Where Self-Help Meets Dasbodh – Part 2

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        मागचा आठवडा होता दुसरा जेव्हा अजून एक नवीन लेखक समर्थांना भेटले. मागच्या २ आठवड्यात एकदा स्टिफन कोवे आणि नंतर रायन हॉलिडे हे दोघे समर्थांकडून इंस्पायर झाले आणि त्यांनी पुस्तकं लिहिले ते आपण बघितलं. या आठवड्यात बघूया कोण नवीन लेखक भेटतो ते!

        माझ्या मागच्या पत्राला भरभरून प्रतिसाद दिला आणि ते पत्र मोठ्या मनाने एक पोस्टमन बनून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवलं म्हणून धन्यवाद. पोस्टमन बनून म्हणजे स्टेट्स ला ठेवलं, ओळखीच्यांना पाठवलं हे सगळं. आपली ओळख असेल म्हणून तुम्ही शेअर केलं, आवडलं म्हणून शेअर केलं किंवा दासबोध एका वेगळ्या पद्धतीने कळावा म्हणून शेअर केलं. काहीही कारण असेल. पण या प्रयत्नाला मनापासून धन्यवाद. वेळ काढून मला रिप्लाय करणाऱ्यांना वेगळा धन्यवाद.

        आज जेम्स क्लिअर ह्यांना कुठलं पुस्तक लिहावं हे क्लिअर होतं नाहीये. बघूया त्यांना दासबोधामधून कसा मार्ग मिळतो. लेट्स गो!

जर मागचं पत्र वाचणं राहिलं असेल तर ही आहे लिंक. Where Self-Help Meets Dasbodh!

आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावं असं वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.

जुने सगळे पत्र वाचायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. Thoughts Become Things.

🔆 Atomic Habits

        James Clear हे अमेरिकन लेखक आणि behavioral psychology चे तज्ञ आहेत. त्यांचे काम मुख्यतः "मानवी सवयी कशा बनतात? बदल कसा होतो? लहान सवयी मोठे परिणाम कसे देतात?" यावर आधारित आहे. त्यांचा weekly newsletter जगभरात 2 million+ subscribers वाचतात. ते जगातील सर्वात प्रभावी self-help लेखकांपैकी एक मानले जातात.

        आजही Amazon वर #1 Best Seller म्हणून टिकून आहे. हे पुस्तक का एवढं famous? कारण ते एक मोठं truth शिकवतं:

👉 "Tiny changes… Remarkable results." (छोट्या सवयी = मोठे बदल)

        जेम्स क्लिअरला कळलं की रायन हॉलिडे आणि स्टीफन कोवे यांना एक उत्तम विचार मिळाला, त्यांनी त्यावर पुस्तक लिहिलं आणि ते खूप विकलं. जेम्स म्हणाला, “मला पण लिहायचं आहे, तुमचा अनुभव सांगा.”

स्टीफन कोवे हसून म्हणाले, “तुलाही सापडेल तुझा विचार. हे घे—हा ग्रंथ. फक्त घरात ठेवलं तरी आयुष्य बदलतं.”

जेम्स म्हणाला, “मग वाचून तर नक्की बदल होईल”, आणि त्याने तो ग्रंथ पूर्ण वाचला. त्यानंतरच त्याने Atomic Habits लिहायला सुरुवात केली.

सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायची—
दासबोधात परमार्थ, भक्ती, भगवदभजन आहेच, पण त्यात खूप व्यवहारिक ओव्याही आहेत.
आणि Atomic Habits हे पुस्तक पूर्णपणे व्यवहारातील यशासाठी—काय केलं पाहिजे, सवयी कशा लावायच्या—यासाठी आहे.

परमार्थिक यश हे प्रापंचिक (जॉब, बिझनेस, अभ्यास, दैनंदिन अडचणी) यशापेक्षा कित्येक पट मोठं आणि कठीण.
जर दासबोध वाचून आपण परमार्थिक यश मिळवलं, तर रोजचं प्रापंचिक यश तर मग सहजच मिळतं.

ही दोन्ही पुस्तकं—दासबोध आणि Atomic Habits—यांतलं एक सुंदर साम्य आपण पाहूया.
बाकी तुम्ही ठरवा, रोजच्या जीवनात कोणत्या सवयी आणायच्या ते.

समजून घेणे = यश (Understanding = Success)

हें तों प्रगटचि आहे ।पाहिल्याविण कामा नये ।
समजणें हा उपाये । प्राणिमात्रांसी ।।

नीट जाणून घेतल्याशिवाय कुठलेही काम नीट होत नाही, ही गोष्ट प्रगटच आहे. म्हणून कुठलीही गोष्ट समजून घेणे हाच सर्व प्राणिमात्रासाठी उपाय आहे.

समजले आणी वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले ।

यावेगळे उरले । तें करंटे पुरुष ।।

जे कोणी कुठल्याही विषयाची नीट माहिती करून घेऊन त्याप्रमाणे वागतात, ते पुरुष भाग्यवान होत. याशिवाय जे इतर असे करीत नाहीत, ते करंटे, भाग्यहीन जाणावेत.

जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव ।

समजलें पाहिजे, उपाव । प्रगटचि आहे ।।

जितका व्याप आपण वाढवू, त्याप्रमाणे वैभव प्राप्त होते. जसे वैभव प्राप्त होईल, तसे त्याचे बोलणे-वागणे असते. म्हणून नीट समजून वागणे हाच यासाठी उपाय आहे.

