।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
प्रत्येक आठवड्यात वेळ काढून माझं पत्र वाचणाऱ्या सर्व मित्रांना मनापासून धन्यवाद.
आणि माझं पत्र इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्यांना खास नमस्कार. रविवार आला की माझं पत्र आलंच समजा. कारण मी पत्र लिहितो म्हणजे मी जिंकत असतो.
“लिहिणं म्हणजे जिंकणं कसं?”
तेच आजच्या पत्रात बोलूया. Let’s go!
एकदम क्लिक झालं…
खरं सांगायचं तर, मी सुद्धा तुमच्यासारखाच रोज काहीतरी शिकत असतो.
पण कधी कधी एखादी साधी गोष्ट अचानक डोक्यात “क्लिक” होते…
आणि वाटतं — ही फक्त मनात ठेवायची नाही, शेअर करायची.
म्हणूनच, अशी एक “क्लिक” झालेली गोष्ट मी तुमच्यासमोर मांडणार आहे.
जिंकलेला माणूस कसा विचार करतो?
मला जिंकलेल्या लोकांचे इंटरव्ह्यू बघायला खूप आवडतात.
त्यातून एक गोष्ट नेहमी लक्षात येते —
ते म्हणतात,
“आज जिंकलो म्हणून काही वेगळं वाटत नाही…
कारण मी हे जिंकणं रोज माझ्या मनात पाहिलं आहे.”
हे किती खरं आहे?
१००% खरं.
आपण जसं सतत विचार करतो, आपण तसंच बनत जातो.
हे वाक्य प्रत्येकाला समजतं. पण रोजच्या धावपळीत विचारांना दिशा देण्याचा वेळ कोणाकडे आहे? रोजच्या धावपळीत त्यासाठी वेळच मिळत नाही.
मग उपाय काय?
रोज फक्त ५ गोष्टी जिंकायच्या
मोठं यश मिळवायचं असेल, तर काहीही मोठं करण्या आधी रोज छोटे छोटे विजय मिळवायचे.
1. शारीरिक विजय (Physical Win)
आपलं शरीर हेच आपलं खरं भांडवल आहे.
थोडं चालणं, धावणं, व्यायाम — काहीही करा…
पण रोज शरीरासाठी काहीतरी करा.
👉 “आज मी माझ्या शरीरासाठी काहीतरी चांगलं केलं” — बस्स!
2. मानसिक विजय (Mental Win)
मेंदूला रोज नवीन काहीतरी शिकायला हवं.
वाचन, लेखन, नवीन skill — काहीही चालेल. इथे वाचन आणि लिहिणं करून रोज जिंकत असतो.
👉 फक्त १० मिनिटं वाचलं तरी दिवस जिंकला.
3. आध्यात्मिक विजय (Spiritual Win)
मन शांत नसेल, तर काहीच टिकत नाही.
प्रार्थना, ध्यान, स्वतःशी संवाद…
👉 दिवसात ५ मिनिटं शांत बसणं — मोठा बदल घडवू शकतं.
4. आर्थिक विजय (Financial Win)
पैसे कमावणं महत्त्वाचं आहेच…
पण त्याचं योग्य नियोजन त्याहून महत्त्वाचं. इन्व्हेस्ट असो किंवा सेव्ह.
👉 “आज मी पैशांबद्दल एक योग्य निर्णय घेतला ही भावना महत्वाची.”
5. नातेसंबंधांचा विजय (Relationship Win)
जीवनात माणसं असली तरच आनंद असतो.
फोन करा, गप्पा मारा, ऐका, धन्यवाद बोला, माझ्या पत्रांना रिप्लाय करा…
👉 एका व्यक्तीला खुश केलं — दिवस सार्थक.
शेवटी म्हणायचं इतकंच आहे मला
आपण नेहमी वाट बघतो —
“एक दिवस येईल… आणि मी मोठं काहीतरी करेन.”
पण खरं सांगायचं तर, तो “एक दिवस” कधीच येत नाही.
तो आपणच बनवतो…
दररोज, छोट्या छोट्या निर्णयांमधून.
आज जर तुम्ही उठून ५ छोट्या गोष्टी जिंकल्या,
तर तुम्ही आधीच त्या मोठ्या जिंकण्याच्या मार्गावर आहात.
मोठं यश अचानक मिळत नाही…
ते रोजच्या छोट्या विजयांचं जमा व्याज असतं.
म्हणून स्वतःला विचार —
“आज मी काय जिंकलो?”
उत्तर मोठं नसावं…
पण प्रामाणिक असावं.
कारण शेवटी,
जिंकणारे लोक वेगळं काही करत नाहीत…
ते फक्त रोज जिंकत राहतात.
म्हणून आजच ठरवा —
मोठं जिंकायचं नाही…
रोज जिंकायचं.
हा होता "एकदम क्लिक झालं" चा पहिला भाग. आवडलं तर सांगा कधी कधी असे पण पत्र लिहितं जाईन.
आपण भेटूया पुढच्या रविवारी
पुन्हा एका नवीन गोष्टीसोबत।
तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि रोज जिंकण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद 🙏
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

16 Comments
खरंच छान 🙏 भावेल आणि रुचेल पटेल असा सुंदर लेख.. 👌👌👌 असेच लिहिते रहा...
ReplyDeleteThank you
DeleteMast👍🏼
ReplyDeleteThank you
DeleteInteresting topic 👍👍
ReplyDeleteHave a blessed day 😊😊
Thank you
DeleteKhup chan 👍🏻👍🏻
ReplyDeleteThank you
Deleteमोठ जिकांयच नाहि रोज जीकांयच👌👌👌👌रोजच्या पाच सवयि खुप छान
ReplyDeleteखूप छान. जय श्रीराम.
ReplyDeleteखूप मोठी गोष्ट पण किती सुंदर आणि अप्रतिम पणे सांगितलीत.
ReplyDeleteआवडलं.
कुठलीही ही गोष्ट पूर्ण होण्यास एक पहिला छोट पाऊल उचलणं आवश्यक असतं.
खूप सुंदर विचार.
👌🏻👏☝️👍🏻
खुप छान 👌👌🙏🙏
ReplyDeleteरोज जिंकण्यात व्यस्त आणि मस्त राहू. धन्यवाद.
ReplyDeleteएकदम मस्त 👍🏻
ReplyDeleteतू सांगितलेल्या दोन तीन गोष्टीत तरी मी रोज विजय मिळवते असं वाटतं मला.त्यामुळे स्वतः बद्दल जरा छान वाटतय😀..पण आता बाकी दोन गोष्टींचाही विचार नक्कीच करत जाईन आणि रोजचे छोटे छोटे विजय celebrate पण करेन स्वतःच😀
अजिंक्य तू आजही जिंकलास कारण पत्र लिहून तो सगळ्यांना जिंकलस.... पाचही बुलेट पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचा रोज उपयोग केला तर नक्कीच जिंकण्याकडे वाटचाल करता येईल...
ReplyDeleteअसंच छान छान लिहित रहा जिंकत रहा
धन्यवाद
मोठे यश मिळवायचं असेल, तर काहीही मोठं करण्या आधी रोज छोटे छोटे विजय मिळवायचे.
ReplyDeleteखूप छान वाक्य ,पत्र पण छान👍🏻