सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
मागच्या आठवड्यातील माझ्या आवडत्या श्लोकावरील पत्र तुम्हा सर्वांना आवडले. तुमचे प्रतिसाद खूप काही सांगून गेले. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आता अजून काही रविवार आपण आवडत्या श्लोकांबद्दलच बोलूया. पत्र सुरू करण्यापूर्वी तुमच्या प्रत्येकाचे मनापासून आभार. पत्र वाचून प्रतिक्रिया देणाऱ्यांचे खास आभार, आणि पोस्टमन बनून हे पत्र आणखी काही जणांपर्यंत पोहोचवणाऱ्यांचे विशेष आभार.
आज पाहूया, सद्गुरुंची कृपासावली आपल्या पाठीशी नेहमी राहावी यासाठी काय करावे. याचे अतिशय सुंदर उत्तर या श्लोकात दिलेले आहे. Let's go!
एका महिन्यापासून आवडायला लागलेला श्लोक
रोज तो श्लोक कानावर पडत असल्याने उत्सुकता वाटली. चौकशी केल्यावर समजले की क्लास घेणारे सर आणि मॅडम हे श्री पारनेरकर महाराजांचे अनुग्रहित आहेत आणि त्यांच्या उपासनेतील हाच श्लोक ते मुलांकडून रोज म्हणवून घेतात.
रोज ऐकता ऐकता श्लोक पाठ झाला. नंतर त्याचा सखोल अर्थ समजून घेतला आणि तेव्हापासून हा श्लोक माझ्या आवडत्या श्लोकांच्या यादीत सामील झाला.
तो श्लोक पुढीलप्रमाणे आहे.
हा श्लोक रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या उपासनेतील एक महत्त्वाचा श्लोक आहे.
लोकसंग्रहाबद्दल महाराज सांगतात की, भगवद्गीतेतही याचा उल्लेख आहे. जसा मासा पाण्यात असताना महत्त्वाचा असतो आणि पाण्याबाहेर त्याचे महत्त्व शून्य होते, तसेच लोकसंग्रह करताना लोकांच्या मतांचा आदर केल्याशिवाय चालत नाही. लोकांच्या मतांना किंमत दिली नाही, तर आपलेही महत्त्व कमी होते. म्हणून लोकसंग्रह करताना प्रत्येक मताचा आदर करा, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक.
कालज्ञान म्हणजे काळाचे ज्ञान. साध्या भाषेत सांगायचे तर टाइम मॅनेजमेंट. काळाचे योग्य नियोजन करून नियमित प्रभूची उपासना करा. "मला जप करायला किंवा पारायण करायला वेळ नाही" हे कारण आपण नेहमी देत असतो. पण महाराज सांगतात की, काळाचे ज्ञान घेऊन वेळेचे व्यवस्थापन शिका आणि प्रभूची उपासना करा. कारण हीच साधना आपले भाग्य उजळवणारी असते.
या सहा सवयी म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर कला आहे. जो कोणी या सवयी विश्वात, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल, त्याच्यावर सद्गुरु रामचंद्र प्रभूंची कृपा आणि आशीर्वाद सदैव राहतील.
एक दासबोधमधली ओवी सांगतो!
दासबोधात एक ओवी आहे. दशक १२, समास २, प्रत्ययनिरूपण. या समासातील २३ वी ओवी आहे.
समर्थ म्हणतात, सगळं काही आपल्यामध्येच आहे. दुसऱ्यांना दोष देऊ नका, दुसऱ्यांवर बोट दाखवू नका. हीच गोष्ट मनाला क्षणोक्षणी शिकवावी लागते.
आता मनाला शिकवणे म्हणजे आपण रोज बसून, "ऐक रे मना, दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही. चूक तुझीच आहे," असे सांगू शकत नाही. पण हीच शिकवण एखाद्या श्लोकातून रोज मनावर बिंबवता येत असेल तर? मन हळूहळू आपोआप वळते. म्हणूनच समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. मनाचे नियम सुद्धा लिहिता आले असते. पण आपल्या मनाला नियम फारसे आवडत नाहीत. श्लोकांच्या स्वरूपात सहज मिळालेली शिकवण मात्र मन लक्षात ठेवते.
पारनेरकर महाराजांचा हा श्लोक रोज म्हटला की आपल्याला नकळत आठवण होत राहते – आपल्या कामात निपुण व्हायचे आहे, साधनेसाठी वेळ काढायचा आहे, कष्ट करून भाग्य आपल्या बाजूने करून घ्यायचे आहे, अंगी योजकता आणि शिस्त आणायची आहे, लोकमताचा आदर करून लोकसंग्रह करायचा आहे, कालज्ञान शिकून वेळेचे योग्य नियोजन करायचे आहे. या सहा गोष्टी ज्याने जीवनात आणल्या, त्याच्यावर सद्गुरु रामचंद्र प्रभूंची कृपा नेहमी राहील.
आता प्रश्न पारनेरकर महाराजांचा श्लोकाचा नाही. तुमचे जे कोणी गुरु असतील, स्वतःला विचारून बघा. या सहा गोष्टी जर तुम्ही नियमितपणे आचरणात आणल्या, तर गुरूंचे आशीर्वाद तुमच्यावर असणार की नाही? नक्कीच असतील.
दासबोधातील सद्गुरू समासात समर्थांनी याच विषयावर आणखी काही ओव्या लिहिल्या आहेत. या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात की पंचमहाभूतांनी बनलेली ही सृष्टी नाशिवंत आहे. फक्त सद्गुरुंचे स्वरूपच शाश्वत आणि अविनाशी आहे.
थोडक्यात काय तर सद्गुरु हे एक तत्त्व आहे. ते आधीही होते आणि पुढेही राहील. कोणाला सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांच्यामध्ये दिसतात, कोणाला रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्यामध्ये, कोणाला समर्थ रामदास स्वामी यांच्यामध्ये, तर कोणाला स्वामी समर्थ यांच्यामध्ये. पण तत्त्व एकच आहे. त्यामुळे "तुमचे सद्गुरु कोण आणि माझे सद्गुरु कोण?" हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपण जगतो आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
हा मला नुकताच आवडलेला श्लोक आहे. त्याचा मला जो अर्थ समजला, तो मी तुमच्यासमोर मांडला. माझ्या समजुतीपेक्षा या श्लोकांचा आणखी काही मोठा किंवा वेगळा अर्थ असेल, तर तो मला नक्की कळवा. मला पुन्हा अभ्यास करायला आनंदच होईल.
भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि निपुणतेमध्ये मित्र शोधण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद.

0 Comments