        दासबोध म्हणतो "समजणें हा उपाये, समजले आणि वर्तले तेच भाग्यवान" आणि James Clear म्हणतात "Awareness first, then change. Understand your systems and habits." दोघेही समजून घेण्यावर आणि मग त्याप्रमाणे वागण्यावर भर देतात.

        जेम्स क्लिअर अगदी क्लिअर सांगतात जो पर्यंत तुम्हाला समज नाही तो पर्यंत बदल होणे शक्य नाही. त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे की नवीन सवयी लावायच्या असतील तर आधी ज्या सवयी आहेत त्या लिहून काढा. हे पहिल्यांदा पचतच नाही. मला सकाळी लवकर उठायचं आहे तर मी अलार्म लावतो ना ५ चा. मी रोज उशीरा उठतो हे का लिहिलं पाहिजे? समजणें हा उपाये । आपण उशीरा उठतो हे Subconsciously माहिती आहे त्याला conscious करण्यासाठी लिहायचं.

        जेम्स क्लिअर एक ओळ परत परत लिहितात. "You do not rise to the level of your goals. You fall to the level of your systems. Your system is the collection of daily habits that will get you there."

२०२६ हे माझ्यासाठी खराब वर्ष असलं तर?

        असा प्रश्न खूप जणांना असतो. माझं हे वर्ष इतकं वाईट गेलं आहे की आता पुढचं कसं जाणारं काय माहिती? समर्थांच्या ही भरपूर ओव्या आहेत आणि जेम्स क्लिअर पण खूप काही सांगतात. पण मी हे सगळं एका वाक्यात सांगतो. मी पण ही ओळ कुठे तरी वाचलेली आहे.

Keeping Good Habits on Bad Days, Attract Good days.

वाईट दिवसात चांगल्या सवयी ठेवल्या तर त्या सवयी चांगले दिवस ओढून आणतात.

        म्हणून आपल्याला फक्त चांगल्या सवयींमधे राहायचं आहे. आपल्याला आपल्या आयुष्याचे चांगले दिवस आपोआप ओढून आणता येतात. या चांगल्या सवयी कुठल्या आहेत त्या समजून घेण्यासाठी हे ग्रंथ आणि पुस्तकं वाचायचे असतात. नाही वाचले तर मोठे मोठे बिझनेस करणारे बिझनेसमन आपल्याला त्यांच्या प्रॉडक्ट्सची, त्यांच्या सर्विसची, त्यांच्या पदार्थांची, त्यांच्या औषधांची सवय लावतात.

        काही जणांना माझे पत्र रविवारी वाचण्याची सवय लागली आहे. उत्तम. वाचण्याइतकी चांगली सवय कुठलीही नाही. नको ते प्रॉडक्ट्स, सर्विस, औषध, पॅकेज फूड ह्या सवयींपेक्षा आपण समर्थांचा दासबोध आणि जेम्स क्लिअर सारख्या व्यक्तींचे पुस्तकं वाचणे, व्यायाम करणे, मित्रांना भेटणे, नवीन मित्र बनवणे ह्या सवयी लावून घेऊया.

        तुम्ही पण इंग्रजी नवीन वर्षात काही नवीन सवयी सुरु करणार आहात तर मला नक्की कळवा. चला मग नवीन वर्षात ह्या ओव्या समोर ठेऊन आपले आपले काम आणि सवयी ठरवूया.

आळस उदास नागवणा ⁠। आळस प्रेत्नबुडवणा ⁠।

आळसें करंटपणाच्या खुणा ⁠। प्रगट होती ⁠।⁠।⁠ १२ ⁠।⁠। 

म्हणौन आळस नसावा ⁠। तरीच पाविजे वैभवा ⁠।

अरत्रीं परत्रीं जीवा ⁠। समाधान ⁠।⁠।⁠ १३ ⁠।⁠।

समर्थ म्हणतात

        आळसामुळे माणसाला कधी सुख लाभू शकत नाही. तो उदास होतो. सर्व प्रकारे तो नागवला जातो. आळसामुळे प्रयत्न केलाच जात नाही आणि अखेर करंटेपणाची लक्षणे आळशी मनुष्याच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागतात. म्हणून माणसाने कधी आळस करू नये. आळस सोडून उद्योग केल्यानेच वैभव प्राप्त होते आणि जीवाला इहलोकी आणि परलोकी समाधान प्राप्त होते.

⭐ पुढच्या रविवारी?

पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता — अजून काही महान लेखक समर्थांना भेटायला येत आहेत.

जर तुम्हाला आमचे पत्र नियमित मिळावे असं वाटत असेल तर:

 👉 WhatsApp ग्रुप Join करा 

👉 Email Newsletter Join करा

तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा आणि चांगल्या सवयी लावून घेण्यात व्यस्त रहा! धन्यवाद.





Post a Comment

5 Comments

  1. पत्र खुप छान आळसाला झटकलेच पाहिजे👍🏻

    ReplyDelete
  2. Khup chan ajinkya👍🏼

    ReplyDelete
  3. खूप छान अजिंक्य. 👌

    ReplyDelete
  4. खूप छान समजून सांगितलं आहे.
    जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏

    ReplyDelete
  5. भारीच👍🏻😊

    ReplyDelete