कंसिस्टन्सी शिकावी शबरी कडून!

 ।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        नमस्कार मी परत एकदा आलो आहे भेटायला. तुम्ही वेळ काढून माझे पत्र प्रत्येक आठवड्यात वाचतात म्हणून खूप खूप धन्यवाद. माझं पत्र तर फक्त निमित्त आहे. आठवड्यातून एकदातरी तुम्ही रामायण, दासबोध अशा विषयांबद्दल काही ना काही वाचत आहात ही फार मोठी सुरवात आहे. नक्कीच अजून काहीतरी चांगलं होईल या मधून. 

        "अरे अजिंक्य मी वाचणंच काय, काही सुद्धा आज सुरु करेन, प्राब्लेम कंसिस्टन्सीचा आहे. काही दिवसात बंद होतं ठरवलेलं." जर तुम्हाला सुसंगती, सातत्य म्हणजेच कंसिस्टन्सी शिकायची आहे ना मग आपण डायरेक्ट वाल्मिकी ऋषींकडून शिकूया. चालेल? लेट्स गो!

शबरी ची प्रत्येकाला माहिती असेलेली गोष्ट

        एक शबरी होती तिने श्री रामांना बोरं खायला दिली अशी गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. मी शबरी चा फ्लॅशबॅक म्हणजे एक भूतकाळ थोड्यात सांगतो जो मी आफळे बुवांचा अयोध्याधीश श्रीराम कथा नावाच्या एका कीर्तनात ऐकला. हा शबरीचा भूतकाळ वाल्मिकी रामायणात नाही पण नंतर ज्या संतानी लिहिला तो फार सुंदर लिहिलेला आहे.  

        भिल्ल जमातीला शबर म्हणतात. अशी एका शबर राजांची मुलगी तिचं नाव शबरी. ती ८ वर्षांची होती. तिच्या कडे असलेल्या बकऱ्या आणि बाकी प्राण्यांसोबत ती अंगणात खेळतं होती . शबरीची आई म्हणाली, "आज खेळून घे. उद्या तुझं लग्न आहे तेंव्हा या सगळ्यांना आपण कापणार आहोत. मेजवानी साठी." हे ऐकून इतकं वाईट वाटलं शबरीला. आपल्या आनंदासाठी ह्यांना मारून टाकणार? हा विचारच सहन झाला नाही. 

    ह्या प्राण्यांचा जीव वाचवायचा असेल तर आपण पळून जाऊया असा विचार करून शबरी रात्री पळून गेली आणि सगळी कोकरे सोडून दिली. कशी तरी लपत लपत मातंग ऋषींच्या आश्रमात आली. तिथलं वातावरण तिला खूप आवडलं. ऋषींनी तिला हळू हळू शिकवलं आणि आश्रमातल्या जबाबदाऱ्या एक एक करत हातात दिल्या. 

        एके दिवशी ऋषी म्हणाले, "आम्ही निघालो आमच्या पुढच्या कार्यासाठी. तू या आश्रमाची इतकी छान काळजी घेतली आहेस की भगवान नारायण तूला दर्शन दिल्या शिवाय आपला अवतार समाप्त करणार नाहीत. मानवी रूपात भगवंताचं दर्शन तूला होणार हे नक्की. अशीच सेवा करत रहा."

आता करूया गणित!

        जेंव्हा शबरी  प्रभू रामचंद्रांना भेटली तिचे वय आहे ९० पेक्षा जास्त. जेंव्हा ती आश्रमात आली होती तेंव्हा तिचं वय आहे ८. गोळा बेरीज पकडा १०. दहा  वर्षाची असताना सांगितलं आणि ९० वर्षाची असताना श्री राम भेटले असं गणित करा. किती वर्ष झाले? १० ते ९० म्हणजे ८० वर्ष. इतक्या वर्षांपूर्वी सांगितलं आणि शबरीने आपल्या गुरूंचे शब्द प्रमाण मानून आश्रमाची सगळी व्यवस्था आणि आश्रमात येणाऱ्या सगळ्या तपस्वी ऋषींची सेवा खूप मन लावून केली. 

    म्हणजे She was super consistent for the 80 years of her life. From the age of 10 to 90! 

        १ जानेवारीला जिम ची घेतलेली मेम्बरशिप वर्षभर पूर्ण न करणारे आहोत आपण आणि एकदा शबरी देवींचा अभ्यास करा म्हणजे समजेल सातत्य, सुसंगती कशाला म्हणतात ते. काय काय नसेल झालं ८० वर्षात पण तरीही आपल्या कामामधलं सातत्य काहीही विचार आणि अडचणी आल्या असतील तरी ते काम थांबवलं नाही. मला नेहमी वाटतं अशा गोष्टी माहिती असल्या की आपोआप आपण त्या स्किल्स शिकायला लागतो. 

        पण या गोष्टी समजण्यासाठी भरपूर वाचन पाहिजे किंवा ज्याला कुठलीही गोष्ट आवडेल अशा पद्धतीने सांगता येते असा व्यक्ती तरी पाहिजे.

काम कसं करावं माहिती?

        शबरीची गोष्ट म्हणजे अत्यंत उत्तम उदाहरणं आहे कसे एखादे हाती घेतलेले काम करावे त्याची. शबरीने आज श्री राम येणार म्हणून फळं तोडली होती असं समजू नका. ती रोज आश्रमाच काम करून रोज फळ तोडून, थोडी बाजूला ठेऊन सायंकाळी भगवंत येतीलच. असा विचार करून नैवद्य दाखवतं होती. नाही आले की रडत होती. असं किती वर्ष? ऐंशी.  

        मला माहिती ह्या गोष्टीमध्ये नवविधा भक्ती कशी असते हे श्रीराम शबरी ला समजावून सांगतात हे सगळं आहे. पण थोड्या वेळ ते सगळं बाजूला ठेवून आपण कंसिस्टन्सी  समजून घेऊया का? आपण नाही का कथेचं तात्पर्य ऐकतो पण ते तात्पर्य आजच्या जगण्यात, आजच्या चोवीस तासात तू कुठे वापरलं का हा प्रश्न स्वतःला विचारायचे विसरतो. तोच हा प्रकार. 

        ज्याला काढायचा आहे तो चांगला वाईट कुठलाही अर्थ कुठल्याही गोष्टी मधून घेऊ शकतो. पण आपल्या सगळ्यांच्या कामाचा आहे सातत्याने एखादे काम करण्याचा अर्थ. तो समजला आणि रोज वापरला की झाल ना. कशाला गूढार्थ आणि आजू अवघड अवघड अर्थ पाहिजे? ही गोष्ट ऐकल्या ऐकल्या पुढच्या क्षणापासून माझं काम मी कसा वर्षोनुवर्षे शक्य तितकं उत्तम करेल हा विचार येऊन या वर कामं व्हावं. बस्स. समजली तुम्हाला गोष्ट. 

आपण भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात कंसिस्टन्ट रहाण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.























Post a Comment

0 Comments