।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आला परत एक रविवार आणि आपल्या virtual (आभासी) गप्पा मारण्याची वेळ झाली.
तुमचे प्रत्येकाचे रिप्लाय (प्रतिक्रिया) मला खूप आवडतात. मला त्या प्रतिक्रिया पण आवडतात जेंव्हा तुम्ही माझी भेट झाली की मला सांगतात,
“अरे मी ग्रुपवर किंवा तुझ्या पत्राला कॉमेंट करत नाही, पण आवर्जून वाचतो.”
आज त्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद, जो काही कारणामुळे कमेंट करत नाही.
(कदाचित मोबाईलवर तितक्या पटकन लिहिता येत नसेल, जमत नसेल, राहून जात असेल)
पण भेटल्यावर मला आठवणीने सांगतो की पत्रामधलं काय आवडलं.
कमेंट आणि शेअर करणाऱ्यांना वेगळा नमस्कार,
कारण तुमच्यामुळे माझ्या बडबडीला गप्पांचं स्वरूप येतं.
आजच्या पत्रात बघूया—ग्रंथ का वाचावेत? असं काय मिळणार आहे सगळ्या ग्रंथांमध्ये? Let’s Go!
🤔 आपल्याला गोष्टी का आवडतात?
आज हॅरी पॉटर असेल, बॅटमॅन, स्पायडर मॅन असेल, धुरंधर असेल—
कुठलीही गोष्ट एखाद्याला का आवडते?
कारण ती गोष्ट अनुभवणारा व्यक्ती स्वतःला त्याच्या मध्ये बघत असतो.
याचे दोन फायदे—
👉 मनोरंजन
👉 नकळत मिळणारी शिकवण
उदाहरणार्थ, श्रीराम आणि रावण ह्यांची गोष्ट वाचल्यानंतर लहान मुलगा सुद्धा म्हणतो—
“मी मोठा होऊन श्री रामांसारखा होणार. रावणासारखा नको.”
हे कोणी सांगितलेलं नसतं.
त्याने स्वतः अनुभव करून निर्णय घेतलेला असतो.
अशा प्रकारे आपल्याला व्यक्तिरेखा आवडायला लागतात…
आणि आपण नकळत त्यांच्यासारखा विचार करायला लागतो.
⭐ “फॅन” होणं म्हणजे नेमकं काय?
आपण कोणाचे तरी फॅन असतो.
“फॅन झालो” म्हणजे—
आपण स्वतःला त्या गोष्टीत कुठेतरी पाहिलं आहे
आणि नकळत त्यातून काहीतरी शिकतो आहोत.
मग प्रश्न असा आहे—
👉 हे फॅन कुठल्यातरी कल्पनेतल्या characters चे असण्यापेक्षा
👉 आपण छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम, श्रीकृष्ण ह्यांचे फॅन व्हायला नको का?
🎬 चित्रपट vs वास्तव
लोकं नक्कीच ह्यांचे फॅन होत आहेत…
पण त्यात चित्रपटांचा मोठा वाटा आहे.
पण एक साधी गोष्ट समजून घ्या—
चित्रपट बनतो पैशासाठी.
कोणी ३०० कोटी लावत असेल,
तर त्याचा पहिला विचार असतो—
👉 “माझे पैसे कसे परत येतील?”
मग काय होतं?
मग आता जर पैसे कमवायचे आहेत तर नक्कीच काही तरी उलटं सुलटं दाखवणारं. त्याला नंतर त्याला क्रिएटिव्ह लिबर्टी नाव देणार आणि तो चित्रपट जास्तीत जास्त विकण्याच्या प्रयत्न करणार. हे करण्यात चूक नाही काही. पण या गडबडीत जे कोणी ग्रंथ वाचत नाही त्यांना खरी गोष्ट समजतच नाही. त्यांना अजूनही वाटतं अल्लाहुद्दिन खिलजी ने खलिबली गाण्यावर डान्स केला होता. कारण वाचन नाही.
मी मागच्या पत्रात म्हणालो होतो तसं चित्रपटाला चित्रपटाच्या जागेवर ठेवायचं. जास्त सिरीयस घायचं नाही. आवडलं तर सगळ्यांना सांगायचं नाही तर सोडून द्यायचं. आपलं लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा श्री रामांचा चित्रपट कसा वाईट बनवला आहे हे वर्णन करून सांगण्यापेक्षा त्यांचे ग्रंथ वाचून जसे आहेत तसे आपल्या ओळखीच्यांना सांगण्यात घालवावा.
🙏 श्रीराम — मर्यादा पुरुषोत्तम कसे झाले?
आपल्याला श्रीराम म्हणजे “परफेक्ट” वाटतात—
👉 परफेक्ट राजा
👉 परफेक्ट पुत्र
👉 परफेक्ट व्यक्तिमत्त्व
पण ते जन्मापासून तसे होते का?
नाही.
तेही शिकले…
संकटांना सामोरे गेले…
आणि त्यातून घडले.
📚 योगवासिष्ठ — एक वेगळा दृष्टिकोन
याचं उत्तर एका ग्रंथात आहे—योगवासिष्ठ।
हा ग्रंथ फारसा लोकांना माहित नाही।
एका प्रसंगी श्रीराम खूप खिन्न झाले।
त्यांना वाटलं—
“हा संसार दुःखाने भरलेला आहे…
मग काहीही का करायचं?”
आजच्या भाषेत—
👉 हे “डिप्रेशन” सारखं होतं
तेव्हा वसिष्ठ ऋषींनी त्यांना मार्ग दाखवला।
वसिष्ठ ऋषींनी त्यांना समजावलं हे वाचून बघा किंवा युट्युब वर ऐकून बघा. मी इथे खाली योगवासिष्ठ ग्रंथ समजावून सांगणारे व्हिडिओ देतो आहे.
✅ ग्रंथ वाचण्याची दोन कारणं
आपल्याला ज्या व्यक्तिरेखा आवडतात, आपण त्याच्यासारखं व्हायचा प्रयत्न करतो. हिरो संकटात काय करेल याचा विचार आपण नकळत करतो. त्यामुळे ग्रंथ वाचून आपल्याला योग्य हिरो आणि विचार मिळतो.
आपली संस्कृती खरी समजली पाहिजे. आजकाल चित्रपट येतात, पण ते आपल्या पद्धतीने बदल करून दाखवतात. कधी कधी चुकीची माहितीही मिळते. चित्रपटाला दोष न देता मूळ ग्रंथ वाचणं गरजेचं आहे.
🧪 छोटा प्रयोग
पुढच्या रविवारपर्यंत—
👉 दररोज थोडा वेळ ग्रंथ वाचा
👉 आणि बघा—चित्रपटात दाखवलं ते खरंच आहे का?
आपण भेटूया पुढच्या रविवारी
पुन्हा एका नवीन गोष्टीसोबत।
तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा
आणि ग्रंथ वाचण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद 🙏
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

0 Comments