. हट्ट हा चांगले वाचणे, चांगले ऐकणे हा असावा नुसता वेळ घालवण्याचा नसावा आणि कशात वेळ जातो आणि कशात नाही हा निर्णय घ्यावा. त्या विचार करण्याला आणि चांगला विचार निवडून ती क्रिया करण्याला विवेक म्हणतात. पुन्हा एक उदाहरण सांगतो. अनलिमिटेड फूड मिळते अशा ठिकाणी मी कधी जातंच नाही कारण मला अनलिमिटेड मिळाले की मी अति जेवेल मग माला त्रास होईल म्हणून अति तेथे माती. म्हणून जाणेच नको. हा झाला अर्धवट विचार.
समजा तुमचे कोणी मित्र जे भारताच्या बाहेरून तुमचं शहर बघायला आले आणि तुम्हाला त्यांनी "इथे एखाद्या छान हॉटेल मधे जेवायला घेऊन चल रे" अशी ऑर्डर च सोडली मग काय करणार? घेऊन जा की मस्त हॉटेल ला! तुम्ही रोज घरीच जेवणारे आहात पण कोणीतरी आपलं शहर बघायला आले आहेत ना? त्यांची इच्छा आहे ना? घेऊन चला की त्यांना एका छान हॉटेल मधे. म्हणेजच प्रसंग पाहोन चालावे. मी हॉटेल मधे खातच नाही. हॉटेल मधे पायच ठेवतं नाही. असा हट्ट नको, म्हणजेच हट निग्रही न पडावे. घेऊन जा. खाऊ द्या त्यांना. तुम्ही नका खाऊ. विवेकाने आपण काय खावं, किती खावं, कुठे खावं ठरवा आणि मैत्री मैत्री च्या जागेवर ठेवा. असं केल्याशिवाय मित्र कसे बनणार किंवा नवीन ओळखी कशा होणार? म्हणजे विवेकी पुरूषे.
म्हणून म्हणलं ना समर्थ म्हणजे कन्सेप्ट क्लिअर. डोक्यात प्रश्नच उरतं नाही. कुठलीच गोष्ट अति चांगली नाहीच पण प्रसंग पाहून निर्णय घ्या आणि तो निर्णय हट्टाचा नको तर विवेकाने घेतलेला पाहिजे.
आपण भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि विवेकाने निर्णय घेण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.
नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बोलो शाकम्बरी मैया की जय, सच्चे दरबार की जय, अंबेचा उदो उदो, तुळजाभवानी की जय. 🙏🙏🙏
0 Comments